हिंदी शब्दान्ची मराठीत भेसळ

Submitted by किरण on 18 April, 2010 - 00:16

मुंबईत रहाणार्‍या मराठी माणसाला मराठी आणि हिंदी ह्यांची चांगलीच जवळीक(?) असते. मात्र ह्या भाषांत वापरले जाणारे काही शब्द 'स्पेलींग' (आता ह्याला मराठीत काय म्हणावे बरे?) अगदी सारखे असले तरी त्याचा अर्थ व संदर्भ वा दोन्ही अतिशय वेगळा असू शकतो. त्यातून कधीकधी विनोदी प्रसंग निर्माण होतात त्याचे वेगळे बाफ आहेतच मात्र मराठीत एखादा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ नये म्हणुन त्याचे दोन्ही भाषेतील अर्थ येथे लिहावेत. काही शब्द तन्तोतन्त सारखे नसले तरीही त्यात चुकीची शक्यता असेल तरीही लिहावेत पण शक्यतो अगदी सारखे असणार्‍या शब्दांना प्राधान्य द्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच दिवसांपासून हा विषय मनात होता पण नुकतेच इसकाळ मध्ये मराठी पाठ्यपुस्तकातील एका धड्यात ही सरमिसळ आढळली त्यामुळे हा धागा.

(सर्व अर्थ मराठीतच आहेत)

१. खाली
हिंदी शब्दाचा अर्थः रिकामा, रिता
मराठी शब्दाचा अर्थः निम्न, अधर (दिशा), 'वर' च्या विरुद्ध

२. गर्व
हिंदी शब्दाचा अर्थः अभिमान
मराठी शब्दाचा अर्थः दुराभिमान, पोकळ अभिमान, प्रौढी

ह्या शब्दाचा 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' ह्या चित्रपटात हिंदी अर्थ गृहीत धरुन 'गर्व' हा शब्द अनेकवेळा वापरण्यात आला आहे. 'गर्व से कहो हम हिंदू है' च्या चालीवर 'मला गर्व आहे मी मराठी असल्याचा' अशा धर्तीचे वाक्य त्यात आहे.

मराठीत गर्व असणे ही मिरवण्यासारखी गोष्ट नव्हे कारण तो खोटा अभिमान असतो. गर्वाचे घर खाली ही म्हण आणि गायीचा आकार घेणारी बेडकीणीची कथा सर्वांनाच माहित असेलच.

३. घास
हिंदी शब्दाचा अर्थः गवत
मराठी शब्दाचा अर्थः जेवताना तोन्डी घ्यायचा अन्नाचा तुकडा

४. बदला
हिंदी शब्दाचा अर्थः सूड
मराठी शब्दाचा अर्थः (आज्ञार्थी) बदल करा

(आता ह्यावर कोणी लूंगी सांगून फा. को. करु नये Happy हिंदी शब्द लूँगी असा आहे लूंगी नव्हे Wink

एक शाळेत असतानाच फेमस जोक आठवतोय

मगर आपल्या प्रियकराची वाट पहात असताना कुठलं गाणं म्हणेल?
चांद फिर निकला... मगर तुम न आये. Proud

मगर
हिंदी शब्दाचा अर्थः परंतू, पण, किंवा
मराठी शब्दाचा अर्थः प्राणी, crocodile

व्यस्त हा एक शब्द ही यात येतो का? हिन्दीत व्यस्त म्हणजे घाईत्/गडबडीत -बिझी. मराठीत विरूद्ध प्रमाण (सम - व्यस्त) असेच आहे ना? पण महाराष्ट्रात कोणी मोबाईलवर बोलत असताना फोन केला की ते 'व्यस्त असतात'

होय. बरोबर आहे तुझं. ते गर्व सारखच झाल.

अजुन एक शब्द आठवला. 'खाली'

हिंदीतला अर्थ : रिकामं असणे.
मराठीत : खालच्या बाजुला.

व्यस्त हा शब्दही ह्याच पठडीतला वाटतोय. पण खात्री नाही. कदाचित ह्या भेसळीमुळे बळी पडलेला शब्द असू शकेल! इतर जाणकार माहिती देतीलच.
सर्व अभिप्रायांबद्दल धन्यवाद. जवळ जवळ सगळ्याच अशा शब्दांवर काहीतरी विनोद असतोच!

