स्कूल चले हम!!!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
10
शाळा चालू झाल्या... नविन रेनकोट, नविन छत्री, नविन दप्तर, नविन पुस्तकं...
नविन पुस्तकाचा तो मनामधे अजून पण दरवळणारा वास.
खूप खूप दिवसानी भेटणार्या ते मित्र. त्याच्यासोबत अखंड चालणार्या गप्पा..
आणि या सर्वाना सोबत म्हणून आकाशातून कोसळणारा तो पाऊस.
आता तो पाऊस आहे, रेनकोट आहे, पुस्तकं आहेत... नाहीत ते फक्त जवळचे असे मित्र-मैत्रीण.. आणि त्या अखंड गप्पा!!!!!
विषय:
प्रकार:
शेअर करा
नंदिनी फारच सुंदर शाळेचे दिवस
नंदिनी फारच सुंदर शाळेचे दिवस आठवले...........
नाहीत ते फक्त जवळचे असे
नाहीत ते फक्त जवळचे असे मित्र-मैत्रीण.. आणि त्या अखंड गप्पा!!!!!
नंदीनी अग मायबोलीला विसरलीस की काय ?
बाकी फोटो जुन्या आठवणी ताज्या करतोय. मला त्या रिबीणीच जास्त आठवतात. त्या आणल्या की अगरबत्तीने त्याची टोक जाळायला लागायची.
अखंड गप्पा, हे मात्र एकदम
अखंड गप्पा, हे मात्र एकदम बरूबर
शाळा ! लागतो लळा अशी माझी
शाळा !
लागतो लळा अशी माझी शाळा ... शाळेचा पहिला दिवस म्हणजे किती जिवांची लगबग आई-बापाची धडपड मार्गी लागलेली असते कारण लेकराच्या अॅडमिशनसाठी न खाता पिता , झोपता रात्रभर रांगेत उभा राहून फक्त फॉर्म भरलेला असतो अन कधी नव्हे ते शाळेच्या interview साठी लेकरापेक्षा आईबापानेच जास्त तयारी केलेली असते.
मग ते अमाप ओझ्याचं दप्तर, रुमाल, वॉटरबॅग , रेन कोट , शाळेचा टाय , बुटं .. सगळं काही घेताना तुंडूंब उसळलेली दुकानातली गर्दी... त्यानंतर ते पोराच्या पाठीवर ठेवताना एक विचार, कि झेपेल का ह्याला एवढा अभ्यास ? मग शाळेत पोहचल्यावर लेकरू रडतं कारणं त्याला ते विश्व नविनच असतं ! मग ते रडू नये म्हणून दाखवलेली खोटी खरी अमिषे. सारं काही वेगळचं... मग उगाच घरी आल्यावर त्याला विचरायचं कशी होती शाळा , मग ते रडतं शेंबूड पुसत सांगणार छान अगदी हाताच्या मुद्रा करून. काय शिकवलं कि म्हणणार पोएम , काय दाखवलं की म्हणणार हत्ती , घोडा, उंट , वाघ, पुन्हा प्रश्न मग घाबरला/घाबरली नाहीस तू.. नाही मी अजिबात नाही घाबरलो / घाबरले. मग पुढचा अन अगदी हळवा प्रश्न हळूच विचारलेला .. मग जाणार ना उद्या शाळेत... मग ते लेकरू विश्वासाने म्हणणार हो जाणार !
असचं काहीसं असतं शाळेचं विश्व ! मी पाहिलेलं तर असचं आहे !
हे रत्नागिरी आहे का हो?
हे रत्नागिरी आहे का हो?
शाळा सुटली पाटी फुटली. आई मला
शाळा सुटली पाटी फुटली. आई मला भग्यानी मारलं... त्याच्या काय बापाचं खाल्लं......
आनंन्दा, हो हे रत्नागिरी आहे!
आनंन्दा, हो हे रत्नागिरी आहे! गणपतीपुळे ते जयगडच्या दरम्यानचा फोटो आहे.
चंपक, हा नेवाश्याचा फोटो आहे का??
हो नंदिनी.:
हो नंदिनी.::)
शाळेचे नाव काय आहे
शाळेचे नाव काय आहे चंपी??
कदाचित माझ्या आईची शाळा असेल. ती ज्ञानोदय इंग्लिश स्कूलला ७६-७७ साली होती.
अग ती आमच्या गावातली शाळा आहे
अग ती आमच्या गावातली शाळा आहे मुकिंद्पूर चि मला नाव नाही आठवत .
ज्ञानोदय इंग्लिश स्कूलला तर मि हि होते नंदिनी