प्रेम म्हणजे

Submitted by लाल्या on 26 June, 2010 - 03:04

प्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी,
प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी.

प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणि प्रेजेंट्स भारी.
प्रेम म्हणजे मित्रांकडून घेतलेली उधारी...

प्रेम म्हणजे फिरणं करून बंक लेक्चर,
प्रेम म्हणजे पॉपकॉर्न, पेप्सी आणि पिक्चर.

प्रेम म्हणजे घरच्यांकडे मारलेली थाप.
प्रेम म्हणजे काठी घेऊन पोरीचा बाप.

प्रेम म्हणजे माधुरीचं कॉपीकॅट स्माईल.
प्रेम म्हणजे आमीरची ढापलेली हेअरस्टाईल.

प्रेम म्हणजे रंगीबेरंगी गोला कूल कूल.
प्रेम म्हणजे व्हॅलेंटाईनचं गुलाबाचं फूल.

प्रेम म्हणजे नजरेमध्ये चालणारा खेळ.
प्रेम म्हणजे संध्याकाळी भेटण्याची वेळ.

प्रेम म्हणजे हृदयाला लागलेला बाण.
प्रेम म्हणजे डोक्याला पडणारा ताण.

प्रेम म्हणजे एक राजा आणि एक राणी.
प्रेम म्हणजे हसता हसता डोळ्यांत आलेलं पाणी.

- माधव आजगांवकर.

गुलमोहर: 

अप्रतिम.. शेवटच्या ओळी वाचताना वेगळाच अनुभव देवून गेलात तुम्ही.. माधव.. सुंदर आहे तुमचं लेखन आणखी सुद्धा वाचायला नक्कीच आवडेल.

Happy