सर्व्हे रिपोर्टः विभाग- नोकरी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 April, 2010 - 13:15

नोकरी

या भागात १० प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. त्यातला कुठलाही प्रश्न अनिवार्य नव्हता. सध्याचा पदभार, नोकरी/ करियरविषयक मतं, Work- Life Balance, पदोन्नती, नोकरी सोडण्याची कारणे, Glass Ceiling (कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा अनुभव), नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्रियांबाबत मैत्रिणींचे विचार याभोवती या सदरातील प्रश्नांचा रोख ठेवला होता.

हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
कृपया या भागातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्या.

  • सध्याच्या पदभाराचे नाव, विभागाचे नाव

    या प्रश्नाला आणि एकंदरीत नोकरी या सदरातील सर्वच प्रश्नांना बर्‍याच स्त्रियांनी उत्तर देणे पसंत केले नाही. None of your business अशीही एक प्रतिक्रिया आली. सर्व खाजगी प्रश्नांना मो़कळेपणाने उत्तरं देताना मात्र या सदरातीलच काही प्रश्नांना मैत्रिणींनी लक्षणीय संख्येने प्रतिसाद दिला नाही हे कशाचे द्योतक असू शकेल या प्रश्नापाशी विश्लेषक म्हणून आम्ही नक्कीच थबकलो. इंग्रजी प्रश्नावलीत अनुवादात राहिलेली एक त्रुटी याचे एक कारण असू शकेल. इंग्रजी प्रश्नावलीत चुकुन Company Name असा उल्लेख राहिला होता. मराठी प्रश्नावलीत योग्य प्रकारे प्रश्न विचारला जाऊनही मैत्रिणींनी या प्रश्नाला आणि या सदरातील इतर प्रश्नांना उत्तर देणे पसंत केले नाही.

    • पूर्णवेळ नोकरीत कार्यरत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र : सर्वाधिक संख्येने स्त्रिया संगणकक्षेत्रात कार्यरत आहेत (२९), त्याखालोखाल मानव संसाधन विकासक्षेत्रात (५) , अभियांत्रिकी (३), संशोधन (५), वित्त (४), कंपनी सेक्रेटरी, ग्रंथपाल, प्रशासन (४), Real Estate, शिक्षणक्षेत्रात (४)
    • अर्धवेळ नोकरीत कार्यरत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र: शिक्षण, संशोधन, शैक्षणिक प्रशासन, संगणक.
    • पूर्णवेळ व्यवसाय/पूर्णवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र : चित्रपट, वैद्यकीय, संपादन, इतर (Director)
    • अर्धवेळ व्यवसाय/अर्धवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र: सल्लागार, घरातील व्यवसाय, समुपदेशक, सहसंस्थापक
    • विद्यार्थीदशेत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्रः संशोधन, इतर
  • सध्याच्या पदभाराचे स्वरूप
    ४० मैत्रिणींने या प्रश्नाला उत्तर दिले नाही. पैकी ८ जणींने गैरलागु असे नमुद केले आहे.

    वरिष्ठ
    १४ स्त्रियांच्या मते त्या वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहेत. यामध्ये सर्वात कमी वर्षांचा कार्यानुभव ४ वर्षे आणि सर्वाधिक ३० वर्ष (स्वतःचा पूर्णवेळ व्यवसाय चालवणार्‍या असल्यामुळे वरिष्ठ पदभार हा पर्याय निवडला गेला असावा.) पूर्णवेळ व्यवसाय/पूर्णवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या ४ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार वरिष्ठ या सदरात येतो. तर पूर्णवेळ नोकरीत असलेलेल्या १० जणींच्यामते त्यांचा पदभार वरिष्ठ प्रकारात मोडतो. कार्यक्षेत्र संगणकीय, वैद्यकिय, चित्रपट, संपादन , HR, शिक्षण इतर.
    काही पदभारांचे नावे: दृष्य संकल्पक/निर्माती, Director, Technical Lead/Consultant, Training Manager, मुख्य संपादक, S/w Engg, Doctor, Analyst- Institutional Research, Supervisor-Telephone Exchange, AM-Bkg etc
    हाताखाली काम करत असलेल्या व्यक्तिंची संख्या (काही उदाहरणॅ)-
    - ४-४० (कामाच्या स्वरुपानुसार)
    - Direct ४, Total २२
    - 0 (तांत्रिक काम असल्यामुळे)

    मध्यम व्यवस्थापकीय
    ४९ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार मध्यमव्यवस्थापकीय आहे. पैकी ४२ पूर्णवेळ नोकरीत आहेत. यामध्ये सर्वात कमी कार्यानुभव ५ महिने (एम.बी.ए नंतरच्या नोकरीचा कालावधी धरला असल्याची शक्यता आहे), सर्वाधिक ३६ वर्षे आहे.
    काही पदभारांचे नावे: Project Manager, Project Lead, Technical Lead (S/w), Librarian, Company Secretary, HR Executive/AVP, Project Office Planning, Accountant, SAP FICO Consultant, Executive Real Estate, Analyst, Reader, Architechtural Designer,Auditor etc.
    हाताखाली काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या (काही उदाहरणे)
    - Not directly, manage a project team of 50
    - Indirectly manage a project team of 30
    - 15-20
    - 0 (तांत्रिक काम)

    कनिष्ठ
    १९ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार कनिष्ठ स्तरात मोडतो. पैकी सर्वात जास्त कार्यानुभव १० वर्षे.
    काही पदभारांचे नावे: Software Engg, Design Engg, Translator, Programmer, Developer, R &D Engineer, Assistant to MD, GR Assistant, Section Officer, SW Test Engg etc

  • मूल झाल्यावर नोकरी करावी की नाही याबद्दल कधी संभ्रम निर्माण झाला होता का?

    (टीपः प्रश्नाचा रोख नोकरी करावी की नाही यावर नसुन संभ्रमात पडण्यावर होता)
    २८ मैत्रिणींने काही प्रमाणात संभ्रमात पडल्याचे नोंदवले आहे. संभ्रमात पडल्याची कारणे :
    - कामाचे तास
    - आर्थिक परिस्थिती
    - परदेशात असल्याने कौंटुंबिक आधारगटाचा अभाव/सोयींचा अभाव
    - मुलं लहान असताना काही काळ नोकरी न करणे/ पूर्ण वेळ काम न करणे.

    हो (संभ्रमात पडले), मला नोकरी आवडते, पण कामाचे तास कमी केले पाहीजेत असं प्रकर्षाने वाटतं. फार घायकुतीला आल्यासारखं होतं.

    पडले, परदेशात असल्याने जास्तच संभ्रम होता.

    काही काळ ब्रेक घेतला होता. करियरच्या दृष्टीने सेटबॅक पण बसला.

    हो. मुल झाल्यावर आईने थोडा काळ नोकरी न करता मुलाकडे राहावे असे मला आधीपासुनच वाटायचे. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.

