Submitted by मेधा on 19 April, 2010 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक जुडी चार्ड
एक छोटा लाल कांदा बारीक चिरून
कडिपत्ता, मोहरी , हिंग , हळद , तेल - फोडणीसाठी,
मीठ
दाण्याचं कूट १ मोठा चमचा भरून
दोन -तीन जाड्या लसूण पाकळ्या किसून
१ चमचा तिखट.
क्रमवार पाककृती:
चार्डची पाने धुवून , मधला देठ काढून बारीक चिरुन घ्यावीत.
तेलावर फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा मऊ झाला की चिरलेला चार्ड टाकून परतून मीठ घालावे. ३-४ मिनिटे झाकून शिजू द्यावे. मग तिखट, दाण्याचं कूट अन लसूण एकत्र करून ते भाजीत मिसळावे. नीट मिसळून एक वाफ काढावी. भाजी तयार!
वाढणी/प्रमाण:
२ -३ जणांना
अधिक टिपा:
चार्डची मिनोतीच्या रेसिपीने भाजी बरेच वेळा करत असते. यावेळेस ' कुछ अलग तरीकेसे बनाओ' अशी रिक्वेस्ट आली म्हणून केलेला प्रयोग.
माहितीचा स्रोत:
स्वतःचे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे रेसिपी. मला कधीपासून
छान आहे रेसिपी. मला कधीपासून खाऊन बघायची आहे चार्डची भाजी पण रेड चार्ड दिसतच नाही कुठे. आता इथे होल फूड्स आहे तिथे मिळतो का ते बघते.
आमच्याकडे इथे शॉपराईट मध्येही
आमच्याकडे इथे शॉपराईट मध्येही मिळतो चार्ड.मला हिरवा चार्ड अजिबात आणावासा वाटत नाही. मिनोतीच्या स्टाईलची भाजी आवडती कारण काहीच करायला लागत नाही.
चला आमच्या घरी आता एक नवीन
चला आमच्या घरी आता एक नवीन भाजी बनणार
मी कधी आणलीही नाही ही भाजी. आता करेन. थॅन्क्स मेधा!
चाड्र ची जुडी कशी असते? कुणी
चाड्र ची जुडी कशी असते? कुणी फोटु टाकु शकाल का?
माझी एक काकू लाल माठाची अशी
माझी एक काकू लाल माठाची अशी भाजी बनवते
मस्तच लागते.
चार्डचा एक फोटो इथे आहे. पाने नीट दिसत नाहीयेत. http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post_10.html
पण बीटची असतात तशीच असतात साधारणपणे.
धन्यवाद मिनोती!
धन्यवाद मिनोती!
सिंडी मोड ऑन रेड चार्ड
सिंडी मोड ऑन
रेड चार्ड म्हणजेच तुळस म्हणजेच वासाबी का?
शोनु- कृती छानै.
वेगळी वाटते आहे हि रेसिपी.
वेगळी वाटते आहे हि रेसिपी. ट्राय करेन.
रेड चार्ड आणि मसुर यान्चे दबदबीत पण छान लागते. गरम गरम चपाती बरोबर तर मस्तच.
माझ्या मैत्रिणीची आई अशी भाजी
माझ्या मैत्रिणीची आई अशी भाजी मेथीची करते. लई भारी लागते. चार्ड करुन बघते.
रैना, बघतांय हां
चार्ड मी पण केली नाहीये अजुन
चार्ड मी पण केली नाहीये अजुन कधी. आणते आता.
चार्ड काय असतो? कुट्टे मिळतो
चार्ड काय असतो? कुट्टे मिळतो ?
मीरा, तुम्ही कुठे आहात त्यावर
मीरा, तुम्ही कुठे आहात त्यावर अवलंबून आहे.
मला आत्ताच क्रोगरमधे नवलकोलची
मला आत्ताच क्रोगरमधे नवलकोलची भाजी मिळाली. वा वा. किती वर्षांनी खायला मिळणार.
इथे त्याला Kohlrabi म्हणतात.
एवढा आनंद झालाय की कुठे लिहावे हे न सुचून सरळ इथे लिहित आहे.
क्षमस्व.
मीरा, स्विस चार्ड किंवा रेनबो
मीरा, स्विस चार्ड किंवा रेनबो चार्ड नावाने गूगल करुन पहा. अमेरिकेन ग्रोसरी मधे मिळणारी पालेभाजी आहे.
मीरा हे बघ
मीरा हे बघ http://blog.fatfreevegan.com/images/rainbow-chard.jpg
मी सध्या चार्ड grow करत आहे,
मी सध्या चार्ड grow करत आहे, भाजी फारच सुन्दर लागते, माठाची भाजी सारखी. कालच चार्ड कापला, link - LINK to Chard
मी करु पाहिली ही, छान लागते.
मी करु पाहिली ही, छान लागते. आता नेहमी आणते मी चार्ड.
इथे बाकीच्या ईतर पालेभाज्या
इथे बाकीच्या ईतर पालेभाज्या मिळ्तात त्या कशा करायच्या? उदा. bok choy, kale, leek etc..
धन्यवाद