कोकणसयला छोटासा झब्बू!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सध्या सतत कोकणात भटकतेय. गठ्ठ्याने फोटु मारतेय. अर्थात बरेचसे लोकेशन रिसर्च चे असल्याने इथे टाकता येत नाहीत पण त्यात नसलेले काही असंच सहज म्हणून टाकतेय.
फोटोंच्या क्रमाला महत्व नाही.
Shpr-vaayangani.jpg
भातशेती.

vicharamagna-digdarshak.jpg
नदीकाठी विचारमग्न उभा असलेला माझा दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.
नाणेली,

Goa-chorla-ghat-view-(6).jpg
इथून सूर्यास्त पण अप्रतिम दिसतो पण पोचायला उशीर झाला. आणि जे मिळालं ते असं. नदी, धरण, डोंगर, झाडी हळूहळू सगळे आकार वितळून एकमेकात शिरत असताना पाह्यले.

aronda.jpg
सुंदर खाडी, होडी, झाडी, डोंगर आणि थोडासा निवांत वेळ आणि नुकता नुकता घेतलेला कॅनन पॉवरशॉट SX 120 IS.

Tilari-kalawa-(7).jpg
तिलारीच्या कालव्यांमधूनचे रस्ते. नागमोडी राखाडी वाट बाजूला जर्द लाल माती, मधेच कुठे हिरवाई, वर विस्तीर्ण निळं आकाश. कॅमेरा बाहेर आला नाही तरच नवल.

0222-(6).jpg
उगवला नारायण
लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा ||

0222-(18).jpg
उगवले नारायण
सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया ||

-----
हे खालचे दोन नवीन फोटो

Aronda-khadi-(33).jpg
आरोंद्याच्या किरणपाणी खाडीवरचा आरोंदा-पेडणे ब्रिज. अजून काम चालू आहे

100_4195.jpg
कोकणातलीच जागा.. मॅजिकल मान्सून....

वरचा कुठलाही फोटो फोटोशॉपमधे रंग बदलून टाकलेला नाही. जसे रंग दिसले तसेच फोटोत मिळाले आहेत सुदैवाने. कॅमेर्‍याला धन्स! सर्व फोटो कोकणातलेच आहेत. थोडं अपरिचित असलेल्या कोकणातले पण कोकणच. जागांची नावं टाकली नाहीत कारण त्यांना इथे महत्व नाही. तरी शंका वाटत असेल तर संपर्क साधा. नावे कळवण्यात येतील. Happy

- नी

विषय: 

मला शूट संपल्यावर कोकणची अ‍ॅलर्जी येणारे इतकं अति फिरणं होतंय कोकणात असं मी जाहीर केलंय नवर्‍याकडे पण खरंतर तसं काही होणार नाहीये.(सांगू नका कुठे भेटला माझा नवरा तर!) Proud

मलाही डायरेक्टरचा फोटो आवडला! मस्त फ्रेम आहे ती..
पहिलासुद्धा मस्त आहे एकदम!
मजा आहे इतकं फिरायला मिळतंय म्हणजे!

बस्के गं,
फिरताना निसर्गसौंदर्याचा इत्यादी आस्वाद घ्यायला फुरसत असेल तर मजा. आम्ही आपले जातोय तिथे कम्पलसरी ढिगाने फोटो काढा विविध अ‍ॅन्गल्समधून, प्रत्येक ठिकाणाच्या दिशा टिपून ठेवा कंपास घेऊन, मॅपवर नोंद करा, किमी. लिहून ठेवा.. इत्यादी चालू असतं. परत सेन्सिटिव्ह गावांच्यात अनोळखी गाडी दिसली की लोक कधी कधी इतके खुन्नसने बघतात ना की भिती वाटते की आता हे काय करणार आपल्याला.
आपल्याला व्यवस्थित ऐकू येईल अशी घातलेली "मा**ये, मायनिंगवाले असत!" अशी गाळी ह्याची तर आता सवय झालीये...

असो हे अनुभव फिल्मच्या नंतर जी लेखमाला लिहिण्यात येईल (बहुतेक!) त्यात लिहीन.. Happy

खुप आवडलेत फोटोज, पहिला आणि तो नागमोडि रस्त्याचा खुप आवडला!

बाय द वे खाणमालकांचा/कर्मचार्‍यांचा इतका तिरस्कार का करतात तिथले लोक?

फोटो छानच आहेत हो....पण शिर्षक "कोकणसयला छोटासा झब्बू" असे देण्याची काय गरज होती....कुणी जरा बरा लेख टाकला यांच्यापेक्षा की लगेच यांचा पोटशूळ जागा होतो!!

लिहिण्यात येईल (बहुतेक!) त्यात लिहीन..
>>
नीधप तुला असं वाटलंच कसं कि आम्ही तुला असंच सोडू लेख न लिहीता?? Proud तो तु लिहायचाच आहेस. ह्याला काही समज. Wink फोटो सगळेच अगदी छानच.. Happy

नी फोटो अत्युच्च आलेत. १,२ आणि नागमोडी रस्त्याचा फोटो तर सुपर खास.
पण ३ आणि ४ मध्ये बराच वाव आहे सुधारण्यासाठी. पिकासा वापरून पहातेस का जरा? Happy

(आणि शुटींगच्या दरम्यान फोटोग्राफि सुरू ठेव, तेव्हढाच विरंगुळा...) Happy

प्रथम, शीर्षकाला मनापासून दाद !
कोंकणातले फोटो बघताना तांत्रिक बाबी माझ्या लक्षातच येत नाहीत. तुम्ही तिथल्या गाभ्यालाच हात घातला आहे. सुंदर.

नीधप,
मस्त आहेत फोटो.
या तिलारी घाटात आणि परिसरात भरपूर भट़कलोय. सगळा परिसर मस्त आहे. पुढच्या महिन्यात तिथे रातांब्याची झाडे फळावतील.

पण ३ आणि ४ मध्ये बराच वाव आहे सुधारण्यासाठी. पिकासा वापरून पहातेस का जरा?<<
जरा तपशीलात सांग ना राणी काय प्रॉब्लेम वाटतोय ते.
पिकासा पेक्षा फोटोशॉप बरे ना?
प्रॉब्लेम सांग मग मी प्रयत्न करून पाहीन सुधारायचा.

Pages