विंबल्डन - २०१०

Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53

ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.

हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोको आणि बर्डीचची सेमी फायनल सुरु झाली...
दोघही अजून अंदाज घेतायत एकमेकांचा... बर्डीचने एक ब्रेक मिळवला ऑलरेडी....

मरेचा चेहरा वाचून त्याला स्वतःच्या जिंकण्याची आशा आहे असे वाटत नाही. बेकहॅम पण आलाय मॅच बघायला. इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा 'पाय'गुण मरेसाठी घेऊन आलाय का?
मरे दुसरा सेट हरला : टाय ब्रेक मधे दोनदा मिनी ब्रेक, एक सेट पॉईंट घेऊन.

खूप कमी गेम्स ब्रेक पॉइंट पर्यंत गेलेत.

लिअँडर-कॅरा ब्लॅक मिश्र दुहेरीच्या फायनल मधे...सेमि फायनल मधे त्याने ड्लोहीच्या टीम ला हरवले.

हम्म....

नदाल विरुद्ध फेडरर Sad नाही ......

नदाल विरुद्ध बर्डिच ---- फायनलला फारशी मजा नाही येणार...

बट.. आय होप धिस इस नॉट द बिगीनिंग ऑफ द एंड ऑफ रॉजर-द्-ग्रेट>>> मुकुंद..अगदी अगदी !!

फेडरर कम ब्ञक सुन...

नदाल विरुद्ध बर्डिच ---- फायनलला फारशी मजा नाही येणार...>>> नदाल फुलफॉर्म मध्ये खेळणार तर कदाचित येणार नाही पण बर्डिच त्याला तितकीच जोरदार लढत देईल.... कालची बर्डीचची मॅच बघितली... त्यानी डोकोविचला पूर्णपणे झोपवला..... अर्थात दुसर्‍या सेट मध्ये थोडासा गडबडला पण शेवटी त्यानी जबरीच खेचला तो सेट... अर्थात नदाल असल्या काही संधी मिळाल्या की त्या अजिबातच सोडत नाही.. त्यामुळे बर्डीचला त्रास होणार...

"नदाल विरुद्ध बर्डिच ---- फायनलला फारशी मजा नाही येणार..."
फक्त फेडररल मजा नाही येणार, बाकी सगळ्यांना येईल.

सेरेनाचं चौथं विजेतेपद... Happy
एकूणात सेरेना जबरदस्त फॉर्म मधे असल्याने ही स्पर्धा फारच किरकोळीत जिंकली असं वाटलं..

सेरेना समोर नामांकित खेळाडु फारशा आल्याच नाहीत, ली ना आणि मारिया शारापोव्हा याच दोघी..तिला एकूणच स्पर्धा खूप सोपी गेली. आव्हान देऊ शकणार्‍या आपापसात संपल्या नाहीतर नवख्या खेळाडूंकडून हरल्या.... पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्याशी सामना झाला असता तर सेरेना जिंकली नसती. पूर्ण स्पर्धेत एकही सेट गमवला नाही. चौथे विंबल्डन आणि १३ वे ग्रँड स्लॅम जेतेपद. पण स्टेफी, मार्टिना आणि खिर्स एव्हर्ट पेक्षा अजून मागेच.

बाप्यांची फायनल पाहत आहे का कुणी?

पहिल्याच सेट मध्ये आहे पण भारी चालू आहे. लोकांच्या कॉमेंटसही मस्त आहेत. Happy बर्डिच अन्डर प्रेशर नाही वाटत. तो राफाला कोर्टभर पळवतोय.

पेस आणि कॅरा ब्लॅक मिश्र दुहेरीत जिंकले !!! पेस साठी अजून एक विंबल्डन आणि ग्रँडस्लॅम विजेतेपद.. Happy

एकूणात विंबल्डन भारी झाले.. अनेक इतिहासातल्या सगळ्यात लांबलेल्या सामन्यासह उत्तम सामने, चांगल्या दर्जाचं टेनीस आणि सुरुवातीच्या फेर्‍यांमधले अनपेक्षित निकाल ह्यामुळे लक्षात राहील..

पेस/ब्लॅकची मॅच चांगली झाली.. ह्या विंबल्डनमध्ये एव्हडी एकच मॅच बघता आली.. पेसचे अभिनंदन.. पठ्ठ्या किती वर्षे खेळतोय.. तो ज्युनिअर विंबल्डन जिंकला त्यालापण २० वर्षे झाली..

...तुम्ही पहाच नदाल बर्डीचला कसा झोपवतो ते...

