कथा अथवा लेख दिसत नाही

Submitted by मदत_समिती on 26 June, 2010 - 15:08

मायबोलीवरील लिखाण हे त्यावरच्या प्रतिसादांच्या वेळेनुसार क्रमवारित असते. त्यामुळे नविन आलेले साहित्य बर्‍याचदा 'नवीन लेखनात' मागच्या पानांवर जाते. आपले लिखाण तिथे आहे का पहा. तसेच तुमचे लिखाण तुमच्या सदस्यत्व खात्यातही दिसते. माझे सदस्यत्व >> पाउलखुणा >> लेखन या क्रमाने दुव्यांवर गेल्यास आपले सर्व लिखाण दिसेल.

एखादे लेखन बरेच दिवस अप्रकशित ठेवून मग प्रकाशित केले तर ते लेखन नवीन लेखन मध्ये पहिल्या पानावर न दिसता ज्या दिवशी लिहायला सुरूवात केली आहे त्या तारखेनुसार बर्‍याच मागच्या पानावर सापडते सबब आपले लेखन प्रकाशित झाले नाही असे लेखकांना वाटते.
लेखन ज्या दिवशी प्रकाशित केले त्यादिवशीच्या लेखनात ते येत नसल्याने ते 'नवीन लेखना'च्या पहिल्या पानावर दिसत नाही. त्यावर जर कोणी प्रतिसाद दिला तरच ते प्रतिसादाच्या वेळेनुसार क्रमवारीत येते.

एखाद्या कथेत/लेखात जर परिच्छेद खूपच मोठा असला त्यावेळेसही असे होते आहे. कथेत/लेखात योग्य ते परिच्छेद दिल्यास कथा/लेख दिसू लागेल. शक्यतो कथा/लेख ही सलग, परिच्छेद न देता लिहीणे या प्रमुख कारणास्तव ती दिसत नाही. बदल करूनही कथा/लेख दिसत नसल्यास मायबोली प्रशासकांशी संपर्क साधावा.

मी दांडेकर काकूंची डायरी असा लेख लिहिला आहे तरीही तो दिसत नाहिये,म्हणुन मी लॉग ऑऊट होऊन परत लॉग इन केले तरी तो दिसत नाहीये,मी मागची ही पान चाळली आणि माझ्या सदस्याच्या लेखातही पाहिले पण तिथेही तो दिसत नाहीये.मग आता ह्यावर काय कराव?

मा़झी पूल कथा दिसत नाही. वर प्रशासकांशी संपर्क साधावा असे लिहले आहे. पण त्याचा दुवा दिलेला नाही. मी मद्तसमितीला इ मेल पाठविले आहे. मद्तसमिती आणि प्रशासक वेगवेगळे आहेत, बरोबर ना? प्रशासकांशी कसा संपर्क साधायचा?

मदत समिती आणि मायबोली प्रशासक वेगवेगळे आहेत.
तुम्ही वर सांगीतलेत ते सगळे उपाय करून बघीतलेत का सुरवातील एक ओळ सोडणे, छोटे उतारे करणे इ.?
ते करूनही होत नसेल तर वर लिंक आहे प्रशासकांशी संपर्क साधा अशी त्यावर टिचकी मारा. प्रशासकांच्या विचारपूस मध्ये लिहीता येईल.

रामराम MVPRJ !

>>एखाद्या कथेत/लेखात जर परिच्छेद खूपच मोठा असला त्यावेळेसही असे होते आहे. कथेत/लेखात योग्य ते परिच्छेद दिल्यास कथा/लेख दिसू लागेल. शक्यतो कथा/लेख ही सलग, परिच्छेद न देता लिहीणे या प्रमुख कारणास्तव ती दिसत नाही. बदल करूनही कथा/लेख दिसत नसल्यास मायबोली प्रशासकांशी संपर्क साधावा.
<<

तुमच्या कथेमध्ये दोन परिच्छेदांमध्ये दोन ओळी सोडून बघणार का? कथा त्यामुळेच दिसत नाही आहे.

रुनी, मदत समिती आणि नंद्या सर्वांना मदतीबद्दल धन्यवाद. नंद्या, तुमचा उपाय अवलंबिला आणि आता गोष्ट दिसते आहे. जरुर वाचा Happy हे म्हणजे मदत केली तर (वाचा आता) कामही करा असं झालं ना?