    ५१ मैत्रिणींने संभ्रमात न पडल्याचे नोंदवले आहे. संभ्रम नसण्याची कारणे :
    - आधीपासुनच स्पष्ट विचार/सुरवातीपासूनच नोकरी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नसल्याचे ठरवले होते
    - मुलं लहान असताना काही काळ घरून काम करायचे योजिले आहे/होते व त्याप्रमाणे केले
    - मुलांची लहानपणीची वर्ष संपल्यावरच कामाला सुरवात केली
    - आर्थिक गरज
    - एकत्र कुटुंब असल्यामुळे आधारगट होता
    - नोकरी करणा-या आईचे उदाहरण समोर असल्यामुळे विचार स्पष्ट होते
    - मुलांना पा़ळणाघरात ठेवायचे नसल्यामुळे विचार स्पष्ट होते .

    कधीच नाही. नोकरीची अत्यंत गरज होती

    नाही. पर्याय उपलब्ध नव्हता. पैशांची गरज होती.

    नाही. मुलांना प्राधान्य द्यायचे हे ठरवले होते.

    मी माझे कामच मुळी मुले शाळेत जायला लागल्यावर सुरू केले.

    नाही. माझी आई नोकरी करणारी असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सांभाळूनही मुलं चांगल्याप्रकारे मोठी होतात याबाबत मनात संभ्रम नव्हता.

  • तुम्ही नोकरी/व्यवसाय कशासाठी करता ?

    मराठीतील पर्याय आवड, गरज, अंगभूत क्षमतांना न्याय देण्यासाठी असे होते. या प्रश्नाला एकुण ९२ उत्तरं आली.
    Reason for Working.JPGआता नोकरी करत नसल्यास आणि पूर्वी करत असल्यास ( मध्ये काही काळ नोकरी सोडली असल्यास) नोकरी सोडण्याची कारणे :
    - शारीरिक (गर्भवती असणे, स्वतःची तब्येत, कुटुंबाच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी)
    - बालसंगोपन (मुलांकडे पहायला आधारव्यवस्था नसणे, मुलांना वेळ देण्यासाठी, मुलांची तब्येत, आपल्याला न मिळालेले बालपण मुलांना देण्यासाठी)
    - कामासंदर्भातील अडचणी (अपुरा पगार,कामाचे तास आणि तणाव, रोजच्या प्रवासाचा वेळ)
    - आर्थिक गरज नसल्यामुळे
    - नातेस्थिती (लग्न झाल्यामुळे, लग्नानंतर परदेशात डिपेन्डन्ट म्हणुन जावे लागल्याने, कुटुंबाच्या मानसिक समाधानासाठी)
    - स्वेच्छेने आणि योजिल्याप्रमाणे (स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास, छंद जोपासण्यासाठी, स्वाध्याय, सामाजिक कार्य करण्यासाठी )

    लग्नानंतर परदेशी वास्तव्य करावे लागत असल्याने आणि डीपेन्डंट असल्याने नोकरीमध्ये ब्रेक घ्यावा लागला. खरं तर पुढे शिकायचा इरादा पक्का होता मित्राला लग्नासाठी हो म्हणाले तेव्हा. पण त्याचे शिक्षण संपत आल्याने व इतर काही कारणांमुळे भारतात परत जायचा निर्णय झाला. निर्णय अर्थात दोघांनी मिळून घेतला. पण परिणामतः मी सध्या बेकार व भारतात लवकरच जाऊन नोकरी करण्यास उत्सुक आहे. त्याची पी.एच. डी. लांबत चालल्याचे पाहून मी x वर्षांपूर्वी काही महिने देशात जाऊन नोकरी केली. आणि मला प्रमोशन मिळण्याची वेळ येताच त्याचे शिक्षण अजून लांबले. मग आमची गाडी पुन्हा अमेरिकेला परत!

    इकडे कामाला मदतनीस नसल्याने आणि नोकरीत कामाचे तास जास्त असल्याने कामच्या रगाड्यात घराकडे दुर्लक्ष होईल असे वाटले. मुलीची प्रकॄती हेही एक कारण होते.

    मुलगा झाला. एकच मुल असावं हा माझा निर्णय असल्यामुळे त्याचं 'बाळ'पण बघायचं, आईपण अनुभवायचं, त्यानं ते छोटे छोटे माईलस्टोनस पार करतांना त्यात सहभागी असावं असं मला वाटलं. म्हणुन नोकरी सोडली. आर्थिक गरज असती तर नसती सोडली.

    अपुरा पगार, कामाचे तास, मुले झाली, पहायला कोणी नव्हते.

    नोकरी-व्यवसाय कधीच केला नाही. पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ती म्हणून एका सेवाभावी संस्थेत XX वर्षे काम. नंतर XX वर्षे विविध प्रकारची शैक्षणिक कामे. नुकताच काम थांबवण्याचा निर्णय घेतला. कारण साधना व स्वाध्याय यांसाठी वेळ देण्याची मनापासून इच्छा आहे.

    सासुबाई आणि आई दोघी नोकरी करणार्‍या असल्याने आम्हा दोघांनाही हवी त्या प्रत्येकच वेळी आई मिळाली नाही [अर्थात त्या दोघीनीही त्यांच्यापरिने प्रयत्न केलेच पण तरीही...]तेव्हा आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये, दोघापैकी एकाने तरी त्याला हवे तेव्हा लगेच उपलब्ध असावे आणि यासाठी बाबापेक्षा आईच योग्य अस वाटल्यामुळे नोकरी सोडुन दिली.
    दुसरे कारण...धावायचा [नोकरीनिमित्त दगदग] कम्टाळा आला होता, स्वतः साठी जगावं वाटत होतं, आता मी वाचन/ प्रवास यासाठी हवा तेवढा वेळ देऊ शकते रजेचा प्रश्नच येत नाही.

  • कामातील जबाबदार्‍या निभावताना एक स्त्री म्हणून दुय्यम वागणुक/ खास (स्पेशल) वागणूक मिळाली का ते तपशीलवार लिहा

    ६८ स्त्रियांनी "नाही "असे उत्तर दिले आहे. नाही/ फारशी नाही/ कधीच नाही/ तशी वेळच नाही येऊ दिली - अशी उत्तराची भाषा आढळते. यापैकी फारशी नाही आणि तशी वेळच कधी येऊ दिली नसल्याच्या भाषेकडे विश्लेषकचमु तुमचे लक्ष वेधू इच्छिते.

    यापैकी ६ स्त्रियांनी दुय्यम नाही तरी खास वागणुक मिळाल्याचे नमुद केले आहे. खास वागणुकीत ज्याला साधारणपणे स्त्रीदाक्षिण्य म्हणले जाते (टीपः केवळ भाषेच्या दृष्टीने हा शब्द वापरला आहे. हे विश्लेषकचमुचे मत अथवा पसंती नाही किंवा स्त्रीदाक्षिण्य असावे/नसावे याबद्दलही मत नाही) अशा स्वरूपाची उदाहरणं दिली आहेत:- मुलं लहान असल्याकारणाने वेळेवर घरी जाता येणे, गर्भार असताना खास काळजी घेतली जाणे, उशीरापर्यंत काम केल्यास पुरुष सहकार्‍यांनी सोडायला येणे, बॉसशी पूर्ण कुटुंबाचा परिचय असणे इ.इ.

    फक्त २४ स्त्रियांनी या प्रश्नाला हो असे उत्तर दिले.

    • स्थलसापेक्ष (फक्त भारतात/ भारतीय टीममध्ये काम करताना, फक्त परदेशात दुय्यम वागणुक मिळाली, फिल्ड वर्क मध्ये, रात्रपाळीत, टुरमध्ये,कामाच्या ठिकाणी नाही तरी मोलाने काम करणार्‍या पुरुषांकडुन (मुद्दाम)आज्ञापालन न होणे )
    • कामाच्या ठिकाणी अस्तिवात असलेला सुक्ष्म अथवा उघडउघड लिंगभेद (उघडउघड दुय्यम वागणुक न मिळणे, दुय्यम वागणुकीसाठी तक्रार करावी लागणे, माहिती न मिळणे,स्वतःबाबतीत नाही तरी इतरांबाबत अनुभवले आहे, वरिष्ठ म्हणुन स्त्री खपत नाही, नवराच बॉस असल्याने जास्त गृहित धरणे, हातखालच्या लोकांचे वय जेवढे जास्त तेवढा वागणुकीत फरक, (पेशंटने) स्त्रीडॉक्टरकडुन वैद्यकीय मदत घ्यायला नकार देणे, ठराविक माहिती पुरुषांशीच शेअर केली जाणे, स्त्री म्हणुन नसले तरी मुलांमुळे महत्वाची वेळखाऊ कामं न सोपवल्या जाणे, सारख्या कामासाठी पुरुषांहून कमी वेतन, कमी आव्हानात्मक काम मिळणे, शिक्षीका या पदाला स्त्रियांच्या बहुसंख्येमुळे पुरेसे मह्त्त्व दिल्या न जाणे

    यापैकी ४ स्रियांनी खास वागणूकही कधी कधी मिळाल्याचे नमुद केले आहे.

  • नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रिया याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तपशीलवार लिहा

    ३३ स्त्रियांनी हा जिचातिचा खाजगी निर्णय आहे असे नमूद केले आहे. यापैकी २१ स्त्रिया सध्या नोकरीत कार्यरत आहेत, ६ गृहिणी आहेत. आर्थिक गरज/ मुलं/मुलांच्या खास समस्या, कौटुंबिक गरजा/ आयुष्यातील प्राधान्यक्रम/ स्वतःची शारीरिक क्षमता या घटकांवर अवलंबून हा निर्णय असल्याचे आणि तो आनंदाने घेतला गेल्या असल्यास हरकत नसल्याचे मैत्रिणींने नमूद केले आहे. जोपर्यंत हा निर्णय स्वखुशीने घेतला जातो तो पर्यंत ठीक, पण काही कारणाने दबाव असल्यास मात्र ते योग्य नाही अशी मतं व्यक्त केल्या गेली आहेत. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य वगळता फारसा फरक नसल्याचे एकीने सांगितले आहे, तर काहींनी दोघींवरही महत्त्वाच्या जबाबदार्‍या असुन दोघीही सारख्याच मानाला पात्र असल्याचे नोंदवले आहे. (टीपः "मानाला पात्र असणे" हा शब्दप्रयोग सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांनी केलेला आहे. हा विश्लेषकचमुचा भावानुवाद नाही. खालील प्रतिक्रियांवरही काहीही प्रक्रिया केलेली नाही. शुद्धलेखनाचीही नाही.)

    हा प्रत्येकीचा चॉईस आहे. कोणी नोकरी करते म्हणून श्रेष्ठ ठरत नाही आणि कोणी घरी असते म्हणून कनिष्ठ नाही. एक मात्र वाटतं की घरी अस्णार्‍या बायकाच ह्या कॉम्प्लेक्सच्या शिकार असतात की त्या घरी असतात. आणि त्यामुळे नोकरी करणार्‍या बाईची तारेची कसरत पाहून 'सांगितलं आहे कोणी सर्व डगरींवर हात ठेवायला' टाईप कमेन्ट्स त्याच द्यायची शक्यता जास्त आहे.

    तो प्रत्येकचा स्वताचा निर्णय असावा. तुमच्या आवडी, गरजा आणि परिस्थिती यानुसार नोकरी करणे अथवा न करणे ठरते. विशेष भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही.

    जोपर्यंत त्या स्त्रीला 'मला काय करायचे आहे आणि मी काय करते आहे' याची जाणीव असेल, ती आहे त्या परिस्थितीत आनंदी असेल तोवर ऑल इज वेल! नाहीतर धोक्याची घंटा.

    काय वाटायचंय? दोघीही कष्ट करत राहतात. एकीला मोबदला मिळतो आणि त्याबरोबरीने निर्णय घेण्याचा हक्क बजावता येतो. दुसरीला मोबदला मिळत नाही घरात निर्णय घेण्यात सहभाग असतो किंवा नसतो. आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र - सक्षम असणं महत्त्वाचं वाटतं.

    each has responsibility - investing in the lives of others whether its children or adults

    As long as the woman is happy and comfortable with what she is doing, I do not believe in the categories like working/non-working women.

    ४८ स्त्रियांनी आपण नोकरी करणार्‍या स्त्रियांना जास्त पसंती देत असल्याचे नोंदवले आहे. (टीपः पसंती हा शब्द विश्लेषकचमुचा आहे. खुला प्रश्न असल्याकारणाने विस्तृत उत्तरांमधील समान धागे काढून हा शब्द त्याउत्तरातील भावमुद्रेनुसार वापरण्यात आला आहे.) यापैकी ३८ स्त्रिया सध्या कसल्या न कसल्या प्रकाराची नोकरी करतात आणि फक्त ३ गृहिणी आहेत.
    यापैकी बहुतांशी उत्तरांत न करण्यापेक्षा, नोकरी करणे केव्हाही चांगले असा सूर आहे. काहींनी नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांबद्दल तौलनिक दृष्टीकोन मांडला आहे, तर काहींनी नोकरी न करणार्‍या स्त्रियांना आपण समजुन घेऊ शकत नसल्याचे नोंदवले आहे, तर काहींनी घरकाम ही २४ तासांची नोकरी असल्याचे मत नोंदवले आहे. एकीने नोकरी न करणार्‍या स्त्रियांना स्पष्ट पसंती देत असल्याचे नमूद केले आहे. काही प्रतिक्रियांमध्ये फक्त नोकरी करण्याचे फायदे किंवा न करण्याचे तोटे नमूद केले आहेत.

    हा प्रश्न घराबाहेर काम, अस्तित्व असलेल्या आणि घरापुरतंच जग असलेल्या स्त्रिया अश्या तुलनेचा आहे असं समजून हे लिहिते. घरापुरतंच जग असलेल्या स्त्रिया अनेकदा मुलांना स्वतःवर जास्तीत जास्त अवलंबून ठेवण्यात धन्यता मानतात. जे पुढे जाऊन मुलांसाठीच त्रासाचे होऊ शकते. स्वतःचं घराबाहेरही अस्तित्व असलेल्या बायकांचा जगात काय चाललंय याच्याशी थोडा तरी संपर्क असतो. ज्याचा घरावर नक्कीच परिणाम होतो चांगल्या अर्थाने. तसेच मुलं हाच केंद्रबिंदू नसल्याने मुलांनाही स्वावलंबन शिकवले जाते.

    नोकरी करायला पाहिजे. घरी बसणे म्हण्जे नवर्‍याची नोकरी करण्यासारखे आहे.

    नोकरी न करणार्‍या स्त्रिया जर उच्चशिक्षित असतील आणि त्यांचा सगळा वेळ काही प्रॉडक्टिव न करण्यात घालवत असतील तर मला तो साधनसंपत्तीचा अपव्यव वाटतो. जर असे काही न करण्यात आयुष्य घालवायचे ठरले असेल तर त्या स्त्रियांनी घरकामाचे शिक्षण घ्यावे. स्पर्धात्मक क्षेत्रातील जागा अडवू नयेत. ( तसेच पुरुषांचेही. - उदा एखादे घरचे दुकान चालवायचे आधीच ठरले असेल तर स्पर्धात्मक क्षेत्रात जागा अडवू नयेत.)

    न करणार्‍यांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता कमी असल्याचं लक्षात आलं आहे.

    दोन्ही प्रकारचं जग बघितलं आहे. मला तरी नोकरी करणार्‍या स्त्री ला स्वतःसाठी वेळ मिळतो असे वाटते. घरी राहणारी बाई घरकाम व इतर गोष्टींमध्ये (त्यात जर लहान मुलं असेल तर त्यामध्ये) इतकी गुंतलेली असते की तिला स्वतःचे छंद वैगरेसाठी वेळ देता येत नाही. घरात रहाणार्‍या स्त्रीला बहुतेक वेळा गृहीत धरलं जातं. घरातच आहे मग कामवालीची काय गरज?
    तर नोकरी करणारीला दोन्ही डगरीवर पाय ठेवावे लागतात. दोन्हीकडच्या कामाच्या व्यापामूळे तिलाही स्वतःसाठी वेळ काढणे अवघड जाते. नोकरी करणार्‍या काय अन न करणार्‍या काय, जोपर्यंत स्त्री स्वतःच्या आयुष्याबद्दलचे, कामाबद्दल्चे निर्णय दुसर्‍यांना घेवू देते तोपर्यंत दोघींचे आयुष्य सारखचं असतं
    .

    नोकरी न करणार्‍या स्रियांमधला कॉन्फिडन्स खूप कमी वाटतो. शिवाय त्या आयुष्याबाबत फार उदास वाटतात.

    नोकरी करणार्‍या काही स्त्रियांचे घराकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हे मी अनुभवले आहे. ते ठीक वाटत नाही. नोकरी करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाल्यामुळे काही जणी भावनिक स्वावलंबन मिळवू शकतात. पण हा नियम सर्वांना लागू करणे कठीण. घरात अशा स्त्रियांचा शब्द मानला जाऊ शकतो पण हेही सरसकट खरे नाही. शेवटी प्रत्येकाची मनःशक्ती ही कुठल्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

    स्त्रीच काय, कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा असा व्यवसाय (occupation या अर्थी) हवाच हवा. त्यातून अर्थार्जन होतं की नाही हा दुय्यम भाग. (मी प्रश्नातला 'नोकरी' हा शब्द 'occupation' याच अर्थी घेते आहे.) असं occupation नसलेल्या व्यक्ती आर्थिक, भावनिक आणि एकूणच दुसर्‍यावर फार अवलंबून रहायला लागतात आणि त्याहून वाईट म्हणजे त्यालाच त्याग वगैरे गोंडस नावं देऊन वर त्याचा मोबदला मिळावा अशीही अपेक्षा ठेवायला लागतात. ही वाईट परिस्थिती आहे. प्रश्न केवळ अर्थार्जनाचा असेल तर त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास सहसा येतो हे अमान्य करताच येत नाही, पण आपल्या घराला असं 'डिव्हिजन ऑफ लेबर' सूट होत असेल तर कमीपणा न वाटून घेता जरूर योग्य तो निर्णय घ्यावा. नोकरी करणं / न करणं यांतलं काहीच गतानुगतिकतेतून ठरवलं जाऊ नये.

    मला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. नवर्‍याच्या जीवावर चैन करणार्‍या स्त्रिया ह्या माझ्या दृष्टीने कलंक आहेत. मला त्यांचा तीटकारा वाटतो.

  • पदभारातील पदोन्नतीचे अनुभव. मिळालेली पदोन्नती तुम्ही कधी नाकारली आहे का ? केवळ स्त्री म्हणुन तुम्हाला पदोन्नती नाकारली गेली आहे का?:

    २० स्त्रियांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. यापैकी १६ स्त्रियांनी मिळालेली पदोन्नती स्वतः नाकारली आहे. ३ स्त्रियांनी अनुक्रमे "मिळाली नाही" आणि "हो" एवढेच उत्तर दिले आहे. यावरुन केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारल्या गेल्याचे सिद्ध होत नाही.

    एका स्त्रीने स्पष्टपणे स्त्री म्हणुन, आणि विशेषकरुन गर्भार राहिल्यामुळे पदोन्नती नाकारली गेली असल्याचे नमूद केले आहे. एकीने केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारली गेली नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, तरी राजकारणामुळे पदोन्नती मिळाले नसल्याचे नमूद केले आहे.

    मिळालेली पदोन्नती नाकारण्याचे कारणे:

    • वाढीव पदभारामुळे येणार्‍या जबाबदार्‍या/ वाढीव कामाचे तास निभावण्याची कौटुंबिक परिस्थिती नसणे (मुलं लहान, नवर्‍याच्या निर्णयामुळे पदोन्नती सोडावी लागणे, नवीन लग्न असताना एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळण्यासाठी, नवरा दुसर्‍या शहरात/देशात असल्यामुळे
    • वाढीव प्रवास/फिरतीची नोकरी/ बदलीची नोकरी
    • आवडीच्या शिक्षणासाठी
    • प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली नसली तरी लहान मुलांमुळे नोकरी सोडायचा निर्णय घ्यावा लागला
    • प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली नसली तरी पदोन्नती पर्यंत न पोचण्याची खबरदारी स्वतःच घ्यावी लागली अशा प्रतिक्रियाही यात समाविष्ट आहेत.

    ६२ स्त्रियांनी पदोन्नती नाकारल्या गेल्याचा/ स्वतः नाकारण्याचा अनुभव नसल्याचे स्पष्ट नमुद केले आहे.

    नाही केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारली गेलेली नाही, ऑफीस पॉलीटिक्समुळे नाकारली गेल्याचा अनुभव आहे. परदेशात मात्र काही ठिकाणी भारतीय स्त्रियांना आम्ही नोकरी देऊ इच्छित नाही असे सांगण्यात आले आहे.

    पदोन्नतीमुळे इतर लोकांचा आपल्याकडे पाहायचा दृष्टीकोन उंचावतो. पण तेवढीच योग्य निर्णय, जबाबादारी, सगळ्यांना बरोबर घेऊन राहणं ही टेन्शन्स असतात. स्त्री म्हणून कधीच नाकारली गेली नाही, मी कधी नाकारली नाही.

    असे प्रश्न सामाजिक कामात असल्यामुळे फारसे आलेच नाहीत. या गोष्टींमधे कधी रसही वाटला नाही.
    I like the process at my company. My managers so far have been fair about promotions. Whenever I showed excellent work, I did get promoted. Now with the given economy, promotions are a bit rare.


stline2.gifनिष्कर्ष

I have yet to hear a man ask for advice on how to combine marriage and a career. - Gloria Steinem.

मूल झाल्यावर नोकरी करण्या न करण्याबाबत संभ्रमाची कारणे/ नोकरी सोडण्याची कारणे वर तपशीलवार नमूद केली आहेत. एक वाचक म्हणून तुम्हाला याबाबत काय वाटतं?

एकंदरीतच 'नोकरी' या सदरातील सर्व खुल्या प्रश्नांना बाकीच्या सदरातील प्रश्नांच्या तुलनेत कमी प्रतिसाद आले. विश्लेषकचमुच्या यावर चर्चांच्या फैरी झडल्या. काही ठोस निष्कर्ष काढण्याइतपत पुरावा नाही, तरी सहज सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाही.

इंग्रजी प्रश्नावलीत राहून गेलेल्या एका त्रुटीमुळेही अपुरा मजकुर हाताशी आहे. इथे वरिष्ठ/ मध्यमव्यवस्थापकीय/ कनिष्ठ हे स्तर त्या त्या प्रतिक्रिया देणार्‍यांच्या मतानुसार आहेत. तिथे काटेकोर व्याख्या नव्हती तरीही कशा प्रकारच्या पदभारांबाबत नोंदणी झाली आहे हे व्यवस्थित समजावे म्हणून दिले आहे.

प्रतिक्रिया देणार्‍या मैत्रिणींच्या सध्याच्या नोकरीस्थितीचा, नोकरी करणार्‍या/ न करणार्‍या स्त्रियांबाबत मतांवर निश्चित प्रभाव दिसून येतो. प्रतिक्रियांची भाषा पाहता 'पूर्वग्रह' हा शब्द वापरता यावा इतपत भाषा नोंदली गेली आहे.

विषयांतर झालेच आहे तर...
मेकॅनिकल इंजि होऊन आयटी मध्ये काम करणे हे पुर्णपणे illogical नाही. कारण आयटी हे असे क्षेत्र आहे जिथे अनेक क्षेत्रातले प्रवीण लोक लागतात subject matter experts म्हणून (उदा. for requirements capturing and analysis of some automotive CAD CAM project, mechanical engineers would be required, for some healthcare domain's proects, even doctors/pharamcists are required)..त्यात तुमचे एखाद्या क्षेत्रात प्राविण्य (अनेकदा केवळ degree देखिल) अपेक्षित असते. त्यामुळे ते वाया तर जात नाहीच तर दुसर्या पण उत्तम प्रकारे वापरले जाते. इथे मेकॅ इंजि हे prerequisite आहे.

परंतु इंजि होऊन नंतर investment banking मध्ये काम करणे हे इंजिनिअरींग शिक्षणाचा पुर्णपणे अपव्यय आहे. अर्थात एखाद्याला संधी मिळाली तरी त्याने दुसर्या क्षेत्रात जावे की नाही हे त्यानेच ठरवायचे असले तरी "काही तरी वाया जातंय" हे मात्र बदलत नाही.

<<परंतु इंजि होऊन नंतर investment banking मध्ये काम करणे हे इंजिनिअरींग शिक्षणाचा पुर्णपणे अपव्यय आहे<<>> पण त्या इंजिनिअर ला त्याच्या क्षेत्रात कामच मिळत नसेल किन्वा अगदी फालतु काम ( २-३ हजार रु . पगार ) मिळत असेल (की जे डिप्लोमा होल्डर सुद्धा करु शकतो ) तर तो ही त्याच्या शिक्षणाचा अपव्ययच नाही का ?
त्यापेक्षा इतर क्षेत्रात काम करुन तो जर जास्त पैसे मिळवु शकत असेल तर जास्त कर सुद्धा भरेल. आणि त्यातुन सरकारचा देशाचाच फायदा होणार आहे की.

म्रुदुला,
हा मुद्दा बरोबर आहे गं. नसेल मिळत तर वेगळी गोश्ट आहे..पण मला म्हणायचे होते ते उदा. म्हणजे जसे चेतन भगत सारखे.. IIT मधुन इंजि होऊन नंतर IIM मधुन finance शिकणारे व investment banking मध्ये काम करणारे. आता आधीच IIT त जाण्यासाठी किती मारामारी (आणि comparatively किती कमी fees)त्यात जर का ते बहुमुल्य शिक्षण वाया घालवलं तर हळहळ्णारंच ना ज्याची सीट गेली तो? चेतन तर काय B.Com. करुन ही जाउ शकला असता की IIM मध्ये.. आणि IIT मधे भारत सरकार कितीच investment करते त्या brand साठी.. ती ही वायाच गेली नाही का? दुसर्या कुणी समजा त्या सीट चा लाभ घेऊन एखदी इंजि कंपनी काढली तर returnsजास्त नाही का सरकार्च्या गुंतवणुकीवर? फक्त उदा. म्हणून चेतन चे नाव घेतलंय बाकी काही नाही. हाच प्रकार मी प्रोफेशनल कोर्सेस च्या सीटा अडवून नंतर त्या शिक्षणाला वाया घालव्णार्यां मुलींच्या बाबतीतही म्हणते आहे.

