Submitted by अभय आर्वीकर on 29 July, 2010 - 10:16
ती स्वप्नसुंदरी
'सात' खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी
जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
.
. गंगाधर मुटे
………………………………….…
गुलमोहर:
शेअर करा
जिंकून मीच हरतो, ना जिंकतो
जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी
अर्थ नाही कळाला !!
अनिलजी,
लवाद आणि पंच (तसेच कायदे करण्याचे अधिकार ) तुमच्या अखत्यारीत आहे.
त्यामुळे माझे खरे असूनही ते खरे मानले जात नाही. जिंकलो तरी विजेता घोषीत केले जात नाही,
तुमच्या बाजुने पंच असल्याने तुम्ही सदैव रडीचा डाव खेळून मला पराजित करता आहात.
आणि जर हरलो तर पराभुतच असतोच असतो.
असा काहीसा अर्थ.
............................................................................
अवांतर;
या कृषिप्रधान देशात शेतकर्यांचे कायदेशिर हितसंबंध जोपासू शकेल, असा एकही कायदा नाही.
शेतीसंबधित सर्व कायदे शेतकर्याच्या लुटीसाठी उपयुक्त आहेत.
किंबहूना शेतीचे शोषण करण्यासाठीच आहे.
त्यामुळेच
ओली पडो की सुकी, मरण शेतकर्यांचेच असते.
मुटेजी, धन्यवाद ! तुमचा इतका
मुटेजी,

धन्यवाद !
तुमचा इतका अभ्यास बघुन मी तर अचंबित झालो आहे !
शेती करून मालक होणेच
शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
.
भिडला.
Pages