प्रतिसाद, हास्यचित्रे (स्माईलीज), रंगीत शाई, सही

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवर पुढील सुविधा का नाही किंवा कधी देणार याबद्दल नेहमी विचारणा होत असते.

१) अधिक हास्यचित्रे:
२) रंगीत शाई:
३) सहीची ( Signiture) ची सोय:

या सुविधा दिलेल्या नाहीत कारण मायबोलीवरच्या संवादांमधे/हितगुज मधे त्या बाधा आणणार्‍या आहेत. या सुविधांमुळे प्रतिसाद देणार्‍या व्यक्तीचे वेगळेपण दिसते पण प्रत्यक्षात ज्या विषयावर संवाद सुरु असतो त्यात काहीही भर पडत नाही.

१) अधिक हास्यचित्रे:
टायपून लिहलेल्या लेखनात सगळ्या भावना थोड्या शब्दात व्यक्त करणे नेहमीच शक्य होते असे नाही. त्यामुळे एका मायबोलीकराचे भाव दुसर्‍याला कळावे म्हणून काही ढोबळ हास्यचित्रे दिली आहेत. पण एका ठराविक मर्यादेबाहेर ही हास्यचित्रे संवादाला मारक ठरतात. तुम्हाला नवीन हास्यचित्रे शोधून काढता येतात या पलिकडे त्या संवादात काही भर पडत नाही. कल्पना करा तुम्ही कुणाशी तरी बोलत आहात आणि जर तुम्हाला उत्तर जर प्रत्यक्ष शब्दात न मिळता जर समोरची व्यक्ती सारखे मुखवटे घालून करत असेल तर तुम्हाला काही वेळ मजा येईल. पण त्यामुळे संवाद कुठेही पुढे जाणार नाही. उलट संवादात काही बोलण्यासारखे नसले तरी हास्यचित्रे टाकून उगीच संवाद चालू असल्याचा भास तयार होईल.

२) रंगीत शाई:
यात पुन्हा प्रतिसाद देणार्‍या व्यक्तिचे वेगळेपण दिसते. पण असे लक्ष वेधून घेण्यापेक्षा तुमच्या प्रतिसादाच्या मजकुरामुळे तुम्ही जास्त वेगळे दिसणे जास्त योग्य नाही का? पुन्हा काही व्यक्ती गप्पा मारत आहेत अशी कल्पना करू. जर मधेच एक व्यक्ती मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी गेंगाण्या आवाजात बोलत असेल तर सुरुवातीला थोडी गंमत येईल पण नंतर ते त्रासदायक वाटेल. संवादाची गम्मत काय बोलले जात आहे यामुळे वाढते. कश्या आवाजात (गरज नसताना) बोलले जात आहे यामुळे नाही.

३) सही:
पुन्हा माझी वेगळी सही या पलिकडे त्या संवादात सहीने भर पडत नाही. उलट झाला तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. वरचे उदाहरण पुन्हा घेऊ. काही व्यक्ती एका विषयावर बोलत असताना, एक व्यक्ती प्रत्येक वाक्यानंतर एकच वाक्य म्हटत असेल तर तेही त्रासदायक वाटेल. अगदी दु:खद विषयावर बोलताना आनंदाच्या सहीचे वाक्य असे झाले आहे. किंवा सारखे दुसरीकडे जाऊन माझ्या ब्लॉगला भेट द्या हे ही त्रासाचे होते. म्हणजे चालू असलेल्या संवादात भर घालण्याची इच्छा असणार्‍या व्यक्ती त्या पानावर येण्यापेक्षा स्वत:ची जाहिरात करणार्‍या व्यक्ती येण्याचे प्रमाण वाढते.

थोडक्यात या सुविधा त्या त्या व्यक्तीपुरत्या हव्याश्या वाटल्या तरी एकूणात समूहातल्या संवादाला/हितगुजला मारक ठरणार्‍या आहेत. म्हणून त्या दिलेल्या नाहीत.

विषय: 
प्रकार: 

क्रमान्क १ व ३ पटले
त्यातुनही क्रमान्क एक मधे "जीभ दाखविणारे" चित्र नसल्याने मला नेहेमी दात विचकावे लागतात त्याचे वाईट वाटते! (आयला, डोळा मारणारी तुलनेत "असभ्य" स्मायली दिलीये, पण जीभ दाखविणारी नाही, असे का बरे? Wink )
क्रमान्क २ चे तितकेसे पटले नाही
>>>> संवादाची गम्मत काय बोलले जात आहे यामुळे वाढते. कश्या आवाजात (गरज नसताना) बोलले जात आहे यामुळे नाही. <<<<
हे तर अजिबात पटले नाही!
ज्या एकसुरी, पण ओघवत्या सूर व लयीबद्दल शिवाजीराव भोसल्यान्चे कौतुक केले जाते त्याच्या उलट, स्वरातील चढ उतार, लयीतील विविधता याबद्दल इये मराठीचिये नगरी आजवर कोणीच वक्ता तसा झाला नाही का?
अन गरज कोण ठरवणार? वक्ता की श्रोता?
अर्थात लिखित मजकुरातही, रन्ग आकार रुप यान्चे काहीच वैविद्ध्य नसेल, तर अवघड आहे. इकडे आम्ही हस्ताक्षरावरुन माणसान्च्या भावभावना/स्वभाव यान्चे चित्रण समजु शकतो, का नाही तसे समजणार कोण कोणता रन्ग्/आकार वापरतोय यावरुन? निदान जिथे वहाते धागे आहेत, तिथे तरी या सुविधा हव्याच हव्या! (असे माझे मत - लाल रन्गात Wink )

मला फक्त नं. ३ चा मुद्दा पटला.

क्र. १ बद्दलः
चित्रविचित्र आणि फॅन्सी हास्यचित्रे नकोत , पण बेसिक भावना दर्शवणार्‍या स्मायलीज हव्यात असे वाटते.
उदा.
१) भय
२) जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणारा स्मायली
३) गोंधळून गेलेला स्मायली
४) गप्प बसलेला स्मायली ("या उप्पर मला काही बोलायचे नाही" वाला)
५) झोपाळू स्मायली
६) विचारात पडलेला स्मायली
७) बाय बाय (टाटा) करणारा

सध्या वरच्या लीस्ट मधील क्र. ३ आणि ६ साठी सगळे :अरे आता काय करायचं: वाला स्मायली वापरतोय.

क्र. २ बद्दलः
एखाद्या व्यक्तीच्या प्रतिसादावर आपणास काही प्रतिसाद देण्याचे असल्यास ते वाक्य आपल्या प्रतिसादात कॉपी-पेस्ट करून त्याचे वेगळेपण दिसून येण्यासाठी एक तर बोल्ड किंवा आयटॅलिक करावे लागते. अक्षररंग available असतील तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.

तसेच आपल्या म्हणण्यातील एखादे वाक्य stress देऊन बोलायचे असल्यास अक्षररंगाचा उपयोग होईल असे वाटते.

मला पटले हे मुद्दे. इथे चार शब्द का होईना, ते असावेत.
मला नाही वाटत, मी इथे कधीही स्माईली, सही, रंगीत शाई वगैरे वापरले आहे.

>>> मला नाही वाटत, मी इथे कधीही स्माईली, सही, रंगीत शाई वगैरे वापरले आहे. <<<<
अहो दिनेशभाऊ, आपण सन्माननिय अपवादान्बद्दल बोलत नाहीहोत Proud

स्मिलेय्स आपण इतर साईतवरुन html मफ्हुन आणु शकतो त्या बद्दल हरकत नाही .
.
,
पण अक्षर रंग असावेत असं मलाही वाटटं

सर्व मुद्दे पटले. या वरील तिन्ही गोष्टी असत्या तरी मजाच आली असती पण नसल्याने काही विशेष अडचण होत नाही.

