मोहाची फुलं

Submitted by विमुक्त on 1 June, 2010 - 01:41

एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...

(मोहाच झाड)

(झाडाखाली पडलेला फुलांचा सडा)

(मोहाची फुलं)

फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...

गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात...

विमुक्त

गुलमोहर: 

आधी मधुकरच्या लेखात उल्लेख झाल्याचा आठवतो, मोहाची फुलं आणि त्यापासुन बनवलेल्या दारुचा. आज प्रथमच फुलं पाहिली.

क्लोजअप मुळे तर खरचं एक फुल चाखून बघायचा मोहचं आवरत नाही. बाकी दिनेशदा एकदा कुतूहल म्हणून प्रयोग करण्यास काय हरकत आहे?

वॉव, किती दिवसांनी मोहाचं फुल बघितलं. मोहन्याला ( माझ्या माहेरी) उल्हास नदीच्या काठी मोहाची झाडं होती. पण आम्हाला इतकी फुलं कधिच बघायला मिळाली नाहित. बहुतेक तिकड्चे गाववाले वेचुन नेत असावेत.
मस्त आलेत फोटो.

सुर्यकिरण, हो फोटो खुपच ताज्या फूलांचा आहे. एवढी ताजी मिळाली तर खायला गोडच लागतात. मग पुढे ती "गुलाबी" होत जातात. दोन्ही अर्थाने !!!

Pages