मासे ३) खरबी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2010 - 02:16
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरबी ५-६
१ गड्डा लसुण
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
मसाला २ चमचे
लिंबा पेक्षा थोडा मोठया आकाराच्या चिंचेचा घट्ट कोळ
चविपुरते मिठ
मिरची १
थोडी कोथिंबीर
तेल फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

पद्धत १ :

प्रथम खरब्या साफ करुन धुवुन घ्याव्यात. मग पातेल्यात तेल घालुन लसणीची फोडणी द्यायची मग त्यात तेलात हिंग, हळ्द, मसाला घालायचा. खबरब्या व चिंचेचा कोळ घालुन मिठ टाकायचे. गरज असल्यास पाणी घालायचे. त्यातच मिरची मोडून घालायची व चिरलेली कोथिंबिर घालायची. उकळ आला की ३ ते चार मिनीटे ठेउन गॅस बंद करायचा.

पद्धत २ :
वरील सर्व जिन्नस एकत्र करायचे अगदी तेलही मग शिजवायचे. हे देखिल खुप चविष्ट कालवण लागत.

तळलेल्या खरब्या :

साफ केलेल्या खरब्यांना लसूण, मिठ, मसाला, हिंग हळद चोळून तव्यावर तेल टाकुन शॅलो फ्राय कराव्यात. खुप चविष्ट लागतात.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

खोबर्‍याचे वाटण घालुनही कालवण करता येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्व जिन्नस एकत्र करायचे अगदी तेलही मग शिजवायचे

टोपात तेलासकट सगळे एकत्र टाकुन मग पाणी घालुन उकळवायचे काय?? एकदा माझ्या साबा घोळ मासा अशा शिजवत होत्या, मला कळेचना त्या नक्की काय करताहेत ते.. Happy

आणि हो, पाकृ बद्दल धन्यवाद. तुझ्यामुळे नवीन माशांशी परिचय होतो Happy

.

ह्याला खरबीच म्हणतात. निवट्यांना पांढरे ठिपके असतात.
मसाला म्हणजे आपण रोजचा मसाला वापरतो तोच.

जागु मान्य आहे बीबी जुना आहे, पण त्या नंतर खरबी केली असशीलंच की..
पुन्हा केलिस की फोटो काढ आणि हा बीबी अपडेट कर.. Happy