बाबु
हिंदी : सरकारी कार्यालयात काम करणारा
मराठी : आता मराठीत काय सांगणार Proud , बाबुराव

भाग
हिंदी : पळ
मराठी : हिस्सा

हरा
हिंदी : हिरवा
मराठी : हरण्यासाठी सांगणे

पिला
हिंदी : पिवळा
मराठी : ज्याला जे आवडलं तो ते पिला Proud

श्री, बराच स्टॉक दिसतोय तुझ्याकडे.
ज्याला जे आवडलं तो ते पिला>>> चल!!! पिला हा शब्द मराठी नाहीये. ते पण हिंदीतच म्हणतात. मुझे पानी पिला. Happy

>>ज्याला जे आवडलं तो ते पिला << श्री पिला नाही प्यायला..

हिंदी - जीना (जगणे)
मराठी - जीना (पायर्‍या)

हिंदी - केला (केळं)
मराठी - केला (क्रियापद असल्याने उदा. त्याने अनुल्लेख केला. :फिदी:)

दादा
मराठी अर्थ : मोठा भाऊ
हिन्दी (दादाजी): आजोबा.

शिक्षा
हिन्दी अर्थ: शिक्षण
मराठी: Punishment अर्थानी वापरतात

मीठी आणि मिठी
( उच्चार एक च आहे, लिहिताना (बहुदा) हिन्दी मधला मी दीर्घ, मराठी मधला मि ह्रस्व.)
हिन्दी अर्थः गोड
मराठी अर्थ : अलिंगन.

मटका

हिंदी : मडके
मराठी : जुगाराचा एक प्रकार

खून

हिंदी : रक्त
मराठी : हत्या. [हिंदीतही बहुधा ह्या अर्थाने आहे हा शब्द]

कुंडी

हिंदी : कडी [कडी -कोयंडा मधील]
मराठी : मातीचे भांडे, ज्यात रोपे लावली जातात.
कन्नड अर्थ नकोच! Wink

दादरा

हिंदी : जिना
मराठी : बरणीच्या तोंडाला बांधायचे फडके

बन

हिंदी : वन
मराठी : बनणे क्रियापदाचे आज्ञार्थ रूप.

यातायात...

हिंदी : वाहतूक
मराठी : त्रास..... मला आज येताना खूप यातायात झाली.

मगर आपल्या प्रियकराची वाट पहात असताना कुठलं गाणं म्हणेल?
चांद फिर निकला... मगर तुम न आये. Proud
अमृता, हे खरंच मस्त होतं

तसंच अजून एक...
तवा
तवा आपली आत्मकथा गाण्यातून कशी सांगेल?
मी तवाs s s s कहे धडकने तुमसे क्या s s s s Lol

आणि अरुंधती, कुंडीच्या न सांगण्यासारख्या अर्थाबाबत कन्नड आणि तमिळ मधे साधर्म्य आहे Lol
जेव्हा जेव्हा मी कुंडी हा शब्दप्रयोग करते, तेव्हा तेव्हा माझा तमिळ नवरा ह.ह.ग.लोळतो!!!! Rofl

सानी, आमचे एक शेजारी महाराष्ट्रात स्थायिक झालेले कानडी गृहस्थ होते. आमच्या मजल्यावरच्या कॉमन पॅसेजमधील कुंड्यांसंबंधी आम्ही काही बोलायला लागलो की ते फक्त खुसुखुसू हसायचे आणि मान हालवत घरात निघून जायचे! Lol

हो ना अरुंधती, अर्थच असलाय ना Lol
माझा नवरा म्हणतो, भारताबाहेर आहेस तोवर ठिके, पण तमिळनाडूत गेल्यावर चुकूनही असं बोलू नकोस... Lol आणि गम्मत म्हणजे असे बरेच शब्द आहेत... आपल्या नेहमीच्या वापरातल्या 'काय' ह्या शब्दाचा सुद्धा असलाच वाईट अर्थ आहे तमिळमधे!!! Lol
आणि 'काल' म्हणजे 'पाय'!!!!!!!!! आता काय काय बोलायचे टाळावे म्हणते मी...:अओ: Lol
....ह्यावर एक वेगळा बी बी काढता येइल Lol

सिताफल
मराठी: सिताफळ नावाचं फळ
हिंदी: लाल भोपळा Happy
इथल्या मार्केटात मी सिताफल ओरडताना ऐकले म्हणुन गेलो तर त्या भैयाने लाल भोपळा ठेवला हातात Proud

कुंडीचे विनोद तर कर्नाटकात फारच होतात. आमच्या एका नातेवाईक बाईंनी बंगलोरला आमच्या घरी आल्यावर कानडी माळ्याला, ज्याला थातुरमातुर हिंदी कळायचं, "भैय्या, कुंडी में फूल लगाने से पेहेले जरा ठोक ठोक के मिट्टी भरो और ऊपरसे (हातातली पिशवी नाचवत) ये खाद भी डालो" असं बागेत मोठमोठ्यानी ओरडून सांगितलं. माळीबाबा आणि शेजारी फक्त हसून पडायचे बाकी होते.

