छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
. गंगाधर मुटे
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....----------...------------
.....................................
MP3 ऑडियो फ़ॉरमॅट मध्ये
पाहीजे असल्यास कृपया ई-मेल करा.
ई-मेलद्वारे MP3 कविता पाठवली जाईल.
E-Mail : ranmewa@gmail.com
.......................................
पुन्हा वाचली, पुन्हा
पुन्हा वाचली, पुन्हा आवडली.
राजे म्हणातात तसं अगदी वास्तव आहे.
मस्त हो मुटे !
मस्त हो मुटे !
लै भारी वो मुटेसाहेब.. सणसणीत
लै भारी वो मुटेसाहेब.. सणसणीत वास्तव...
थंडीचा कडका हा तडका लय भारी
थंडीचा कडका
हा तडका लय भारी
जबरा तिखट तडका आहे. देवनिनाद
जबरा तिखट तडका आहे. देवनिनाद म्हणतो तसे करा.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
आपणास सर्व "नागपुरी तडका" या प्रकारातील रचना येथे वाचायला मिळतील.
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....----------...------------
सुंदर...
सुंदर...
खुप मस्त ... हे सर्व
खुप मस्त ...
हे सर्व आत्तापर्यन्त कुट लपुन बसल होत काय माहीती...
Pages