मासे ६) बोंबिल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2010 - 02:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालवणाचे साहित्य :
१ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.)
लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
१ ते २ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
१ मिरची मोडून
थोडी कोथिंबीर
तेल.

तळण्यासाठी लागणारे साहित्य :
बोंबिल ५-६ साफ करुन
लसुण किंबा आल लसुण पेस्ट
हिंग, हळद,
२ चमचे मसाला
मिठ
तांदळाचे पिठ किंवा रवा
तेल.

क्रमवार पाककृती: 

कालवणाची कृती :
तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.

त़ळ्ण्याची कृती :
बोंबलाला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला मिठ लावुन ठेवावे. मग रवा किंबा तांदळाच्या सुक्या पिठात हे घोळून मिडीयम गॅस वर तळावेत. जर आल लसूण पेस्ट नसेल तर तेल तव्यात टाकल्यावर लसूण टाकावा व मग तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

पावसाळ्यात भरपुर प्रमाणात आणि एकदम फ्रेश बोंबील येतात.

वरील कालवण फोडणी न देता करण्याचीही पद्धत आहे. म्हणजे सगळ एकत्र करायच त्यावरच तेल टाकायच आणि फक्त उकळवायच. हेही खुप छान लागत.

तळलेले बोंबील खुपच रुचकर लागतात. अगदी नुसते सुद्धा मटकावता येतात.
बोंबील घेताना छोटे, मिडीयम फोटॉत दाखवल्याप्रमाणे घ्यायचे. जाड्या बोंबलांना जास्त चव नसते.
काही जण पाट्याखाली ठेवतात बोंबील मग त्यातल सगळ पाणी निघुन गेल की ते तळतात. ह्या प्रकारचेही खुप खरपुस लागतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कट्टर मासेहारी आहे. मांसाहारी नाही.. मासे सोडुन इतर मांसाहारी पदार्थांवर माझे विषेश प्रेम नाहीये... Happy

आई मला मांजर म्हणायची.. पण आता खुप कमी झाले मासे खाणे. माझा गुण लेकीने उचललाय.. बोंबील आणि मांदेली तिच्या खास आवडीचे...... अख्खे वाटेच्या वाटे ती एकटी खाते.

साधना आता तुझ्या आईने केलेला प्रयोग मी पण करेन.
बी तुला जर साथ हवी असेल तुझ्या बाजुने तर अश्विनीला हाक मार.

तांदळाचे ताजे रवाळ पिठ करुन ते बोंबिलांना लावुन तळले तर अजुन कुरकुरीत होतात >>>>>>>>>>>>>>>>>>> हो खर आहे हे, मी करते असे, त्या पिठा त थोडेसे मिठ , मसाला टाकावा म्हन्जे मग आणखिन छान चव येते

अरे बी, हे फोटो आहेत म्हणून मी बघू शकतेय. प्रत्यक्ष तर मासेवाली एका फुटपाथला दिसली तर मी पलिकडल्या फुटपाथवर जाते Proud

<<<<हो खर आहे हे, मी करते असे, त्या पिठा त थोडेसे मिठ , मसाला टाकावा म्हन्जे मग आणखिन छान चव येते>>>>> त्यात २-३ खडे गूळ आणि २ टीस्पून गोडामसाला पण टाकावा म्हणजे आणखिन पेक्षा आणखिन छान चव येते Rofl

हो खर आहे हे, मी करते असे, त्या पिठा त थोडेसे मिठ , मसाला टाकावा म्हन्जे मग आणखिन छान चव येते>>>>>
अश्विनी, मी तुझी पोस्ट वाचायला लागले आणि पहिला मला धक्काच बसला मग अ‍ॅरो बघितले.

थंड अग कच्ची केळी पेक्षा पिकलेली थोडे काळपट डाग सालांना पडलेली केळी घे. बोंबील तशेच असतात मऊ मऊ.

मांसाहारी नाही मासेहारी.. Happy छान Happy

मग साधने तू इथे सिंगापुरात यायला हव.. असले चित्रविचित्र मासे मिळतात.. !

मांदेलीचे चित्र टाका ना कुणी..

टाक गं जागु.. मी उद्याच घेणार आहे मांदेली...

बी, माशांच्या बेटात राहुन मासे खात नाहीस तु??? काय म्हणावे या नशिबाला???? ते चित्रविचित्र चवीला बरे असतात का????

मासे खाल्ल्याने बुद्धी शार्प होते असे म्हणतात उदा: सर्व बंगाली जन.

