नमस्कार, या आत डोकावून पहा.

Submitted by admin on 3 April, 2008 - 23:38

नमस्कार, मायबोलीवर तुमचं स्वागत !

इथे येणार्‍या बहुतेक सगळ्या नवीन लोकांच हे पहिलं विसाव्याचं ठिकाण. टेका थोडं. आजुबाजुला पहा. खाली थोडं तुमच्याबद्द्ल लिहा. आम्हालाही कळु दे की थोडं तुमच्याबद्दल.

मदत हवीये, मदतपुस्तिका पाहिलीत का इथे?

चाचणी करायची, कसं लिहायचं त्याची? इथे करून पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कल्याणी... माबोची जुनी वाचक अन कधी कधी लेखन करणारी.. (पिल्लू लहान असल्याने वाचकच जास्त होते आत्तापर्यंत.))

मी विन्डोज ८ टाकल्या नंतर इंटरनेट एक्सप्लोरल मध्ये मराठी लिहिताय येत नाहीये. माराठी हा पर्याय स्विकारून वा कंट्रोल \ दाबूनही.
क्रोम मध्ये हे आता लिहितेय. पण तिथे वाचताना २-४ अक्षरांनंतर/ अक्षरांमध्ये चौकोन चौकोन येताहेत. त्यामुळे वाचणेच अशक्य झालेय.
काही उपाय सुचवा? की माझ्या संगणात काही अडचण आहे? प्लिज मदत करा. धन्यवाद

नविन सभासदांचे मायबोलीवर स्वागत.....मी पण मायबोलीवर नविनच आहे (तरीही ७-८ महिने झाले).मायबोलीवरचा अनुभव छानच आहे.मला रांगोळी,हस्तकला,भरतकाम,विणकाम... या सगळ्या गोष्टींची आवड आहे Happy मी नेहमीचं विविध कला/हस्तकला या ग्रुप्स मध्ये माझ्या काही कलाकृती पोस्ट करत असते... तर आपणही या ग्रुप्स ना आवश्य भेट द्या ही विनंती... Happy

निलेश भुताम्बरा

स्वागत! आपले आणी आपल्या संकल्पनेचे ! मनातून खूप ईच्छा येण्याची...बघू केंव्हा योग येतो ते!

मनःपूर्वक शुभेच्छा!

नमस्कार ! माझं नाव मंदार

मी "मायबोली" वरती नवीन आहे. गेल्या खुप दिवसान पासुन मि इथले लेख वाचतो आहे .पण सभासद आत्ताच झालो आहे .

नमस्कार ! माझं नाव मंदार

मी "मायबोली" वरती नवीन आहे. गेल्या खुप दिवसान पासुन मि इथले लेख वाचतो आहे .पण सभासद आत्ताच झालो आहे .

दिल्लि बोले मीआउ
मै तो घबराउ
मायबोली मे आउ क्या
जब मराथी बस पढ्ना जानु

नमस्कार
मराथि हि माझी मायबोली आहे पण अभिवक्ति चि भाषा नाही .
मायबोली अवडली वाचनात मन रमत :-p

नमस्कार ! माझं नाव दर्शन
मी "मायबोली" वरती नवीन आहे. खुप दिवसांपासून मी इथले लेख वाचतो आहे पण सभासद आत्ताच झालो आहे .

नमस्कार
मी योगेश जोशी , कृषि आणि मत्स्य विषयक सल्लागार.
योगेश ह्या नावाने id उपलब्ध नाही झाला म्हणून तुम्हा सर्वांसाठी अंबज्ञ.
बेफ़िकीर आणि अश्या अनेक सुंदर रचना लिहिणाऱ्या कांदबरीकारांमुळे इकडे सतत डोकवण्याचे जणु व्यसन लागले आणि आपण सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ह्या भावनेतुन रितसर मेंबर झालो.
फक्त एक गोष्ट थोड़ी खटकते ते शास्त्रीय महितीची देवाण घेवाण आणि त्याअनुसार लेखनावर फार कमी प्रतिसाद येतात. नवीन तंत्रज्ञान अगदी प्रत्येक विषयातील ईथे लिहिले गेले की ते किमान आठवडाभर हाय लाईट करता आले तर कदाचित अनेकांना लाभ होवू शकेल असे सूचवावेसे वाटते.
।हरि ॐ । श्रीराम । अम्बज्ञ ।