सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2010 - 09:42

दुसया दिवशी दुपारी दोन वाजता अथक प्रयत्नांनंतर भाऊ अतिशय शांत झालेले होते. आपली सद्दी संपली आहे किंवा संपायला आली आहे असे विचार सर्वप्रथम त्यांनी झटकले. सकारात्मक पद्धतीने विचार करत त्यांनी हाताशी असलेल्या व हातातून गेलेल्या गोष्टींची मोजदाद केली. खरं पाहायला गेलं तर हातातून काहीच गेलेलं नव्हतं! उपप्रमुखपद मिळाले नाही याचा अर्थ ते हातातून गेलेले नव्हते. ते फ़क्त मिळाले नव्हते. ते मिळाले नसल्याची अनंत कारणे असू शकत होती. तसेच, ते मीनाला मिळण्याचीही अनेक कारणे असू शकत होती. मीनाचा आमदारांशी संबंध कसा आला असेल व तोही आपण केलेल्या बलात्कारानंतर याचा विचार ते करत होते. कारण त्या प्रसंगाच्या आधीच जर मीनाचा आमदारांशी संबंध असता तर त्याचवेळेस तिने आपल्याला धमकी दिली असती अन आपणही विचार केला असता. त्या अर्थी मीनाचा संबंध आमदार सोलापुरात आल्यानंतरच आलेला आहे. आता तशी संधी तिला कधी मिळणार होती यावर सर्वांगाने विचार केल्यावर त्यांना दोनच शक्यता वाटत होत्या. पहिल्या दिवशी रुग्णालयातील कार्यक्रम संपल्यावर रात्री! किंवा सेमिनारच्या दिवशी सकाळी, सेमिनारच्या आधी! कारण एरवी आमदार सतत भाऊंच्या किंवा कुणा ना कुणा कार्यकर्त्याच्या समोरच होते. फ़क्त रात्रीच ते न जेवता रूमवर गेले होते अन सकाळी सेमिनारसाठी रूमवरून आले होते. अजून काही वेळ विचार केल्यानंतर त्यांना जाणवले की सकाळी काय किंवा रात्री काय, जर परिचयच सोलापुरात झाला असेल व तोही गेल्या दोन दिवसात कधीतरी, तरीही आमदार तिला एकदम जिल्हा उपप्रमुख पद कसे देतील? त्याला आरोग्यमंत्र्यांची परवानगी मिळणे अगदी सहज शक्य होते कारण त्यांच्या मुलाचाच निर्णय होता तो. पण आमदारांना मुळात हा निर्णय घ्यावासा वाटण्यासाठी काय कारणे निर्माण झालेली असतील? एक म्हणजे, मीनाने त्यांना काहीतरी अचाट कथन केलेले असणार! तिच्यात किती क्षमता आहे, महिला प्रमुख असणे पक्षाच्या कसे फ़ायद्याचे आहे वगैरे! मात्र, आमदार काही दूधखुळा नाही. जुन्या लोकांना बिघडवून असले निर्णय घेणार नाही. त्यालाही वडिलांची भीती असणारच! समजा मीनाने आपल्याबद्दल काहीतरी सांगीतलेले असेल तर आमदार आपली हकालपट्टी करेल, तेही वडिलांना सांगून अन तेही आपले सोलापुरातील महत्व जोखल्यानंतर होणे अवघड आहे. केवळ अर्ध्या एक तासाच्या ओळखीवर असा निर्णय होणार नाही. बर, आपले कट्टर समर्थक कार्यालयातील तिची फ़ाईल पाहून तर शपथेवर सांगतायत की तिला कसलीच राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा आमदारांच्या घराण्याशी तिचा संबंध येण्याची कुठलीही शक्यताही नाही.
याचा अर्थ एकच आहे. मीनावर आमदार लट्टू आहे. आणि लट्टू होण्याइतका त्या दोघांचा संबंध आहे.

त्याशिवाय असे कसे होईल?

