नॉर्थ कॅरोलीना

Submitted by admin on 11 April, 2008 - 15:17

नॉर्थ कॅरोलीना मधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बाफवर मोहना सोडल्या तर कुणीच NC चे नसावेत. कुणाच्याही Profile मधे ते NC मधे असल्याचे लिहीलेले नाही.. Happy

या बाफवर मोहना सोडल्या तर कुणीच NC चे नसावेत. कुणाच्याही Profile मधे ते NC मधे असल्याचे लिहीलेले नाही.. >>> भेटण्यासाठी Non-Contiguous असावे एवढीच अट पुरेशी असावी. Lol
खरं तर तुम्हीच या तुमच्या कधीपासून ऊभ्या असलेल्या विनोदाला घेवून मग एनसी करांना वेगळा वेन्यू शोधावा लागणार नाही. कधी येताय?

कधी येताय? <<<< आवताणाची वाट बघतोय.. बोलावलात की लगेच आलो उउवि घेऊन. (यापूर्वी २ दा रॅलेला येऊन गेलोय.. अन्जली, आणि मोहना याना भेटलो होतो..) Happy

Cary व Charlotte च्या बाहेर कोण आहे? शक्यतो मध्य निवडला तर सर्वान्ना बर पडेल....

डन

एन्सीकर्स, अ‍ॅमेझॉन ने दुसर्‍या हेडक्वार्टर्स साठी नॅरो डाउन केलेल्या २० शहरांच्या लिस्ट मधे Raleigh आहे. अटलांटा ला सर्वात जास्त शक्यता आहे असे लोक म्हणतात असे वाचले.
http://mashable.com/2018/01/18/amazon-hq2-finalists/#lKXlk1Hkj5qg

हॅलो पब्लिक.

काल बून व जवळ ब्लू रिज पार्कवे वर फिरून आलो. ढगाळ हवामान व ढक्/धुके यामुळे टोटल खंडाळा वातावरण होते. सगळीकडे हिरवेगार झाले आहे. तेथे बहुधा लोक जास्त फॉल कलर्स करता जातात असे ऐकले आहे पण आत्ताही मस्त आहे एकदम. धुक्यात त्या पार्कवे वर गाडी अत्यंत हळू चालवावी लागली. कारण अनेक ठिकाणी ५०-६० फुटांपलीकडे व्हिजिबिलिटी नव्हती. पण बर्‍याचश्या धबधब्यांमधे पाणी भरपूर असेल (आम्ही पाहिले त्यात तरी होते).

नमस्कार ! Raleigh, Morisville इथे राहणा-या (एका लाडक्या डोहाळतुलीला) माझ्या भाचीला, उकडीचे मोदक पाठवायचे आहेत. तिथेच (USA मधे) बनवून पाठवू शकतील अशा सेवा कुणा माय बोलीकरांची / त्यांच्या माहितीत आहे का? १५ एप्रिल च्या सुमारास पोचतील अशी आशा आहे .