बंगळुरूमधल्या गप्पा

Submitted by admin on 3 April, 2008 - 02:01

nimbu_mirchi.png

सहसा बंगलोर सोडून जगभरच्या आणि कधी कधी मग बंगलोरबद्दलच्याही , क्वचितच कोणी बंगलोरमध्ये आणि जवळ जवळ सगळेच बंगलोराबाहेर राहून, मनाने मात्र आपापल्या आवडत्या ठिकाणी राहणार्‍या गपिष्टांच्या मनमोकळ्या गप्पा.

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा म्हैसूर आणि उटी फिरण्याचा प्लॅन आहे. सगळे बुकिंग्स पण झालेत. परवाची तिकिटं आहेत विमानाची.
बंगलोर पर्यन्त विमानाने आणि नंतर कॅब करून फिरण्याचा प्लॅन होता. पण आता या कावेरी प्रश्नामुळे जी दंगल चालूं आहे त्या बद्दल सगळॆजण वेगवेगळी माहिती देतायेत. बंगलोर ट्रॅफिक पोलिसांना पण विचारले तर ते म्हणतात काही प्रॉब्लेम नाही कर्नाटकातून तामिळनाडू मध्ये जायला. अशी पण माहिती मिळालीये कि ब्रॉडर क्रॉस करू देत नाहीये. कुणी आता बंगलोर किंवा म्हैसूर मध्ये असेल तर सद्य परिस्थिती काय आहे सांगू शकेल का ?

आत्ताच दुसराई बातमी वाचली की बंगळुरु मधे दंगलीच्या निमित्ताने आयटी कंपन्यांना काम करता येत नसल्यामुळे ,
बॅगलॉग भरुन काढण्यासाठी त्यांच्या हैद्राबाद ब्रँचमधील आयटी कर्मचारयांना जादा तास थांबवुन काम करायला लावले जात आहे. अनेक लोक सोमवारपासुन ऑफिसमधेच आहेत. त्यांना अजुनही १-२ दिवस ऑफिसमधेच रहायला सांगितले आहे.

तरी तुमचे विमान परवाचे आहे तर काही सांगता येत नाही. निवळेलही वातावरण.

आज इथे मोस्ट्ली बंद नाहिये. बहुतेक ऑफीसेस आणि शाळा सुरु आहेत. वातवरण बदलणे हे कोणीच अंदाज बांधू शकत नाही. पुढची कोर्टाची तारीख कधितरी ऑक्टोबर मध्ये आहे. टिव्हीवर आणि नेटवर दाखवतात त्या सगळ्यावर विश्वास ठेवू नका. तुमचा बहुतेक प्रवास कर्नाटकामध्ये होणार आहे तर कॅब कर्नाटका नंबरप्लेट असेल ह्याची खात्री करून घ्या. तुम्ही बहुतेक बंदीपूर अभयारण्य संपले की तामिळ्नाडू मधे प्रवेश कराल. इतक्या आतल्या भागात बॉर्डर क्रॉस करायला अडचण यायला नको. तरी तुमच्या कॅब प्रोव्हाडरशी बोलून खात्री करून घ्या. प्रवासासाठी शुभेच्छा.

सुप्रभात.

लॅटेक्स (LaTeX) येणारे कोणी आहेत का इथे? मदत हवी आहे.

सुप्रभात.

अलिकडेच पुर्णब्रह्मच्या बानेरघट्टा रोड शाखेत गेलो होतो. रोज मिळणारी थाळी चांगली वाटली. रविवारी जबरदस्ती स्पेशल थाळी होती, त्यात पुरणपोळी या नावावर भलतेच काही दिले होते. झोमॅटॉवर एवढे निगेटीव्ह रिव्ह्यु का आहेत कळले नाही. एवढे काही वाईट नाही.

विशेष थिम वर असलेल्या हॉटेला कडुन, दोन लोकांसाठीची पापड व पुरणपोळी देताना ती एकाच ताटात देऊन ताट बचत करण्याचा कंजुषपणा नाही आवडला. काँउटरवरचा पैसे घेणारा माणुस वगळता इतर सर्व अमराठी आहेत.

थाळी व्यतिरिक्त इतर पदार्थ कसे असतात हे इथे कुणी सांगु शकेल का?

पूर्णब्रह्मच्या दुसऱ्या कुठल्या तरी शाखेत आम्ही बर्याच दिवसांपूर्वी गेलो होतो. काही खास नाही वाटलं आम्हालाही ते जेवण. थाळीच घेतली होती. जरा जास्तच तिखट आणि तेलकट वाटलं. तेही चाललं असतं, जर चविष्ट असतं तर Happy

जरा जास्तच तिखट आणि तेलकट वाटलं. तेही चाललं असतं, जर चविष्ट असतं तर
>>
+१

आमच्याही कोथिंबीर वडी मधे मिठ जास्तच होते जरा!

बंगलोर खादाडी बीबी वर reviews आहेत. Snacks items decent असतात, hsr layout च मी try केलं होतं. Fine dining rate आहेत. थाळी bore असते.

मराठाहल्ली च्या जवळ eatroo म्हणून स्टॅन्ड अप आहेत तिथे वडा-पाव, दाबेली चांगलं असतं आणि reasonable. आजकाल वडापाव सर्रास कुठेही चांगला मिळतोय.

त्याचे कारण उत्तरेतुन तिकडे जाणारे लोक असतील का?
मी आत्तापर्यंत बँगलोर/तामिळनाडुन खाल्लेले समोसे / वडा पाव वेगळेच होते. भाजीपण वेगळी होती. मुंबईतल्या वडापावची सर कशाला नाही!

शेषाद्रीपुरममधे नेहरू सर्कलला सागर नावाचं रेस्टॉरंट आहे. त्याचे मालक आमच्या सोसायटीत राहतात. त्या रेस्टॉरंटमधे त्यांनी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, मिसळपाव असे मराठी पदार्थ ठेवले आहेत. ते खूप दिवस आग्रह करत होते येण्याचा. आज गेलो होतो. पदार्थ आवडले. शिवाय उंधियु पुरीही घेतली. तीही छानच होती. त्या बाजूला गेल्यावर आवर्जून खायला जाण्यासारखी जागा आहे नक्की!

मालक मूळ मराठी नाहीत, गुजराती आहेत. पण born and brought up in कोल्हापूर. त्यामुळे तसे अस्सल मराठीच

Whitefield ईथे महाराष्ट्रियन आणि कोकणी फुड प्रोड्क्ट्स सुरू केले आहेत. आपल्या सणा साठी तसेच सिझनल लागणारे सगळे पदार्थ तिथे विक्रीसाठी उपलब्ध करणार आहोत.

SAVE_20200115_143042_0.jpeg

उद्या बंगळुरू महाराष्ट्र मंडळाच्या शताब्दी उद्घाटन समारंभाला कुणी येणार आहे का? Palace grounds वर आहे. सुमित्रा महाजन, तेजस्वी सूर्या हे येणार आहेत. सचिन खेडेकरांची बहुतेक मुलाखत आहे. किरण यज्ञोपवीत घेणार आहेत. नंतर अवधूत गुप्तेचा गाण्यांचा कार्यक्रम आहे.

वावे, नाही ग, खरतर तिथे स्टॉल ठेवण्यासाठी बोलने झाले होते पण मानुष्यबळ नसल्याने आम्हाला कैन्सल करावे लागले. Sad

IMG-20200215-WA0011.jpg

IMG-20200325-WA0034.jpg

This is authentic and you can do the needful.