ठीक आहे. म्हणजे, कोणत्याही समाजमान्य नसलेल्या नात्याच्या आकर्षणात आत्ता दोघे तरूण जीव आहेत. त्याचा पर्दाफ़ाश सहज होऊ शकेल. मीनाला लवकरच आमदार उस्मानाबादला बोलवतील. आपले लोक नीट लक्ष ठेवतील. आपल्याला ते पद लगेचच मिळवता येईल. फ़क्त, आमदारांवर प्रेशर आणायला हवे.

ठीक आहे. हा एक मुद्दा संपला. आता आपला मूळ धंदा! सी.डी.! यात काय प्रॊब्लेम आहे? काहीच नाही. उलट मीनाची सी.डी आपल्याकडे आहे. त्या जीवावर आपण तिला खेळवु शकतो. नंदनची कोठडी, अटक सगळे रद्द करू शकतो. ती काय म्हणाली? स्वत:च्या तोंडाने मान्य करेन की या दोघांनी माझ्यावर बलात्कार केला पण या दोघांचा मुखवटा फ़ाडेन! असे करू शकेल ती? एक सेकंद तरी तिला कुणी पक्षाच्या पदावर ठेवेल? शक्यच नाही. उलट, तिला भयानक भीती असेल की आपण जर ती सी.डी. आमदारांना किंवा सोलापुरात कुणाला दाखवली तर तिची काय अब्रू राहील? मीना आपल्या हातात आहे. आणि आपण तिच्या हातात असल्यासारखे घाबरत आहोत.

आता नंदन! बिचारा पडलाय चौकीवर! महिला मोर्चे काय काढतायत अन काय काय चाललंय! चार दिवसांनी विसरून जातील. पण नंदन जर काही बरळला तर? तेही शक्य नाही. कारण तो जे बरळेल ते वाघमारे कॆन्सल करेल रिपोर्टमधून! वाघमारेला आपण हप्ता अन शर्मिला असदोन्ही पुरवलेले आहे. तो विश्वासघातकी होणारच नाही. कारण त्यात पुन्हा तोच अडकू शकतो हेही त्याला माहीत आहे.

आपला हा बंगला! हा कुणाला दिला जाणार आहे? मीनाला! पण मीनाच जर आपल्या ताब्यात असेल तर बंगल्यात ती येणारच नाही. उलट आमदाराला सांगेल की भाऊंचे वय आता पन्नाशीच्या पुढे आहे, त्यांना या वयात कशाला हालवाहालव करायला लावायची? बंगल्यातून हालायचेच नाही.

वाघमारे, दादू, माधव हे लोक सगळ्यापासून तसे दूर आहेत. नंदनचे प्रकरण बाहेर पडायला तो शांताराम कारणीभूत ठरला. अन्यथा तेही झाले नसते. बारटक्केचाही प्रश्न नाही. त्याच्या विशाल लॊजचा उल्लेख होणे शक्यच नाही कारण मीनाची स्वत:चीच अब्रू त्यात जाईल. मेहताला शुटिंगची इतरही कामे भरपूर असतात. त्याच्या मिळकतीवरून त्याच्यावर कुणीच संशय घेणार नाही.

आता महत्वाचा एकमेव प्रश्न राहिला तो म्हणजे शर्मिला! ही दिल्लीला का गेली आहे, कधी येणार आहे ते माहीत नाही. फ़ार फ़ार तर काय, ती आपला अपमान करते. पण त्याचेही कारण हेच आहे की रॆकेटमधे ती सगळ्यात महत्वाची आहे असा तिचा भ्रम झाला आहे. तो काढता येईल. बग्गाला फ़ोन करून ’सहा महिने काम बंद ठेवावे लागत आहे’ असे सांगायचे अन तेच शर्मिला अन नंदनला सांगायचे. पैशाची चणचण भासली की येतील लायनीवर!

एकूण काय! तर आपला इगो नडला. वास्तविक पाहता शांतपणे घडलेल्या घटना बघत बसलो असतो अन आगपाखड केली नसती तर उगाच हा त्रास झालाच नसता.

भाऊंनी स्वत:वरच खूष होत सदूला हाक मारली.

