जनगणना....!
सन २०११ च्या जनगणनेला (अपवाद वगळता दर १० वर्षांनी होणार्या)/ खानेसुमारी ला सुरुवात झाली. काही राज्यांत ती अजुन अधिकृतपणे सुरु व्हायची आहे. नेहमीप्रमाणे ज्या खात्यांच्या कर्मचार्यांना हे काम दिले आहे, तिथुन तक्रारी सुरु झाल्या आहेत. पण ते समजण्यासारखे आहे.
एक धक्कादायक बाब समोर येते आहे, ती म्हणजे, आमची खाजगी माहिती आम्ही इतरांना का द्यावी?
मला आठवते तसे, जनगणना सुरु झाली कि आमच्या प्राथमिक शाळेतील गुरुजी घरी येत अन जे कुणी मोठे व्यक्ती घरात असेल त्यांना साधारण माहिती- घरातील व्यक्तींची नावे, वय, शिक्षण, व्यवसाय अशी माहिती विचारत. जवळपास सर्वच लोक ही माहिती देत असत. पण आताशा लोकांना वय, मुले, व्यवसाय याबद्दल जनगणना अधिकार्याला महिती देणे अडचणीचे/ खाजगी माहितीत दखल वाटते आहे? हे मला अनाकलनीय आहे.
तुम्ही जर खाजगी व्यक्तीला माहिती दिली, तर ते अनधिकृत असेल, ती व्यक्ती त्या माहितीचा दुरुपयोग करेल, हे समजु शकते.... पण सरकारी यंत्रणेला जर माहितीच पुरवली नाही तर नियोजनाच्या कामात एक मोठा अडथळाच ठरणार आहे.
सरकारी यंत्रणेला जनगणने साठी माहिती पुरवण्यात गैर ते काय? माहिती जमा करणारा अधिकारी हा सरकारचे प्रतिनिधित्व करतो आहे. सरकारला/प्रशासनाला सहकार्य करणे हे सुज्ञ नागरिकाचे कर्तव्यच आहे.
व्हाट इस स्टेट? असा प्रश्न राज्यशास्त्राच्या तासाला एक निवृत्त जेष्ठ सनदी अधिकार्याला विचारला असता, सोप्या भाषेत त्यांनी सांगितले कि, घरी पत्र घेऊन येणारा पोस्टमन हा 'स्टेट' आहे. म्हणजे तो सरकार चा प्रतिनिधी आहे.
भलेही आपले नियोजन १०० टक्के चुकलेले असले, तरी किमान चुकायला का होईना नियोजन करणे गरजेचे आहेच कि
आपल्याला काय वाटते?
सगळी ओरड सगळे नेतेच करताहेत.
सगळी ओरड सगळे नेतेच करताहेत. पुढे घेऊन जाणारा तो नेता, इथे लोकांनी आपल्या मागे आणि कायम मागासलेलेच राहावे असे वाटते ते नेते.
अनुसुचित जातीमधे फक्त हिन्दुच
अनुसुचित जातीमधे फक्त हिन्दुच allowed असतात का?>>>>> मुस्लीम पण असतात. दलीत मुस्लीम हा शब्द प्रयोग बरेचदा वाचनात आला आहे.
मुस्लीम पण असतात. दलीत
मुस्लीम पण असतात. दलीत मुस्लीम हा शब्द प्रयोग बरेचदा वाचनात आला आहे.>> हो, मुस्लिम, क्रिश्चन या धर्मामधे पण जाती असतातच. बहुतेकदा त्या धर्मांतरानंतरदेखील चालू झालेल्या असतात. तामिळनाडूमधे दलित क्रिश्चनाना चर्च मधे प्रवेश नसतो असे वाचले होते. हे एक उदाहरण झाले. इतरत्र देखील असे नियम असतील तर माहित नाही.
अनुसूचित जातीमधे नवबौद्ध येतात का???
चंपक ,एक चांगला विषय
चंपक ,एक चांगला विषय मांडल्याबद्दल ..धन्यवाद !
जातीवार माणसे मोजुन त्या त्या प्रमाणात आरक्षण द्या,कुटुंब नियोजन ला धाब्यावर बसवल्यांना
मात्र याचा अप्रत्यक्षरीत्या फायदाच झाला ..म्हणायचा !
जात काही जातच नाही...
जात काही जातच नाही...
