सचित्र बारा गटग (वृत्तांताशिवाय) - जुलै २०१०

Submitted by Adm on 28 July, 2010 - 23:30

बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला. Wink

देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!

IMG_7390.JPG

सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या.. Happy

IMG_7391.JPG

सिंडीने आणलेल्या जिलब्या..

IMG_7392.JPG

वृंदाताईंनी आणलेला दहीभात..

IMG_7393.JPG

दहीभाता बरोबर तळलेल्या मिरच्या.

IMG_7395.JPG

बुवांनी आणलेलं चिकन.. ऑस्सम होतं !

IMG_7394.JPG

शोनूने तळलेले मासे.. मला एव्हडेच मिळाले.. Sad

IMG_7396.JPG

लालूचे रॉकींग बटाटेवडे.. नशिब इतके तरी उरले आम्ही पोहोचेपर्यंत !

IMG_7397.JPG

बुवांच्या हॅपीबड्डेचा केक.. पिपाण्यांचा फोटो नाहिये Happy

IMG_7406.JPG

वृंदाताईंनी केलेले मलाई सँडवीच.. अमेझिंग होते !!!!

IMG_7410.JPG

"लालूच्या रावणपिठल्यापेक्षा माझं जास्त टेस्टी आणि फोटोजनिक होतं" असं सिंडीने सांगितल्याने त्याचा फोटो काढायचा राहिला. Proud

माणसांचे फोटो सगळ्यांना मेल करतो.. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोरदार फोटो आहेत...अंबाडी ला इंग्रजीत काय म्हणून शोधायचं श्टोर मधे गेल्यावर? दक्षिण गोलार्धात शोध घ्यायला हवा कुठे मिळते त्याचा

धन्यवाद सायो. सगळ्यांना सप्रेम नमस्कार. बाराबाफ चा पसारा वाढलेला दिसतोय, आणि खादाडी साठी वेगळा बाफ! मज्जा आहे की

अमेय, नाही. २४ ला एवेएठि झालं तिथल्या खादाडीचे फोटो आहेत हे.
पार्ल्यात अगत्याने येण्याचे करावे. जिथे कुठे असशील तिथल्या शेजारणी बर्‍या आहेत ना? Wink

बरं बरं... पार्ल्यात गेलो तर शेवटचं पोस्ट १२ जुलै चं दिसलं आणि सगळी नावं ही नवीन. "पार्लं बदललं हो बाकी" Happy
शेजारणी काळ्या की गो-या तेही ठाऊक नाही इथे. आणि वर हे "निवडक १० त नोंदवा" काय आहे? कसलं बक्षिस आहे का लागणार?

सापडला! (ह्यावरून आठवलं, मी पुण्यात जाऊन "हुडकलं" असं म्हटलं होतं पूर्वी तर लोक हसले होते, शोधलं ला हुडकलं का म्हणतो म्हणून)

Pages