आणखी किती कमवायचं आयुष्यात......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आणखी काय कमवायचं आयुष्यात......
अमित(असुदे)ची ही प्रतिक्रिया वाचली आणि याचाच एक सुंदर तितकाच सहजपणे जमिनीवर आणणारा अनुभव लिहावासा वाटला. खरतर आपण (अर्थात मी ही त्यातलाच आहे/किंवा होतो म्हणा फार तर)सगळे रोजच धावत असतो काहीतरी कमवायच्या मागे. एक गोष्ट कमावली कि दुसरी समोर दिसत असते.ही न संपणारी शर्यत एकदिवस पार अड्खळुन पाडायला लावते आणि मग येतो आपण जमिनीवर.
२६ जुलैचाच संदर्भ असणारा हा एक अनुभव.पावसानी त्याचा हिस्सा वाहुन नेला होता आणि मग उरलेल बाकी जनता सावडत होती.
कल्याण पुर्वेचा हा किस्सा.संघ शाखेवरुन सगळ्यांनी मदत वाटपाला कल्याण पुर्वेला जायच असं सांगण्यत आलं होत.तब्बल २ ट्रक भरुन सामना आम्ही दिवस भरात वाटुन संपवलं. प्रत्येक वस्तीत जायच. तांदुळ, डाळ, चहा साखर तेल मसाला अशी जिवनावश्यक वस्तुंची ३ किलोची पोती प्रत्येक घरात, वस्तीत पोहोचवायची. सगळे आम्ही सुखवस्तु घरातले आणी किमान नोकरी वगैरे करणारे.या पोत्यांची ने-आण चढ-उतार करुन दमलेलो. संध्याकाळी शाखेवर परतलो. आम्हाला किती अभिमान केवढं मदत कार्य केल्याचा आणि मदत मिळ्वुन ती सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याचा. शाखा संपली आणी बाहेर चहा प्याला पोहोचलो. गप्पा मारत उभे होतो तर साधारण ३०-३२ शी चा तरुण त्या चहावाल्याला बिस्कीट पुडा आहे का विचारत होता. त्याचा एकंदर अवतार पाहुन तरी तो भल्या घरातला वाटला.पण बिस्कीट नाहीत हे एकल्यावर एकाएकी त्याचा चेहरा अगदी रडवेला झाल्या सारखा वाटला. आमच्या शिक्षकांनी त्याची चौकशी केली. किशोर रासकर, त्यांच नाव पावसानी त्याच सगळ घर धुवुन स्वच्छ केलेले.चांगली पाच आकडी पगाराची नोकरी, बायकोही नोकरी करणारी.हा २५ जुलै ला घरुन कामावर निघाला तो २८ जुलैला घरी पोहोचला.सगळ घर आवरत होता.हे एकुन आम्ही ही एक पोत त्याच्यासाठी शाखेतुन घेउन आलो.तो ते काही घेइना.खुप समजुत काढुन खोदुन खोदुन विचारल्यावर म्हणाला "माझ्या लहान मुलीचा आज वाढदिवस आहे. ती चार वर्षाची झाली आज. परवा जाताना यावेळी बाहुली घेउन देणार, केक आणणार म्हणुन सांगितलय.आज घरी पोहोचलो तर तीने अचानक विचारलं बाबा केक आणि बाहुली कुठेय.. ". ते एकुनच घरातुन बाहेर पडलोय."खात्यात पैसे आहेत,पण ना एटीम चालु,ना दुकानं उघडी". बिस्कीटचा पुडा तरी घ्यावा आणि कशीतरी समजुत घालावी म्हणुन संध्याकाळ पासुन दुकानं शोधत फिरतोय.आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावले.त्याचा पत्ता विचारुन घेतला त्याला म्हटलं तुम्ही घरी पोहोचा आम्ही मागाहुन येतो.सरळ मागे फिरलो तसेच बाइक वरुन आमच्या ठाण्यातल्या अनुपच्या दुकानात एकाला पाठवलं त्याला म्हटल कशी ही असुदे एखादी बाहुली गिफ़्ट प्याक करुन दे. तो ही चक्रावला. साधारण ९ वाजता त्यांच्या घरी पोहोचलो.किशोरच सगळ घर चिखलाचा रंग घेउन उभ होत. तळ्मजल्याची खोली, टीव्ही,फ्रीज सगळ घरात पण बंद पडलेल. घरी त्याचे आईवडील बायको आणि लहानगी नेत्राली. आगदी बोबड्या शब्दात नाव सांगत होती. तिच्या बाबांचे मित्र तिच्या वाढदिवसाला आले होते ना. तिला कोण आनंद त्याचा. ती ला विश केलं बाहुली दिली. किशोर तर अक्षरश: आमच्या शिक्षकांच्या पाय पडला. म्हणाला "याहुन सुंदर गिफ्ट मी कधीही विकत घेउ शकलो नसतो माझ्या मुलीसाठी".खुप कमावुन ठेवलाय पैसा पण वेळेला हाताशी काय आहे काही नाही".

विषय: 
प्रकार: 

सर्वांना धन्यवाद. हे असेच अनेक अनुभव, आजही समाजात वावरताना मला आणि कदाचित तुम्हालाही जमिनीवर ठेवतील अशी आशा बाळगतो.

२६जुलैनेच आम्हाला भारतात कायमस्वरूपी तळ ठोकायला उद्युक्त केलं.

आम्ही दोघही तेंव्हा युकेत होतो.. आणि राजा राणीच्या संसारात सुखी होतो. पैसाही गाठीला जमा होत होता.. आईवडिलांकडे बघायला दोन्ही घरी भावंडे आहेत त्यामुळे तीही जबाबदारी नाहीये.

पण २६ जुलै आला नि संदर्भच बदलले. आमची दुपार युकेत होईपर्यंत मुम्बैची दळणवळण, संपर्क यंत्रणा बंद पडली होती. मिड डे वाचला नि भयंकर टेन्शन आलं.

माझे बाबा प्लांट मेन्टनन्सला काम करतं, अश्या वेळी शॉक सर्किट होऊ नये, मटेरीअल भिजू नये म्हणून ते पवई ऑफिसात जाणार हे नक्की माहीत होतं. माझी बहीण विरारला नोकरीला जात होती. एका मामेभावाला ऐकू येत नाही तो दादरला क्लासला जाणारा होता. दीर पवईत कॉलेजात. हे सगळे नीट घरी पोहोचतील ना? सासू सासरे घरी एकटे असतील. आमच्या सोसायटीत असेही पाणी साठतं आता काय झालं असेल? त्यात बिल्डींग मजबूत नाही. आत्ते आणि काकांची घरं तळमजल्याला आहेत. आत्तेकडे तर तिची मूलही नाहियेत. हजार नकारात्मक विचार. आमचे सगळे नातेवाईक एकमेकाला घट्ट धरून आहेत पण तरीही माझी उलघाल कमी होत नव्हती.

तेंव्हा मला जाणवलं की हे पैसे कमवणे वै. आपल्यासाठी फारसं महत्वाचं नाहीये, आपली माणसं आहेत. माझ्या माणसांसाठी मी वेळेला नव्हते. सगळी मंडळी कुठे अडकली, कुठे पोहोचली, सुखरूप होती हे कळलं नंतर. पण त्याक्षणी मी तिथे नव्हते. असते तरी खूप काही केलं असतं अश्यातलं नाही पण वेळेला नव्हतो ही बोच राहू नये म्हणून आम्ही आपापल्या असाईनमेंट्स संपल्यावर भारतात तळ हलवला. आता कामानुसार येतो जातो पण काम संपलं की परतं माझ्या लोकांत. आणखीन काय आणि किती कमवणार आहे? आई बाप, भाऊ बहीण गमावले, त्यांच्याबरोबरचा हा वेळ गमावला तर कमावलेल्या पै ची खरी किम्मत किती?

सुरेख लिहीलंय. डोळ्यात पाणी आलं. कुणावर कधी अशी वेळ न येवो आणि चुकुनमाकून आलीच तर त्यांना असा कुणी घारुआण्णा भेटो.

"याहुन सुंदर गिफ्ट मी कधीही विकत घेउ शकलो नसतो माझ्या मुलीसाठी".खुप कमावुन ठेवलाय पैसा पण वेळेला हाताशी काय आहे काही नाही". >>>> खरचं अनमोल गिफ्ट Happy

छान

हे वाचायचं राहुनच गेलं होतं रे आण्णा Happy
पण खरं सांगु का ? जी माणसं घारुआण्णाला जवळून ओळखतात त्यांना यात काहीच नवल नाही वाटणार, अशा जगावेगळ्या गोष्टी करणं हा घारुआण्णाचा स्वभावच आहे ....
wave.gif

नि:शब्द अन पाणावलेले डोळे अशी अवस्था झालीय...
एक कडक सलाम तुम्हाला....

कुणावर कधी अशी वेळ न येवो आणि चुकुनमाकून आलीच तर त्यांना असा कुणी घारुआण्णा भेटो >>>> +१ आमेन!!!!

Pages