फचिन,
सरकारला रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेन्ट मिळवायचे असते तर >>>>
सरकारला नाही हो एवढ्या तेवढ्या तोट्याने काही फरक पडत..म्हणून तर देशात काही काळासाठी काम करणे बंधनकारक नाहिये ना? प्रश्ण त्यांच्या तोट्याचा आहे ज्यांच्या संधी अशा लोकांनी हिरावल्या जे स्वतः त्या संधींचा काहीच उपयोग करत नाहीत.
आणि शिवाय देशाबाहेर काम करणार्या टेकिंनी भारताला टेक्निकल फिल्ड मध्ये उजळ इमेज तरी बनवायला मदत केलिय्..त्यांच्या घरी असणार्या इंजिनीअर्/डॉक्टर बायका/नवर्यांचे तेही योगदान नाही ना एवढे शिक्षण घेऊन Sad
म्हणून च म्हणते हा बराचसा नैतिक जबाबदारीचा पण प्रश्न आहे.
आणि वर कुणीतरी म्ह्टलंय की professional courses वाल्यांनी नोकरी करावीच हा आग्रह का तर त्याचे उत्तर त्या नावातच नाही का? its a "professional" course which enables and expects you to become a "professional" in that field.
अरे नका करू नेहमीसाठी तुम्हाला नसेल गरज तर, पण एक दिवस ही काम न करता सरळ लग्न करून घरात बसणे हे काही justifiable नाही. कमीत कमी टोचणी तरी असायलाच हवी आपण दुसर्या गरजुची "संधी घालवली" याची.

>>नोकरी करणार्‍या काही स्त्रियांचे घराकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हे मी अनुभवले आहे. ते ठीक वाटत नाही.

यावर कशी काय काहीच प्रतिक्रिया नाही? घराकडे लक्ष देणे हे काय फक्त स्त्रीचेच काम आहे का?

शिक्षण घेऊन नोकरी न करणार्‍या स्त्रीया या इतरांवर अन्याय करतात, हे अर्धवट खरे वाटते.

कारण शिक्षण घेताना आधी कुणालाच स्वप्न पडलेले नसते की नंतर तो/ती किती यशस्वीरीत्या व्यवसाय करेल/न करेल.

शिवाय, हाच मुद्दा विचारात घेतला तर विशिष्ट डिग्री असून दुसराच व्यवसाय करणार्‍या मुलानाही याच कलमाखाली गुन्हेगार मानायला लागेल.

ह्या लेखाचा हा विषय नसल्यामुळे हे शेवटचे पोस्ट टाकतो.

<<सरकारला नाही हो एवढ्या तेवढ्या तोट्याने काही फरक पडत..>>
ह्यावर मला हेराफेरी ह्या चित्रपटातील परेश रावलचा एक डायलॉग म्हणावासा वाटतो: 'एक फूल, पहले तुम अपना समस्या नक्की करो बाबा.. रिटर्न ऑन इन्व्हेस्ट्मेंट चाहिए या नहीं!" Proud

अहो तुम्हीच म्हणालात की सरकार खर्च करुन शिक्षण देते आणि लोक काहीही न करुन ते वाया घालवतात आणि देशाला त्यातून फायदा काहीच मिळत नाही. आता जर एवढ्याशा तोट्याने सरकारला काहीच फरक पडत नसेल तर रिटर्न ऑन इन्व्हेस्ट्मेंट हा मुद्दा बाद झाला चर्चेतून. मग ते काही न करणारे अमेरिकेतील असोत किंवा भारतातील असोत.

आता चेतन भगतचं बघूयात. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन फायनान्समध्ये गेला. तिथे तो खोर्‍याने पैसा ओढतो आणि भरपूर टॅक्स भरतो. त्यामुळे सरकारचा तर फायदा झालाच. आता त्याने ती सीट जाणूनबुजून सोडली असती समजा, आणि दुसर्‍या कुणी ती घेतली असती तर ह्याची काय शाश्वती की तो मनुष्य कंपनी सुरू करेल? वर परत ती कंपनी बुडणार नाही आणि सरकारचा तोटा होणार नाही कशावरून? नंतर जर चेतन म्हणाला की 'अहो, कोणीतरी चांगला उपयोग करेल म्हणून मी ती सीट सोडली', तर तुम्ही म्हणणार की 'वा रे वा, स्वतःला काही करणे जमले नाही आणि वर त्याग केला असं गोंडसपणे सांगतोय!" ह्या असल्या उदाहरणांना काही अर्थ नाही. त्यामुळे आयआयटी किंवा इतर कोणत्याही परिक्षेत तुम्हाला जर त्या क्षणी इतरांपेक्षा जास्त गुण मिळवून अ‍ॅड्मिशन मिळवता आली नाही तर तुम्ही त्या सीटच्या लायकीचे नाहीत.

शेवटचा मुद्दा आहे गरजूंचा. हा मुद्दा बहुतेक रिजर्वेशनच्या चर्चेत पण आला होता. कोण गरजू आहे हे कसं ठरवणार? मी सोडलेली सीट एखादा गरजूच घेईल आणि त्याचा उपयोग करेल कशावरुन? आणि ज्याने ती सीट घेतली त्यानेही तसाच विचार केला पाहिजे की त्याच्यापेक्षा जो जास्त गरजू आहे त्याला ती सीट मिळाली पाहिजे. मग परिक्षा वगैरे न घेता सरकारने सरळ फक्त फॉर्म भरून घ्यावेत आणि त्यांच्यामते जे गरजू आहेत त्यांना सरळ सीटा देऊन टाकाव्यात.

मी लिहिले होते की एखाद्या मेकॅनिकल इंजिनिअरने समजा आयटीमध्ये जॉब घेतला तर त्याने जी नोकरी सोडली ती एखाद्या "गरजूला" मिळेल. त्यावर तुम्ही काहीच उत्तर दिले नाही. त्याच नियमाने जे लोक प्रोफेशनल शिक्षण घेऊन घरी बसले आहेत आणि ज्या नोकर्‍या करत नाहीयेत, त्या आपोआपच गरजूंना मिळतील. भारतात जसा साधनसंपत्तीचा तुटवडा आहे तसा नोकर्‍यांचाही आहेच की. झाले बॅलन्स.

त्यामुळे "गरजू" वगैरे असला विचार करण्यापेक्षा सरळ स्वत:च्या प्रगतीचा प्रत्येकाने विचार केला तर आपोआप प्रगती होईल देशाची.

>>>सायो,
पहिली गोष्ट म्हणजे मी कुणालाही तुच्छ लेखत नाहीये.>>>> ते मी तुम्हांला उद्देशून लिहिलेलं नव्हतं. जिनी कुणी >>>कलंक आहेत, तिटकारा वाटतो>>> टाईपचे महान विचार लिहिले आहेत तिच्याकरताच ते वाक्य होतं. तुमच्याकरता फक्त उदाहरण होतं.

