जनगणना....!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सन २०११ च्या जनगणनेला (अपवाद वगळता दर १० वर्षांनी होणार्‍या)/ खानेसुमारी ला सुरुवात झाली. काही राज्यांत ती अजुन अधिकृतपणे सुरु व्हायची आहे. नेहमीप्रमाणे ज्या खात्यांच्या कर्मचार्‍यांना हे काम दिले आहे, तिथुन तक्रारी सुरु झाल्या आहेत. पण ते समजण्यासारखे आहे.

एक धक्कादायक बाब समोर येते आहे, ती म्हणजे, आमची खाजगी माहिती आम्ही इतरांना का द्यावी?
मला आठवते तसे, जनगणना सुरु झाली कि आमच्या प्राथमिक शाळेतील गुरुजी घरी येत अन जे कुणी मोठे व्यक्ती घरात असेल त्यांना साधारण माहिती- घरातील व्यक्तींची नावे, वय, शिक्षण, व्यवसाय अशी माहिती विचारत. जवळपास सर्वच लोक ही माहिती देत असत. पण आताशा लोकांना वय, मुले, व्यवसाय याबद्दल जनगणना अधिकार्‍याला महिती देणे अडचणीचे/ खाजगी माहितीत दखल वाटते आहे? हे मला अनाकलनीय आहे.

तुम्ही जर खाजगी व्यक्तीला माहिती दिली, तर ते अनधिकृत असेल, ती व्यक्ती त्या माहितीचा दुरुपयोग करेल, हे समजु शकते.... पण सरकारी यंत्रणेला जर माहितीच पुरवली नाही तर नियोजनाच्या कामात एक मोठा अडथळाच ठरणार आहे.

सरकारी यंत्रणेला जनगणने साठी माहिती पुरवण्यात गैर ते काय? माहिती जमा करणारा अधिकारी हा सरकारचे प्रतिनिधित्व करतो आहे. सरकारला/प्रशासनाला सहकार्य करणे हे सुज्ञ नागरिकाचे कर्तव्यच आहे.

व्हाट इस स्टेट? असा प्रश्न राज्यशास्त्राच्या तासाला एक निवृत्त जेष्ठ सनदी अधिकार्‍याला विचारला असता, सोप्या भाषेत त्यांनी सांगितले कि, घरी पत्र घेऊन येणारा पोस्टमन हा 'स्टेट' आहे. म्हणजे तो सरकार चा प्रतिनिधी आहे.

भलेही आपले नियोजन १०० टक्के चुकलेले असले, तरी किमान चुकायला का होईना नियोजन करणे गरजेचे आहेच कि Happy

आपल्याला काय वाटते?

विषय: 
प्रकार: 

माहिती देणे आवश्यक आहे. तसेच या प्रतिनिधीला मानाने वागवणे आवश्यक आहे. हाडत्-हुडुत वागणूक देऊ नये. प्रतिनिधीने पण सभ्यपणे वागावे. अनावश्यक चौकश्या करू नयेत.

मला वाटते जनगणना कायदा आहे, आणि त्यानुसार हि माहिती देणे बंधनकारक आहे. त्यांच्या विहित फॉर्म मधेच माहिती द्यायची असते. त्यामूळे अनावश्यक असे त्यात काहि नसते.
त्याबाबत सरकारने पुरेशी पूर्वप्रसिद्धी दिली असावी,
बाकी चंपका, तूझी गणना नाही रे व्हायची !!!

आजच ४/५ जण येऊन गेले. आम्ही सगळी माहिती व्यवस्थित दिली. अगदी बिचारे भर उन्हात आले होते. सर्वांना पाणी , सरबत पाजले. सर्वांनी नीट माहिती दिलीच पाहिजे.

नेहमीप्रमाणे ज्या खात्यांच्या कर्मचार्‍यांना हे काम दिले आहे, तिथुन तक्रारी सुरु झाल्या आहेत. पण ते समजण्यासारखे आहे.>>
चंपक,
मला नेहेमी वाटतं की मूळ इथेच गोची नाही आहे का? अश्या कामांच्या प्रत्येक वेळी सरकारी कर्मचार्‍यांना का वेठीस धरलं जातं ?(जनगणना, निवडणूक नोंदणी, निवडणूक). कदाचीत माझे आई वडील आणि इतर बरेच नातेवाईक शिक्षक होते त्यामुळे त्यांना होणारा त्रास जवळून पाहू शकलोय. शहरात एक वेळ ठिक आहे, प्रवासाची साधनं असतात, पण अंतर्गत भागात (खेडेगांवात) प्रत्येक वाडीवर्/वस्तीवर जाणं कठीण होतं ते पण तुम्ही जर स्त्री कर्मचारी असाल तर अजूनच. मग कदाचीत यातूनच पळवाटा काढायचा प्रयत्न होतो आणि "निशाणी डावा अंगठा" सारखे विनोदी चित्रपट्/कादंबर्‍या जन्माला येतात.

आपल्याकडे बेकारी बर्‍याच प्रमाणांवर आहे असं नेहेमी म्हटलं जातं, मग अश्या कामांसाठी तात्पुरत्या नोकरीवर / कंत्राटावर माणसं का ठेवली जात नाहीत?

यासंदर्भात ही बातमी पहा.

वय , मुले हे तर मस्ट आहे नाहीतर जनगणना कशाची करणार , व्यवसाय व इतर गोष्टी पण आवश्यकच आहेत, आपण कुठे चाललोय , कुठल्या क्षेत्रात किती लोक आहेत हे कळलं तरच सरकार विकासाची धोरणं ठरवु शकतं , उदा. जर किती शेतकरी आणि शेतीवर अवलंबुन आहेत हेच माहीती नसेल तर शेतीचं धोरणं ठरवण अवघड्च होईल.
समीर तुमच्याशी १०० % सहमत , जर बेरोजगारांची मदत घेतली तर तेवढाच त्यांचा पण फायदा होईल आणि सरकारी कर्मचारी , शिक्षकांचा वेळ पण योग्य कारणी लागेल , पण निर्णय घेणार्‍यांना हे कळलं पाहीजे ना .

@समीर, श्री,
सरकारचा लोकांवर अन लोकांचा सरकारवर फारसा विश्वास राहिला नसल्याचे परिणाम म्हणुन ही या घटनेकडे पाहता येईल.

जर खाजगी संस्था वा लोकांची सेवा जनगणने च्या कामासाठी वापरायचे ठरले, तर सरकार या खाजगी लोकांवर विश्वास कसा ठेवणार, अन लोकही अश्या लोकांना/संस्थांना पुरेशी माहिती देणार नाहीत असे वाटते. अर्थात, शेषण कार्ड (अर्थात निवडणुकीचे ओळखपत्र) देण्याकामी सरकारने जशी खाजगी फोटोग्राफर ची योजना केली होती, तसा प्रकार करणे नक्कीच शक्य आहे.

खाजगी माहिती च्या बाबतीत शहरी लोक ग्रामीण भागातील लोकांपेक्षा जास्त काळजी करतात, कारण अश्या माहितीचा गैरवापर होण्याचे मार्ग अन धोके त्यांना जास्त माहिती असतात. (अज्ञानात सुख असते! :))

सरकार 'आपले' वाटत नाही... हीच भावणा प्रबळ आहे, हे दुर्दैव!

दोन असंबद्ध उदा.

१) गेल्या आठवड्यात ब्रिटीश पंत्प्रधानानी त्यांच्या पक्षाच्या एका जुन्या चाहत्याचा केलेला लाईव्ह पाणउतारा हा सत्तेत्तील लोकांची मस्ती किती वाढलीय हे च दर्शवतो ना?

२) २००४ च्या निवडणुकीवेळी तात्पुरते मा.मु. श्री. सु. शिंदे साहेबांना पत्रकार म्हणाले कि..सरकारची प्रतिमा खराब आहे, म्हणुन तुम्हाला इथे निवडणुकीपुरते आणले आहे का? त्यावर शिंदे म्हणतात," सरकारची प्रतिमा तर बरेच दिवसापासुन खराब आहे!'

मला वाटते संपूर्ण माहिती देने आवश्यक आहे आणि त्यांना व्यवस्थित वागवले पाहिजे.सरकार ने सुद्धा या कामाचा योग्य मोबदला त्यांना दिला पाहिजे.

समीरशी सहमत. इथे जसे पोस्टाने फॉर्म आले तसे पाठवता नाही येऊ शकत? खेडेगावात वगैरे कटकटीचं होईल ते काम पण एखाद्या शाळेत वगैरे हे फॉर्म्स ठेवून, दोन चार दिवसांची विंडो देऊन त्या वेळेत त्या जागी येऊन लोकांना भरायला सांगता येऊ शकतं.

आपल्याला माहित आसेलहि कि १६ जुलाई हि जनगनणेचि शेवटचि तारीख आहे! तेव्हा आपल्याकडे आलेल्या व्यक्तिला व्यवस्तित माहिति द्यायला पाहिजे ! माहितीचा गैरवापर होण्याचे मार्ग अन धोके ...>>>आहो पन त्यांच्याकडिल कॉलम मध्ये !.........आपन दोन नंबरचा धंदा करता का ? आसा कुठलाहि प्रश्न नाहिये ! तेव्हा मित्रांनो या देशात चांगल्या कामाला आपल्या पासुन सुरवात करुया ! दोनच महिने राहिलेत.........आनि हो ...त्या फॉर्मचि किंमत २० रुपये आहे आनि ज्याच्याकडुन खराब झाल्यास त्याला ५० रुपये प्यानलटि आहे कार्ट उध्योगि आहे ध्या सांभाळुन .....................................एक शेति उपयोगि मानुस न मिळाल्या मुळे शेति करित नसलेला शेतकरि

जातनिहाय जनगणनेबद्दल काय मत आहे लोकहो?
ही आकडेवारी मिळून काय उद्दीष्ट साध्य होणारे?
जातिनिहाय आजचे व्यवसायांचे प्रमाण, जातिनिहाय गुन्हेगारीचे प्रमाण, जातिनिहाय साक्षरतेचे प्रमाण, जातिनिहाय स्त्री-पुरूष प्रमाण, जातिनिहाय फलाणा, ढमकाणा....
असली निरूपयोगी माहिती बरीच जमा होईल. पण त्याचा खरा उपयोग जातींनी/ त्यांच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठीच होईल असं नाही वाटत सध्याची परिस्थिती बघता?

मी स्वतःला ९६ कुळी म्हणून ओळखू शकत नाही आणि माझा नवरा स्वतःला कोब्रा म्हणवू शकत नाही. (तरी संसार सुखाने चाललाय. हा मुद्दा आमच्यासाठी यत्किंचित आहे. तेव्हा या मुद्द्यावरून रण पेटवू नये.). मी माझं आडनावही बदललेलं नाही. जातिनिहाय विचारायचेच झाले तर मला स्वतःची ओळख मी कोब्राच अशी वाटत असते तरी जातिनिहाय जनगणनेमधे माझी जात कायद्याने काय? (कोब्रा आणि ९६ कुळी ही केवळ मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दिलेली उदाहरणे आहेत. तिथे इतर कुठल्याही जातीची नावे घातली तरी हरकत नाही.) हा माझा एकटीचा नाही तर माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींचा प्रश्न असू शकतो.

खरंतर कुठलंच लेबल नको असताना एक लेबल लावायला लागणं हेच अमानुष आणि त्यात ज्या गोष्टीशी आपण असोसिएट करू शकत नाही ते लेबल लावायला लागणं तर अजूनच अमानुष.

