नवी मुंबई

Submitted by admin on 5 April, 2008 - 11:15

नवी मुंबईमधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

सुप्रभात.

ऐरोली टोळनाक्याच्या अलीकडे आणि पलीकडे सध्या बहावा, सोनमोहर आणि गुलमोहर चांगले फुललेत. तिथून जाताना त्यांच्याकडे मान वळवल्याशिवाय पुढे जाणे होत नाही. आज दुसरे एक लहान धाटणीचे मोजकेच गुच्छ फुललेले झाड पाहिले. पाने जवळजवळ नसावीत (किंवा घोडा वेगात असल्याने नजरेला पडली नाहीत.) बहावा म्हणावा तर त्याचे गुच्छ आकाशाकडे तोंड करून फुललेले होते. खालच्या दिशेने लटकलेले नव्हते. सोनमोहरही नक्कीच नव्हता. उद्या जता थांबून नीट बघतो. साधना, हे कोणते झाड असेल बरे?

पुलाच्या डाव्या खाडीकाठी रोहीतपक्षांची न्याहारी चाललेली असते. तर उजव्या बाजूला ताज्या मिठाच्या शुभ्र राशी दिसतात.

गजानन हा पिवळा tabebuia. हा म्हटले तर खूप दुर्मिळ झालाय आपल्याकडे आता. हा वर तुम्ही टाकला बहुतेक ऐरोली जवळचा असावा. तिथून पुढे कोपरखैरणे स्टेशन समोर reliannce DAKC च्या पहिल्या गेटच्या दारात याची दोन झाडे आहेत. तीही यावर्षी एवढीच फुललेली. या व्यतिरिक्त नेरुळला एका सोसायटीच्या आवारात एक झाड आहे. बस. पूर्ण मुंबई आणि नवी मुंबई धरून मी पाहिलेल्लि इतकीच झाडे.
या वर्षी गुलाबी tabebuia सगळी पाने गाळून गच्च बहरलाय. मुंबईत तर आहेच पण नव्या मुंबईतही खूप जागी आहे. खारघर तर पूर्ण गुलाबी झालेय, रस्ते दुतर्फा भरलेत गुलाबी फुलांनी. नेरुळ मध्येही खूप झाडे फुललीत.

खारघर तर पूर्ण गुलाबी झालेय, रस्ते दुतर्फा भरलेत गुलाबी फुलांनी. +१
मी कधीतरी विचारणारच होतो की ही कोणती झाडे आहेत.

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Pink%20Trumpet%20Tree.html

इथला नाही त्यामुळे इथले नाव नसावे. गेल्या वर्षीपर्यंत खारघर मधला इतका फुलत नव्हता. सीवुड्सच्या एका गल्लीत मात्र अशीच गगुलाबी झाडे झाली होती. यंदाची लाम्बलेली थंडी ह्या बहराला कारणीभूत असावीत असा माझा अंदाज आहे. यंदा तसाही सगळ्याच झाडांना खूप बहर आलाय. आंबे तर नुसते पानांपानाला लागडलेत.

गेल्या वर्षीपर्यंत खारघर मधला इतका फुलत नव्हता.
यंदाची लाम्बलेली थंडी ह्या बहराला कारणीभूत असावीत असा माझा अंदाज आहे >>
मी ही विचार करत होतो की एवढी सुंदर झाडे अचानक यावर्षीच कशी काय नजरेत भरतायत

आंबे तर नुसते पानांपानाला लागडलेत. >> +१

साधना, ओह ओके!
ही तीन झाडे ऐरोलीकडून मुलुंडकडे जाताना पुलावर जस्ट चढण्यापूर्वीच भेटतात.

हा क्लोजप -
Yellow_flower_plant_closeup.jpg

पाने लांबुडकी दिसत होती.

Yellow_flower_plant_leaves.jpg

आणि हो, रोहितपक्षी अजूनही आहेत. खाडीच्या दुतर्फा दिसतात. एकदा ढगाळ वातावरण होते, तेव्हा तर भला मोठ्ठा थवा खाडीच्या मधोमध पाण्यावर तरंगत होता. मी पाण्यात पोहणारे रोहित त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिले.

सुप्रभात.

आज आभाळात एके ठिकाणी ढगांचा अंधार दिसत होता तर त्याच्या पलीकडचा स्वच्छ उजेड त्या अंधाराखालून दिसत होता. खाडीवरही काठोकाठ भरलेले ढग जमून आले होते पण त्यांच्या पलीकडच्या उजेडाने पाणी मात्र चकाचक चमकत होते. हापिस गाठण्यापूर्वी दोन मिनिटासाठी जाडेजाड पावसाने गाठले.

नव्या मुंबईत खात्रीशीर दर्जाची आणि वाजवी भावात फर्निचर (मुख्यतः सोफे, डायनिंग टेबल) कोठे मिळतील?

ठाणे, मुलुंड कडचेही चालतील. (त्याला ऑक्ट्राय भरायला लागेल का?)

आणि मुंबईमध्ये कोठे मिळतील?

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg