डीसी गटग : धृतराष्ट्राच्या पट्टीमागून

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मला डीसी गटग ला जाता आले नाही. पण संजयाच्या दिव्यदृष्टीमुळे मला बसल्या जागेहून हे गटग बघता आले. तर या "महाग गटगचा" हा चक्षुर्वैसत्यम (संजयाचे चक्षू) वृत्तांत. गटगला प्रत्यक्ष न जाताही अहवाल लिहण्याचा उत्साह, अपराध आणि पायंडा मी पहिल्यादाच पाडला असावा. द्विरुक्तिचा मोह टाळून इतर वृत्तांतात आलं नाही, ते सांगायचा प्रयत्न करतो.

इती धृतराष्ट्र.

संजय उवाचः
गटगला सुरवात झालेली आहे. मंडळी जमली आहेत. फुटकळ खाणे, पेय पान सुरु आहे. गप्पा रंगायला लागल्या आहेत.

cartoon_1.jpg

पांढरा रस्सा, कसा काय कुणास ठाऊक पण वेबमास्तरांना सगळ्यात आधी मिळाला. त्यामुळे साहजिकच काही जणांच्या पोटात आधीच दुखायला लागले. काही जणांच्या पोटात तो रस्सा गेल्यावर, थोड्या वेळाने दुखले ते वेगळे.

तांबडा रस्सा केलेला नाहीये. कारण पांढरा रस्सा वाढून घेऊन त्याला "ओबामा ओबामा" असे म्हटले की तो रागाने तांबडा होतोय. त्यामुळे ज्याला जो हवा तो रस्सा उपलब्ध आहे. अशा रितीने "एकाच रश्शात दोन तुकडे" म्हणजे काय याचा एक वेगळाच अनुभव इथे आपल्याला येतोय.

डिसी गटगची मराठी सारस्वताला नवीन देणगी. मराठी भाषेत एका नवीन म्हणीची सुरुवात.

cartoon_2.jpg

मायबोलीकरांचे जेवण संपून आता विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरु होतोय. मायबोलीवरची पुढची पिढीही आता तयार होते आहे. काही जण नुकतेच कुठे प्रयत्न करत आहेत. पण या वयातही अस्सल मायबोलीकर असण्याची चुणुक दिसते आहे.

cartoon_3.jpg

तर काही जण फार पुढे गेले आहेत. रोमात राहूनही या बालकांनी मायबोलीवरचे डावपेच पक्के ओळखले आहेत आणि ते डावपेच प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे.

cartoon_4.jpg

आणि त्यातले काही तर फार फार पोचले आहेत इतके की मोठ्यांनाही अचंबा वाटावा..

cartoon_5.jpgcartoon_6.jpg

मायबोलीचं आणि मायबोलीकरांचं भवितव्य उज्ज्वल आहे या शंका नाही.

नंतर पहिल्या दिवशी बाकी काय झालं हे इतर वृत्तांतात आलंच आहे. दुसर्‍या दिवशी काही मायबोलीकर अ‍ॅडमीनबरोबर डीसी शहरात गेले. तिथल्या राजकारणात त्यांनी सक्रीय भाग घेतल्याचे तुम्ही सगळ्यांनी टेलीव्हीजनवरच्या बातम्यात पाहिलेच असेल.

cartoon_7.jpg

इती संजय.

धृतराष्ट्र उवाचः
अशा रितीने " काय सांगू राजे, मन ओळखले तुम्ही माझे" असे म्हणत डीसीला आलेले मायबोलीकर,
"अनंत हस्ते अंदूरकराने, देता किती घेशील दो कराने" म्हणत सुखाने आपआपल्या शहराकडे प्रस्थान करते झाले.

इती.

विषय: 
प्रकार: 

प्रतिसादाबद्दल सगळ्याना धन्यवाद !
आपली चित्रे पाहून एकाला तरी हसू येईल का अशी भिती होती ती थोडीशी कमी झाली.

अहो किल्लेदार! आपले मायबोलीकर शिरियस विषयांनासुद्धा हसतात मग अफलातून कार्टून्सना हसणार नाहीत का? Happy आम्हाला अजून तुमची आमचे जीवन म्हणजे जीव'न' सीरीज आठवतेय...
(कुठे लिन्क असल्यास द्यावी)
(म्हणूनच हसू न येईल म्हणण्याऐवजी हसून म्हणालात का? Wink

>>अशा रितीने " काय सांगू राजे, मन ओळखले तुम्ही माझे" असे म्हणत डीसीला आलेले मायबोलीकर,
"अनंत हस्ते अंदूरकराने, देता किती घेशील दो कराने" म्हणत सुखाने आपआपल्या शहराकडे प्रस्थान करते झाले.

अग्गाईगं!

अनुल्लेखाने मारायचं
अन
विपूत जाऊन सुसु

मेलो!
ज्यांनी मिसलं त्या सगळ्या माबो मेंब्रांसाठी वर काढीत आहे.

Pages