सिद्धार्थ.. तुझे वरचे भविष्य खरे ठरले..:)

राज.. एकदम बरोबर.. स्टार्ट टु फिनीश नदाल वॉज डॉमिनेटिंग! या मॅचमधे नदाल आपला खेळ पाहीजे तेव्हा ..अ‍ॅट विल!.. वरच्या लेव्हलवर नेत होता..(प्रत्येक सेटमधे जेव्हा क्रिटिकल गेममधे .. म्हणजे ब्रेक मिळवायचा होता तेव्हा नेमका!..)बाकीच्या वेळी बर्डिकला नुसता खेळवला.. बर्डिकसुद्धा चांगला खेळत होता पण नदाल जेव्हा जेव्हा त्याचा स्वतःचा खेळ उंचावत होता तेव्हा तेव्हा त्या दोघांच्या खेळातली तफावत लगेच दिसुन येत होती. नदालचा तो हेवी टॉप स्पिन असलेला फोरहँड.. जबरी! तसेच अ‍ॅड कोर्टला त्याने केलेल्या त्या आउट ऑफ रिच.. जबरी स्लायसिंग सर्व्हिस! अहाहा!.. सध्या नदाल एका वेगळ्याच झोनमधे व बाकींच्यापेक्षा बर्‍याच वरच्या पातळीवर खेळत आहे. शिवाय नदालची ही विंबल्डनमधली चौथी फायनल होती तर बर्डिकची पहीलीच ग्रँड स्लॅम फायनल होती... त्याचाही फरक दिसत होता.

विंबल्डनला गेली ३ वर्षे लागोपाठ ३ जबरदस्त फायनल्स बघीतल्यामुळे.. ही फायनल बघताना जरा हिरमोड झाला.

आणी आजच्या फायनलनंतर एन. बी. सी. वर.. १९८० विंबल्डन फायनलमधे झालेला.. बोर्ग्-मॅकेन्रो मधला तो अजरामर टायब्रेकर... त्याची ३० वी अ‍ॅनिव्हर्सरी म्हणुन.. दाखवला.. पाहीला का कोणी? मला तर तो कालच बघीतल्यासारखा वाटला. त्या वेळच्या त्या वुडन रॅकेट पाहील्या का? बोर्ग अजुनही तसाच दिसतो.. पण ते कुरळे व मोठे लांब केस असलेला मॅकेन्रो मात्र अकाली म्हातारा झाल्यासारखा दिसतो..:(

एकूणात विंबल्डन भारी झाले.. अनेक इतिहासातल्या सगळ्यात लांबलेल्या सामन्यासह उत्तम सामने, चांगल्या दर्जाचं टेनीस आणि सुरुवातीच्या फेर्‍यांमधले अनपेक्षित निकाल ह्यामुळे लक्षात राहील..

विंबल्डनला गेली ३ वर्षे लागोपाठ ३ जबरदस्त फायनल्स बघीतल्यामुळे.. ही फायनल बघताना जरा हिरमोड झाला.

ही फायनल म्हणजे भरपेट जेवणानंतरची बडीशोप होती.

फेडरर बरोबर खेळताना आधी इतरांना आपण काही याला हरवत नाही असे वाटायचे तसेच आता राफाशी खेळताना वाटू लागेल. त्याने स्वतः मात्र आपल्याला कोणी हरवणार नाही हा समज आता जसा दूर ठेवलाय तसाच कायम दूर ठेवावा.

भरत आणि मुकुंद, यावर्षीचे विंबल्डन अजून एका गोष्टीमुळे माझ्या लक्षात राहील. लंन्डन मधे एकही दिवस पाउस नाही. त्यामुळे असेल किंवा कव्हर मुळे असेल, कोर्टस फारच स्लो वाटली.
सम्पूर्ण फायनल मधे एकही सर्व्ह अँड व्हॉली विनर नाही. विंबल्डन की फ्रेंच ओपन. राफा जिंकला नाही तर नवलच.

चला, भेटू पुन्हा सगळे आता युएस ओपनला.

मुकुंद,
मी त्यादिवशी वेगास मधे होतो, सकाली ६ ला झोपुन ८ ला मॅचसाठी उठलो, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे राफाचा खेळ ऊन्चावतच गेला. Happy

फायनलनंतर एन. बी. सी. १९८० ची फायनल पण पाहीली..तुम्ही म्हणता ते एकदम पटेश.. Happy

>>ही फायनल म्हणजे भरपेट जेवणानंतरची बडीशोप होती.>
अगदी अगदी..

>>त्याची ३० वी अ‍ॅनिव्हर्सरी म्हणुन.. दाखवला.. पाहीला का कोणी? <<
त्यात बोर्ग/मॅकेंरोची कमेंटरी आणि दोघांनी हल्ली खेळलेली एक्झिबिशन मॅच बघायला मिळाली म्हणजे दिवस सार्थकी लागला (टायगर एटीअँड्टी नॅशनल टुर्नामेंट मध्ये मार खात असताना सुद्धा. Happy )

Pages