अनंताक्षरी - नेहमीची (मराठी)

Submitted by admin on 16 September, 1996 - 00:03

अनंत काळ चालणारी अंताक्षरी = अनंताक्षरी.

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, गाणे लिहिणार्‍याने पर्याय द्यावा. पर्याय दिला नसल्यास पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. पर्याय दिला असला तरी तो घेणे बंधनकारक नाही. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाच ग घुमा
कशी मी नाचू

-
चाफा बोलेना
चाफा चालेना
चाफा खंत करी
काही केल्या फुलेना

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको आपुला गळा

प आ

या रावजी
तुम्ही बसा रावजी
कशी मी राखू तुमची
मर्जी
तुम्ही बसा रावजी

दोन रुपये
दोन रुपये
दे ना मला
खर्चाला
पान सुपारीला

लव लव करी पातं
डोळं नाही थाऱ्याला
एकटक पहावं कसं
लुकलुक ताऱ्याला

ले लो भई चिवडा ले लो
गरम मसालेदार चिवडा घ्या
अरे घ्या हो घ्या चिवडा घ्या
गरम मसालेदार चिवडा घ्या

या गो दांडयावरना बोलते नवरा कुणाचा येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक
त्या नेसल्यान गो नेसल्या पैठणी सार्या
त्यांच्या डोईमधी सायलीच्या गो येन्या

या रे या सारे या
गजाननाला आळवुया
नाम प्रभुचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आल मोठा

ठाउक नाही मज काही
ठाउक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई
कशी होती रे माझी आई

वारा गाई गाणे
प्रितीचे तराणे
धुंद आज वेली
धुंद फुल पाने

ना निन्ना चिवा रामन्ना
तू रती नी मी कामन्ना
आधी साडी नी चोळी आण ना
मग जीवाची राणी म्हण ना
अय्यो रामा रामा
लफड्यात फसलो ना

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...

च येईल शेवटी अस समजून ...

चम चम करता है ये नशीला बदन
करना चाहे हर कोई मुझसे मिलन
मदभरे ये होंठ नशीले
पीने वाले पी कर जिले
कहती है ये आंखें शराबी
कर ले अपनी रात गुलाबी
बेताबी है तन में उठी है चुभन

नभं उतरु आलं,
चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात

तुझ्याविना
भास का हा तुझा
होत असे मला सांगना
लागते ओढ का अशी
सारखी तुझी सांगना
झालो अनोळखी
माझा मलाच मी
का सांगना
तुझ्याविना

हसणार कधी
बोलणार कधी
नाकावरच्या शेंड्याचा हा
राग जाणार कधी
हसणार नाही
बोलणार नाही
नाकावरच्या शेंड्याचा हा
राग जाणार नाही

IMG-20200215-WA0011.jpg