पुण्यातले पुणेकर

Submitted by admin on 1 April, 2008 - 18:43
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आठवणी.
आज लकडी पुलावर दुचाक्या लावून पूर बघत असलेले पुणेकर पहायला मिळाले.
कधी काळी खडकवासल्याला जाऊन पाणी सोडलेले पहायचा उरक असायचा. ते ही तिथले कणीस खात खात.

काही दुर्घटना पण घडल्या. आमच्या इथे अजित पवार येऊन गेले >>> Lol

तो 'काहवा' कॅफे होता btw! >> अरे हो बरोबर! आठवले.

_डी - मी वरती "जाहीर" लिहीले आहे ते गटगपुरते जाहीर. तसे तेथे इतर लोक होते व त्यांच्या कानावर पडलेही असेल - आणि आम्ही आवर्जून खाजगीत वाचन केल्यासारखे नव्हते केले, पण एका भागात आम्हीच सगळे बसलो होतो तेथे हे वाचन झाले.

अरे हो, मी जाहीर म्हणजे तेवढेच मर्यादित मित्र मंडळात गृहीत धरले. पण आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे खरेच.

काहवा बहुदा nalstop ला होता ना. तिथले वेटर अजब टोपी घालत काहीतरी. जामच कॉमेडी.
बी एम सी सी ला mock स्टॉक एक्सचेंज होई, त्याला रम बॉल स्नॅक्स म्हणून असत.
अमित चायनीज रूम म्हणत आहेस का? बालचित्रवाणी समोर होते ते हाय फाय एकदम. ९७/९८ ची गोष्ट आहे.

पण आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे खरेच. >>>> ते कार्याध्यक्ष कुठे गायबले आहेत? त्यांना जागे करा, म्हणजे सगळे नीट सुरू होईल परत.

अवघड काम आहे पावसाचं. एकंदरितच वेदर पॅटर्न्स गंडले आहेत सगळीकडेच. फक्त इन्फ्रा कमी असलेल्या ठिकाणी खुपच त्रास होतो लोकांना. इथे अमेरिकेत इन्फ्रा बरं आहे म्हणावं तर त्याची सुद्धा वाट लावत वेदर इवेंट्स घडत आहेत. वादळं, तुफान पाऊस वगैरे. पुढच्या १० वर्षात जपान मध्ये कसं भुकंपाच्या तयारीनेच सगळं इन्फ्रा, घरं वगैरे आहेत तशी सगळ्याच देशांना अडजस्टमेंट कराव्या लागतील. काही सोपं नाही.

हल्लो र्म्ड Happy (हल्लो वाचलं पण उत्तर द्यायचं राहुन गेलं).

बुवा - खरे आहे.

लहानपणी कधी पुण्यात सोसायट्यांमधे पाणी साचल्याच्या बातम्या नसत. पुलाची वाडी हा डेक्कनजवळचा भाग व इतर काही नदीपात्राजवळचे व तुलनेने फार उंचीवर नसलेले भाग - इथे पाणी शिरे. पण नदीपासून लांब असलेल्या ठिकाणी पाणी साचणे हे पुण्यात कॉमन नव्हते. निदान तशा बातम्या नसत. गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे.

बाय द वे इण्डिया टुडेचे इंग्रजी रिपोर्टर्स कोणत्या शहरात बसून पुण्याचे रिपोर्टिंग करतात माहीत नाही. काल पुण्यात पूल पाण्याखाली गेलाय हे अशा पद्धतीने सांगत होते की एक मोठा अ‍ॅक्सेस बंद झाला आहे. जनजीवन ठप्प झाले आहे (मात्र हे दाखवताना लोक रमतगमत दुसर्‍या एका पुलावरून मोबाईल ने फोटो/व्हिडीओ काढताना दाखवलेत). पूल पाण्याखाली गेला ही बातमी होती भिडे पुलाबद्दल पण ऐकून लोकांना वाटेल दोन्ही तीरांवरच्या लोकांना आता दुसर्‍या बाजूचा अ‍ॅक्सेस बंद झाला आहे. पुण्याच्या मुख्य भागात नदीच्या बाजूने १०-१५ मिनीटे कोणत्याही दिशेने गेलो की आणखी एखादा पूल लागतो हे यांना माहीत नाही असे दिसत होते.

पाऊस भयंकर झाला आहे आणि सोसायट्या/वस्त्यांमधे बरेच पाणी शिरले आहे हे माहीत आहे. ते वेगळे. हे इथे पुलाबद्दल सांगत होते. आणि मथळे सुद्धा Bridge submerged in Pune वगैरे येत होते.

आपल्याकडे इंग्रजी बातम्या देणार्‍यांचा अ‍ॅक्सेण्ट व टोन इतका कॉण्डिसेण्डिंग का वाटतो?

पण ही २००७ वगैरेची गोष्ट असेल.
>>
कॅफे मोका होतं तिथे (त्याचाकडे हुक्का मिळायचा)
नंतर त्याच्या जागी जर्मन बेकरी वंडरबार आलं होतं. पण आता ते ही जमीनदोस्त झालंय...

डेन्मार्क मधे एकदा चेंजओव्हर करताना ट्रेन ची वाट बघत मधल्याच स्टेशन वर थांबलो असता प्लॅटफॉर्म वरच्या दुकानातून घेतलेला रम बॉल हा कॉकटेल मेनू मधून पळवून आणल्यासारखा होता. २ लाडूत मस्त मजा आली...

बरोबर अँकी मोका का काहीतरी कॉर्नर वर आलं नंतर, पण तिथे त्या आधी काही नव्हत, ह वी सरदेसाईंच्या बंगल्यापुढे..भांडारकर च्या बरोबर समोर मी जे म्हणत आहे ते हे चायनीज होतं आणि एक HDFC ki hsbc Bank पण होती. आणि त्याला लागून रंगोली. तिथे पि एम टी चा भांडारकर आणि बी एम सी सी कॉर्नर असा स्टॉप होता. दुपारी तर अगदीच तुरळक वाहतूक असे. खादाडी ला केवळ रंगोली नाहीतर मग खाली एकदम रुपाली वैशाली ई.
हो farend, खास करून सिंहगड रोड वरच्या सोसायट्या मध्ये आणि एकंदर त्या रोडवरच नालेच वाहतात..

अँकी, कुठे गायब आहेस?

न्युज चॅनल्स लोक का बघतात (तुम्ही का बघता)- जस्ट क्युरियस..

सोशल मेडियावरच्या पोस्ट्स किंवा व्हिडिओज त्यातही ठीकच आहे. अमुक ठिकाणी बघा काय झालं- इथवरच ते असतं. त्यातही आपल्याला सिलेक्शन असतं. ऑथेंटिक कुठवर आहे- हे लगेच कळतं. हौशी कलाकार, उठवळ बातमीदार आणि function at() { [native code] }इ उत्साही इन्फ्लुएंसर्स सहज स्क्रीन करता येतात. न्युज चॅनेलवाले शहर कधी बुडतंय किंवा स्फोटाने उडतंय- यावर टपून असल्यागतच दिसतात मला. मुंबई आणि परिसरात २ कोटी, आणि पुणे आणि परिसरात १ कोटी लोक राहत असतील. ही संख्या महाराष्ट्राच्या पावपट आहे, आणि उरलेले पाऊणपटही याच बातम्या महाराष्ट्रभर चघळत बघत असतात, हे त्यांना नीट ठाऊक आहे. का बघतात लोक यांना?

वर्तमानपत्रं कितीही कुणाची गुलाम असली, तरी अजून तरी ऑथेंटिक आहेत. दुसर्‍या दिवशी सारांश असतो, सगळं एकत्रितपणे कव्हर केलेलं असतं. घटना घडून गेलेल्या असतात, त्यामुळे धार आणि पॅनिकही कमी झालेलं असतं. बर्डस आय व्ह्यू असतो. उदाहरणार्थ आज मटामध्ये (इतरही वर्तमानपत्रांतही अर्थातच) पुण्यात घडलं, त्यासोबतच 'राज्यात कुठे काय घडलं' असा कॉलम- यावरून कळलं, की पुण्यात घडलं ते काहीच नाही. उदाहरणार्थ महाडच्या घरांत ३-४ फूट पाणी आलं, हे कुणाच्या गावीच नाही.

का बघतात न्युज चॅनेल्स?

लहानपणी कधी पुण्यात सोसायट्यांमधे पाणी साचल्याच्या बातम्या नसत. पुलाची वाडी हा डेक्कनजवळचा भाग व इतर काही नदीपात्राजवळचे व तुलनेने फार उंचीवर नसलेले भाग - इथे पाणी शिरे. पण नदीपासून लांब असलेल्या ठिकाणी पाणी साचणे हे पुण्यात कॉमन नव्हते. निदान तशा बातम्या नसत. गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. >>> +१

न्युज चॅनेलवाले शहर कधी बुडतंय किंवा स्फोटाने उडतंय- यावर टपून असल्यागतच दिसतात मला. >>> अगदी अगदी.

भांडारकर रोडच्या लो कॉलेजरोड कॉर्नरला कोणतं होतं? तिथं गटग झालेली.

आणि 'काहवा'च्याही आठवणी आहेत. त्यातली आता लगेच आठवत असलेली विचित्र आठवण म्हणजे तिथला तो हुक्का बिका झाल्यावर अरभाटाने मला 'हे कपडे कुठून घेतलेस?' असं विचारल्यावर मी त्याला वॅन ह्युजन (की असंच काहीतरी ब्रँड) ची 'गझनी' स्पेशल सिलेक्टेड एडिशन आहे- असं ठोकून दिलं होतं. हे १००% खरंही असेल. आता हे आक्षी श्रोडिंजरच्या मांजरासारखं आहे. तो इथं खरंखोटं करायला येणार नसल्याने, आणि वॅन ह्युजनने अशा सतरा हजार एडिशन्स आजवर काढलेल्या असल्याने मांजरच गझनी आहे, हे नक्की Proud थोडक्यात काय, तर आप्ल्या न्युज चॅनेल्ससारखं.

र्म्ड, मीही लेख प्रिंट करून वाचले आहेत. आता लग्गेच आठवलेला- रैनेचा 'विश्वाचे आर्त'. अजूनही अनेक.

चला आता खडकवासल्याचा रील करू. पाणी केव्हा गायब होईल माहित नाही. तिथे आत खडकांत बसून गटग केलं पायजे खरं तर. इनमीन २ टीमसीचं धरण. म्हणजे पुण्याच्या एकुण सार्‍या धरणसाखळीच्या अंदाजे ४-५% पाणीसाठा. पण ग्लॅमर केवढं!

कॅफे मोका होतं तिथे >>> ही तीच जागा आहे का जिथे एक भलमोठ्ठा टंपर भरून गवती चहा घातलेला चहा मिळत असे? तो फार भन्नाट असायचा.

भांडारकर रोडच्या लो कॉलेजरोड कॉर्नरला कोणतं होतं? तिथं गटग झालेली. >>> रंगोली का?

र्म्ड, मीही लेख प्रिंट करून वाचले आहेत. आता लग्गेच आठवलेला- रैनेचा 'विश्वाचे आर्त'. अजूनही अनेक. >>> च्यामारी! आम्ही गटग (AMBA) करत होतो तेव्हा नाही केले असले उद्योग कोणी. Proud

न्युज चॅनल्स लोक का बघतात (तुम्ही का बघता)- जस्ट क्युरियस.. >>> आवर्जून नाही पाहिले. काल यू ट्यूब वर गेलो तर "महाराष्ट्रातील पुराच्या बातम्या" वाली क्लिप दिसली - ती इण्डिया टुडेची निघाली. त्यात हे होते. मी पूर्ण क्लिप पाहिली नाही पण जितकी पाहिली त्यात मुंबई, पुणे व कोल्हापूरची माहिती होती.

१. इतर डेडली आत्याच्या सिरीयल बघण्यापेक्षा न्युज चॅनल
२. मोबाईल वरच्या छोट्या स्क्रीन मधे सतत बघत राहण्याचा कंटाळा शिवाय आपण काय बघतोय हे बघणारी चार डोकी. त्यापेक्षा खुले आम टिव्ही वरच बघा
३. सोशल मीडिया वर हे बघू का ते, यापेक्षा हे चांगले, कुणाला फॉलो करायचे असा फोमो असण्यापेक्षा गरीब न्युज चॅनल बरे किनाई
४. उद्या पेपर येईल (हे उद्या माझा गोपाळ येईल आणि मला इथून घेऊन जाईल हो चालीवर) तेव्हा खरे काय ते कळेलच पण हे लोक काय दिवे लावतात ते बघू तरी. त्याशिवाय उद्या सोशल मीडियावर यांना नावे कशी ठेवणार
५. कितीही नावं ठेवली तरी, लाईव्ह ची नशा वेगळीच ओ. मॅच चालू असताना टाटा स्काय वाले आधी ओरडले की हॉट स्टार वाले नुसते चडफडत येरझाऱ्या घालताना पाहिले आहेत.
६. त्यामुळे अजून कुठे कुठे काय काय घडतं आहे हे बघण्याची सोय असताना डोळे मिटून बसणे धृतराष्ट्राला पण जमले नाही तर उरलेल्या राष्ट्राला काय जमणार ( हे उगाच स्किट फॉरमॅट साठी Proud )

फा, युट्य्ब नव्हे रे. तासन्तास न्युज चॅनेल्सना चिकटून बसणार्‍यांबद्दल बोलतोय. या अशा चिकटून बसणार्‍या लोकांकडून मला फोन आले. म्हणे पुण्यात हाहाकार माजलाय? म्हटलं तसं काही नाहीय, पण तुम्हाला नक्की बातमी असेल तर सांगा तसं, म्हणजे मी गाशा गुंडाळतो इथनं.

हे उगाच स्किट फॉरमॅट साठी
>>>
तेच म्हणतोय, चला सारे जाऊया खडकवासल्याला स्किट करायला. तिथून लाईव्ह करू. कुठचा तरी न्युज चॅनल दखल घेईलच Proud

नको, न्यूजचा मथळा पुन्हा तोच नेहमीचा - पाणी पाहायला पुणेकरांची गर्दी. आता खरंतर आपण तिथे स्कीट करायला जाणार आणि लोक आपल्याला बघायला येणार. पण हे आपल्या कष्टांवर खडकवासल्याच्या साठ्यातलेच पाणी टाकणार. नको नको.

>>> नवीन Submitted by फारएण्ड on 26 July, 2024 - 22:56

आजच्या पुढारीमध्ये नेमकी तांत्रिक माहिती आली आहे. निळी व लाल मर्यादारेषा (२५ वर्षांतील सर्वात मोठा पाऊस व १०० वर्षांतील सर्वात मोठा पाऊस अनुक्रमे, यानुसार आखलेल्या रेषा) या आता कालबाह्य झालेल्या आहेत. दोन महत्वाची कारणे:

■ धरणातील विसर्ग हाच फक्त नदीपात्रात येत नसून असंख्य नाले, ओढे हेही नदीपात्रात येतात याकडे झालेले दुर्लक्ष! (उदाहरणार्थ, पुढारीमध्ये दिल्यानुसार,) धरणातील विसर्ग ३५००० क्यूसेक्स असेल तर एकट्या आंबील ओढ्यातून नदीपात्रात येणारे पाणी २०००० क्यूसेक्सने येते, जे हिशोबात धरलेलेच नाही. असे लहान नाले व ओढे असंख्य आहेत. त्यामुळे, येणारे पाणी इतरत्र पसरेल हा अंदाज कागदोपत्री अस्तित्वातच नाही

■ बांधकामे ठरवलेल्या पुररेषेनुसार होतात (अनेकदा तर तेही होत नाही). त्यामुळे, (हेही पुढारीमध्ये दिलेले आहे की) १९९२ साली धरणातून ९०००० क्यूसेक्स विसर्ग होऊनही पाणी इतरत्र पसरले नव्हते पण यंदा फक्त ३५००० क्यूसेक्स विसर्ग करूनही ते इमारतींमध्ये पसरले. जर एक लाख क्यूसेक्स विसर्ग करावाच लागला तर काय होईल असा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जे २०१९ साली ४५००० क्यूसेक्स विसर्ग असल्याने झाले होते ते २०२४ साली ३५००० क्यूसेक्स विसर्ग असल्याने झाले आहे.

Alarming, already.

ज्या दिवशी पुण्यात पूर आल्याच्या बातम्या होत्या त्या दिवशी पुण्याच्या एका टोकाकडून दुसरे टोक ओलांडून गेलो.
पाणी साचलेले होते रस्त्यात. संध्याकाळी येताना जास्त पाणी होते.
सकाळी जेव्हढे ट्रॅफिक जाम लागले होते, तेव्हढे संध्याकाळी नाही लागले. बहुतेक लोक लवकर घरी गेले असावेत.
संगमवाडीला नदीत भर टाकत आहेत. गेल्या दहा वर्षात भर टाकत टाकत जवळपास दोनेकशे गुंठ्याचा प्लॉट बनवलाय.
खासगी बसेसचे पार्किंग आणि आता शेजारी या बनवलेल्या भूखंडावर हॉटेल्स झाली आहेत.
काही वर्षांनी कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/activists-decry-riverbed-d...

धन्यावाद माहितीबद्दल लोकहो. यातून बरीच माहिती मिळाली आणि काही कारणेही कळाली. ती फिल्म पाहिली. पुढारीमधली माहिती साधारण अशीच दिसते.