जनगणना करतांना भटके, सतत फिरणारे ज्यांची घरे नाहीत असे किमान ८-१० कोटी लोकं भारतात आहेत, त्यांची शिरगणती होते काय? या निव्वळ भटकणार्या (NT) लोकांना आधार द्यायचा विचारही होत नाही... त्यांच्या साठी काही सुविधा आहेत, पण त्यांना त्याची पुसटशी माहिती देखील नसते
नियंत्रणाच्या बाहेर वाढणार्या जन-संख्येवर काही उपाय योजना कारायची कुठल्यातरी राजकीय पक्षाची मानसिक तयारी आहे कां? आज पिण्याचे (!) पाणी सर्वांना पुरवण्यास आपण कमी पडतो. अन्न, विज बद्दल न बोललेलं चांगले. ४७ सें तापमानात आजही नित्याने १० तास विज गायब असते, ५-७ दिवस पाणी नसते. एखाद वर्षी ठिक आहे पण गेली ७-८ वर्षे मी तेच वाचतो आहे. सर्व जन गणनेचा व्यावहार प्रामाणिक, पारदर्शी आहे असे समजलो तरी नियोजना साठी लागणारी किमान साधने उपलब्द आहेत कां? जर तसे नसेल तर नियोजनात तोंडे कमी करणे ह्यावर भर कां दिला जात नाही ?
नीधप , अगदी सुरुवातीला भारतात
नीधप , अगदी सुरुवातीला भारतात जाती जन्मावरून नाही तर व्यवसायावरून ठरायच्या आणि कुणाला कोणताही व्यवसाय करायची मुभा होती ,नंतर हे बदलले,असे मी वाचले आहे.<<
बरोबर आहे पण जेव्हा ते बदलले तेव्हा ते ते व्यवसाय त्या त्या जातीला चिकटले. त्यानंतर कैक पिढ्या तेच व्यवसाय करत असत एखादा दुसरा अपवाद वगळता. ही अगदी गेल्या शतकापर्यंतची वस्तुस्थिती आहे. आता इतके हजारो वर्ष एकच व्यवसाय पिढ्यानपिढ्या केला गेला तर ती कौशल्ये उदाहरणार्थ सुतारकाम किंवा कुंभाराचा व्यवसाय, ही कौशल्ये पिढीगणिक विकसित होत जाणार लहानपणापासूनचा सराव व अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन या बाह्य कारणांमुळे पण मुळचं जे कौशल्य लागेल ते जनुकीय दृष्ट्याही विकसित होते. याला जेनेटिक्सच्या भाषेत बहुतेक Acquired Mutation असे म्हणतात.
>>आज आपण वापरतो त्यातल्या काही स्किल्स तर ५० वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसतील, त्या कुठून येतील. स्किल्स पुढल्या पिढीला पोचत असतील तर त्या जेनेटिक्स मुळे नाही, तर वातावरणामुळे असे मला वाटते.<<
५० वर्षापूर्वी अस्तित्वात नसतील पण जर आज नवीन असलेलं एखादं कौशल्य मी आत्मसात केलं आणि मग माझ्या पुढच्या ५० पिढ्यांनीही तेच काम केलं तर कदाचित नंतर ५१ व्या पिढीकडे ते कौशल्य उपजतच असेल.
जातीवार माणसे मोजुन त्या त्या
जातीवार माणसे मोजुन त्या त्या प्रमाणात आरक्षण द्या>>असे व्हायची शक्यता कमी आहे.
कुटुंब नियोजन ला धाब्यावर बसवल्यांना मात्र याचा अप्रत्यक्षरीत्या फायदाच झाला ..म्हणायचा !>> कुटुंब नियोजन धाब्यावर बसविणारे बर्याचदा तोट्यातच असतात.जास्त मुले वाढविणे अगदी आरक्षण असले तरी त्रासाचेच असते.
arc शी सहमत.
arc शी सहमत.
लालूप्रसाद यादवना कुठे आरक्षण
लालूप्रसाद यादवना कुठे आरक्षण आहे, त्यांची मुले किती?
arc, तुम्ही म्हणताय तेही खरंच
arc, तुम्ही म्हणताय तेही खरंच आहे ..
