कोकणसयला छोटासा झब्बू!
सध्या सतत कोकणात भटकतेय. गठ्ठ्याने फोटु मारतेय. अर्थात बरेचसे लोकेशन रिसर्च चे असल्याने इथे टाकता येत नाहीत पण त्यात नसलेले काही असंच सहज म्हणून टाकतेय.
फोटोंच्या क्रमाला महत्व नाही.
भातशेती.

नदीकाठी विचारमग्न उभा असलेला माझा दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.
नाणेली,

इथून सूर्यास्त पण अप्रतिम दिसतो पण पोचायला उशीर झाला. आणि जे मिळालं ते असं. नदी, धरण, डोंगर, झाडी हळूहळू सगळे आकार वितळून एकमेकात शिरत असताना पाह्यले.

सुंदर खाडी, होडी, झाडी, डोंगर आणि थोडासा निवांत वेळ आणि नुकता नुकता घेतलेला कॅनन पॉवरशॉट SX 120 IS.

तिलारीच्या कालव्यांमधूनचे रस्ते. नागमोडी राखाडी वाट बाजूला जर्द लाल माती, मधेच कुठे हिरवाई, वर विस्तीर्ण निळं आकाश. कॅमेरा बाहेर आला नाही तरच नवल.

उगवला नारायण
लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा ||

उगवले नारायण
सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया ||
-----
हे खालचे दोन नवीन फोटो

आरोंद्याच्या किरणपाणी खाडीवरचा आरोंदा-पेडणे ब्रिज. अजून काम चालू आहे

कोकणातलीच जागा.. मॅजिकल मान्सून....
वरचा कुठलाही फोटो फोटोशॉपमधे रंग बदलून टाकलेला नाही. जसे रंग दिसले तसेच फोटोत मिळाले आहेत सुदैवाने. कॅमेर्याला धन्स! सर्व फोटो कोकणातलेच आहेत. थोडं अपरिचित असलेल्या कोकणातले पण कोकणच. जागांची नावं टाकली नाहीत कारण त्यांना इथे महत्व नाही. तरी शंका वाटत असेल तर संपर्क साधा. नावे कळवण्यात येतील.
- नी
(No subject)
अप्रतीम फोटो. पहिला, शेवटचा
अप्रतीम फोटो. पहिला, शेवटचा आणि नागमोडी वळणाचा जास्त छान.
धुक्याचा इफेक्ट पण छान आहे. मी जास्त कुठे फिरले नाही पण
एकदा 'शिवथरघळ, रायगडला पावसाळ्यात गेलो असता कोकणातूनच
फिरलो. तेंव्हापासून मी कोकणच्या प्रेमात पडले. मला तुमचा हेवा वाटतो आहे.
नीधप, नागमोडी रस्त्याचा व
नीधप, नागमोडी रस्त्याचा व शेवटचा तर केवळ खास. पण मला तो वॉटरमार्क खटकतोय.
नीधप..........मस्त आहेत फोटो!
नीधप..........मस्त आहेत फोटो! २ नं "सर्व्यात" आवडला.
हो आडो माझ्यापण लक्षात आलंय
हो आडो माझ्यापण लक्षात आलंय ते आता. परत नीट केला पाहिजे.
नीधप, पहिला फोटो मस्तच आहे.
नीधप, पहिला फोटो मस्तच आहे. आणि दुसराही हरवून जायला लावणारा आहे.
नीधप, फोटो सुंदरच आहेत.
नीधप, फोटो सुंदरच आहेत. तुम्हाला कोकणात एवढे फिरायला मिळते याचा हेवा वाटतो.:)
जियो ... दुसरा आणि तिसरा कसले
जियो ...
दुसरा आणि तिसरा कसले भन्नाट आलेत नीरजा...जियो...!!
सगळेच फोटो मस्त! कोकण आहेच
सगळेच फोटो मस्त! कोकण आहेच तसं छान. कुठेही गेलात तरी अगणित लोकेशन्स मिळतील अगदी सहज!
फोटो मस्त आहेत सर्वच, ५वा
फोटो मस्त आहेत सर्वच, ५वा बघुन गावाकडील लाल मातीची आठवण झाली.
फोटोंच्या क्रमाला आणि जागेला महत्व नाही हे वाचुन मजेशीर वाटले.
आभार लोकहो!
मस्तमस्तमस्त......
मस्तमस्तमस्त......
मस्त फोटो!
मस्त फोटो!
Pages