सात्विक, तामसी, राजसी पदार्थ

Submitted by हर्ट on 8 June, 2010 - 04:42

मला आपल्या आहारातील कुठले पदार्थ सात्विक, तामसी, राजसी असतात त्यांची नावे हवी आहेत. दुसरे असे की काही पदार्थ हे आपण कुठल्या वेळी खातो यावर ते सात्विक, तामसी, राजसी पदार्थ आहेत हे ठरत असतात. जसे की मी वाचले आहे दुध हे सकाळी सत्विक असते. आंबा हा सकाळी सात्विक असतो. कृपया इथे या विषयावर माहिती लिहा.

काही सुचना:
# इथे विनोद निर्मिती करु नका.
# इथले संदर्भ घेऊन इतर वाफंवर वा कुणाच्या विपूत विनोद निर्मिती करु नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं खरचं काही असतं का हो? ही जेन्युईन शंका आहे खुसपट नाही, कारण उत्तम चिकन खाल्यानंतर माझ्या मनात अपार शांतता समाधान तृप्ती आनंद इ.इ. भावनांचा उगम होतो, जगातील सर्व प्रश्न सुटले आहेत असे वाटू लागते त्याचे मूळ काय असेल? कारण मांसाहार हा तामसी मानतात म्हणे.

उत्तम चिकन खाल्यानंतर माझ्या मनात अपार शांतता समाधान तृप्ती आनंद इ.इ. भावनांचा उगम होतो, जगातील सर्व प्रश्न सुटले आहेत असे वाटू लागते त्याचे मूळ काय असेल? कारण मांसाहार हा तामसी मानतात म्हणे.
>> कारण तुझी मूळ प्रवृत्ती तामसी असेल आगाऊ Lol :दिवे:

आगावू,

एखादी व्यक्ती जन्मजात खूप सात्विक, तामसिक, राजसिक असते की काही खाण्यापिण्याचा त्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. आपण काय खातो त्याचा नक्कीच आपल्या शरिरावर आणि म्हणूनचं मनावर/विचारावर/वागणूकीवर परिणाम होतो.

आगाऊ Lol (सॉरी बी, राहवलं नाही.)

ह्याबद्दल फारशी माहिती नाही, पण तामसिक, राजसिक असे नाही, 'सात्विक, तामसी, राजस/सी' असे शब्द आहेत. मी तर हे (माणसाच्या) वृत्तीतले गुण आहेत असं ऐकलंय. पदार्थातदेखील असतात होय? माहिती मिळाल्यास वाचायला आवडेल.

तामसिक, राजसिक असे नाही, 'तामसी, राजसी' असे शब्द आहेत. >>

मला ही हे शब्द थोडे ऑड वाटले. मला 'तामसी' या शब्दाची सुद्धा शंका आहे.
सत्व, रज, तम या पासून बनलेली विशेषणे अनुक्रमे सात्विक, राजस आणि तामस असावीत अनुक्रमे.

पौर्णिमा,
आपण नाचणीचे सत्व, गव्हाचे सत्व, भाज्यांमधील सत्व असे म्हणतो कारण या सर्वांचे मुळ गुणधर्म हे सात्विक असतात. हेच आपण अमूक मासामधील सत्व असे म्हणत नाही कारण मांस हे सात्विक नाही.

एखादी व्यक्ती जन्मजात खूप सात्विक, तामसिक, राजसिक असते की काही खाण्यापिण्याचा त्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. >>> या ओळीचा अर्थ कळला नाही.
आपण काय खातो त्याचा नक्कीच आपल्या शरिरावर आणि म्हणूनचं मनावर/विचारावर/वागणूकीवर परिणाम होतो.>>> या मागे शास्त्र काय आहे? हे सिद्ध करण्यासाठी नेहमी गाय-बकरी गवत खाते म्हणून मवाळ आणि वाघ-सिंह मांस खातात म्हणून क्रूर अशी सिंप्लिस्टीक, अशास्त्रिय मांडणी केली जाते. हे एक केवळ उदाहरण म्हणून लिहीले आहे यात चर्चेला शाकाहार विरुद्ध मांसाहार या ट्रेकवर न्यायचा माझा कोणताही डाव नाही.मांसाहाराचे महत्व मला पूर्ण पटलेले आहे Happy
तथाकथित तामसी मांसाहारचा माझ्या मनावर सात्वीक परिणाम कसा होतो ते कळत नाही.

तथाकथित तामसी मांसाहारचा माझ्या मनावर सात्वीक परिणाम कसा होतो ते कळत नाही.>> वर तेच तर तुला नानबा आणि मी सांगितले आहे की तू मुळतःच इतका सात्विक आहेस की काहीही खाल्ले तरी तुझ्यातला सात्विकपणा कमी होत नाही. पण मी जर मुळतः सात्विक नसेल तर तामसिक पदार्थ सेवन करुन आणखीनचं तामसिक होऊ शकतो.

माझ्या माहितीनुसार काही राजसी पदार्थ:
कांदा, लसूण, कलिंगड / पपई (यापैकी एक अथवा दोन्ही, नक्की आठवत नाही...), बीफ, पोर्क, काही लिकरा...

बी तू विधानं करत आहेस, त्या अर्थी तुला बरीच माहिती दिसतेय ह्याबद्दल. मग लिही की नीट संगतवार वरच्या हेडरपोस्टमध्येच सगळी एकत्र. एक एक वाक्य का लिहित आहेस?

माझ्या मते,
गाईचे शुद्ध तुप, ताक, भात, दाळींमधे मुग दाळ, भाज्यांमधे दुधी, घोसाळी, दोडके वगैरे फळभाज्या, इ. पचायला हलके सात्विक पदार्थ
तर
हिंग, लसुण, अद्रक, मसाल्याचे पदार्थ, लाल मिर्ची, असे उग्र वासाचे पदार्थ तामसिक असतात.

बी,
सात्विक, राजसिक व तामसिक ही आहार संकल्पना आयुर्वेदात येते. अनेक वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून वगैरे त्याविषयी अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. सकाळ च्या फॅमिली डॉक्टर या पुरवणीतही त्यावर विस्ताराने चर्चा झालेली आहे. माझ्या आठवणीप्रमाणे,

सात्विक आहार : ताजी फळे, भाज्या, सलाड इ., मूग, नाचणी, सत्तु, भाज्यांची सूप्स, ज्यूस, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा वगैरे.
राजसिक आहार : खूप तळलेले/ तिखट/ चमचमीत/ तेलकट पदार्थ, चमचमीत -तुपकट पदार्थ.
तामसिक आहार : मांसाहारी पदार्थ, शिळे/ दुर्गंधीयुक्त पदार्थ, बर्‍याच वेळा गरम केलेले पदार्थ, लोणची, कांदा, लसूण, मिरची, अंडी वगैरे.

अधिक माहितीसाठी तुमच्या विपू मध्ये लिंक्स देत आहे.

तू मुळतःच इतका सात्विक आहेस की काहीही खाल्ले तरी तुझ्यातला सात्विकपणा कमी होत नाही.>>>
आयला हो? आत्ताच सांगतो बायकोला हे! Happy
रच्याकने, अन्नाचा आणि चित्तवृत्तीचा संबंध कसा असतो ते अजून कळले नाहीए मला,पण आता मी सात्विक अस्ल्याने जास्त ताणत नाही Happy

उत्तम चिकन खाल्यानंतर माझ्या मनात अपार शांतता समाधान तृप्ती आनंद इ.इ. भावनांचा उगम होतो, >> आगाऊ Happy अगदी असंच मलाही वाटतं की ह्या क्षणाला आपण 'पृथ्वीवरचा सर्वात तृप्त ('आनंदी' ह्या शब्दाचा इथे वापर जाणीवपूर्वक टाळलाय ) जीव' आहोत.
माझ्या लिस्ट मधे चिकनच नव्हे तर मटण आणि मासे (स्पेशली पापलेट, सुरमई आणि बोंबलाचं कालवण) ही आहेत. Happy

छांदोग्य उपनिषदात ऋषी अरुणींनी म्हटल्याप्रमाणे, मन अन्नमय आहे, प्राण आपोमय आहे व वाक् (बुद्धी) तेजोमयी आहे.