अ‍ॅडमिन, या सुविधांमुळे मायबोलीच्या सर्व्हरवर जाणवण्याइतका भार पडत असेल तर या सुविधांचा कधीच आग्रह नाही. कारण या सुविधांवाचून काही अडत नाही. पण तसे काही नसेल तर या सुविधा असाव्यात असे मला वाटते. या सुविधांमुळे संवाद साधायला / हितगुज करायला विशेष बाधा येते असे मला वाटत नाही. आता काहींनी मुद्दामच त्रास देण्याच्या हेतूने हास्यचेहर्‍यांचा / रंगांचा / सहीचा अति / गैर वापर केला तर गोष्ट वेगळी. (त्रास द्यायचाच असला तर तो येनकेनप्रकारे दिलाच जातो.)

हे माझं वैयक्तिक मत. Happy

फार मॅचुअर्ड आहेत हे मुद्दे.
आपली मायबोली काही नुसती चॅटिंग मेसेंजर नाहीये की हे सगळं असावं कारण मग तेच महत्वाचं व्हायला लागतं आणि तुम्ही म्हणताय अगदी तस्संच होण्याची शक्यता जास्त.
आवडीनं मराठीत लिहायला येणार्‍यांची संख्याच जास्त असावी हेच अपेक्षित आहे मायबोलीवर.
तर केवळ धडाधड लोकांच्या सेवेसाठी हे असलं बेगड उपलब्ध करून देण्याचा (इतर अनेक साईटस सारखा) उतावीळपणा न दाखवल्याबद्दल अभिनंदन.

गजाननला अनुमोदन. मला नाही वाटत त्याने संवादाला काही बाधा येते. जुन्या मायबोलीतही होती की रंगीत शाईची सोय. तेव्हा होत होताच की उत्तम संवाद.

सर्व्हरवर भार पडत असेल तर तो निराळा मुद्दा, आणि त्यापुढे या सोयी महत्त्वाच्या नाहीत.

अश्या पोस्ट्स अ‍ॅडमिन टिमच्या रंगीबेरंगी ब्लॉगच्या ऐवजी 'आपली मायबोली' या ग्रुप मध्ये टाकता येऊ शकतील का? रंगीबेरंगी नेहेमीच पहाणे होते असे नाही.

गजाननाला अनुमोदन.
सहज शक्य असेल, सर्वर वर भार होत नसेल तर द्याव्यात सुविधा याला अनुमोदन. संवादावर त्याचा परिणाम होणार नाही असे मला वाटते. (आधी कधी खास जाणवले नव्हते, पण रिपोर्ट लिहीताना मात्र थोडा अभाव जाणवला.)

अ‍ॅडमिन टीमने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन. सही, रंगीत शाई आणि अधिक हास्यचित्रे हे अत्यंत निरर्थक मुद्दे आहेत. मायबोलीने आतापर्यंत पुरस्कृत केलेल्या धोरणांशी त्यांचा काही संबंध आहे, किंवा काही अडथळा उत्पन्न होतो आहे- असं अजिबात वाटत नाही. Happy भविष्यातही त्यांचा फार काही उपयोग होईल, असं आता तरी वाटत नाही.

१. या सुविधांमुळे सर्वरवर कुठलाही भार येण्याची शक्यता नाही. त्यामुळे ते कारण अजिबात नाही. (जर मायबोलीबाहेरच्या वेबसाईटवरच्या smiley वापरल्या तर त्यामुळे थोडेफार पान हळू दिसण्याची शक्यता आहे पण तो त्रास मायबोलीच्या सर्वरला नाही).

२. वर मूळ लेखनात लिहिलेले सगळे मुद्दे प्रतिसादाबद्दल आहेत. मुख्य लेखनाबद्दल नाही. पण फक्त मुख्य लेखनात या सोयी देणे, पण प्रतिसादात नाही हे सध्यातरी तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. नाहीतर तो विचार केला असता.

