मुलुंड

Submitted by admin on 1 April, 2008 - 19:19

मुलुंडमधील मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, हो हापिसातच गेल्या चार दिवसातच दोन अपघात. एक नुकत्याच निघून गेलेल्या पाण्याच्या टँकरच्या मार्गात गळालेल्या पाण्यावर घरसून. दुसरा ठाण्याला पूर्व पश्चिम जोडणार्‍या पुलाआधी कुठेतरी तुम्ही म्हणताय तसे रस्ता खरवडून ठेवल्याने. त्याआधीचे आता लिहित नाही. Sad
अजून एक विचित्र. गेल्या शनिवारी टोळीतल्या एकीच्या बाबांना एका उन्मत्त नवयुवतीने (चारचाकीने दुचाकीला) उडवले. एकदा ठोकले. त्यातून ते सावरून उभे राहताहेत तोवर त्या नवयुवतीने भान सुटून तिने पुन्हा अ‍ॅक्सलरेटर मारला आणि ते दुसर्‍यांदा ठोकले गेले.

त्यामुळे सकाळी सकाळी टीममधल्या कोणाचा फोन येऊ लागला की 'आता काय ऐकायला मिळणार' असे वाटायला लागते.

इ.इ. वरून गांधीनगरला वळणारा सिग्नल आहे त्याच्या आधी तुम्ही म्हणतात तसे नुकताच डांबर टाकून रस्ता असला गुळगुळीत केलाय की बास.

अमित Happy
एकदा मी आणि भावाने कालवण-मध-भात खाला होता!
झाले असे की आम्ही गरम गरम कालवण भात वाढून घेऊन जेवायला बसलो होतो. तेवढ्यात गावकडून खाऊचे गाठोडे आले. ते अधीरतेने लगेचच उघडले गेले. भावाने पिशवीत घात घातला तर त्याला एक गडद तपकिरी रंगाची बाटली लागली. जिच्यातून नेहमी तूप येत असे. त्याने लगेचच टोपण उघडून माझ्या आणि त्याच्या भातावर ती उपडी केली. दोन तीन घास खाल्ले तरी अपेक्षीत चव जिभेवर येईना म्हटल्यावर उलटतपासणी सुरू झाली. मग लक्षात आले. Proud

ललिता, मुंबई-पुण्याबाहेर बर्‍याच ठिकाणी बोलीभाषेत : जेवण = नाम = खाण्याचा बेत = स्वयंपाक. त्यामुळे बर्‍याचदा 'जेवण झाले का?' हा प्रश्न 'झाला का स्वयंपाक करून?' या अर्थाने येतो. Happy
दुसर्‍या (बनवलेला स्वयंपाक गिळला का या) अर्थासाठी स्पेसीफिकली 'जेवला का?' असा प्रश्न विचारला जातो.

सुप्र.

काल कलर्स मराठीवर अवघा रंग एक झाला पाहिले का? काही काही सादरीकरणं अप्रतिम झाली. राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचे कानडा राजा पंढरीचा तर कळस होते. खर्जाच्या रियाझाचे महत्व कालचे महेश काळेचे एक गाणे ऐकून नीटच कळले. मुस्लिम पद्धतीची रचना होती (त्याला काय म्हणतात ते माहित नाही पण खूप वेळा असते अशी रचना) सुरवातीचा बराच भाग खर्जातले स्वर होते आणि अगदी शेवटी थेट षड्ज. खर्जामध्ये महेश खूपच बेसूर होत होता अगदीच कंटाळवाणा झाला तो भाग. त्यामुळे त्याचा हातखंडा असलेला वरच्या पट्टीतला भागही पकड घेऊ शकला नाही.

आनंद भाटेंचे 'माझे माहेर पंढरी' अप्रतिम होते. एका जागी त्यांनी एक प्रदिर्घ तान घेतली. ढील दिलेल्या पतंगाप्रमाणे सूर लहरत होते. कान तृप्त होत असताना आता समेवर कसे येणार हा प्रश्न पडलाच. पण त्यांनी एका बेसावध क्षणी पतंगाचा मांजा बरोबर ताणला आणि अचूक सम गाठली. तेंव्हा तबलजी आणि मृदंगीयाने दिलेली दाद बघण्यासारखीच होती.

रुक्मिणीच्या आख्यायीकेवर सो.कु.ने सादर केलेले नॄत्य मस्त होते तर लताच्या अजरामर रचनांची मानसी साळविने लावलेली वाट हे ठसठशीत गालबोट होते.

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg