आणखी किती कमवायचं आयुष्यात......

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आणखी काय कमवायचं आयुष्यात......
अमित(असुदे)ची ही प्रतिक्रिया वाचली आणि याचाच एक सुंदर तितकाच सहजपणे जमिनीवर आणणारा अनुभव लिहावासा वाटला. खरतर आपण (अर्थात मी ही त्यातलाच आहे/किंवा होतो म्हणा फार तर)सगळे रोजच धावत असतो काहीतरी कमवायच्या मागे. एक गोष्ट कमावली कि दुसरी समोर दिसत असते.ही न संपणारी शर्यत एकदिवस पार अड्खळुन पाडायला लावते आणि मग येतो आपण जमिनीवर.
२६ जुलैचाच संदर्भ असणारा हा एक अनुभव.पावसानी त्याचा हिस्सा वाहुन नेला होता आणि मग उरलेल बाकी जनता सावडत होती.
कल्याण पुर्वेचा हा किस्सा.संघ शाखेवरुन सगळ्यांनी मदत वाटपाला कल्याण पुर्वेला जायच असं सांगण्यत आलं होत.तब्बल २ ट्रक भरुन सामना आम्ही दिवस भरात वाटुन संपवलं. प्रत्येक वस्तीत जायच. तांदुळ, डाळ, चहा साखर तेल मसाला अशी जिवनावश्यक वस्तुंची ३ किलोची पोती प्रत्येक घरात, वस्तीत पोहोचवायची. सगळे आम्ही सुखवस्तु घरातले आणी किमान नोकरी वगैरे करणारे.या पोत्यांची ने-आण चढ-उतार करुन दमलेलो. संध्याकाळी शाखेवर परतलो. आम्हाला किती अभिमान केवढं मदत कार्य केल्याचा आणि मदत मिळ्वुन ती सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याचा. शाखा संपली आणी बाहेर चहा प्याला पोहोचलो. गप्पा मारत उभे होतो तर साधारण ३०-३२ शी चा तरुण त्या चहावाल्याला बिस्कीट पुडा आहे का विचारत होता. त्याचा एकंदर अवतार पाहुन तरी तो भल्या घरातला वाटला.पण बिस्कीट नाहीत हे एकल्यावर एकाएकी त्याचा चेहरा अगदी रडवेला झाल्या सारखा वाटला. आमच्या शिक्षकांनी त्याची चौकशी केली. किशोर रासकर, त्यांच नाव पावसानी त्याच सगळ घर धुवुन स्वच्छ केलेले.चांगली पाच आकडी पगाराची नोकरी, बायकोही नोकरी करणारी.हा २५ जुलै ला घरुन कामावर निघाला तो २८ जुलैला घरी पोहोचला.सगळ घर आवरत होता.हे एकुन आम्ही ही एक पोत त्याच्यासाठी शाखेतुन घेउन आलो.तो ते काही घेइना.खुप समजुत काढुन खोदुन खोदुन विचारल्यावर म्हणाला "माझ्या लहान मुलीचा आज वाढदिवस आहे. ती चार वर्षाची झाली आज. परवा जाताना यावेळी बाहुली घेउन देणार, केक आणणार म्हणुन सांगितलय.आज घरी पोहोचलो तर तीने अचानक विचारलं बाबा केक आणि बाहुली कुठेय.. ". ते एकुनच घरातुन बाहेर पडलोय."खात्यात पैसे आहेत,पण ना एटीम चालु,ना दुकानं उघडी". बिस्कीटचा पुडा तरी घ्यावा आणि कशीतरी समजुत घालावी म्हणुन संध्याकाळ पासुन दुकानं शोधत फिरतोय.आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावले.त्याचा पत्ता विचारुन घेतला त्याला म्हटलं तुम्ही घरी पोहोचा आम्ही मागाहुन येतो.सरळ मागे फिरलो तसेच बाइक वरुन आमच्या ठाण्यातल्या अनुपच्या दुकानात एकाला पाठवलं त्याला म्हटल कशी ही असुदे एखादी बाहुली गिफ़्ट प्याक करुन दे. तो ही चक्रावला. साधारण ९ वाजता त्यांच्या घरी पोहोचलो.किशोरच सगळ घर चिखलाचा रंग घेउन उभ होत. तळ्मजल्याची खोली, टीव्ही,फ्रीज सगळ घरात पण बंद पडलेल. घरी त्याचे आईवडील बायको आणि लहानगी नेत्राली. आगदी बोबड्या शब्दात नाव सांगत होती. तिच्या बाबांचे मित्र तिच्या वाढदिवसाला आले होते ना. तिला कोण आनंद त्याचा. ती ला विश केलं बाहुली दिली. किशोर तर अक्षरश: आमच्या शिक्षकांच्या पाय पडला. म्हणाला "याहुन सुंदर गिफ्ट मी कधीही विकत घेउ शकलो नसतो माझ्या मुलीसाठी".खुप कमावुन ठेवलाय पैसा पण वेळेला हाताशी काय आहे काही नाही".

विषय: 
प्रकार: 

नशिबवान आहात घारूअण्णा, जमिनीवर आणुन ठेवणारा हा अनुभव मिळाला नि तुम्ही लोकान्नी त्याचे सार्थक केले Happy मी कल्पनेतच त्या मुलीचा अन तिच्या असहाय्य बापाचा चेहरा नजरेसमोर आणू शकतो, त्यान्च्या भावना समजू शकतो Happy
ग्रेट
अर्थातच,
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे, हे ज्याला उमगलेले अस्ते तो या रेस मधे भागच घेत नाही!
खिशात दमडा नाही म्हणून अमुक काही घेता/करता येत नाही हे अनेकान्नी असन्ख्य वेळेस अनुभवले असेल.
पण खिशात पैसाच काय, सोन्याच्या लगडी जरी असतील, तरी वेळेस त्याचा उपयोग शून्य अस्तो हे देखिल लक्षात ठेवावे लागते! Happy उपयोगी पडला तर वेळेस एक माणूसच दुसर्‍या माणसास उपयोगी पडू शकतो, उपयोगी पडावे! Happy
आम्हाला चान्गली गोष्ट सान्गितलीत घारूअण्णा

घारू Happy

Pages