आता वर मांडलेल्या काही मुद्दांना उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

अगदी मूलभूत पातळीवर विचार करताना, जेंव्हा इथे एखादा प्रतिसाद प्रकाशित होतो तेंव्हा तो लेखकाला/ इतरांना दिसावा अशी अपेक्षा असते, बरोबर? नाहीतर् तेच सरळ ईंमेलनेही कळवता आले असते.
( हं आता "मी प्रतिसाद फक्त स्वतःसाठी , माझ्या मनातलं बाहेर काढण्यासाठी देतो/देते. त्याचे पुढे काय होते ,कोण वाचते याबद्दल मला काही देणेघेणे नाही" असे कुणी म्हणणार असेल तर मात्र माझ्याकडे त्यावर उत्तर नाही !)

तर वाचकापर्यत (त्यात मूळ लेखकही आला) पोहोचवण्यासाठी प्रतिसाद लिहलेले असतात या गृहितकापासून सुरु करायला हरकत नसावी.

१. हास्यचित्रे:
हास्यचित्रांमुळे काही भावना थोडक्यात व्यक्त करायला सोपे जाते. पण नेमकी त्याची सीमारेषा काय? नक्की किती असाव्यात? मग सध्या आहेत त्या पुरे का नाही? तुम्हाला लिहायला सोप्या पडल्या तरी वाचणार्‍याला त्यातून काही बोध होतो का? का तेच शब्दात लिहल्याने जास्त स्पष्ट होते? प्रतिसाद देण्याची काहीही गरज नसताना एक smiley टाकून मी प्रतिसाद दिल्याचे समाधान मानतो का? (काही गप्पांच्या पानावर कधीकधी नुसत्या smiley दिसतात त्या जाउन पहा )

लिहणार्‍याची सोय होत असेल पण वाचणार्‍याला त्यातून काय मिळतं?

२. रंगीत शाई:
प्रत्यक्ष संभाषणात चढ उतार, आवाजात बदल वगैरे आल्यामुळे त्याची गोडी वाढते हे कबूल. पण त्या त्या बदलाचा अर्थ काय आहे (उदा. आवाज चढला म्हणजे बोलणार्‍याच्या मनात काय भावना असू शकतात) याचे संकेत मानवजातीला पिढ्यानपिढ्या उत्क्रांतीच्या बदलातून माहिती आहेत म्हणून ते बदल अर्थपूर्ण होतात. पण काळ्या शाईत लिहणार्‍याच्या मनात जे आहे ते निळ्या शाईत लिहणार्‍याच्या मनापेक्षा वेगळे काय? किंवा एकदा पिवळ्या शाईत लिहले आणि नंतर हिरव्या शाईत लिहले तर वाचणार्‍याला त्या बदलातून काय माहिती मिळणार? आता पांढर्‍या शाईत लिहून खवचटपणा केल्याचा आनंद मिळतो. पण पुन्हा तो प्रतिसाद लिहणार्‍याला किंवा त्याच्या कंपूतल्या काही जणांना मिळतो. वाचणार्‍याचे काय?

>>>> निदान जिथे वहाते धागे आहेत, तिथे तरी या सुविधा हव्याच हव्या! (असे माझे मत - लाल रन्गात ) <<<<
या माझ्या वाक्यास सन्दर्भित करुन पुढे...
अ‍ॅडमिन टीम, मूळात वरील व आधीच्या पोस्टमध्ये "सन्वाद" व "प्रतिसाद" याबाबत थोडा घोळ होतोय असे वाटते.
माझ्यामते तरी अन मायबोलीपुरता विचार करता, सन्वाद तिथे होतो जिथे वहाते धागे आहेत जसे की अनेकानेक शहरे/पेठा/कट्टे वगैरे
प्रतिसादाचा विचार करता, "प्रतिसाद" देण्याचे विषय मूळ लेख्/निबन्ध/कविता वगैरे बाबी या गुलमोहरावर येतात. (व बरेचदा प्रतिसादान्चे रूप वादात होते तो भाग निराळा Proud )
तुमचे वरील विश्लेषण हे सन्वाद व प्रतिसाद यान्ना उद्देशून आलटून पालटून आहे.
वर उद्धृत केलेल्या वाक्यानुसार, स्मायली/रन्गितशाई वगैरेची मागणी वहात्या सन्वादात्मक बीबीन्करता केली जात्ये, (ज्या पोस्टीन्चे अस्तित्व कित्येकदा काही मिनिटे देखिल असत नाही) अभ्यासपूर्ण प्रतिसादान्बद्दल नाही.
अर्थातच, स्मायली/रन्गित शाई याबाबतची मागणी वहात्याधाग्यान्वरील सन्वादात काही "बाधा" पोचवेल असे वाटत नाही, उलट त्याने रन्गत वाढेल.
मात्र आपले बाकी मुद्दे जर केवळ गुलमोहरावरील "प्रतिसादान्बद्दल" असतील, तर तिथे मात्र मान्य, तिथे विशिष्ठ लेख्/विषय्/साहित्यावर प्रतिसाद देताना याची गरज नाही.

(जुन्या मायबोलीवर खटपट करुन का होईना, पण टेबल (कोष्टक) तयार करणे शक्य होत होते, नविन मायबोलीवर त्याची देखिल कमतरता अनेकदा जाणवते. )

अहो तोन्डी किन्वा लिखित सन्वादाचे काय घेऊन बसलात? तस तर आख्खाच्या आख्खा माणूस रन्गान्धळा अस्ला तरी त्याच्या जगण्यात काहि विशेष फरक पडत नाही!
(फक्त तो रातान्धळा नस्ला म्हणजे झाले! Proud )
फार पूर्वी ये देशी औरन्गजेब नावाचा एक बादशहा होऊन गेला, सन्गिताने कुणाचे भले झालय असे तो विचारायचा! सन्वादाकरता बोलीभाषेत शब्द अस्ताना पुन्हा तेच शब्द ते आऽऽऽऊऽऽऽ करत हेल काढत निरनिराळ्या वाद्यान्च्या अर्थहीन गजराबरोबर का म्हणावेत असे त्याचे मत असेल. रास्तच असावे त्याचे मत!
पण थोडा अर्धवटच होता तो बहुतेक! कारण नुस्त्या सन्गितावरच घसरला.... त्याच्या नजरेतुन रन्ग कसे काय बरे सुटले? रन्ग हवेतच कशाला? रन्गाने कुणाचे भले झालय? अस का नाही त्याने विचारले? मला तर शन्का आहे की तो रन्गान्धळा असावा, म्हणूनच त्याने रन्गान्वर आक्षेप घेतल्याचा इतिहासात पुरावा नाही! Proud
(अन अर्थातच तो बहिरा नव्हता हे देखिल सिद्ध होतेच Wink , नीटपणे शब्दरुपी सन्वाद ऐकू येत असल्यानेच, त्याने अनावश्यक सन्गित वगैरे गोष्टीन्ना फाट्यावर तोलले होते)