आहार, निद्रा, भय, मैथुन या चार मनकेंद्रांचा नीट अभ्यास करुन स्वतःची शरीरप्रकृती व मनप्रकृती आरोग्यदायी राखण्यासाठी उचित 'आहार' अन् 'विहार' सांभाळावे लागतात. या ४ केंद्रांचे व्यापार आणि म्हणूनच शरिराचेही व्यापार ज्या कार्यकारी तत्वांवर अवलंबून असतात त्यांना 'भावशारीरि गुण' म्हणतात जे मूळ सत्व, रज व तम या गुणांपासून तयार होतात. ते खालिलप्रमाणे आहेत -

१) गुरु गुण (उत्तम, प्रेमळ)
२) लघु गुण (अस्थिर, चंचल)
३) लंका गुण (अती चंचल, पाषाणहृदयी)
४) जाड्य गुण (आळशी, अज्ञानी, मूढता, ग्लानी)
५) तीक्ष्ण गुण (शौर्य, धैर्य, आक्रमकता)
६) अशीघ्र गुण (धीमा, संयमी)
७) मंद गुण (सुस्त, कंटाळवाणा, नीरस, उदासीन, भावनाशून्य, दुष्ट, कपटी)
८) स्निग्ध गुण (प्रेमळ, स्नेहपुर्ण, हळुवार, सुकुमार, सुखकारक, अनुकूल, सुसंगत)
९) रूक्ष गुण (कोरडेपणा, क्रूर, निर्दयी)
१०) उष्ण गुण (उबदार, कार्यक्षम, रागीट, तरतरीत, भावनाप्रधान)
११) उग्र गुण (गरम, भावनावश, दुराग्रही)
१२) अनुष्ण गुण (जो उष्णहि नाही आणि शीतही नाही)
१३) शीत गुण (थंड, संथ, नीरस, मूर्ख)
१४) सौम्य गुण (हा मानवाच्या शरीर व मनाच्या उचित विकासासाठी अगदी योग्य गुण आहे. म्हणजे उचित तेवढी उष्णता, शीतता. या गुणाला स्वतःचे अस्तित्व नसून स्निग्ध व गुरु गुणांमुळे शीत, उष्ण, तीक्ष्ण यांची संतुलित अवस्था).

आता व्यक्ती तितक्या प्रकृती तितके व्यक्तीमत्वे, पण शेवटी प्रत्येकाचे व्यक्तिमत्व हे ह्या ४ केंद्र व १४ गुणांवर अवलंबून असते, जे ३ ढोबळ प्रकारात मोडते

१) समर्थ आणि तृप्त - मधुर व्यक्तिमत्व
२) समर्थ परंतु अतृप्त - लवण व्यक्तिमत्व
३) असमर्थ आणि अतृपत - कषाय व्यक्तिमत्व
(असमर्थ आणि तृप्त असं एकत्र असूच शकत नाही).

आपले व्यक्तिमत्व मधुर बनविण्यासाठी कुठल्या भावशारीरि गुणांची वाढ करणे किंवा कमी करणे हे आपण आहारात आवश्यक ते बदल घडवून करु शकतो. कारण नित्यवापरातल्या अन्नद्रव्यांमधे या भा.गुणांचे वेगवेगळे प्रमाण अस्तित्वात असते.

उदा. दह्यामधे उष्ण, स्निग्ध, गुरु, तीक्ष्ण हे गुण ३:१:२:४ या प्रमाणात असतात
तर, ताकामधे कमी उष्ण, रुक्ष, लघु, तीक्ष्ण हे गुण १:३:३:२ या प्रमाणात असतात.
चिकनमधे उष्न, स्निग्ध, गुरु, तीक्ष्ण हे गुण ४:२:२:३ या प्रमाणात असतात.
लसणीत उग्र, स्निग्ध, लंकत्व, तीक्ष्ण हे गुण ५:१:४:३ या प्रमाणात असतात.
तंबाखु मधे उग्र, रुक्ष, लघु, तीक्ष्ण, मंद हे गुण ४:४:३:०:० या प्रमाणात असतात.
चायनिज सॉस मधे उग्र, रुक्ष, लंकत्व, तीक्ष, मंद हे गुण ४:४:४:०:० या प्रमाणात असतात.
दारुत उग्र, रुक्ष, लंकत्व, तीक्ष्ण, मंद हे गुण ५:५:५:०:० या प्रमाणात असतात.

ही काही उदाहरणं आहेत. पण आपण आपला स्वभाव/व्यक्तिमत्व आत्मपरिक्षणाने ओळखून योग्य ते आहार घटक वाढवून व अयोग्य ते वजा करुन आवश्यक ते बदल करावेत.

इदम् न मम | इदम् गुरुदत्तस्य |

बी, भगवद्गीतेतही या आहाराचे विषयी सांगितले आहे. खालील माहिती मला एका ब्लॉगवर मिळाली :

'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्'। स्वस्थ शरीर ही स्वस्थ मन का आधार है और स्वस्थ मन ही सकारात्मक उर्जा के माध्यम से सशक्त समाज का निर्माण कर सकता है। गीता में 'शरीर संशुद्धि' के सर्वप्रमुख कारण 'आहार-नियमन' पर सूक्ष्मता से विचार हुआ है। आहार का मन पर प्रभाव असंदिग्ध है। अशुद्ध आहार 'मन' की शांति तरंगों में विक्षोभ उत्पन्न करता है। गीता के 17 वें अध्याय के कतिपय अंश इसके प्रमाण स्वरूप उद्धृत किये जा सकते हैं-

आयु: सत्त्वबलारोग्यसुख प्रीति विवर्धना:।
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रिया:।
कट्वम्ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्ष विदाहिन:।
आहारा राजसस्येष्टा दु:खशोका भय प्रदा:।
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्।

(आयु, बुद्धि, बल, आरोग्य, सुख, प्रीति बढ़ाने वाले, रसयुक्त, चिकने, स्थिर रहने वाले, मन को प्रिय लगने वाले भोज्य पदार्थ सात्विक पुरुष को प्रिय होते हैं। कड़वे, खट्टे, लवण युक्त, अति गर्म, तीक्ष्ण रूखे, दाहकारक, भोज्य पदार्थ राजस पुरुष को प्रिय होते हैं, जो दु:ख चिंता और रोगों को उत्पन्न करने वाले हैं। अधपका, रसरहित, दुर्गन्धयुक्त बासी, उच्छिष्ट, अपवित्र, भोजन तामस पुरुष को प्रिय होते हैं।)

स्पष्टत: 'सात्त्विक पुरुष' को प्रिय लगने वाले भोजन में उन सभी भोज्य पदार्थों की गणना की गयी है जो मनुष्य को दीर्घायु, बुद्धि, आरोग्य व उत्साह प्रदान करते हैं। जिन्हें रसयुक्त, चिकने (दुग्ध-घृतादि)भोजन की संज्ञा से अभिहित किया गया है। यहां इसका भी स्पष्ट उल्लेख है कि राजसी आहार में कड़वे, तीखे, चटपटे, भोज्य-पदार्थ आते हैं जो नाना प्रकार के रोगों, दुखों व भय को आंत्रण देने वाले हैं। 'तामसिक आहार' के अंतर्गत उन सभी त्याज्य भोज्य पदार्थ का वर्णन है जो निश्चित रूप से शरीर-हानि करने वाले हैं। सड़ा-गला, बासी, दुर्गधयुक्त, अपवित्र (संदूषित)भोजन कदापि ग्रहण करने योग्य नहीं है।

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा।(617)

