Submitted by विमुक्त on 1 June, 2010 - 01:41
एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...
(मोहाच झाड)
(झाडाखाली पडलेला फुलांचा सडा)
(मोहाची फुलं)

फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...
गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात...
विमुक्त
गुलमोहर:
शेअर करा
विमुक्त, तिकडे आदिवासी भागात
विमुक्त, तिकडे आदिवासी भागात त्यांची पारंपारिक पेय आहे कारण मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो एका अदिवासी एरियात तिथली लग्नाची पद्धत जाणून घ्यायची होती मला तेव्हा तिथे ह्यापासून बनवलेल्या दारूमधे सगळेचं झिंगले होते.
नुसती बघुनही गुंगी आली मला.
नुसती बघुनही गुंगी आली मला. मस्त आहेत.
ह्या महुआपासून, खीर, गोड रोट,
ह्या महुआपासून, खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात. त्यामूळे दारू बनवतात एवढंच लक्षात ठेवू नका.
सही ! मी पहिल्यांदाच पाहीली.
सही ! मी पहिल्यांदाच पाहीली.
सुर्यकिरण, खरयं... तुम्ही
सुर्यकिरण,
खरयं... तुम्ही सांगीतलेलं पण आता टाकलय वरती... धन्यवाद...
अरे वा ! मी एका मोहाच्या
अरे वा ! मी एका मोहाच्या झाडाच्या सोबतीत वर्षभर होतो. (त्यातूनच मोहाचं झाड हि कथा सुचली होती.) सर्व अवस्था डोळ्यासमोर आहेत. या फुलांच्या वासानी खरेच धुंदी येते. ती घरात ठेवली, तर घरभर तो घमघमाट असतो. भातात घालून शिजवली, तर भाताला पण हा वास येतो.
याच्या झाडावरच्या गुच्छाचा क्लोजप मिळाला का ?
याच झाडाला आता फळे लागतील, त्याच्या बियांची भाजी करतात (मोहट्या) त्यापासून तेल पण काढतात.
हे मोहाचं झाड म्हणजे खरचं एक
हे मोहाचं झाड म्हणजे खरचं एक मोहाचंच झाड आहे, दुरवर याचा सुगंध दरवळतो अन मग सुगंधाला शोधून काढण्याचा मोह आवरत नाही.
वा !! माहिती पुर्ण
वा !! माहिती पुर्ण फोटो.
दिनेशदा असे मोहाचा भात खाल्ल्याने झिंग चढते का हो ??
सहिये. मीपण पैल्यांदाच
सहिये. मीपण पैल्यांदाच पाह्यली.
ताजी फुले खाल्ल्याने नाही
ताजी फुले खाल्ल्याने नाही झिंग चढत, पण ती फुले थोडा वेळ ठेवल्यावर थोडी फर्मेंट होत जातात, (मग काहि खरे नाही !! ) निसर्गात ससे, हरणे आणि बरेचसे पक्षी यावर तूटुन पडलेले दिसतात.
मस्त, फुलं पहील्यांदा पाहिले,
मस्त, फुलं पहील्यांदा पाहिले, नवापुर, नंदुरबार च्या जगंलात पण भरपुर मोहाची झाडं आहेत......
गणेश, येस नंदुरबार नावं मला
गणेश, येस नंदुरबार नावं मला आठवतं नव्ह्तं.
व्वा... दिसायला फारच सुंदर
व्वा... दिसायला फारच सुंदर आणि रसरशीत दिसतायेत...
छानं झाडाचीफुलाची ओळख झाली.
छानं झाडाचीफुलाची ओळख झाली.
छान !!!! मी पहिल्यांदाच
छान !!!!
मी पहिल्यांदाच पाहीली.
माहीतीसुध्दा छान...
माझी महुआ नावाची एक बंगाली
माझी महुआ नावाची एक बंगाली मैत्रीण होती.... आज हे महुआचे फोटोज पाहिल्यावर का कोण जाणे, तिची आठवण झाली!
माहिती छानच!
बादवे ह्या झाडाच्या तेलाचा वापर साबण, डिटर्जन्टस, त्वचा सौंदर्य उत्पादने यांच्यातही होतो. तसेच त्यापासूनचे तेल इंधन म्हणूनही वापरतात. ह्या झाडाचे अनेक औषधी उपयोगही आहेत. म्हणूनच आदिवासींना हे झाड पूजनीय आहे.
हो... ह्या झाडाच्या
हो... ह्या झाडाच्या फळांमधल्या बियांपासून biodiesel बनवून त्या पासून वीज निर्मिती पण करतात...
अरे व्वा! पहिल्यान्दाच पाहिल
अरे व्वा! पहिल्यान्दाच पाहिल हे झाड अन फुल
याचे रोप कुठे मिळू शकेल काय? लावतो की लिम्बीच्या रानात
>>>निसर्गात ससे, हरणे आणि
>>>निसर्गात ससे, हरणे आणि बरेचसे पक्षी यावर तूटुन पडलेले दिसतात.<<< मला ब्युटिफुल पीपल हा चित्रपट आठवला
त्या बद्दल धन्यवाद विमुक्त आणि दिनेशदा 
LT , मिळेल हो. अवश्य मिळेल मी
LT , मिळेल हो. अवश्य मिळेल मी मदत करेन मिळवून द्यायला.
मोहाच्या झाडाबद्दल ऐकून आहे,
मोहाच्या झाडाबद्दल ऐकून आहे, पण फुलं पहिल्यांदाच बघितली. क्लोजअप छान आलाय.
सुर्या, तू शोधात रहाच रे
सुर्या, तू शोधात रहाच रे
यन्चाच्याच पावसाळ्यात लावुन टाकू रोपे 
लिंबुभौ, ही जमात लिंबीच्या
लिंबुभौ, ही जमात लिंबीच्या रानात तग धरेल असे वाटत नाही. पर्यायी ताडी, माडीची कायतरी सोय करा तिकडे.