पण मुळचं जे कौशल्य लागेल ते
पण मुळचं जे कौशल्य लागेल ते जनुकीय दृष्ट्याही विकसित होते. याला जेनेटिक्सच्या भाषेत बहुतेक Acquired Mutation असे म्हणतात.>>> असला काही प्रकार जेनेटीक्समधे नाहीए. उलट तू जे सांगत आहेस ती लामार्कची थिअरी अजिबात सिद्ध झालेली नाही.त्यामुळे ५१व्या पिढीकडे ते कौशल्या असेलच याची काहीही खात्री देता येत नाही.लोहाराचा मुलगा बळकट बायसेप्स घेउन,किंवा सुताराचा मुलगा जन्मजात उत्तम प्रिसिजन घेउन जन्माला येत नाही. मतिमंद आणि अतिबुद्धीमान सोडले तर जन्माला येणारे सगळेच काहीएक किमान क्षमता आणि पात्रता घेउन येतात.ती पुढे कशी विकसित होते तो वातावरणाचा परिणाम असतो.
अनुसूचित जातीत फक्त हिंदू येत नाहीत पण एखाद्या धर्मांतरीत ख्रिश्चन वा मुस्लिमाला त्याची मूळ जात माहिती असल्यास व ती लावण्याची इच्छा असल्यास तसे करता येते. उदा. ख्रिश्चन होण्याआधी तो महार असेल तर तो ती माहिती देखील देउ शकतो.नवबौद्धांनी या जनगणनेत असेच करावे हा प्रचार चालला आहे.
ठिके मग माझ्या आठवणीत चूक
ठिके मग माझ्या आठवणीत चूक असेल. हे सगळं SY चं जेनेटिक्स शिकवताना अनुषंगाने सरांनी सांगितलं होतं त्यातलं काही आहे.
मंडल व त्यानंतरच्या सर्व
मंडल व त्यानंतरच्या सर्व ओबीसी आरक्षण राजकारणात नेमके ओबीसी किती ही माहिती नेहेमीच गुलदस्त्यात राहिली.. विविध न्यायालयांनीसुद्धा लोकसंख्येतील अनुसुचीत/अतिमागास/इतर मागास वगैरे जातसमुहांचे प्रमाण नेमके किती ही माहिती नसल्याने निर्णयाच्या अचूकतेवर परिणाम होतो असे भाष्य नोंदवलेले आहे. जातनिहाय गणनेस आत्ताआत्तापर्यंत सर्वच ओबीसी नेत्यांचा विरोध होता.. कॉन्ग्रेसच्या रेट्याने बहुदा जातनिहाय गणना होईल.. ह्याचा फायदा विविध राजकीय गट कसा करुन घेतील हे बघणे निश्चितच वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे.
ज्यांना जात लावायची नाही त्यांचा प्रश्न नाही. परंतू आज भारतात जवळपास प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत जात अतिमहत्वाची असल्याने जातनिहाय गणना करणे स्वागतार्ह आहे. किमान आकडेवारी तरी सामोरी येईल..
ज्यांना जात लावायची नाही
ज्यांना जात लावायची नाही त्यांचा प्रश्न नाही. परंतू आज भारतात जवळपास प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत जात अतिमहत्वाची असल्याने जातनिहाय गणना करणे स्वागतार्ह आहे. किमान आकडेवारी तरी सामोरी येईल..<<
जात लावण्याचा उद्देश प्रत्येक गोष्टीत जात महत्वाची असणे, आकडेवारी हा असेल तर जात लावणे अनिवार्य केले जाईल. मग ज्यांना जात लावायची नाही त्यांचा प्रश्न नाही असे कसे?
आणि प्रत्येक गोष्टीत जात अतिमह्त्वाचे असते हे कसे हे समजावून सांगणार का?
फार पूर्वी स्वराज्य नावाचं एक पाक्षिक निघे पुण्यात त्यात एक गोष्ट वाचली होती आंबेडकरांची किंवा कर्मवीर भाउराव पाटलांची. नक्की कोण तेही आठवत नाहीये. खरी की खोटी तेही माहीत नाही. पण त्याचं तात्पर्य नक्कीच खरं असावं.