बेफिकीर यांचे "गगोकर जाती दुबॉय" असे काहीसे विनोदी लेखन मी बुधवारी वाचले होते व प्रतिसादही दिला होता. आता ते लेखन दिसत नाही.
"माझे सदस्यत्व-पाऊलखुणा-प्रतिसाद" या प्रकारे पण शोध घेण्याचा प्रयत्न केला पण लेखन सापडले नाही.

इथे स्क्रोल केल्यावर एकदम खाली 'सर्च' बटण दिसते त्या आधीच्या चौकोनात 'भयानक' असे टाईप केले की आलेले सगळे भाग दिसतात.

जुन्या हितगुज वरील " मराठीची विविध रुपे " मालवणी म्हणी " देवनागरीत" वाचता येत नाहित , काय करावे म्हणजे वाचता येतिल ?

माझे हे विडंबन अप्रकाशित का दिसते आहे. तसेच ते माझ्या लेखनात दिसत नाही.
http://www.maayboli.com/node/32970

कुणीतरी अनवधानाने डिलिट केले असावे का?

mala solapur sex scandleche pudil bhag kase vachayala miltil me meen jilhapramukh zali. tevdhech vachale aahet.

काल मी अकल्पित भाग १ प्रकाशित केला होता पण आज जेव्हा मी अकल्पित भाग २ मायबोली वर टाकला तेव्हा अकल्पित भाग १ दिसेनासा झाला. यात माझी काही चूक झाली आहे का..?

अ‍ॅडमिन,

कादंबरी विभागात 'मनाचिये गुंती' चे १२ भाग दिसतात. १३वा भाग दिसत नाहीये. कृपया १३वा भाग त्या विभागात हलवावा.
आभारी आहे.

http://www.maayboli.com/node/23327
साडे तीनशे वर्षापासून अज्ञात असलेली शिवथर घळ हिचं संशोधन व त्याचे पुरावे ह्या जगता समोर ह्या लेखा द्वारे समजत होते .
हे सत्य लोक किती दडपण्याच प्रयत्न केला तरी दडपणार नाही कारण समर्थांचं आशीर्वाद आम्हा मागे आहे .
माझी मायबोली ला एव्हढी विनंती आहे तो लेख जो सद्या कोणी तरी बंद केला आहे तो पुन्हा आम्हाला दिसावा.

माझे
अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि ...[१]

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि ...[२]
हे माझेच दोन्ही लेख 'सर्वांसाठी' प्रकाशित केलेले असूनही मी गुलमोहोर मध्ये लॉग इन केल्याशिवाय मला नवीन लेखन मध्ये का दिसत नाहीत? माझी काय चूक होत असावी? ते सर्वांनाच दिसावेत अशी माझी इच्छा आहे.

जुन्या हितगुजवरचे लिखाण दिसत नाही असे नाही. पण ते वाचणे अशक्य आहे. रोमन मध्ये बरेच लेख आणि प्रतिसाद दिसतात. मी क्रोम/ फा फॉ वापरते. दोन्ही वापरून सेम प्रोब्लेम.

हा प्रश्न मी इतरही कुठेकुठे विचारून झालेला आहे. पण कुठेच उत्तर मिळाले नाही.

हा प्रश्न या धाग्यावर अप्रस्तुत असल्यास किमान योग्य धागा सांगा जिथे हा प्रश्न विचारता येईल/ त्याचे उत्तर मिळेल.

मला "माझे सदस्यत्व >> पाउलखुणा >> लेखन " इथे जाता येत नाही. मी "माझे सदस्यत्व " वर टिचकी मारली कि नंतर बाकीचे दुवे दिसतात पण "पाउलखुणा" दिसत नाही.

आकाश नील
'माझे सदस्यत्व >> लेखन' असा दुवा आहे तो पहा. मध्यंतरी मायबोली अपडेट्स मध्ये 'पाऊलखुणा' ऐवजी तिथे 'लेखन' नावाचा टॅब घातला आहे.
पियुपरी
जुन्या मायबोलीतले लेखन इंटरनेट एक्सप्लोरर (जुने व्हर्जन) वापरून वाचता येते. बाकी कुठल्याही ब्राऊझरमध्ये हे लेखन नीट दिसत नाही. यावर दुसरा कुठला उपाय सध्यातरी नाही.

नाही तुम्ही फक्त प्रतिसाद दिलेले लेखन बघण्याची सोय जी पाऊलखुणामध्ये होती ती आता अस्तित्वात नाही. मायबोलीच्या सर्व्हरवर खूप ताण येत असल्याने ती सोय काढून टाकली गेली.

Pages