उद्या आमच्यासारख्या लग्नातून झालेल्या मुलांच्या जाती काय? दोघांपैकी एकही (किंवा एकच) आडनाव आम्ही आमच्या मुलाला देणार नाही तर जातीचा संबंधच नाही. अश्यावेळेला आम्ही आमच्या मुलाला जातीचं लेबल लावलंच पाहिजे ही सक्ती का?

तसेच असे अनेक लोक आहेत की ज्यांचे आईवडील एकाच जातीत जन्माला आलेले असल्याने त्यांच्याबाबतीत जातीचा संभ्रम नसेल पण त्या व्यक्तींना स्वतःला जातीच्या लेबलखाली मोजणे पटतच नसेल तर? तरी सक्ती?

जातिनिहाय जनगणना ही मला तरी या अश्या अनेक मुद्द्यांवर चुकीची वाटतेय.

निधर्मी आणि कोणतीही जात नाही अशी नोंद करण्याची सोय असावी बहुधा.
आमच्या कडे जनगणना वाले आले होते, आणि त्यांना त्यांच्याकडे असलेल्या यादीत आमची जात(!) आहे का हे बघून त्याचा कोड लिहायचा होता. ती नसल्यामुळे मला काही प्रश्न आला नाही.धर्म,मातृभाषा हे विचारले नाही. त्यामुळे तोही प्रश्न आला नाही.
बरेच प्रश्न व्यक्तीच्या आयडेंटीसाठी आणि आर्थिक स्तर पाहणारे.जसे पूर्ण नाव, आईवडलांची पूर्ण नावे, जन्मतारीख, जन्मस्थान, शिक्षण, व्यवसाय, घरातल्या वस्तू जसे वाहने, खोल्यांची संख्या, फोन, इंटरनेट, भ्रमणध्वनी.पण उत्पन्नाचा उल्लेख नाही.

जातीची मागणी शाळेच्या दाखल्यामधे करतात ते पण मला अमानुष वाटते. मी तर सगळीकडे सक्तीचे होते म्हणुन ओपन अशीच जात लावलीये.जातीची मागणी ज्या लोकांनी चालवली आहे ते फुटीरतावादी लोक असतात, त्यांना अशा निमित्ताने आपली राजकिय पोळी भाजुन घ्यायला मिळते.मुळात आजच्या knolwdge driven जगात जातीला/धर्माला किती महत्व द्यायचे किंवा द्यायचे नाही हे आपणच ठरवायची वेळ आलेली आहे.जर जात पात मानत नसाल तर निधर्मी/निर्जातीय हा पर्याय निवडावावा.

बरोबर. पण मग जातिनिहाय जनगणनेचा आग्रह का चालवला जातोय सरकारकडे/ सरकारकडून?
आपल्यासारख्या अनेकांनी ओपन किंवा निर्जात असा ऑप्शन निवडला तर जातिनिहाय जनगणना करून त्यांना तथाकथित डेटा तरी काय मिळणार...

इथे मंडल आयोग..त्यानंतर बदलेली राजकिय समीकरणे ह्याचा अभ्यास असलेले लोक जास्त चांगले भाष्य करु शकतील्.
माझ्या थोडक्या माहितीनुसार काही लोकांना ज्यात लालु,पास्वान,मुलायमही येतात (जे जातीची मागणी करत आहेत)ह्या लोकांना मंडल आयोगा आल्यावर फार मोठा राजकिय बेस / यश मिळाले होते. आज हे कुणीच सत्तेवर नाहीत ,ह्या निमित्ताने काही फायदा झालच तर करुन घ्या असा विचार आहे त्यांचा.

जातीनिहाय जनगणनेचा सध्या चाललेला घोळ पाहता, त्यातुन फक्त 'आमचे' किती अन 'तुमचे' किती ही शिरगणती होणार असे भासतेय. अन ज्या सर्वपक्षीय राजकीय पुढार्‍यांनी ह्यात पुढारपण केलेय त्यांचे हेतु काही शुद्ध नाहीत.

चांगली बाजु- उदा. देशाची धोरणे ठरवताना, जर जातीनुसार जनगणना केली तर मला सर्वात महत्वाचा वाटणारा मुद्दा: देशात किती जाती/प्रजाती आहेत त्यावरुन किती डायव्हर्सिटी आहे हे कळेल. आरोग्य विषयक अभ्यासाला हे पुरक ठरु शकते.

आरोग्य विषयक अभ्यासाला हे पुरक ठरु शकते.<<
यात जनुकीय आजारांच्या संदर्भात हा डेटा वापरायचा असेल तर प्रत्येक जातीत जिथे जिथे संकर झालेला आहे त्याचा वेगळा डेटा घ्यावा लागेल. आणि ते शक्य होणार नाही. त्यामुळे जनुकीय अनुमानांच्या दृष्टीने ही माहिती अपुरीच असेल.

मी नुकतचं या विषयावर २ मे च्या लोकमत पुणे आवृत्ती मधे एक लेख वाचला ,त्या लेखाच्या लेखकाने पुण्यातल्या वेश्यावस्तीत केलेली जनगणना, अन त्याचे अनुभव खूप सुंदररित्या मांडले आहे. ऑनलाईन लिंक मिळवण्याचा बराच प्रयत्न केला पण मला मिळाली नाही. तेव्हा कोणाला मिळाल्यास जरूर इथे पोस्ट करा. मि तो पेपरचा भाग स्कॅन करून इथे पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो.

आमच्याकडे जनगणना करणारे दोन वेळा येऊन गेले. एकदा फक्त घराला नंबर द्यायला आणि दुसर्‍यावेळी थोडीफार माहिती घ्यायला. त्या माहितीत केवळ कुटुंबप्रमुखाचे नाव, जात- ओपन, घरात महिला/पुरुष किती?, घराला खोल्या किती? गाडी आहे का? एवढेच विचारले. वय, शिक्षण इ. किंवा वरती जे काही बाकीचे मुद्दे आलेत ते काहीच नाही.
आता हे परत तिसरी फेरी मारणार कि एवढीच माहिती घेणार कोणास ठाऊक?

आपणतर बोवा "जातिनिहाय" जनगणनेचे स्वागत करतो! Happy
शिन्चे दर वेळेस बोम्बलतात साडेतीन साडेतिन टक्के, अहो खरच शिल्लक राहिलेत का साडेतिन तरी? Biggrin बघायला नको?

जातीनिहाय जनगणनेचे स्वागत असो!
तात्वीकदृष्ट्या कितीही चुकीचे वाटले तरी आपल्या देशात जात ही अत्यंत महत्वाची ओळख आहे.अनेक सरकारी योजना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षण आणि त्यातला क्रिमीलेअर ठरवण्यासाठी अशी गणना अपरिहार्य आहे.आतापर्यंत झालेल्या विकासाचा फायदा कुणी आणि कसा घेतला हे देखील यातून स्पष्ट होईल.कुणाला कोणत्या गटात टाकायचे हे ठरवणेही सोपे जाईल.उदा.मातंग समाजाने हिंदू धर्म लाउ नये म्हणून कालपर्यंत ठणाणा करणार्‍या रिपब्लिकन नेत्यांनी ही गणना जाहिर होताच नवबौद्धांची भरती अनूसुचित जातीत केली पाहिजे असा ओरडा सुरु केला आहे
राजकारणी यात आपली मतगणिते सोडवून घेणार पण त्याला काही इलाज नाही.

आमच्याकडे तर झेरॉक्स फॉर्म देऊन गेलेत. भरून ठेवा म्हणाले. चुका करू नका पण चुकले तर बिघडत नाही असेही म्हणाले.झेरॉक्सच आहे. फॉर्म मुलांकडून भरून घेतले. सोपे आहेत. आयुष्यात एवढे फॉर्म भरावे लागतात तेवढीच प्राक्टीस. आन्तर्जातीय विवाहात मुलाची जात काय असते खरेच? बहुधा शाळेत पालक जी नोन्दवतात ती धरत असणार....

आन्तर्जातीय विवाहात मुलाची जात काय असते खरेच? बहुधा शाळेत पालक जी नोन्दवतात ती धरत असणार.<<
कायद्याने माहीत नाही.
लग्नानंतर बाईचीही जात बदलते की नाही, बदलणं अपेक्षित आहे की नाही कायद्याने ते माहीत नाही.
कायद्याने बाई आपलं नाव आणि धर्म दोन्ही लग्नानंतरही तसेच ठेवू शकते हे माहीतीये पण जातीचा मुद्दा तसा त्रिशंकू आहे.
मूळ मागासवर्गीय नसल्यास लग्नामुळे जात बदलल्यास सवलती मिळणार नाहीत अशी तरतूद आहे.
पण प्रथेप्रमाणे बापाचं नाव आडनाव मुलाला दिलं जातं, आईच्या नावाचा मागमूसही नसतो तेव्हा जात बापाचीच लावली जात असावी ग्राह्य धरली जात असावी. असे न केल्यास काय हे माहीत नाहीये. ती चौकशी केलेली नाही.
पण प्रथेप्रमाणे मिश्र विवाहातून होणारी संतती ही कमी प्रतिची मानली जायची.(याला बहुतेक टोळ्या, मनुष्यबळाची गरज आणि त्यासंदर्भातली असुरक्षितता कारणीभूत असावी) अर्थात जेनेटिक्सप्रमाणे मिश्र विवाहातून निर्माण होणारी संतती ही दोन्हीकडचे चांगले गुण + काही अजून ताकद घेऊन येण्याची शक्यता जास्त असते असं आहे.

या बीबीचा विषय नाही पण निघालाच आहे तर....
>>>>>अर्थात जेनेटिक्सप्रमाणे मिश्र विवाहातून निर्माण होणारी संतती ही दोन्हीकडचे चांगले गुण + काही अजून ताकद घेऊन येण्याची शक्यता जास्त असते असं आहे. <<<<<
१) याच्या नेमके उलटे देखिल होऊ शकते म्हणजे खराब गुण वगैरे, तसेच अनुवन्शिक कौशल्ये गमावलेली असणे वगैरे, यात शारिरिक व्यन्गाचा विचार स्वतन्त्र करावा लागेल, पण त्याची कसलीच आकडेवारी सध्या तरी उपलब्ध नाही
२) मी पाहिलेल्या यच्चयावत "(आत्तापर्यन्तच्या) सवर्णातील" मिश्र विवाहात (यात मी देब्रा-कोब्रा, ९६-९२ कुळी असले जातीअन्तर्गतचे विवाह धरत नाहीये - केवळ भिन्न सवर्ण जाती धरतोय), पुढील संतती अत्यन्त हुषारच निपजलेली बघितली आहे. Happy
(आत्तापर्यत्नच्या असे म्हणायचे कारण की इथुन पुढे सवर्णातील काही जातीन्ची रिझर्वेशनची मागणी मान्य झाल्यास शब्दप्रयोग बदलता यावा Wink )

म्हणजे जात रिझर्वेशनमध्ये गेली की हुशारीवर परिणाम होतो का? खासे लॉजिक!

सवर्णातील" मिश्र विवाहात

सवर्णातील मिश्रविवाह म्हणजे काय? सवर्ण कोणाला म्हणायचे? मुसलमानही सवर्ण असतात. मुसलमान आणि ब्राम्हण या सवर्णातील विवाहाबाबतही तुमचा हा 'सिद्धान्त' लागू पडतो काय?

कौशल्ये अनुवांशिक असतात काय?

अहंकारापोटी काहीही ठोकून द्यायची सवय अजूनही जात नाही.....