ये विविध प्रकार के भोजन 'जैसा खाए अन्न, वैसा बने मन' की उक्ति को चरितार्थ करते हुये भिन्न-भिन्न परिणामों को जन्म देने वाले हैं। 'सात्विक आहार' सतोगुण को बढ़ाता है और सतोगुण मन को निर्मल, ज्ञानी और सुखी बनाता है। राजसी आहार रजोगुण की अभिवृद्धि करता है जो मन को चंचल बनाता हुआ नाना प्रकार की कामनाएं उत्पन्न करता हुआ उनकी प्रतिपूर्ति में मनुष्य को संलग्न करता है। 'तामसिक आहार' तमोगुण को बढ़ाता है और वह मनुष्य को अज्ञानी, आलसी, प्रमादी व निद्रालु ही बनाता है।

त्याची लिंक तुमच्या विपू मध्ये देत आहे.

हे पूर्वीच्या जीवनपध्दतीसाठी एकदम योग्य असावे जसे की सैनिकांचा आहार हा तामसी पद्धतीचा. कारण तिथे तशीच प्रवृत्तीचीच गरज असते. या उलट हाच आहार आश्रमात राहणार्‍या ऋषी-मुनींसाठी वर्ज्य. त्यांच्यासाठी फळे आणि कंदमुळे हा आहार.
आधीच स्पष्ट करतीय इथे कोणताही वाद घालायचा हेतु नाही. सहज लक्षात आले ते लिहीले.

खूपचं छान माहिती आहे. मुलांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देता येतिल आता. thanks.
पण विपु म्हणजे काय? मलाहि त्या लिंक्स वाचायला मिळतिल का?

भगवद्गीतेतही या आहाराचे विषयी सांगितले आहे. खालील माहिती मला एका ब्लॉगवर मिळाली :

खूपचं छान माहिती आहे. मुलांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देता येतिल आता. thanks.
पण विपु म्हणजे काय? मलाहि त्या लिंक्स वाचायला मिळतिल का?

अरुंधती, मीही हेच लिहायला इथे आले होते. तुम्हाला धन्स.

बी,
भगवद्गीतेचा १७वा अध्याय "श्रद्धात्रयविभागयोग" असा आहे. त्यात सत्त्व, रज आणि तम या ३ श्रद्धा, गुण आणि अन्न यावर भगवंतांचं भाष्य आहे.

"सर्व प्राणिमात्रांना आवडणारा आहार्देखील ३ प्रकारचा असतो. आयुष्य, बुद्धी, शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढवणारे असून, रुचिकर, स्निग्ध, शरीरात मुरून चिरकाल राहाणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सात्त्विक व्रुत्तीच्या माणसांना आवडतात.

तिखट, आंबट, खारट, अति उष्ण, झणझणीत, नीरस, दाह करणारे, त्याच्प्रमाणे दु:ख, शोक व रोग उत्पन्न करणारे आहार राजस व्रुत्तीच्या लोकांना प्रिय असतात.

तामस व्रुत्तीच्या लोकांन आवडणारे अन्न एक प्रहरातून वेळ होउन गेलेले म्हणजे निवालेले, नीरस, दुर्गंधीयुक्त, (एक दिवसाचे) शिळे झालेले, उष्टे तसेच अपवित्र असते"

हा मला गीतेच्या छोट्या पुस्तकातून १७व्या अध्यायात मिळलेला अर्थ आहे. आता यात अनेक मुद्दे असे असू शकतात जिथे अनेकांचं दुमत होइल. (अगदी विनोद निर्मिती सुद्ध होउ शकते)
पण मी हे फक्त जे वाचलं ते लिहिलं. बाकी माझा या बाबतीत अभ्यास नाही.
असं म्हणतात, की जेवण तयार करणार्यने ज्या मनःस्थितीत ते केलंय त्याचाही खाणार्याच्या मनावर परिणाम होतो.
चोरून आणलेल्या अन्नची खीर खाऊन साधूला सुद्धा चोरीची बुद्धी होते अशी एक गोष्ट लहानपणी वाचली होती. पदार्थ म्हणून खीर आणि व्यक्ती म्हणून साधू सात्त्विकच. पण परिणाम मात्र तामसी.
असो.