बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवरा माझा नवसाचा >>> पहिला मला आवडतो. दुसर्‍या बद्दल काही विशेष चांगलं ऐकलं नाहीये. शिवाय या नवीन पिक्चरात ती कोण हिरवीण आहे ती अगदी फेक दिसते , निदान प्रोमो आणि गाण्यांमधे तरी. मला नाही वाटत मी हा पिक्चर आवर्जून बघेन हा पिक्चर.

नवरी मिळे नवर्‍याला २ पण आलाय. जोरात सुरु आहे की ठीक ठाक?>>> नाव थोड चुकतय बुआ! नवरा माझा नवसाचा-२ अस आहे.
काल कुठेतरी रिल बघताना पहिला पार्ट कुणीतरी अपलोड केला होता...अशक्य पीळ आहे, अगदी ५ मिनिट पण नाहि बघु शकत.. एकतर इरिटेटिन्गली स्लो आहे त्यात सुप्रिया,सचिन आणी लाडे लाडे हिरॉइन एकमेकाशी यमक जुळवुन काहितरी बोलत असतात..सचिनच नाव काय तर वॅन्की आणी स्वजोच लॅन्बी एकायला इतक भयाण वाटत..
सगळे जोक बाळबोधच्या खालची लेव्हल आहेत...म्हणजे हसायला येतच नाही उलट किव यायला लागते.
अभिनय शिकायला लागलेले लोक चाचरत बोलतात तसच सगळे लॉस्ट असल्यासारखे बोलत राहतात...आपण अजुनच लॉस्ट असतो की याच माणसाने बनवाबनवी काढला का?

सुप्रिया,सचिन आणी लाडे लाडे हिरॉइन एकमेकाशी यमक जुळवुन काहितरी बोलत असतात >>> Lol रियली? Happy

नाव थोड चुकतय बुआ! नवरा माझा नवसाचा-२ अस आहे. >>> Lol मला तर ते ही लक्षात आले नाही.

सुप्रिया,सचिन आणी लाडे लाडे हिरॉइन एकमेकाशी यमक जुळवुन काहितरी बोलत >>> अरे देवा! यापेक्षा गुंडा का पाहू नये? Proud

हो बरोबर. टायपो. न मा न -२ म्हणायचं होतं. ट्रेलर वरुन तरी पीळच वाटला. बनवाबनवी, धुमधडाका, दे दणा दण, झपाटलेला आणि इतर काही पिकचरांना काय म्हणतात तसं एक प्रकारची न्युसन्स वॅल्यु होती. म्हणजे विनोद तसा साधा होता पण पीळ कॅटेगरी नव्हता. बरेच मराठी आणि हिंदी पिकचर तर लावले की ताबडतोब का लावले असा विचार येतोच मनात लगेच.
तो काही वर्षांपुर्वी टाईम प्लिज म्हणून सिनेमा आला होता. अ‍ॅक्टिंग तशी सुमारच आहे आणि समहाऊ लाऊड विनोद असून सुद्धा बरेच प्रसंग बघून सॉलिड हसायला आलं होतं. तेव्हा त्या प्रिया बापटला आजिबातच अ‍ॅक्टिंग यायची नाही. सिद्धार्त जाधव, उमेश कामत आणि सई ताम्हणकरनी नैया तारली त्या पिकरची. असाच तो संस्कृत गाणं (मला फार आवडतं!) असलेला वाय झेड. त्यात पण त्या अक्षय टांकसाळेनी भारी काम केलं होतं. खर अति पीळ सहज टाळता येतो पण प्रोड्युसर डायरेक्टर लोकांना कोण सांगणार?

फा, मी नेटफ्लिक्स वर पाहिला होता स्त्री १. आता गेला असेल तिथून तर माहीत नाही. आजकाल फार खो खो सुरु असतं काँटेंटचे. इतके की आर्टिकल निघतात, ह्या आठवड्यात नेटफ्लिक्स वरून काय काय जाणार/उडणार आहे ते. तिथे थंबनेल वर पण लिहिलेलं असतं आजकाल की कधी जाणार आहे ते.

तोच बघ...अगदी एखादा तमिळ्,तेलगू सिनेमाचा रिमेक त्याच्या अ आणी अ सिन सहित सुसह्य असेल...

वक्त हमारा है मधे ममता कुलकर्णी कस्स्ली बारीक, शिडशिडीत वगैरे आहे! उंच / लाँग लेग्ज वाटते त्यामुळे खूप. 'कोई जाये तो ले आये' मधली ती हीच का असा प्रश्न पडला मला Happy

वाचतो आता. मी हा आणि इतर अक्षय/सुनिल शेट्टीचे पिकचर थेट्रात पाहिले आहेत. आय गेस, त्यावेळी फक्त अ‍ॅक्शन बघण्यातच इंट्रेस्ट होता त्यामुळे काहीही खपत होत बाकी काँटेंट मध्ये.

