मासे ४) उधवणीची चिवनी (पावसाळ्यातील मच्छी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 June, 2010 - 03:16
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ चिवनी
फोडणी - १ गड्डा लसूण पाकळ्या ठेचुन, हिंग, हळद, मसाला २ चमचे.
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
१ हिरवी मिरची
थोडी चिरलेली कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेलावर वरील फोडणी टाकुन चिवनी व चिंचेचा कोळ टाकावा. थोडे पाणी घालावे. मिठ घालावे व चिरलेली कोथिंबीर घालुन मिरची मोडून घालावी. उकळी आली की ३-४ मिनीटे शिजवुन गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४- ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

चिवनी ही मच्छी सुरवातीचा जोरदार पाउस पडून जेंव्हा पाणी वाहू लागत तेंव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठि ही वर आलेली असतात. म्हणुन ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातुन वाहत खाडीत, विर्‍यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसु घेऊन जागोजागी दिसतात.

चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावुन साफ करावी लागतात. कारण ती बुळबूळीत असतात. हातात घेतल्यावर हातातुन सटकतात. ह्यांच्या पाठीवर एक टणक काटा आसतो तो राखाडी हातात घेउन मोडतात.
मला हा काटा वगैरे काढता येत नाही म्हणून मी त्या काट्याच्या जवळून डोकच काढुन टाकते. डोक्याच्या जवळच हा काटा असतो. मच्याकडे कोणी जास्त डोकी खात नाहीत मच्छीची. त्यामुळे साफ करायलाही सोप पडतात.

ह्यातील गाबोळी खाण्यासाठी ही मच्छी लोकप्रिय आहे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी मळे नावाचे मासे दिसायचे, ते पण असेच चिकट असायचे. अजूनही मिळत असतील. >>>> हो आमच्या
गावच्या नदित मिळतात .... ते खायला खास पाहुणे येतात ....

जागू,चिवनीबद्दल फक्त माहित होते पण रेसिपी माहित नव्हती.ती टाकल्याबद्द्ल धन्स!आमच्या इथे हे मासे मिळतात.आता करून बघता येतील.

सृष्टी कधी मळे मिळाले तर फोटो नक्की टाक.

अंशा नक्की करुन बघ पण आता उधवणीची चिवणी गेली असतील. नुसती चिवणी मिळतील. खर सांगायच तर उधाण यायला पाउसच नाही आला.

Pages