Digital Nation: Livemint national edition, Saturday, May 29, 2010

Submitted by Admin-team on 2 June, 2010 - 00:13

गेल्या शनिवारी (२९ मे, २०१०) Livemint.com या वर्तमानपत्रात, भारतीय भाषांमधे अगदी पहिल्या प्रथम काम करणार्‍या काही डॉट कॉम बद्दल एक चांगला लेख आला होता. यात देवनागरीमधली पहिली वेबसाईट म्हणून मायबोलीचा उल्लेख आहे. यात विशेष म्हणजे, लेख लिहणार्‍या पत्रकाराने जुन्या इंटरनेटचे रेकॉर्ड तपासून, संशोधन करून त्या त्या संस्थापकाशी संपर्क साधला. मायबोली मराठीतली पहिली आहे हे माहित होते पण देवनागरीतली पहिली वेबसाईट आहे हे आम्हालाही माहिती नव्हते आणि त्याच्याकडूनच ते पहिल्यांदा कळाले.
Livemint हे हिंदूस्तान टाईम्स आणि वॉलस्ट्रीट जर्नल यांचे संयुक्त प्रकाशन आहे.
वेबवरील दुवा
Digital Nation: The creators if First indian language websites braved rudimentary technology and limited reach to become dot-come pioneers.

संपूर्ण पिडीएफ
maayboli_livemint_20100529.pdf (499.92 KB)

maayboli-livemint-2-20100529.pdf (490.61 KB)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही झकास माहिती आहे! Happy
अन अशा या पहिल्यावहिल्या देवनागरी वेबसाईटचे (कदाचित जुनाजाणता - नै नै, जुनापुराणा नव्हे, जुनाजाणताच) मेम्बर असल्याबद्दल कॉलर ताठ करुन घेतोय! Proud

त्या लिन्कवर जाऊन, तिथे देवनागरीतुन प्रतिसाद देऊन आलो Happy जमले तर बाकी मायबोलीकरान्नी पण प्रतिसाद द्यावा - नुस्ते त्या लेखकाच्या लेखामुळे नव्हे तर तुमच्या प्रत्यक्ष उपस्थितीने मायबोलीचे तेथिल अस्तित्व रन्गु दे Happy

मायबोलीचे, हे असे स्टॅटीस्टीक्स, (म्हणजे हिट्स, सभासद, एकावेळी ऑनलाईन असलेले सभासद, ) अधूनमधून मुखपृष्ठावर झळकू द्या की.

जबरदस्त Happy संस्थापकांचे व सर्व मायबोली टीमचे अभिनंदन ! पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा !
लिंबूभाऊ, मी पण प्रतिक्रिया दिली तिकडे देवनागरीत आपल्या आदेशानुसार Happy

अरे वा !! जबरीच की हे !!
खूप अभिनंदन अ‍ॅडमिन टीम.. देवनागरीतली पहिली वेबसाईट मायबोली म्हणजे खूप सही !!

ग्रेटच !! Happy फार अभिमानास्पद बातमी.

अजय यांचा छोटा इंटरव्ह्यू मस्त आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा ! Happy

अभिनंदन प्रशासक.. माबोने दिलेले हे व्यासपीठ आणि माबोकर समाज ह्यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेकांच्या रोजच्या आयुष्यात मिळणारे असंख्य सुखाचे (आणि अतिशय आवडते म्हणजे वादाचे Happy ) क्षण ह्याचे संपूर्ण श्रेय तुम्हाला आहे..

अरे व्वा माबो चे आणि अ‍ॅडमिन्-चमूचे अभिनंदन

मास्तरांचा (मास्तरीणबाईं सह फोटो) आणि मुलाखत वाचून मस्त वाटले

खरोखर मनःपूर्वक अभिनंदन!
मायबोलीचे जन्मदाते कोण आहेत हे त्या निमित्ताने पाहायला मिळालं आणि त्याच्या जन्माची गंमतीदार कथाही वाचायला मिळाली... home नाही तर homepage बांधण्याच्या तुमच्या practical joke मुळे वेबविश्वात आपल्या देशाच्या दृष्टीने मोठी क्रांतीच घडलीये...
देवनागरीमधल्या पहिल्या संकेतस्थळाची- मायबोलीची मी उशिरा का होईना सभासद झाले आणि ही आनंदाची बातमी वाचायला मिळाली. मी देवनागरीमधल्या एका दर्जेदार संकेतस्थळाची सभासद आहे ह्या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो आहे.
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

अर्रे वा! अभिनंदन! Happy
मायबोलीचं ऋण आणि तिच्याबद्दल वाटणारी आत्मीयता आणि कृतज्ञता - यांतलं काहीही शब्दांत मांडणं अशक्य आहे.

Pages