ओपन ऑफिसमधील स्वयंसुधारणा

Submitted by shantanuo on 21 May, 2010 - 00:18

मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्‍या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.

http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi

वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
C:\Documents and Settings\UserName\Application Data\OpenOffice.org\3\user\autocorr
वरील फोल्डर दिसत नसेल तर टूल्स - फोल्डर ऑप्शन - व्ह्यू - हिडन फाईल्स निवडा.

रायटर चालू केल्यावर बराहाच्या मदतीने लिहायला सुरुवात करा. उदाहरण म्हणून खालील वाक्य पाहा.
चीकाटीने व कटिबध्द रीतीने काम केले तर हीची प्रगती होईल.

या वाक्यात शुद्धलेखनाच्या ४ चुका आहेत. या चारही चुका आपोआप सुधारल्या जातील. म्हणजे मी "चीकाटीने" असे लिहून स्पेस दिली की लगेच "चिकाटीने" होईल.

चिकाटीने व कटिबद्ध रितीने काम केले तर हिची प्रगती होईल.

आता आपल्याला जर खरोखरच चीकाटीने असे लिहायचे असेल व त्या शब्दापुरती स्वयंसुधारणेची सेवा नको असेल तर त्या शब्दाची सुधारणा झाल्यावर लगेच "undo" हा ऑप्शन वापरू शकता. (Ctrl + z)

आपल्या संगणकामधील रायटरमध्ये मराठी भाषा उपलब्ध आहे का? नसल्यास...
टूल्स = ऑप्शन्स = लॅंग्वेज सेटिंग = लॅंग्वेजस = एनेबल फॉर कॉम्प्लेक्स टेक्स्ट लेआऊट
तसेच डीफॉल्ट लँग्वेज फोर लेआउट मधील सीटीएल मध्ये मराठी निवडलेले असले पाहिजे.

अर्थात याबरोबरच मराठी स्पेल चेकर इन्स्टॉल केला तर उत्तमच. नव्हे तो हवाच. कारण त्यामुळे अशुद्ध शब्द लाल रंगात दिसतात.
http://extensions.services.openoffice.org/project/dict-mr

यात सुमारे २७००० शब्द असून त्याचा साठा मुक्तस्त्रोत असल्यामुळे कुणालाही पाहता येईल किंवा त्यात सुधारणाही करता येईल. यामुळे टंकलेखनाचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल असे मला वाटते. आपल्यापैकी कोणी ओपन ऑफिसचा रायटर वापरत असाल तर ही एटो करेक्टची सुविधा आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बराहा+auto-correct यांच्या तुलनेत गुगल transliteration कसे आहे.
मी गुगल transliteration वापरतो. तो शुद्धलेखन सुधारातोच पण पूर्ण शब्द देखील सुचवतो.