"हम दोनो अंग्रेजी स्पिकिंग कोर्स साथ मे गये थे. इतना सेक्सपियर (शेक्सपियर) बनने की जरूरत नही है"

Lol "स्त्री" सापडला हुलूवर आणि साधारण तासभर पाहिला. धमाल आहे. संवाद तर अफलातून.

तो अपारशक्ती खुराणा अभिषेक बॅनर्जीला पहिल्या अर्ध्या पाऊण तासात एकदा शेक्सपियर, एकदा आणखी कोणीतरी, तर एकदा "पॅसिफिक ओशन" म्हणतो Happy ते त्याच्या उच्चारात "पसिफिकोसन" म्हंटलेले समजायला मला पुन्हा ऐकावे लागले Happy

"निम्नलिखित नियम" हे असले हिंदी बहुधा फक्त पंकज त्रिपाठी व सध्याचा बच्चनच पुल ऑफ करू शकतात. तो चौथा नियम न सांगताच जाणे सारखाच एक धमाल सीन ओशन्स-१२ मधेही आहे. मॅट डेमनला एका महत्त्वाच्या भेटीकरता "No matter what happens, don't ever say..." इतकेच सांगेपर्यंत ब्रॅड पिट डिस्ट्रॅक्ट होतो व निघून जातो.

"निम्नलिखित नियम" हे असले हिंदी बहुधा फक्त पंकज त्रिपाठी व सध्याचा बच्चनच पुल ऑफ करू शकतात. >> तू सेक्टर ३६ बघितला आहेस का ? त्यात दीपक दोबरियाल असे हिंदी बोलतो ते ऐक. एकून सिनेमा एकदम धक्कादायक आहे. भयंकर ग्रिम . दोबरियाल नि विक्रांत मासी दोघांन्ही धुमाकूळ घातला आहे निव्वळ.

त्यावेळी फक्त अ‍ॅक्शन बघण्यातच इंट्रेस्ट होता >> तुम्ही सांगा नि आम्ही ऐकतो बुवा Lol

"इतनी सुंदर स्त्री स्त्री कैसे हो सकती है"
"पढी लिखी है. ये नये भारत की चुडैल है"

Lol

पाहिला पूर्ण. पहिल्या अर्ध्याइतका धमाल नसला, तरी खूप जेम्स आहेत.
स्त्री-२ पाहायचा आहेच.

धन्यवाद फोमोबद्दल. मस्त पिक्चर मिसला होता.

सेक्टर ३६ नाही पाहिला अजून. वर्णन वाचून बघावासा वाटत नाही >>> डिट्टो! मलाही.

"इतनी सुंदर स्त्री स्त्री कैसे हो सकती है"
"पढी लिखी है. ये नये भारत की चुडैल है">>>> Lol शिवाय 'किसी की मां टीचर होती है, किसी की डॉक्टर होती है और किसी की तवायफ'. याचेच दुसऱ्यात "आप भूतनीके लिये थोडी ज्यादाही सुंदर नहीं है" हे प्रत्यक्ष भूतनीलाच म्हटले आहे.

स्त्री २ च्या गाण्यात 'तेरे चक्करोमे दुसरी पटायी नहीं(३ वेळा) तर सगळ्या 'फिल्डींग' वाया गेलेल्या तरूणांचा कोतबो आहे. Lol सगळ्यात जास्त हसू मला 'उसकी आँखों में प्यारसे देखो' ऐकताना आले. एवढी तंतरलेली असताना कुठून आणणार प्यार , त्यात शाखा होतो हा Lol

वरची स्त्री-२ चर्चा वाचुन कधी नव्हे तो फोमो आलाय मला...कधि एकदा ओटिटी वर येतो अस झालय.पहिलाही
भारिच होता..२ दा बघितलाय.

'उसकी आँखों में प्यारसे देखो' ऐकताना आले. एवढी तंतरलेली असताना कुठून आणणार प्यार , त्यात शाखा होतो हा >>> Lol हो

'तेरे चक्करोमे दुसरी पटायी नहीं(३ वेळा) तर सगळ्या 'फिल्डींग' वाया गेलेल्या तरूणांचा कोतबो आहे >>> Lol

कामसूत्र पुस्तकात आत दुसर्‍याच विषयावरचे पुस्तक असणे हे प्रचलित ट्रेण्डच्या पूर्ण उलटे आहे Happy