सदू - हा साहेब
भाऊ - पुरंदरेला फ़ोन कर...
सदू - केलाय साहेब.. गाड्या येतायत
भाऊ - पुरंदरेला फ़ोन कर (आता आवाजात जरब होती.) आणि म्हणाव शिफ़्ट होणार नाहीये. गाड्या घेऊन जा.

तब्बल पाच सेकंद अविश्वासाने पाहात सदू दारातच उभा होता. त्याला पाहून भाऊ जेव्हा तडकून बोलले तेव्हा तो हालला. पहिली बातमी मीनाला देऊन मग त्याने पुरंदरेंना कळवले.

दहा मिनिटांनी भाऊंनी वाघमारेला फ़ोन केला. प्रकरण कुठपर्यंत आलं आहे हे समजल्यावर गुप्ततेसाठीच्या योग्य त्या सूचना देऊन फ़ोन ठेवला. वाघमारेने सगळे ऐकून होकार भरलेला होता. आता वाघमारेच्याच लेव्हलला योगिता प्रकरण संपणार होतं!

तिसरा फ़ोन भाऊंनी थेट आरोग्यमंत्र्यांना केला.

आरोग्यमंत्री जवळपास तीन मिनिटांनी लाईनवर आले.

भाऊ - सर.. सर गुडनून सर...
आरोग्यमंत्री - काय रे बनसोडे? ठीक आहेस ना?
भाऊ - अगदी.. अगदी सर...
आरोग्यमंत्री - बोल
भाऊ - आता..
आरोग्यमंत्री - बोल बोल, पटपट बोल.. अर्जंट आहे का काही?
भाऊ - होय सर... मला निवृत्तीची परवानगी मिळावी अशी विनंती करायची होती.
आरोग्यमंत्री - का? ( त्यांच्या स्वरात आश्चर्य उघड ऐकू येत होते.)
भाऊ - आता तरूण समर्थ अन तडफ़दार हातांमधे पक्षाची धुरा आहेच.
आरोग्यमंत्री - तू म्हातारा झालास का? आमच्याहून बारा वर्षांनी लहान आहेस
भाऊ - (हसत हसत) नाही नाही सर! कार्य करणारच की पार्टीचं! आपलं हे कार्यकारी पद आता पेलेनासं झालं आहे.
आरोग्यमंत्री - तुझं त्या नवीन मुलीबद्दल काय मत आहे?
भाऊ - सर अतिशय तडफ़दार आहे. एकाच दिवसात अनेक चांगल्या कामांचा आरंभ झाला तिच्यामुळे.
आरोग्यमंत्री - आरंभ झाला? मग तीच कामे तू का करत नव्हतास इतके दिवस?
भाऊ - (पुन्हा हासत) सर.. आरंभ झालाय, मी कामं तडीला नेणारा माणूस आहे.. आपण जाणताच, नुसता आरंभ करणारा नाही.
आरोग्यमंत्री - पण ही मुलगी माहितीतली आहे का? का बंडाच्या एकट्याच्याच ओळखीची आहे?
भाऊ - मलाही अजून नीट काही समजलेले नाहीये तसे, पण मी चेक करून सांगतो.
आरोग्यमंत्री - थोरले बंधू कसे आहेत तुझे?
भाऊ - ठीक आहेत सर! ते अकोल्याला असतात.
आरोग्यमंत्री - बर तू आता निवृत्ती वगैरे सगळं विसर! तुझी साथ मोलाची आहे पार्टीसाठी
भाऊ - आता अपमान पण नाही पुर्वीसारखे सहन होत दादा (भाऊ पक्षस्थापनेच्या वेळेस मंत्र्यांना दादाच म्हणायचे. पुढे पुढे हे ’सर, सर’ चालू झालं होतं. ’दादा’ अशी हाक मारल्याचा आरोग्यमंत्र्यांना राग येणे शक्यच नव्हतं)
आरोग्यमंत्री - अपमान? तुझा कुणी अपमान केला बाबा आता?
भाऊ - आता नवे लोक आले की जुनी खोडं कशाला सन्मानाने जगणार?
आरोग्यमंत्री - हे बघ, काय झालं ते सांग
भाऊ - आता या वयात मला शिफ़्टींग करायचा हुकूम आलाय. काय सोसणार मला?
आरोग्यमंत्री - कुणी सांगीतलं शिफ़्टींग करायला
भाऊ - सचिवांनीच सांगीतल दादा
आरोग्यमंत्री - मानेनी? कधी?
भाऊ - काल सकाळी फ़ोन आला होता.
आरोग्यमंत्री - ऎ? हे आम्हाला कसं माहीत नाही. मी बघतो. तू काही शिफ़्ट वगैरे होऊ नकोस.
भाऊ - आता बंडाभाऊसाहेबांनी सांगीतलं म्हंटल्यावर
आरोग्यमंत्री - बंडा म्हणाला तुला शिफ़्ट व्हायला?
भाऊ - नाही.. म्हणजे तसे ते अजून लहान पडतात सर
आरोग्यमंत्री - मी बघतो. बोलतो त्याच्याशी. तू शिफ़्ट होऊ नकोस..
भाऊ - जसा आपला हुकूम दादा. ही नवीन मुलगी आली आहे तिच्यासाठी हा बंगला देणार होते.
आरोग्यमंत्री - तिच्यासाठी दुसरी जागा बघ! तूच बघ स्वत: जातीने! आणि आम्ही सांगीतलंय म्हणून सांग! मी मानेला सांगतो लेटर द्यायला.