एका शाळेत आंबेडकर/ कर्मवीर भेट द्यायला जातात तेव्हा तिथले प्रमुख असतात ते त्यांना सांगतात की आम्ही अजिबात जात पात मानत नाही. स्पृश्यास्पृश्य भेदाभेद करत नाही. सगळे जण एकत्र खेळतात. ते कसे हे बघायला सगळेजण मैदानात गेले. मैदानात धावण्यापासून कबड्डीपर्यंत अनेक खेळ चालू होते. काही मुले निळ्या रंगाच्या कपड्यात आणि काही लाल रंगाच्या कपड्यात होती. रंगाच्या फरकाचं प्रयोजन न समजल्याने आंबेडकर/ कर्मवीर यांनी विचारलं असं का ते. प्रमुख म्हणाले निळ्या रंगाच्या कपड्यातले ते अस्पृश्य आणि लाल रंगाच्या कपड्यातले ते स्पृश्य. पण ते सगळे एकत्रच खेळतायत.
त्यावर पाहुणे म्हणाले की कोण स्पृश्य आणि कोण अस्पृश्य हे व्यवस्थित कळेल अशी वर्गवारी केल्यावर केवळ एकत्र खेळून जातीचा रोग नष्ट होईल का? खेळणार्याच्या मनातही मी अमुक आणि हा अमुक ही जाणिव असणारच. आणि बघणार्याच्याही. म्हणजे तुम्ही भेदाभेद करत नाही असं कसं?
हे असंच काहीसं आपल्या जातिनिहाय जनगणनेचं प्रकरण आहे असं मला वाटतं. जातपात न मानणे हे नुसतं वरवर एकत्र मैदानावर खेळण्यासारखं आहे. अंगातले कपडे काय रंगाचे हवेत हे जातीने बंधनकारक आहेच.
नवबौद्धांनी या जनगणनेत असेच
नवबौद्धांनी या जनगणनेत असेच करावे हा प्रचार चालला आहे.
>> आता आणखी थोडे खोलात विचारते. नवबौध्द जर आता जर S.B.C.मधे येत असेल, ज्याचे reservation % कमी अहे SC /ST पेक्षा, जर त्यांनी जनगनणा वाल्याना खोती जात जरी सांगितली जी SC/ST मधे येणारी असेल तरी त्याचा त्यांना उपयोग काय? कारण admission च्या वेळेस तर caste certificate वर SBC च असणार ना?
आर्क, मुद्दा हा आहे की 'आम्ही
आर्क, मुद्दा हा आहे की 'आम्ही बौद्ध,आम्ही हिंदू म्हणवून घेणार नाही' अशा गर्जना केल्यावर आताच ही उपरती का होते आहे?
>>>> ही माज्।ई पोस्ट २) मी
>>>> ही माज्।ई पोस्ट
२) मी पाहिलेल्या यच्चयावत "(आत्तापर्यन्तच्या) सवर्णातील" मिश्र विवाहात (यात मी देब्रा-कोब्रा, ९६-९२ कुळी असले जातीअन्तर्गतचे विवाह धरत नाहीये - केवळ भिन्न सवर्ण जाती धरतोय), पुढील संतती अत्यन्त हुषारच निपजलेली बघितली आहे.
(आत्तापर्यत्नच्या असे म्हणायचे कारण की इथुन पुढे सवर्णातील काही जातीन्ची रिझर्वेशनची मागणी मान्य झाल्यास शब्दप्रयोग बदलता यावा )
अन ही एआर्सिची प्रतिक्रिया
>>>>>(आत्तापर्यत्नच्या असे म्हणायचे कारण की इथुन पुढे सवर्णातील काही जातीन्ची रिझर्वेशनची मागणी मान्य झाल्यास शब्दप्रयोग बदलता यावा )>> आचरटपणाचा कळस आहे हे वाक्य .
यात आचरटपणा काय आहे? आज मी जे काही आन्तरजातिय विवाहाचे सन्दर्भ घेतोय ते केवळ सवर्ण जातीत झालेले, तेवढेच बघितलेत, अन यातिलच एक वा जास्त जाती रिझर्वेशनकरता "मागास" ठरविल्या गेल्यावर मी माझ्या माहितीतील त्या विवाहान्ना सवर्णातील आन्तरजातिय विवाह असे कसे काय सम्बोधू शकेन? त्या केस मधे त्या वेळेस मला वेगळाच शब्द प्रयोग करावा लागेल. अन म्हणून आत्तापर्यन्तच्या अर्थात वर्नमानकालिक सवर्ण जाती याचे विश्लेषण दिले!
>>>>>>समजा एक कोब्रा मुलगा+ मराठा मुलगी ह्या विवाहातुन अपत्य झाले आहे आणि ते १० वर्ष वयाचे आहे तर ते हुषार पण, २ वर्षानी मराठा लोकाना reservation मिळाले की त्याची हुषारी संपली ..तुम्ही तुमच्या भयाण विधांनावरुन हे सिध्द करताय की माणुस ब्राह्मण असला म्हणजे त्याला अक्कल असलीच पहिजे असे नाही.म्हणजेच अक्कल अनुवांशिकरित्या पुढच्या पिढीला जातेच असे नाही.
बाकी नन्तरचा तुम्चा हा वरिल कल्पनाविस्तार कशाचा कळस ते तुम्च तुम्हीच ठरवा! ती हुषारी सम्पली वगैरे तुमचे विचार (मी अक्कल असे म्हणत नाही, प्लिज नोट). पण दोन वर्षान्नी रिझर्वेशन मिळालेच, तर त्यान्ना कोणत्याही परिस्थितीत कोणीही आत्ता जसे म्हणतात तसे "सवर्ण" असे नक्कीच म्हणणार नाहीत! कळ्ळे?
आर्क, मुद्दा हा आहे की 'आम्ही
आर्क, मुद्दा हा आहे की 'आम्ही बौद्ध,आम्ही हिंदू म्हणवून घेणार नाही' अशा गर्जना केल्यावर आताच ही उपरती का होते आहे?>>> ह्म्म. त्यालाच तर राजकारण म्हणतात. या व अश्या अनेक धोरणामुळे नवबौद्धाची प्रगती होण्याऐवजी उलट त्याना अजूनच मागे ढकलले जात आहे. आणि याला जबाबदार फक्त त्याचे नेतेच आहेत. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी असे उलट सुलट धोरणे ठरवणे काही नविन नाही.
मुळात जर कागदोपत्री सर्वत्र तुमची जात विचारली जात असेल आणि जनगणनेत विचारली नाही तर फायदा काय?? अमुक एक जात मागासवर्गीय आहे किंवा नाही हे कशाच्या जोरावर ठरवायचे? त्या जातीतील लोकानी केलेल्या प्रगतीवरूनच... मग जातिनिहाय जनगणनेला विरोध कशासाठी? उलट यामधून काही उत्तम आणि काही धक्कादायक निष्कर्ष बाहेर येतील आणि आपल्या नियोजनकर्त्याचे डोळे थोडेफार तरी उघडतील ही अपेक्षा.
माझे थोडे confusion झाले
माझे थोडे confusion झाले होते, तुमच्या पहिल्या पोष्टवरुन वातले होते की हिन्दु असाल तरच SC/ST मधे जाता येते ,म्हणुन हे लोक आता " हिन्दु म्हणवुन घेणार नाही " हा पवित्रा बदलत आहेत.
पण आताही हिन्दु म्हणवुन नाही घेतले तरी चालेलच की, कारण नवबौध्द(इथे मुस्लिम्,ख्रिश्चन हेही घालता येइल) म्हणुनही SC/ST reservation मिळायला तांत्रिक अडचण काहिच नाही as long as caste certificateवर current caste to SC/ST बदल मिळणार असेल,त्याच्यासाठी मात्र कायदाच करावा लागेल्. तसा कायदा झाला तर सगळेच जन त्यात घुसायचा प्रयत्न नक्की करणार,कारण दुसर्या कुठल्याही reservation पेक्षा SC/ST ना जास्त benifits आहेत.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5951711.cms
जनगणनेच्या चित्तरकथा
आमच्याकडे झाली जणगणना. जात
आमच्याकडे झाली जणगणना.
जात विचारल्यावर जरा वेगळच फील होत पण क्या करे!!!
एकिकडे आम्ही तिसरीत की चौथीतच जात कोणती पुसु नका कविता पाठ केली होती आणि इकडे सरकारच जात विचारतय.
पेन्सिलने लिहिल. घरी जाउन पक्क लिहिणार म्हणे.
फोटॉ काढायला घरी येणारेत का?
घरी आलेल्या व्यक्तीने तस सांगितल आहे.
त्याना थंड पाणी आणि नंतर चहा दिला. एवढ्या उन्हाच फिरतात म्हणून.
चंपक. या जनगणने द्वारे आपली
चंपक.
या जनगणने द्वारे आपली संपुर्ण माहीती गोळा केली जात आहे,
या वरुन आता रेशन कार्ड्,मतदान ओळख पत्र बनतील काय ?.....