बर तर मग इकडे ब्ल्याक अ‍ॅन्ड व्हाईटच का ठेवत नाहीत?
ही निळी थिम तरी कशाला हवी? त्यानेही फरक पडत नाही!
मायबोलीचा लोगो तरी रन्गित हवा कशाला? त्यानेही फरक पडत नाही
आमच्या सारख्या डॉस मोड मधे काम केलेल्या जुन्या लोकान्ना तर काळ्या-पान्ढर्‍या रन्गाच्या छटा नस्ल्या तरी चालू शकेल, त्या छटा तरी कशाला हव्यात? त्यानेही फरक पडत नाही
सवये आम्हाला
एसेस्सी-येचेस्सीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत निळ्या शाईव्यतिरिक्त अन्य लाल्/हिरव्या शाईने अज्जिबात लिहू नये हा नियमही आम्हाला शिरोधार्य आहे, नै का?
त्याच पेपरमधे खाडाखोड करु नये, नुस्ती काट मारावी हव तर, पण ती देखिल टाळावी असे असायचे, शिन्चा तो बिलगेट्स्च एसेस्सी-येचेस्सीच्या परिक्षान्ना कधी बसला नसेल म्हणून त्याने वर्ड तर राहुदेच, एक्सेल वगैरे गणिती आकडेमोडीच्या ठिकाणी देखिल येड्यासारख्या अक्षर रन्गित करायच्या अन काट मारायच्या सोई दिल्यात! येडाच्चे तो, नै?
इथे कस, अगदी पोषाखी लिहील पाहिजे! व्हाईट्ट कॉलर्ड!
मायबोली म्हणजे काय तुम्हाला जत्रा वाटली की लग्नसमारम्भ वाटला?
जस काय लग्नाबिग्नाला जत्रला जाताना नटुन थटुन जाव तस तुमच्या दीडदमडीच्या मजकुराला हव कशाला नटवायला? नटवे कुठले! Biggrin
तुम्च्या अक्षरान्ना शब्दान्ना रन्गिबेरन्गी सजवलेच पाहिजे असे कुठल्या श्रुति:स्मृतीपुराणोक्त शास्त्रात लिहीले आहे?
ख्रिश्चनान्च्या वैकुण्ठभुमित जाताना अस्तो तसा काळापान्ढरा कलरकोड वापरायचा, शेवटी तेच अन्तिम सत्य ना? मग त्यापासून फारकत घेऊन कस चालेल?

स्माईली नसल्या तरी फारसा फरक पडत नाही, तसंही आपल्या भावना व्यक्त करायला,

डोकावून पहाणारी बाहुली
हट्ट करणारी बाहुली
चरफडणारी बाहुली
डोळ्यांची पिटपिट करणारी बाहुली
चॅलेंज देणारी बाहुली
कमरेवर हात ठेऊन भांडणारी बाहुली....... इ.इ. स्माइलीज ची वर्णन करणारी वाक्य आपण कोलन मधे टाकून एक्झॅक्ट फिलिंग्ज पोहोचवू शकतोच. आणि समोरच्याला ती कळतातही.

रंगीत शाई ची गरज कधी कधी लेखनात भासू शकते पण ते ही आपण बोल्ड करून दाखवू शकतो.

राहता राहिली सही, तो फारसा गरजेचा प्रकार आहे असं मला वाटत नाही. Happy

सही - नसली तरी चालेल. नकोच.

स्मायली - अजून किती आणि कुठल्या असा प्रश्न असेल तर सध्या आहेत त्या ठीक. आमच्या आम्ही पाहिजेत त्या शोधून काढतो पण त्या खाजगी जागेत सेव्ह कराव्या लागतात. चालेल. Happy

रंगीत शाई - असली तर बरं होईल.

>>स्मायली/रन्गितशाई वगैरेची मागणी वहात्या सन्वादात्मक बीबीन्करता
हे लिंबूचे मला पटले.

तश्या या सुविधा असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. त्या देण्या न देण्याबद्दल एवढी कारणे, चर्चा व्हायची गरज नाही. न देण्याबद्दलची कारणे जरा फारच ताणलेली वाटली. Happy

काही बाहूल्या आवडतील.. नसल्या तरी चालू आहेच.. Happy
पांढर्‍या शाईचा उपयोग काही ठिकाणी नक्कीच होतो.. उदा. एकादे कोडे घातले आणि त्याचे उत्तर तिथेच लिहीले. वाचणार्‍याने सोडवावे, आणि जमले/नाही जमले की तिथेच पहावे, असं करता येतं.
काही वेळा वात्रटपणा (जो थोडासा चालतो) करायला पण याचा उपयोग होतो..
पांशामधे लिहीलेले कसे वाचायचे ते सगळ्यानाच माहीत होतं, पण गम्मत म्हणून वापरण्यासारखी सोय आहे ही..

Pages