फचिन,
सरकार ROI मागत नाही म्हणून तुम्ही दुसर्यांच्या संधी हुकवून स्वतःला मिळालेल्या संधी कुजवणार, हे मला तरी चूक वाटते. जसे बुफे मध्ये ढीगभर अन्न घेऊन नंतर ते टाकून देणे वाटते. ते कुणा गरजुच्या पोटी गेले तर अधिक चांगले नाही का? आता तुम्ही म्हणता त्याप्रंआणे कुणास ठाऊक की ते गरजुलाच मिळेल का नाही ते..पण म्हणून अन्न टाकणे justifiable ठरते का? तसेच हे ही आहे. प्रश्न resource abuse चा आहे. आणि त्याचा कुणी जाब मागत नाही, म्हणून ते बरोबर असे नाही.

परिक्षा वगैरे न घेता सरकारने सरळ फक्त फॉर्म भरून घ्यावेत आणि त्यांच्यामते जे गरजू आहेत त्यांना सरळ सीटा देऊन टाकाव्यात...>>> मी कुठेतरी म्हटलेय का की फक्त गरज या criteria वर प्रवेश मिळावेत? (तसेही कुणी कुणाच्या गरजा नाही ठरवू शकत.) फक्त तुम्हाला जर त्या क्षेत्रात काम करायचे नसेल तर मौल्यवान जागा अडवू नयेत, एवढेच म्हणतेय. त्यावर एवढा गदारोळ?

>>त्यावर एवढा गदारोळ?
हा गदारोळ अजीबात नाही. चर्चा घडतेय आणि प्रत्येकजण स्वतःला काय वाटतं ते लिहितंय. एकमेकांचं पोस्ट पटेलच असं नाही.

मला व्यवसाय बदलणे चुकीचे वाटत नाही, पण काहीच व्यवसाय न करणे वाटते.

रिसोर्स अब्यूझचा मुद्दाही पटला. कारण भारतात उच्चशिक्षणाच्या जागा कमी आणि उमेदवार जास्त आहेत. पण खरोखर अठराव्या वर्षी एव्हढे समजत असते का? की पुढे नक्की काय करायचे आहे? आणि नोकरी व्यवसाय करायचा नाही असे ठरवून शिक्षण घेतले नाही आणि पुढे नोकरीची गरज भासली तर काय करणार? एकदा वेळ गेली की पुन्हा शिकता येत नाही ना... भले नोकरी व्यवसाय न केल्याने सगळे ज्ञान गंजून जावो, गरज पडली तर पुन्हा घासून लख्ख करता येते. त्यामुळे शिकूच नये असे म्हणायला जीभ धजावत नाही. (माझ्या म्हणण्या न म्हणण्याने काही फरक पडणार नसला तरी. :-))

दहाबारा वर्षांपूर्वी लोकसत्तेत 'मुलींनी शिकू नये' अश्या शीर्षकाचा पानभर लेख आला होता. त्यातही हा रिसोर्स अब्यूझचा मुद्दा होता. त्यात खूप शिकलेली मुलगी म्हणजे नाकापेक्षा मोती जड असे लिहिलेले होते हे आठवते. ते वाचून मी खूपच वैतागले होते. पण लेखिकेला म्हणायचे होते की जास्त शिकल्याने मुलींचे आयुष्य जास्त कष्टाचेच होण्याची जास्त शक्यता आहे. ते मला तेव्हा पटले नव्हते आणि आजही पटलेले नाही. (कारण माझे आयुष्य भरपूर शिकून अगदी मजेतच चालेलेले आहे. Happy )

फचिन,
तुमच्या काही मुद्यांना तुमचे हे शेवटचे पोस्ट असल्याने विपु त उत्तर दिलेय. त्याबद्द्ल काही आक्षेप असल्यास सॉरी. (मध्ये काहीतरी आम्च्या विपु त रिक्षा कशाला वगैरे वाद होते, ते कशासाठी माहीत नाही..सो आधीपासुन च सॉरी Happy )

LOL
एक फुल,
विपु त लिहिण्या ऐवजी इथ का लिहित नाही? निदान मुद्द्याच खंडन कशा प्रकारे करता हे वाचुन एक नवी बाजु तरी कळेल. अन्नुलेख करुन किंवा "लोक इमोशनल झाली आहेत" अशी स्वतःची समजुत केलीत तर चर्चा पुढ कशी जाणार.:) (हेमाशेपो अस मी लिहिल असल तरी या बाफ च वाचन अजुन चालु आहे.:) )

सरकारच्या पैशाने (तुमच्या मते. खर तर ते पैसे सरकारचे नाहीत. आपण टॅक्स भरतो त्यातले हे पैसे) >> माझ्या माहीतीप्रमाणे medical,engg. ची फी भारतात माझ्यावेळेस तरी खुप कमी होती,कारण ते शिक्षण भारतात subsidised असते, आणि आपण tax भरतो त्यामानाने सरकारला येणारा खर्च हा जास्त असतो.अगदी private collegesला सुध्दा १रु भाड्याने सरकारी जमीन मिळालेली असते.त्यामुळे खरे तर पैसे सरकारचे नाहीत हे वाक्य चुकीचे आहे.
माझ्या मते अमेरिकेप्रमाणे उच्च शि़क्षण zero subsidised झाले पाहिजे , म्हणजे आपोआप लोक स्वतःच्या आईवडीलांनी invest केलेले पैसे वसुल करण्यासाठी का होईना काम करतील आणि मग सीट वाया जाते हा प्रश्न निकालात निघेल.भारत हा गरीबांचा कैवार घेणारा देश असल्याने अमेरीकेची ही निती जशीच्या तशी अमलात आणता येत नाही.
माझ्या माहीतीप्रमाणे सन २००६ (एक दोन वर्ष मागे होउ शकतात ) पासुन किमान engg. मेडिकल private collegeची फी वाढलेली आहे, त्याचबरोबर सर्व ब्यांकाकडुन आता education loan सहज उपलब्ध होउ लागले आहे,त्यावर house loan सारखा tax benifitपण मिळतोय, त्यामुळे एक स्वागतार्ह बदल व्हायला सुरवात झालेली आहे असे म्हणायला हरकत नाही.

मला व्यवसाय बदलणे चुकीचे वाटत नाही, पण काहीच व्यवसाय न करणे वाटते. >> पटले, कारण टण्याने त्याच्या पोष्टमधे म्हंटल्याप्रमाणे चांगल्या संधी असतील तिथे लोक जाणार हे नैसर्गिक आहे.

मी फचिन ला दिलेले उत्तर आणि त्यांनी मला दिलेले उत्तर आमच्या विपु त असल्याने पुन्हा इथे टाकत नाही. फचिन ने विपु त म्हटल्याप्रमाणे माझे मुद्दे "भावनात्मक", "मी एमबीए असुनही बाळबोध", सुमार, इ.. आहेत.
त्यावर इथे कमेंट करणार नाही.
प्रोफेशनल शिक्षण घेणार्याकडून भारत सरकारच्या काय अपेक्षा आहेत ते पहा:
The Responsibilities of Professional Education--If our im- perilled civilization is to survive, our keenest and most disciplined minds, and to a very considerable degree this means our professional men, must devote their moral energies and intellectual powers to solving current and long range problems 1. The civilized peoples
of the world are puzzled as to why intelligence and education do not bring peace and order, as to why democratic constitution do not bring democracy, why religion does not bring brotherhood.