अकु , सानी ,मृ Lol
एका केरळी मुलीने किडा दाखवत " ए श्री ## देख "म्हणाली , मी जागेवरच गचकायचा बाकी होतो. Proud
मना
हिंदी : नाकारणे
मराठी : मनात येणे वगैरे
सुना
हिंदी : सांग / ऐकले
मराठी : कोणीही नसलेला

चुना
हिंदी : निवड्ले
मराठी : पानाला / भिंतीला लावायचा चुना

खुन/ण
हिंदी : रक्त
मराठी : निशाणी

मृ Rofl

>>एका केरळी मुलीने किडा दाखवत " ए श्री ## देख "म्हणाली , मी जागेवरच गचकायचा बाकी होतो.
श्री कृपया गाळलेल्या जागा भरा Happy

शँकी तो शब्द लिहिण्यासारखा नाही , एखादा केरळी भेटला तर त्याला छोटा किडा / चिलट दाखवुन विचार ह्याला काय म्हणतात Proud

'घास'
आमच्या एका मित्राच्या लग्नानंतर काही दिवसांनी त्याच्याकडे गेलो असताना जवळजवळ सर्वजण मराठी होते व एक दोघेच हिन्दी होते. लग्नात घास भरवण्याच्या गोष्टी चालू असताना एका हिन्दी पंटर ने 'घास खिलाते है क्या?' म्हणून विचारले Happy

श्री, दक्षिणा, दीपांजली, अकु, डॉ. कैलास ह्यांना उपयुक्त भर घातल्याबद्दल धन्यवाद! अनेक शब्द आहेत हे माहित होते पण इतक्यातच एवढे शब्द जमा होतील असे वाटले नव्हते! इतर माहितीबद्दलही धन्यवाद.

शँकी, लाल भोपळ्याला खरोखर हिंदीत सिताफळ म्हणतात का? त्याला कद्दू म्हणतात ना? इतर कोणाला माहित आहे का?

तसेच 'व्यस्त' बद्दल काय म्हणणे आहे?

लोकल ट्रेन्स वेळेवर नसतील तर गाडियॉ 'अस्तव्यस्त' है असे म्हटले जाते. तो मराठीतल्या अस्ताव्यस्त शब्दाशी साध्यर्म दर्शवतो का?

किरण बरोबर आहे , हिंदीत अस्तव्यस्त म्हणजे विस्कळीत , मराठीतल्या अस्ताव्यस्त ला समान आहे .
बारीश से जनजीवन अस्तव्यस्त हो गया ! मुसळधार पावसाने जनजीवन अस्ताव्यस्त झालं.

पाव
हिंदी शब्दाचा अर्थः पाय
मराठी शब्दाचा अर्थः बेकरीतला पाव, देवा मला पाव.

ढेरी
हिंदी शब्दाचा अर्थः ढिग.. एक एक पैसे मे एक एक ढेरी| .. असं वाक्य होतं एका हिंदी धड्यात
मराठी शब्दाचा अर्थः सुटलेलं पोट

ताक
हिंदी शब्दाचा अर्थः प्रतिक्षा.. बिल्ली हमेशा दुध के ताक मे रहेती है|
मराठी शब्दाचा अर्थः प्यायच ताक.

भारी
हिंदी शब्दाचा अर्थः जड
मराठी शब्दाचा अर्थः चांगले, उच्च.

पाठ
हिंदी शब्दाचा अर्थः धडा
मराठी शब्दाचा अर्थः पाठ

शँकी, लाल भोपळ्याला खरोखर हिंदीत सिताफळ म्हणतात का? त्याला कद्दू म्हणतात ना? इतर कोणाला माहित आहे का?
====

हो लाल भोपळ्याला हिन्दीत कद्दूच (किंव्हा मध्य प्रदेश च्या काही भागां मधे काशीफल) म्हणतात. पण सिताफल हिन्दी आणि मराठीत एकाच फळाला म्हणतात.

पीठ

हिन्दी अर्थः पाठ (शरीराचा पृष्ठभाग)
मराठी अर्थ : चूर्ण, धान्य दळल्यावर होणारी भुकटी

शाम

हिन्दी अर्थ : संध्याकाळ
मराठी अर्थ : सावळा, एक नाव.

पाक

हिन्दी : पवित्र
मराठी : साखरेचा/ गुळाचा द्राव

Pages