मासे १२) जवळा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 July, 2010 - 05:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जवळा एक किंवा दोन वाटे,
बेसन १ ते दिड वाटी
१ कांदा बारीक चिरुन
आल लसुण, पेस्ट
२-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे बारीक मासे, छोट्या चिंबोर्‍या असु शकतात ते काढायचे.
तेल वगळून वरील सगळे जिन्नस एकत्र करावे. पाणि घालु नये. मग चपट्या वड्या करुन तव्यावर शॅलो फ्राय करायच्या.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात तुम्ही आवडीनुसार गरम मसाला घालू शकता.
लसूण कापुन घातल तर अजुन चांगल्या लागतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. मस्तच रेसिपी.. जवळे ..म्हंजे कळदी..कलदी.. नं?? अय्यो.. आता नक्की नांवही आठवत नाहीये..

Pages