ह्म्म.. म्हणुन त्या बंगालीजनांच्या चेह-यावर मासा मेल्यावर त्याच्या डोळ्यात आणि चेह-यावर जसे थंडगार थिजल्यासारखे भाव असतात तसे भाव असतात बहुतेक.... अपवाद बिप्स,

बाकी माझ्या ओळखीचे सगळे बंगालीबाबु जाड फ्रेमचा, जाड काचेचा चश्मा लावतात, त्याच्यामागे त्यांचे हिल्सा माशासारखे बाहेर आलेले वाटोळे डोळे असतात आणि त्यांच्याशी काहीही बोलले की साधारण पाच मिनिटाने थंडगार थिजल्या चेह-याने उत्तरे देतात... Happy

आई मला मांजर म्हणायची.. पण आता खुप कमी झाले मासे खाणे. माझा गुण लेकीने उचललाय.. बोंबील आणि मांदेली तिच्या खास आवडीचे...... अख्खे वाटेच्या वाटे ती एकटी खाते.

तुझ्या लेकीला माझे सेम पिंच. मी पण असेच बोंबिल खायचे. आता बोंबील फक्त बघते. अलर्जी येते मला Sad

बाकी सगळे मासे खाते मी. पण बोंबील ते बोंबिल Sad

मलाही लहानपणी माझे वडील (ते मासे आवडीने बनवतात. मासे आणले की आईला आराम असायचा) मला मस्त पाऊस पडत असताना तव्यावरचे गरम गरम तळलेले बोंबील खायला द्यायचे. आहाहा क्या वो दिन थे ?

मस्त पाऊस पडत असताना तव्यावरचे गरम गरम तळलेले बोंबील खायला द्यायचे. आहाहा क्या वो दिन थे ? >> जागू आम्ही पावसाळ्यात भज्यांवर ताव मारतो, तुम्ही बोंबिलांवर.. Happy
हा बीबी पण अर्धवट ठेवलास.. क्लेम नं २, फोटो टाकणे.. Happy

योगायोग ! आजच ताजे, मस्त बोंबिल मिळाले !!
सर्वसाधारणपणे आमच्याकडे आलं, लसूण, किंचित कांदा, हिरवी मिरची , थोडंसं ओल्या नारळाचं खोबरं, थोडी कोथिंबीर व हळद हें सर्व मिक्सरमधून बारीक वाटून बोंबलांना लावतात. तेलांत लसणीची फोडणी देऊन त्यावर हे बोंबिल परतून घेऊन [ फक्त भांडं हलवून ]मग मीठ , चिंचेचा कोळ व पाणी घालतात. वर बारीक चिरून कोथिंबीर. अगदीं बारीक गॅस ठेवून शिजवून घेतात. अर्नाळा, वसई भागात [ जिथें मस्त व भरपूर बोंबिल मिळतात] तिथें हा 'बोंबलाचा रस्सा' विशेष लोकप्रिय आहे. माझाही खूप आवडता.
बोंबिल तळणें [पाट्याखाली न ठेवलेले] हें मात्र कसबच आहे. ताजे सुरेख तळलेले बोंबिल म्हणजे स्वर्गसुखच ! [ माझी बायको यांत भलतीच वाकबगार आहे हा आमच्या प्रदीर्घ संसाराचा पायाच आहे असं मीं मानतो ! Wink ]
जागूजी, आतां अर्थातच तुमच्या वरील पद्धतिने करून पहाणं आलंच ! धन्यवाद.

भाऊ खोबर्‍याच्या वाटणापेक्षा मी वरील केलेला रस्सा नक्कीच करुन बघा. बोंबिलाची चव छान रश्यात उतरते.
आणि तळलेले बोंबीलाला कुठल्याच माशाची तोड नाही. खरच स्वर्गसुख. आम्ही नुसतेही खातो तळून.

विनिता धन्यवाद.

जागू, माझी आई पण असेच करते. फक्त यात चिंचेऐवजी कोकम वापरते. लसणाच्या फोडणी न घालता आले+लसुण्+कोथींबीर याचे वाटण वापरते. याला आम्ही तेलावरचे कालवण म्हणतो. करंदी, कोलंबी, घोळ, पापलेट, सुरमई ...अशाचेही या प्रकारे कालवण करतो.

जागूताई ही मासे सिरीज वाचतेय आणि फोटोही बघतेय. मी कधीच मासे खाल्ले नाहीयेत पण तुमच्या रेसिपीज वाचनीय आहेत.
तुम्हाला केवढी माहिती आहे हो ... ग्रेट.

Pages