One reason is that while professional men in a large degree are in key positions in modern society, professional education has failed in one of its large responsibilities, that of developing over-all principles and philosophy by which professional men should live and work. To the extent that such purpose and philosophy are lacking, the engineer may be at the service of anyone who will pay him well, regardless of the social worth of his services; the lawyer's skill may be for sale for right or wrong (with some professional rationalizing), while the physician may seek the place of largest income, rather than that of greatest service. While each may have high skill, the total effect may be great internal stress and even social deterioration...

--------------------------------------------------------------------------------
1 Adapted from a talk by Professor Elliot Dunlop Smith, at the Inter-Professiona Conference on Education for Professional responsibility at Pittsburg, Penn. U.S.A May 1948. Some other ideas and expressions are taken from Professor Smith and from other speakers at this conference.
मी वर मांडलेल्या मुद्द्याप्रमाणे "प्रोफेशनल शिक्षण घेणार्या व्यक्ती वर ते शिक्षण योग्य प्रकारे उपयोगात आणणे ही नैतीक जबाबदारी आहे", हे च यातून अधोरेखित होते.
ह्यात नोकरी"च "करणे अंतर्भुत नसले तरी नोकरी/व्यवसाय्/संशोधन/volutary work/teaching असे काहीतरी करणे अध्याह्रुत आहे.
वरील पॅरा हा Government Of India
Ministry Of Human Resource Development
Department Of Education च्या साइट वरून घेतला आहे.

अर्थात "भारत सरकार ची HRD ministry" ही प्रत्येक प्रोफेशनल शिक्षण घेणार्या व्यक्तीने ते शिक्षण कसे वापरावे/ वापरावे का वापरु नये या विषया वरची authority नसल्याने वरील मताला कुणी ( जे सध्या मझ्या या मुद्द्याच्या विरुदध मुद्दा मांडताय) काडीचीही किंमत द्यावे/देतील अशी अपेक्षा नाही.

ज्यांना शिक्षण क्षेत्रात होणार्या resource wastage विशयी वाचायचे असेल त्यांनी युनेस्को चा प्राथमिक शिक्षणावर्चा रिपोर्ट इथे वाचावा:
http://unesdoc.unesco.org/images/0000/000049/004913eo.pdf
हा रिपोर्ट स्पष्ट्पणे म्हणतो की शिक्षणात केल्या जाणार्या गुंतवणुकीच्या तुलनेत त्यातून निर्माण होणारा रेवेन्यु ( त्या शिक्षणामुळे उत्पन्न होणारा) हा फार मोठा अभ्यासाचा मुद्दा आहे, व त्यावर अभ्यास सुरु आहे. सो, माझ्या या मुद्द्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे ही काही डेटा नाही.

सुरुवातीपासुनच मी resource abuse चा मुद्दा मांडतेय. तो पटत नसेल तर सोडून दिलात तरी हरकत नाही. शेवटी सगळे गाडे "ज्याची त्याची मर्जी" वर येऊन थांबतेच.

आणि हां, प्रत्येकाने चांगल्या संधी असतील तेथे जावे हे मान्य. मात्र मी एमबीए करताना माझे इंजि शिक्षण वाया जाऊ नये असा विचार करुन आधी ४ वर्शे इंजि मध्ये काम केले. आताही प्रोसेस कन्स्लटींग या रिलेटेड फिल्ड मध्ये काम करतेय. हे सांगण्याचा हेतु फक्त एवढाच की मला मनापासून माझी मते पटतात आणि मी त्याप्रमाणेच वागतेय. बाकीच्याना पटावीत हा आग्रह नाहीच. प्रत्येकाने स्वतःची जाहीर मते आणि खरीखुरी मते आणि वागणुक (actions) ह्या sync मध्ये आहेत का एवढे पडताळले तरी बास्स.

बापरे, येवढा मोठा सर्व्हेचा रिपोर्ट वाचल्यानन्तर बाकी प्रतिक्रिया वाचण्याचे त्राणच राहिले नाहीये!
तरीही....
>>>>एका परीने, स्त्रीया एकमेकींकडे इतक्या मोकळेपणाने बघत नाहीत, हेच अधोरेखित होतंय का? I may be wrong, or am not able to put it correc>>>><<<<
हे वैश्विक सत्य आहे, कटू असले तरीही, पण आहे युनिव्हर्सल ट्र्थ!

<<<< संपदा , ७५% बायका काही करत नाहीत त्या केवळ आळसामुळे काही करत नाहीत अस म्हणन धाडसाच ठरेल नाही का?असंख्य प्रॉब्लेम असतील त्यांचे >>>>>>>>

सीमा , मी या सर्व मुली आळसामुळे नोकरी करत नाहीत असं म्हंटलं नव्हतं , परदेशात असणं किंवा भारतात सपोर्ट नसल्यानं प्रॅक्टिस करणं जमत नसल्याचं लिहिलंय . घेतलेल्या शिक्षणाचा वापर होत नसल्याबद्दलच्या मुद्द्याला अनुसरून लिहिलं होतं . १८ व्या वर्षी पुढच्या आयुष्यात नंतर वापरता न येणारे शिक्षण , त्याबद्दलची अनास्था , आपले फील्ड सोडून दुसर्‍या क्षेत्रात करीयर करणं हे सर्व मुद्दे नंतर आलेले आहेत .

Every business functions in an external environment. It affects the daily happenings and outcomes of the business. One cannot judge our educated, stay at home sisters in a vacuum. They are valuable resources caught up in a hostile or inert external environment such as visa restrictions, family situations and such like. These are bigger issues than merely getting a degree. For each sister, the reasons to stay at home are different and it is unfair to blame them for situation beyond their control.

Secondly, financial independence is the cornerstone of women's liberation and empowerment. A woman must be capable of fending for herself and her children either through her skills or her education. Whether she has to use it or not is her personal decision.

Children definitely benefit from an educated able mother and they are delighted to have her around for them. We cannot ensure a loving husband or a supportive family but we can educate our daughters to be capable of earning their livelihood if the situation comes to that. You just have to see the plight of uneducated immigrants to get this.

Above all, if we don't understand our sisters in a non-judgemental, kind way who will? In a productive life of 60 years if an educated woman spends 10 years with her family when the family needs her what is so wrong. Lot of us have built successful careers after the kids have grown up and in-laws taken care of.

UN findings show that when a woman becomes able, she spends for her family. while a man spends on himself or for his indulgences or heaven forbid wars and such like( no offense meant to male mabo members please) Happy

Pages