आशा भोसले यांचा कार्यक्रम

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी फिलाडेल्फियाच्या किमेल सेन्टर मधे आशा भोसले अन अमित कुमार यांचा कार्यक्रम होता.
त्या कार्यक्रमात म्हटलेली गाणी :

ये जमीं गा रही है, आसमां गा रहा है
आनेवाला पल जानेवाला है
फूलोंके रंग से दिलकी कलमसे

रात बाकी बात बाकी होना है जो , हो जाने दो

मग एक गाणं दीनानाथांनी कसं शिकवलं अन लता, मीना अन त्यांनी स्वतः कसं म्हटलं असेल याची नक्कल

चैनसे हमको कभी आपने जीने ना दिया
लग जा गले के फिर ये हंसीं रात न हो
शूरा मी वंदिले
झाले युवति मन दारूण
झुमका गिरा रे - याला वंस मोअर
एक नव्या आल्बम मधलं गाणं तुम जो मिले तो दिलने कहा
चुरा लिया है - १०,००० वेळा रीमिक्स झालेलं गाणं
पहले पहले प्यार की मुलाकातें याद है
मेरी सोनी मेरी तमन्ना
य वादा रहा - याच्या रिमिक्स वर पण ताशेरे
जिंदगी के सफर मे गुजर जातें हैं

बडे अच्छे लगतें हैं
रूप तेरा मस्ताना - या गाण्याची मूळ सचिनदांनी लावलेली भाटियाळी चाल, मग किशोरने म्हटलेलं सचिन दांचं मूळ बंगाली गाणं अन मग या गाण्याचं फायनल रूप
ये मेरा दिल प्यार का दीवाना
दिल चीझ क्या है आप मेरी जान लीजिये
इन आखोंकी मस्ती के
बेकरार करके हमें युं न जाईये
जाने कहां गये वो दिन
बाबूजी धीरे चलना
मैने पूछा चांदसे
मेरा लौंग द वाज्जा ( मला ऐकू आलेली चुकीची गाणी ला लिंक करू का इथूनच?)
मग दोन चार कडवी ' बारी बरसी खटन गयासी'
नगाडा बजा
पिया तू अब तो आजा

अन मग त्या गेल्यावर ऑर्केस्ट्रा वाल्यांचं एक जबरदस्त जॅमिंग सेशन.

घरी जाताना आमच्या ( नष्टर ) ७६ वरचं ट्रॅफिक ऐकायला सुद्धा रेडिओ लावला नाही गाडीत.

विषय: 
प्रकार: 

वा काय मेजवानी मिळाली सुरांची तुला! सर्व गाणी सदाबहार आहेत. पण आता आशा भोसलेंचा आवाज खूप बदलला आहे आणि जो गोडवा पुर्वी होता तो राहिला नाही. मीही इथे त्यांचा एक शो पाहिला आहे पण त्यात त्यांनी फक्त शेवटी शेवटी चांगला आवाज लावला होता. तिकिट मात्र रग्गड होते.

कसा लागेल बी? वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केली की त्यांनी. तरीही लता पेक्षा सुसह्य आहे अजून.
शोनू, झी वर जी ऍड दाखवताहेत तोच ना हा प्रोग्रॅम? गेल्या वर्षी अट्लांटीक सीटीला याची देही याची डोळा पाहून धन्य झाले.

लकी आहत खरच तुम्ही. मी काहि अजुन असा लाइव कार्यक्रम नाहि पाहिलाय.

आमच्या इथल्या कार्यक्रमात तरी आवाज एकदम फंडू लागला होता.शूरा मी वंदिले ऐकताना तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं एकदम!
अमॄता , अजून पण अमेरिकेत कुठे कुठे कार्यक्रम असतील. सुलेखा वर माहिती मिळेल.

अगं अमृता न्यूयॉर्क मध्ये पण आहे कुठेतरी लवकरच. बघते ऍड झी वर आणि कळवते हवंतर.

त्या दोघीही ह्या वयातही अशी जबरदस्त दमछाक वाली गाणि गाताहेत हेच नवल........ तरुणांनाही श्वास लागतो त्यांची गाणि गाताना..

त्यांच्या बरोबरीच्या गायिका किंवा गायक आता कुठे गाताहेत?? पण ह्या दोघींचे अल्बम अजुनही येताहेत....मला तर आशाचा आवाज दिवसेदिवस् जास्त सुंदर झाल्यासारखा वाटतो... लताचा खुप बदललाय हे खरे आहे....वय.. अजुन काय?

साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

आशा लता पेक्षा सुसह्य आहे अजून......... बरोबर आहे.... लताचे सध्याचे रन्ग दे बसन्ती मधले लुकाछुपी तेवढे सुसह्य आहे...

-=============-------------------------------------------
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!