छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 26 July, 2010 - 11:25

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

. गंगाधर मुटे
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....----------...------------
.....................................
MP3 ऑडियो फ़ॉरमॅट मध्ये
पाहीजे असल्यास कृपया ई-मेल करा.
ई-मेलद्वारे MP3 कविता पाठवली जाईल.
E-Mail : ranmewa@gmail.com
.......................................

गुलमोहर: 

एक नंबरी तडका राव !!!

मुटेसाहेब, मला वाटतं आपण लिहीलेले हे सारे तडके तुम्ही दर रविवारी ई टीवी मराठीवर सादर होणार्‍या `हास्यरंग' ह्या कार्यक्रमाद्वारे रसिकांसमोर आणावेत.

संपर्क / सहभागासाठी पत्ता पुढीलप्रमाणे.

ETV Marathi,Bhagwati House,
B-Wing,2nd Floor
Veera Desai Road,
Andheri(W),MUMBAI-400053
Ph.No:022-26730544/26730481.
E-mail:feedback.marathi@etv.co.in

शुभेच्छा !!
देवनिनाद

>>शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात

Lol

मुटे, एकदम चाबूक. देवनिनादने पत्ता दिला आहे, लगेच संपर्क साधा.

पुण्यातल्या प्रकाशकांचे पत्ते तुम्हाला नेटवर मिळतीलच.
मी ही शोधतोच आहे, मिळाले की लगेच पाठवतो.

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. Happy

देवनिनादजी, तुमच्या सुचनेची मी नोंद घेतली.
प्रयत्न करतोय. बघु काय होते ते. मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. Happy

मुटेजी,
सणसणीत आसुडओढ कविता !!

देवनिनाद यांच्या सल्ल्याचा नक्कीच विचार कराल आणि
लवकरच आम्हाला तुमच्या कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ कळवाल हीच अपेक्षा !
Happy

हा तडका वाचण्यापेक्षा प्रत्य़क्ष मुटेजींच्या आवाजात ऐकल्यावर अजून छान वाटतं.

धन्यवाद मुटेजी.

डॉ.कैलास

मुटेजी छानच तडका...........!

राव तुमचा तडका म्हणजे ठसका लागणे ग्राह्य.......

देवनिनाद यांच्या सल्ल्याशी सहमत.........

लगे रहो मुटेराव......

हं... हे बाकी खरंय... पण भ्रमणध्वनिवरील आपला आवाज आणि ध्वनिफीतीतील आवाज यात साम्य आढळले.....
आपला आवाज नसल्यास, चुकीची माहिती दिल्याबद्दल क्षमस्व मुटेजी.

डॉ.कैलास

भ्रमणध्वनि आणि ध्वनिफीत
यात ध्वनी हा शब्द कॉमन असतो. नाही का? Happy

जाऊ द्या. मनावर घेऊ नका.
कारण तुमचा अंदाज अजिबात चूक नाही. Happy

गंगाधरजी कविता खूप आवडली

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

हे कडव तर खासच

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते

मस्तच एकदम ....च्यामारी धरुन फट्याक.....
जाम आवडली.....

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. Happy

.....................................
MP3 ऑडियो फ़ॉरमॅट मध्ये
पाहीजे असल्यास कृपया ई-मेल करा.
ई-मेलद्वारे MP3 कविता पाठवली जाईल.
E-Mail : ranmewa@gmail.com
.......................................

Pages