अनंताक्षरी - लॉजीकल (मराठी)

Submitted by admin on 31 March, 2008 - 00:04

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधू इथे
अन् चंद्र तिथे
झुरतो अंधारात
झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात

हृदयी वसंत फुलताना
प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना
दूनियेनी का जळावे

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात
कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात ...
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात ....

स्वप्न चालुन आले
बघता बघता
माझे होऊन गेले
हसता हसता
रंग रंगीत झाले
दिसता दिसता
श्वास संगीत झाले
जुळता जुळता
चांदण्यात भिजतो
दिवस हा आता

अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहीलीच तरनी ही लाज
आगं झनानलं
काळजामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी

सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
लाजणाऱ्या फुलातला

जीव झाला येडा-पिसा
रात रात जागणं
पुरं दिसभर तुझ्या
फिरतो मागं मागणं
जादू मंतरली कुणी
सपनात जागपनी
नशिबी भोग असा दावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला

ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा ...
कोऱ्या कागदाची,
कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना ...

धुंदीत गाऊ
मस्तीत राहू
छेडीत जाऊ
आज प्रीत साजना
थंडी गुलाबी
हवा ही शराबी
छेडीत जाऊ
आज प्रीत साजनी

फुंकरीची वादळे
आणि ओल्या सरी
त्यात उडती पाखरे
रोज वरचे वरी

मन पावसाळी वारे
स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या
घट्ट बिलगुन येती
रात ओठातली
दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे
हे एक मागणे
तु जराशी ये उराशी

मन पावसाळी वारे
स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या
घट्ट बिलगुन येती
आहे आतुरले हळवे
हे एक मागणे
तु जराशी ये उराशी

हा जीव वेडा
होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगू दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
... प्रीतीचं झुळझुळ पाणी...

चांद तु नभातला
नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा
उभा तुझ्यासमोर मी