दुबई

Submitted by admin on 3 April, 2008 - 12:36
विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा खटाटोप ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

नमस्कार दुबईकर. मला कामासाठी हमरिया फ्री झोन मध्ये यायचे आहे. जवळपास राहण्यासाठी चांगली जागा सुचवा.

निंबुडा.. दुबईत अनेक मराठी कुटुंब आहेत. देवळात, बाजारात कुणी मराठी बोलताना दिसले कि आपणच ओळख करुन घ्यायची. मग संपर्क वाढत जातो.

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg