गानभुली
लहानपणी कोकणात गेलो होतो, सताठ मावस-मामे भावंडं मिळून. माऊलीची घाटी उतरून घरी येताना करवंदीची जाळी, करमणं, जांभळाचे घोस असलं लुटता लुटता कसे माहीत नाही... पण वाट नेहमीची पायाखालची असूनही...चुकलो. घरचं मोठं कुणी बरोबर नव्हतं... मग सुरू झाला चकवा.... कुठुनही आलो तरी एकाच ठिकाणी पोचत होतो... दोन गट करून एकमेकांना हाका घालत वाट बदलून बघितली... पण छ्छे!
पूर्ण धीर सुटायच्या आधी कुणाचेतरी कुकारे ऐकू आले आणि त्या आवाजाच्या अनुरोधाने पोचलो मूळ वाटेवर... कुकारे कोणी घातले अजून माहीत नाही..... पण घरी पोचलो खरं.
अनेक दिवस त्यानंतर रानचा वास, पानांची सळसळ, ओवळी, प्राजक्ताचा गंध, नागमोडी जाणारी लाल पायवाट, असलं काही बाही आठवून मी झोपेतून जागी व्हायचे... दचकून वगैरे नाही हं... पण अगदी वेध लागल्यागत व्हायचं.... आई-मावशी त्याला ’रानभुली’ म्हणाल्या होत्या... थोडसं काळजीनेच. पुढे ते सगळं थांबलं.
आयुष्याच्या प्रवासात ’गाण्याचं वेड’ हा एक वेगळा रोग जडला. हवाहवासा वाटणारा चकवा आपणहून जडवून घेतला जीवाला. ठरवून हरवत राहिले ह्या गानात-रानात....
अन मग.... माझ्या सर्वसामान्य साध्या आयुष्यातल्या नेहमीच्या ’निद्रेतून’ हाकारे, कुकारे घालत उठवत राहिले... अनेक राग, गाणी, काही शब्द, एखादी लकेर, वेगळा ताल, नेमका ठेका.... वेध लागल्यागत होत राहिलं....
कुणाला काही म्हणावच लागलं नाही... सरळ सरळ दिसतच होतं की...
....की ही गानभुली!
माझ्या पूर्व-संचिताची जोड म्हणूनच बहुतेक ही भूल असावी...
आयुष्य समृद्ध अन समाधानी करणार्या अनेक क्षणांत ह्या गान-भुलल्या वाटचालींचा वाटा खूप मोठा आहे.
मला भुली घातल्या काही गाण्यांच्या, गायक/गायिकांच्या, वादकांच्या, मैफिलींची ही मैफिल....
गानभुली.......
नमस्कार. गानभुली ही एक
नमस्कार.
गानभुली ही एक लेखमालिका म्हणून लिहिण्याचा विचार फार पूर्वीपासून डोक्यात घोळतोय.
जसं जमेल तसं लिहीत जाणारय. बघू डोक्यातल्या, मनातल्या किती मैफिलींना शब्दंरूप मिळतय...
जय जय राम कृष्णं हरी!
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी !
तुझ्याबरोबर प्रवासाला कधीपण तयार.
>>तुझ्याबरोबर प्रवासाला कधीपण
>>तुझ्याबरोबर प्रवासाला कधीपण तयार.
१००% अनुमोदन
गानभुली हा शब्दच किति छान आहे
गानभुली हा शब्दच किति छान आहे
पुढच्या लेखांची वाट बघतेय
पु.ले.शु .
पु.ले.शु .
लेख वाचायला तर आवडतीलच. पण ही
लेख वाचायला तर आवडतीलच. पण ही प्रस्तावनाही फार आवडली
दाद, हम भी आपके साथ है
दाद, हम भी आपके साथ है
तुझ्या गानभुलीने हरपुन जायला तय्यार
पहिल्या लेखाचा दुवा [जय जय
पहिल्या लेखाचा दुवा [जय जय राम कृष्ण हरी] वर दिलेली आहे बरंका !
आजुन लिहा. आम्ही वाचत अहोत.
आजुन लिहा. आम्ही वाचत अहोत.