जनगणनेत २ भाग आहेत. एकात
जनगणनेत २ भाग आहेत. एकात नॅशनल इन्फर्मेशन रजिस्टर साठी लाग्णारी माहिती जीवरून UID दिले जाईल.
चंपक, ही एक या विषयाशी संबधित
चंपक, ही एक या विषयाशी संबधित बातमी
http://www.esakal.com/esakal/20100524/5129374467506780905.htm
चांगली चर्चा आहे. काम पूर्ण
चांगली चर्चा आहे. काम पूर्ण होऊन आकडेवारी कधी कळेल माहीत आहे का?
अमेरिकेतही यावर्षी जनगणना होते आहे. इथे घरी कोणकोण रहाते, वय, लिंग, वंश(race), घर स्वतःचे आहे का इ. मोजके प्रश्न होते. यावेळी रेसमध्ये ऑप्शन्स मात्र वाढवले आहेत. पूर्वी सगळे 'एशियन्स' एकत्रच मोजले जायचे. आता भारतीय, चिनी, जपानी इ इ आहेत. फक्त नागरीकच नव्हे तर इथे वास्तव्य असलेल्या सगळ्यांना मोजले जाते.
भरायचा फॉर्म, गणना का केली जाते, इतर प्रश्न याबद्दल इथे माहिती आहे.
http://2010.census.gov/2010census/how/index.php
http://2010.census.gov/2010census/
मागच्या वेळच्या गणनेचा डेटा इथे census 2000 लिंकवर आहे. तुम्हाला पहायची आहे तेवढीच माहिती सिलेक्ट करुन बघता येते.
http://www.census.gov/
यावेळी उत्सुकता आहे, भारतीयांची संख्या वाढली की कमी झाली. यात मराठी किती इ. कळणार नाही. नवीन तरुण मराठी लोकांची संख्या इथे वाढली नाही तर अमेरिकेतल्या मायबोलीकरांची संख्या वाढणार नाही, सरासरी वय मात्र वाढत जाईल.
हे असंच एक Interracial marriageस वरचं आर्टिकल-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2010/05/26/AR201005...
जातिनिहाय जनगणना न होण्याची
जातिनिहाय जनगणना न होण्याची शक्यता जास्त असं पेप्रात वाचलं.
मागच्या अठवड्यात जनगणानेच्या
मागच्या अठवड्यात जनगणानेच्या कामात मदतनीस म्हणुन काम करण्याची संधी मिळाली.
चंपक ह्यांनी ध्याग्यामधे दिलेल्या माहीती नुसार..
>>>ज्या खात्यांच्या कर्मचार्यांना हे काम दिले आहे, तिथुन तक्रारी सुरु झाल्या आहेत.
हे काम शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना देण्यात आले आहे. महापालीकेच्या क्षेत्रीय कार्यलयामर्फत ह्या कामांचीही वाटणी करण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी हे काम तर न टाळता वेळेत कारायचेच आहे पण त्याखेरीज रोज दोन तास त्यांनी त्यांच्या संस्थेमधे सुद्धा काम करण्यास सांगीतले आहे. दोन तासाची अट ही शाळांच्या प्रवेशप्रक्रीया सुरू झाल्यामुळे अतीशय त्रासदायक ठरते आहे.
>>>आमची खाजगी माहिती आम्ही इतरांना का द्याव>>>
गोळा केल्या जाणार्या माहितीचे स्वरूप जाणुन घेणे येथे गरजेचे आहे.
साधारणपणे खालील प्रश्णांचा समावेश आहे
फॉर्म - १
-निवास स्थानाचा पत्ता / घर नं / पेठ वगैरे.
-कुटुंब प्रमुखाचे नाव
-कुटुंबातील त्या ठिकाणी निवास करत असणारी सदस्य संख्या आणि त्याची नावे त्यांच्या
आई वडिलांची नावे-जन्मतारीख-वय
फॉर्म - २
-घराची माहीती / मालकीचे अथवा भाडेतत्वावर / वापरात असलेल्या खोल्यांची संख्या / घराचा प्रकार ( मातीचे, पक्क्या / काच्च्या बांधकामाचे, ई.) / संडास - बाथरूम ची सुविधा / नळकनेक्शन
-सायकल / दुचाकी / चारचाकी वहान आहे का
-संगणक (नेट कनेक्शन नाही/ आहे)
-टेलिफोन / मोबाईल
याच स्वरूपाचे आणखी काही प्रश्णा विचारले जातात. ह्या माहितीचा सरकारला तसेच महापालिकेला चांगला फायदा होऊ शकतो.
>>>माहिती जमा करणारा अधिकारी हा सरकारचे प्रतिनिधित्व करतो आहे.
ह्याबाबत खात्री करून घेणे गरजेचे आहे. सरकारने त्यांना ओळखपत्र दिलेली आहेत. त्याव्यक्तीला घरात घेण्यापुर्वी ते पहाणे गरजेचे आहे ( हे मला नंतर समजले). माझ्या घरी सुद्धा जनगणाने साठी तिन महिल आल्या होत्या. फॉर्म - १ मधली माहिती त्यांनी विचारली मी सुधा सांगितली फॉर्म भरऊन दिल्यावर प्रगणाक एक पोहोचपावती देतो ज्यावर त्या फॉर्म चा नं टाकलेला असतो. पावती करताना माझ्या लक्षात आले की त्यावर आधीपासुनच कोणात्यातरी पुरूषाची सही आहे. त्यावर मी त्या व्यक्तीबद्दल विचारणा केल्यावर समजले की त्यांने ह्या महिलांना कामाचे १५०० रुपये देणार आहे (प्रतिफॉर्म १०/-). फॉर्म - २ दोन् बद्दल् विचारण्या केल्यावर् त्या महिलांनी असे आम्हाला काही भरायला दिले नाही असे सांगितले आणि त्यांच्या पेक्षा मला जास्त माहिती असल्याचे वाटुन् त्यांनी तिथुन् पळ् काढला.
सरकार् त्या प्रगणकाला प्रतिफॉर्म् ७०-८० रुपये देणार् आहे त्यशिवाय् त्याचा नियमित् पगारही मिळणार् आहे. ह्या योजनेसाठी सरकारची चाललेली उधळपट्टी लक्षात् येते. जे काम् २०-२५ रुपयांत् होऊ शकते त्यासाठी सरकार् त्यावर् चौपट् खर्च करत् आहे.
मायबोलीकरांनी मात्र पोहोच पावती घेतल्या शिवाय् आणि तो अधिकृत् व्यक्ती आहे ह्याची खतरजमा करून् घ्यावी.
लालुंच्या पोस्ट
लालुंच्या पोस्ट मधील............यावेळी रेसमध्ये ऑप्शन्स मात्र वाढवले आहेत. पूर्वी सगळे 'एशियन्स' एकत्रच मोजले जायचे. आता भारतीय, चिनी, जपानी इ इ आहेत. फक्त नागरीकच नव्हे तर इथे वास्तव्य असलेल्या सगळ्यांना मोजले जाते.>>>>>
ह्याची भारतातील जातीनिहाय जनगणनेशी तुलना करता येईल का? मला वाटते हो. कारण कुठल्या वंशाचे किती, हे त्यांनाही जाणुन घेणे गरजेचे वाटते आहे. कदाचित हे ही पुढे जाऊन व्होटबॅन्केप्रमाणेच होणार. एखादा/दी मायबोलीकर तिथल्या संसदेत पोहचेल, तो सोनियाचा दिन दुर नव्हे
२०११ च्या जनगणने च्या ३ र्या
२०११ च्या जनगणने च्या ३ र्या फेरी ला सुरवात झाली आहे .जनगनने च्या ३ र्या फेरी ला सुरवात झाली आहे .
मला अस विचारायचय की काही काळा साठी भारताबाहेर वास्तव्य करणारे भारतीय ( जे नोकरी साठी भारता बाहेर आहेत) जे १/२ वर्षानी भारतात परतणार आहेत जे भारताचेच नागरीक आहेत , त्यान्चे जनगणनेतील स्थान काय असेल? त्याची गणना होईल की नाही. का त्याना NRI म्हन्टले जाईल. जनगणनेत घरात सध्या वास्तव्यास असलेले लोक असा मुद्दा आहे.
जाणकारानी प्रकाश टाकावा.
अनुसूचित जातीमधे नवबौद्ध
अनुसूचित जातीमधे नवबौद्ध येतात का???
>>>>>
नवबौध्दांना कोणत्याही सवलती नाहीत.
Pages