मारुती चितमपल्ली यांच्या काही
मारुती चितमपल्ली यांच्या काही पुस्तकात मी मोहाचा उल्लेख वाचला आहे.
लिंबू, कायदेशीर आहे का ते
लिंबू, कायदेशीर आहे का ते बघावे लागेल, याची लागवड. नाहीतर गांजाचे झाड लावले, अशी बोंब उठेल.
याचे लॅटिन नाव पण मधुका लाँगफेलीया का असेच काहितरी आहे. मूळ भारतीयच झाड हे.
मुंबईला के ई एम हॉस्पिटलच्या आवारात आहे. (होते ? असावे )
याची पाने आधी लालस आणि मग हिरवी होतात. फांद्यांचा टोकाला गुच्छाप्रमाणे लागतात. फूले पण गुच्छानेच लागतात.
प्रकाश, इकडील डोन्गरी पण
प्रकाश, इकडील डोन्गरी पण कोरड्या हवामानात शक्य होईल असे वाटते
प्रयोग करुन बघायला काय हरकत आहे? कोकणपट्टी अन मावळात याचे उल्लेख वाचलेत्/ऐकलेत.

दिनेशदा, तुम्ही म्हणताय ते तपासुन बघायलाच हव, शिवाय अम्क तम्क झाड लावतोय अशी जाहिरातबाजी करुन चालणार नाही गावात! नैतर लिम्बीच्या रानातच भट्टी उठवतील लोकं
अर्थात मी चिक्कार प्रकारची झाडे लावणारे, पण जाहिरातीला मात्र बहुसन्ख्येने निलगिरी असणारे! पाच वर्षात झाड विकायला येत, उत्पन्न चालू होते, शिवाय जनावरे पाला खात नाहीत, त्यामुळे ती भिती नाही, शिवाय खोडे कुम्पणीच्या खाम्बाचे काम करतात
सध्या कोकम, आम्बा, फणस, उम्बर वगैरे निवडक रोपे/झाडे तयार आहेत, जुलै/ऑगस्ट मधे जाऊन लावणार
एल्टी , डोंगरी कोरड्या
एल्टी , डोंगरी कोरड्या हवामानाचा शोध लागलाय, आमचं शेत सुरु होतं तिथे आहे थोडसं माळरान. तिथे कदाचित शक्य होईल. एल्टी ताडी माडी पेक्षा हे नक्किच चांगलं. नाही प्यायची महूआ तर सुंगंध सुंगून तर समाधानी व्हा !
मोहाची फुलं?? म्हणजे महुआ???
मोहाची फुलं?? म्हणजे महुआ??? पहिल्यांदाच पाहिली फुलं (आणी झाड सुद्धा)..गोड आहेत दिसायला अगदी
लिंबू, माझ्या बघण्यात पनवेला
लिंबू, माझ्या बघण्यात पनवेला ला मोठे झाड आहे, त्यामुळे कोरडे हवामान काही आवश्यक नाही.
पण थोडे विषयांतर, निलगिरीच्या आजूबाजूला बाकिची झाडे तग धरु शकत नाहीत. त्यांच्या पानांचे खत बाकिच्या झाडांना मारक ठरते.
अवाकाडोचा विचार करणार का ? ते झाड हिरवेगार राहते. शिवाय उत्पन्न आहेच.
असो गाडी मोहावर येऊ द्या, परत.
पहिल्यांदाच पाहिल हे मोहाचं
पहिल्यांदाच पाहिल हे मोहाचं फुल.
Pages