संबंध पुण्याचाच एक पाय दहा बारा वर्षे पुढे आणि दुसरा दहा बारा वर्षे मागे असा असल्याने, (म्हणजे हल्ली, अलीकडे या शब्दांचा कालावधी साधारण पंचवीस वर्षांचा तरी असतो, ) या तर अगदी काल पडलेल्या पोस्टी वाटत आहेत!
नमस्कार पुपु! शुकशुकाटी शुक्रवारच्या शुभेच्छा
हो कर्वे रोड तर पूर्ण बदलला. पूर्वी ज्या ३-४ मजली इमारती होत्या त्या आता नव्याने दिसतात. त्या फ्लायओव्हर्सवरून आता त्यांचे दुसरे तिसरे मजले दिसतात. बरीचशी ऑफिसेस आहेत असे दिसते. एकदा मेट्रो मधून भरभरून लोक जाऊ लागले की आणखीनच दिसतील. या लोकांना त्या उंचीवरून आपले ऑफिस, घर कसे दिसते हा प्रश्न इतकी वर्षे कधी पडला नसेल
प्रभात रोडही पूर्वी कमालीचा शांत असे. शाळेतून घरी जाताना तेथील गल्ल्यांमधून आम्ही भांडारकर रोडच्या बाजूला जायचो. तेव्हा रस्त्यावर चिटपाखरू नसे. आता गेल्या काही वर्षात कर्वे रोडवरून डेक्कनच्या बाजूला जाणारे सगळे ट्रॅफिक त्या एका छोट्या बोळातून प्रभात रोडवर ओतले जाऊ लागले. आता काय स्थिती आहे माहीत नाही.
प्रभात रोडही पूर्वी कमालीचा शांत असे >>> हो यार. मस्त वाटायचं तिथून चालत जायला. छान बंगले होते तिथे कोणे एके काळी. आता redevelopment च्या नादात पार वाट लावली आहे. फार कशाला, कॅम्पमध्ये पण जाम बोर होतं आजकाल.
प्रभात रोडला आता बंगल्यांच्या जागी मोठ मोठी सलोन, बुटिक आणि पेट पार्लर आली आहेत. श्रीमंती तीच - फक्त पुढच्या पिढीची.
मेट्रो मधून तो परिसर फार सुंदर दिसतो. खाली रस्त्यावर चालताना नुसत्याच बिल्डिंग आणि दुकाने यांच्या गर्दीत रुक्षता वाटते. पण याच्या एकदम उलट वरून बघताना मधली मधली हिरवीगार झाडं , त्यावरचे फुलोरे, झुडुपाळलेल्या खिडक्या गॅलरी लक्ष वेधून घेतात. स्वतः: चा कायम वेगळाच पॉइंट ऑफ व्ह्यू असणाऱ्या पुणेकरांना, पुण्याचा तेही कोथरूड चा बर्डस आय व्ह्यू दाखवणारी मेट्रो म्हणजे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती असली पाहिजे. नाहीतर तसं पुण्यात कुणाला डोक्यावर घेतलं जाणें अशक्यच.
मेट्रोमधून प्रभात रोड फार डिटेल मधे पाहिला नाही बहुतेक. पण कोथरूड साइडला काही काही टेरेसेस वरती चक्क मोठमोठ्या बागा केल्या आहेत ते मात्र मेट्रोमुळे लक्षात आलं. चक्क नारळाचं झाड पण लावलेलं दिसलं एके ठिकाणी. मध्यम आकाराचे वृक्ष पण आहेत १-२ ठिकाणी. गेल्यावेळी आले होते तेव्हा मेट्रोपेक्षा लॉ कॉलेज रोडपासून दशभुजा पर्यंत तुंबणारं ट्रॅफिकच जास्त लक्षात राहिलंय.
मी मेट्रोमधून तो भाग कसा दिसतो बघितला नाही अजून. रस्त्याने फ्लायओव्हर्स वरून पाहिला आहे कर्वे रोडवर.
त्यावरचे फुलोरे, झुडुपाळलेल्या खिडक्या गॅलरी लक्ष वेधून घेतात >> यावर १०-१२ वर्षांपूर्वीच्या पुपुवर काय बहार आली असती गॅलरी लक्ष वेधून घेता इतकेच पुरेसे होते.
गेल्यावेळी आले होते तेव्हा मेट्रोपेक्षा लॉ कॉलेज रोडपासून दशभुजा पर्यंत तुंबणारं ट्रॅफिकच जास्त लक्षात राहिलंय.>>> आता ते तुंबत-तुंबत पार चांदणी चौकाच्याही पुढे गेले आहे.
सगळीकडेच काय गर्दी विचारू नका! कुठे जेवायला गेलात कि कमीतकमी अर्धा तास वेटींग टाईम आहे. प्रत्येक गल्लीत एकतरी बिर्याणी हाऊस आणि अमृततुल्य आहेच. हॅाटेल्स इतकी आहेत कि लोक घरी स्वयंपाक करतात कि नाही हा प्रश्न पडेल.
मी तिकडे गेले कि वेड्यासारखी जुण्या खुणा शोधत असते. पुर्वीचे पुणे राहीले नाही आता!
वेटिंग टाईमवरून आठवलं. गेल्या वर्षी दिवाळीत ब्रेकफास्टला म्हणून आम्ही मेहेंदळे गॅरेजच्या व्हरांडा कॅफेमधे गेलो तर तिथे भयानक गर्दी. जाऊन विचारलं किती वेळ लागेल, तर दीड तास म्हणाले हा वेटिंग टाईम कसा असू शकतो? इथे इतक्यात खायला मिळण्याची शक्यता नाही, दुसरीकडे जा हे चांगल्या शब्दात सांगण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद होता!
रस्त्यावरून चालताना रुक्ष वाटणाऱ्या गोष्टी उंचावरून बघताना सुंदर वाटतात याला +१
झोमॅटोवरून होतात रिझर्वेशन्स. मुळात ते अॅप त्यासाठी (आणि अर्थात रिव्ह्यू आणि रेटिंगसाठी) होतं. स्विगी आल्यावर मग त्यांनीही फूड डिलिव्हरीसुद्धा सुरू केली.
मी १९५५- १९६० साली सदाशिव पेठेत टिळक रोड च्या बाजूच्या घरात रहात होतो. तेंव्हा लोक मराठीत बोलत.
मराठीतच लेख, कविता गोष्टी, कादंबर्या लिहीत.
ते मराठी आता राहिले नाही.
तेंव्हा फूटपाथ वरून मोटर सायकल्स जात नसत, लक्ष्मी रोड उभयमार्गी असून गर्दी नसे.
मी २०१५ साली पुण्यात गेलो असता हिंदी/इंग्रजी चे मिश्रण अशी एक भाषा ऐकू येई. ती मला जेमतेम समजते. पण बोलता येईल असे वाटत नाही.
सध्या पुण्यात बोस्टन (गारा) कॅलिफोर्निया (४२ डीग्री ) हवाई इतक सगळ एकाच दिवसात पहायला मिळतय. त्यामुळेच आम्ही तिकडे येत नाही.
कुक (अॅप्पलचा) पूण्यात का नाही आला. चांदणी चौकात खूप ट्रॅफिक असतो म्हणाला.
संबंध पुण्याचाच एक पाय दहा
संबंध पुण्याचाच एक पाय दहा बारा वर्षे पुढे आणि दुसरा दहा बारा वर्षे मागे असा असल्याने, (म्हणजे हल्ली, अलीकडे या शब्दांचा कालावधी साधारण पंचवीस वर्षांचा तरी असतो, ) या तर अगदी काल पडलेल्या पोस्टी वाटत आहेत!
नमस्कार पुपु! शुकशुकाटी शुक्रवारच्या शुभेच्छा
मला प्रत्येक भारतवारीत पुणे
मला प्रत्येक भारतवारीत पुणे थोडं अजून परकं वाटतं.
साधा कर्वे रोड पण आपला वाटत नाही हल्ली. मी बहुतेक अजूनही १९९० - २००५ च्याच पुण्यात अडकले आहे
हो कर्वे रोड तर पूर्ण बदलला.
हो कर्वे रोड तर पूर्ण बदलला. पूर्वी ज्या ३-४ मजली इमारती होत्या त्या आता नव्याने दिसतात. त्या फ्लायओव्हर्सवरून आता त्यांचे दुसरे तिसरे मजले दिसतात. बरीचशी ऑफिसेस आहेत असे दिसते. एकदा मेट्रो मधून भरभरून लोक जाऊ लागले की आणखीनच दिसतील. या लोकांना त्या उंचीवरून आपले ऑफिस, घर कसे दिसते हा प्रश्न इतकी वर्षे कधी पडला नसेल
प्रभात रोडही पूर्वी कमालीचा शांत असे. शाळेतून घरी जाताना तेथील गल्ल्यांमधून आम्ही भांडारकर रोडच्या बाजूला जायचो. तेव्हा रस्त्यावर चिटपाखरू नसे. आता गेल्या काही वर्षात कर्वे रोडवरून डेक्कनच्या बाजूला जाणारे सगळे ट्रॅफिक त्या एका छोट्या बोळातून प्रभात रोडवर ओतले जाऊ लागले. आता काय स्थिती आहे माहीत नाही.
प्रभात रोडही पूर्वी कमालीचा
प्रभात रोडही पूर्वी कमालीचा शांत असे >>> हो यार. मस्त वाटायचं तिथून चालत जायला. छान बंगले होते तिथे कोणे एके काळी. आता redevelopment च्या नादात पार वाट लावली आहे. फार कशाला, कॅम्पमध्ये पण जाम बोर होतं आजकाल.
प्रभात रोडला आता बंगल्यांच्या
प्रभात रोडला आता बंगल्यांच्या जागी मोठ मोठी सलोन, बुटिक आणि पेट पार्लर आली आहेत. श्रीमंती तीच - फक्त पुढच्या पिढीची.
मेट्रो मधून तो परिसर फार सुंदर दिसतो. खाली रस्त्यावर चालताना नुसत्याच बिल्डिंग आणि दुकाने यांच्या गर्दीत रुक्षता वाटते. पण याच्या एकदम उलट वरून बघताना मधली मधली हिरवीगार झाडं , त्यावरचे फुलोरे, झुडुपाळलेल्या खिडक्या गॅलरी लक्ष वेधून घेतात. स्वतः: चा कायम वेगळाच पॉइंट ऑफ व्ह्यू असणाऱ्या पुणेकरांना, पुण्याचा तेही कोथरूड चा बर्डस आय व्ह्यू दाखवणारी मेट्रो म्हणजे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती असली पाहिजे. नाहीतर तसं पुण्यात कुणाला डोक्यावर घेतलं जाणें अशक्यच.
मेट्रोमधून प्रभात रोड फार
मी मेट्रोमधून तो भाग कसा
मी मेट्रोमधून तो भाग कसा दिसतो बघितला नाही अजून. रस्त्याने फ्लायओव्हर्स वरून पाहिला आहे कर्वे रोडवर.
त्यावरचे फुलोरे, झुडुपाळलेल्या खिडक्या गॅलरी लक्ष वेधून घेतात >> यावर १०-१२ वर्षांपूर्वीच्या पुपुवर काय बहार आली असती
गॅलरी लक्ष वेधून घेता इतकेच पुरेसे होते.
फा मग गोष्टी फुलोरे, झुडुपं
फा
मग गोष्टी फुलोरे, झुडुपं यावर थांबल्या नसत्या 
गेल्यावेळी आले होते तेव्हा
गेल्यावेळी आले होते तेव्हा मेट्रोपेक्षा लॉ कॉलेज रोडपासून दशभुजा पर्यंत तुंबणारं ट्रॅफिकच जास्त लक्षात राहिलंय.>>> आता ते तुंबत-तुंबत पार चांदणी चौकाच्याही पुढे गेले आहे.
सगळीकडेच काय गर्दी विचारू नका! कुठे जेवायला गेलात कि कमीतकमी अर्धा तास वेटींग टाईम आहे. प्रत्येक गल्लीत एकतरी बिर्याणी हाऊस आणि अमृततुल्य आहेच. हॅाटेल्स इतकी आहेत कि लोक घरी स्वयंपाक करतात कि नाही हा प्रश्न पडेल.
मी तिकडे गेले कि वेड्यासारखी जुण्या खुणा शोधत असते. पुर्वीचे पुणे राहीले नाही आता!
पूर्वीचे पुणे राहीले नाही आता
पूर्वीचे पुणे राहीले नाही आता हे अगदी अगदी खरंय.
आणि अस्सल पुणेकराप्रमाणे हे वाक्य आता इथे लिहिल्याने मला बरं वाटतंय
वेटिंग टाईमवरून आठवलं. गेल्या
वेटिंग टाईमवरून आठवलं. गेल्या वर्षी दिवाळीत ब्रेकफास्टला म्हणून आम्ही मेहेंदळे गॅरेजच्या व्हरांडा कॅफेमधे गेलो तर तिथे भयानक गर्दी. जाऊन विचारलं किती वेळ लागेल, तर दीड तास म्हणाले
हा वेटिंग टाईम कसा असू शकतो? इथे इतक्यात खायला मिळण्याची शक्यता नाही, दुसरीकडे जा हे चांगल्या शब्दात सांगण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद होता!
रस्त्यावरून चालताना रुक्ष वाटणाऱ्या गोष्टी उंचावरून बघताना सुंदर वाटतात याला +१
गोष्टी फुलोरे, झुडुपं यावर
गोष्टी फुलोरे, झुडुपं यावर थांबल्या नसत्या >>>
हो
ब्रेफाला दीड तास वेटिंग म्हणजे लंचच झाली
ब्रेफाला दीड तास वेटिंग >>>
ब्रेफाला दीड तास वेटिंग >>> बापरे! बरं झालं सांगितलं
पण म्हणजे अश्या ठिकाणी पण आता रिझर्वेशन करून जायचं का काय?
भारतात अजून कोणी एखादे अॅप
भारतात अजून कोणी एखादे अॅप आणले नाही का अशा रिझर्वेशनचे? खूप चालेल.
हायला, इथे लोक्स अजुनही
हायला, इथे लोक्स अजुनही येतात.
बा.द्,वे.
मी पिंपरी चिंचवड सोडुन आता पुणेकर झालो आहे. धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा या भागात कोणी मायबोलीकर आहेत का ?
झोमॅटोवरून होतात रिझर्वेशन्स.
झोमॅटोवरून होतात रिझर्वेशन्स. मुळात ते अॅप त्यासाठी (आणि अर्थात रिव्ह्यू आणि रेटिंगसाठी) होतं. स्विगी आल्यावर मग त्यांनीही फूड डिलिव्हरीसुद्धा सुरू केली.
ओह! हे माहीत नव्हते. मला
ओह! हे माहीत नव्हते. मला वाटायचे दोन्ही डिलिव्हरी सर्विसेसच आहेत.
मी १९५५- १९६० साली सदाशिव
मी १९५५- १९६० साली सदाशिव पेठेत टिळक रोड च्या बाजूच्या घरात रहात होतो. तेंव्हा लोक मराठीत बोलत.
मराठीतच लेख, कविता गोष्टी, कादंबर्या लिहीत.
ते मराठी आता राहिले नाही.
तेंव्हा फूटपाथ वरून मोटर सायकल्स जात नसत, लक्ष्मी रोड उभयमार्गी असून गर्दी नसे.
मी २०१५ साली पुण्यात गेलो असता हिंदी/इंग्रजी चे मिश्रण अशी एक भाषा ऐकू येई. ती मला जेमतेम समजते. पण बोलता येईल असे वाटत नाही.
सध्या पुण्यात बोस्टन (गारा)

(No subject)
(No subject)