जेनेटिक्सप्रमाणे मिश्र विवाहातून निर्माण होणारी संतती ही दोन्हीकडचे चांगले गुण + काही अजून ताकद घेऊन येण्याची शक्यता जास्त असते असं आहे.>>>
एकदम बरोबर याउलट ज्या समाजांमधे क्लो़ज मॅरेजेसची (जवळच्या नातेवाईकात) प्रथा आहे (उदा. काही जैन आणि मुस्लिम उपपंथ);त्या समाजात मेंटल रिटार्डेशनचे प्रमाण अधीक आहे.सगोत्र विवाहाला असलेली धर्मबंदी काही अंशी,निदान त्या काळात जेंव्हा हा नियम बनवला गेला,बरोबर होती.
लिंब्याभाव, सवर्णातील मिश्र विवाह हा काय प्रकार आहे?
टोणगा,सवर्ण म्हणजे एखाद्या समाजात ज्यांच्या हातात राजकिय,आर्थिक वा आता ज्ञान या शक्ती आहेत किंवा होत्या आणि त्या जोरावर जे आपली सांस्कृतिक ओळख,वैशिष्ठ्ये इतरांपेक्षा उच्च असल्याचा अहंगंड बाळगतात ते.

कौशल्ये अनुवांशिक असतात काय? <<
काही प्रमाणात हो.
पिढ्यानपिढ्या एखादी ठराविक वस्तू बनवण्याचे, एखाद्या ठराविक गोष्टीवर काम करण्याचे कौशल्य तुमच्यात उतरू शकते.
जेनेटिकच्या भाषेत हे मला सांगता येणार नाही आत्ता कुणी तज्ञ असल्यास सांगावे. पण हे वाचलंय मी.

(आत्तापर्यत्नच्या असे म्हणायचे कारण की इथुन पुढे सवर्णातील काही जातीन्ची रिझर्वेशनची मागणी मान्य झाल्यास शब्दप्रयोग बदलता यावा )>> आचरटपणाचा कळस आहे हे वाक्य .

समजा एक कोब्रा मुलगा+ मराठा मुलगी ह्या विवाहातुन अपत्य झाले आहे आणि ते १० वर्ष वयाचे आहे तर ते हुषार पण, २ वर्षानी मराठा लोकाना reservation मिळाले की त्याची हुषारी संपली ..तुम्ही तुमच्या भयाण विधांनावरुन हे सिध्द करताय की माणुस ब्राह्मण असला म्हणजे त्याला अक्कल असलीच पहिजे असे नाही.म्हणजेच अक्कल अनुवांशिकरित्या पुढच्या पिढीला जातेच असे नाही.

सवर्ण म्हणजे काय हा प्रश्न मलाही पडला होता.आगाऊ तुम्ही उत्तर दिले ते बरे झाले, पण ते प्रमाणित करून मिळेल तर बरे.
नीधप , अगदी सुरुवातीला भारतात जाती जन्मावरून नाही तर व्यवसायावरून ठरायच्या आणि कुणाला कोणताही व्यवसाय करायची मुभा होती ,नंतर हे बदलले,असे मी वाचले आहे.
आज आपण वापरतो त्यातल्या काही स्किल्स तर ५० वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसतील, त्या कुठून येतील. स्किल्स पुढल्या पिढीला पोचत असतील तर त्या जेनेटिक्स मुळे नाही, तर वातावरणामुळे असे मला वाटते. (नकारार्थी उदाहरण : गेली ३-४ वर्षे महाराष्त्रात गाजणारे एक राजकीय घराणे)

मातंग समाजाने हिंदू धर्म लाउ नये म्हणून कालपर्यंत ठणाणा करणार्‍या रिपब्लिकन नेत्यांनी ही गणना जाहिर होताच नवबौद्धांची भरती अनूसुचित जातीत केली पाहिजे असा ओरडा सुरु केला आहे
>> एक तांत्रिक प्रश्न , अनुसुचित जातीमधे फक्त हिन्दुच allowed असतात का?

Pages