मुरब्ब्याप्रमाणे बोलून भाऊंनी बंगला वाचवला होता. पण आरोग्यमंत्र्यांना व्यवस्थित माहीत होते की त्यांचा सचिव माने याने भाऊंना मंत्र्यांच्याच सांगण्यावरून फ़ोन केला होता. भाऊंसारखा माणूस अचानक निघून गेला तर पक्षाला धक्का बसणार होता. त्यामुळे अभिनय करून त्यांनी भाऊंना खूष केले.

तेवढ्यात फ़ोन आला.

भाऊ - हॆलो
पुरंदरे - साहेब पुरंदरे बोलतोय
भाऊ - बोला..
पुरंदरे - शिफ़्टींग पुढे ढकललंय का साहेब?
भाऊ - रद्द केलंय! काही अडचण नाही ना?
पुरंदरे - नाही नाही साहेब, अडचण कसली?

भाऊंनी आमदारांना फ़ोन लावला.

बंडा - अरे भाऊसाहेब?
भाऊ - साहेब नमस्कार
बंडा - बोला बोला बोला बोला... काय म्हणताय?
भाऊ - काही नाही, म्हंटल आपल्याला परस्पर कळलं तर काहीतरी गैरसमज व्हायचा, म्हंटलं आपणच कळवाव...
बंडा - काय झालं?
भाऊ - साहेबांना फ़ोन केला होता मी
बंडा - बाबांना?
भाऊ - हां! ते या महिन्याच्या मुंबई मीटिंगची व्यवस्था करायची होती ना? त्याबाबत!
बंडा - मग?
भाऊ - बोलता बोलता त्यांनी विचारलं म्हणून मी आपली माझी परिस्थिती सांगीतली.. की वयामुळे शिफ़्टिंगचा त्रास होतो वगैरे!
बंडा - बर... मग? (आमदाराला काय झालेलं असणार याची कल्पना येऊ लागली होती. बाबा भाउंचं ऐकून घेतात हे त्याला माहीत होतं)
भाऊ - साहेबांनी मोठ्या मनाने परवानगी दिली इथेच राहायला. म्हंटल आपला काहीतरी गैरसमज व्हायचा..
बंडा - छे छे? अहो काहीतरी काय? बाबा काय, तुम्ही काय? तुम्ही सांगायचंत आम्ही ऐकायचं! तुमच्या कडेवर खेळलेली पोरं आहोत आम्ही!
भाऊ - असंच काही नाही बर का साहेब? तुमची तडफ़ आम्हाला फ़ार आवडते.

किरकोळ स्तुतीसुमने दोन्ही बाजूने उधळली गेल्यावर फ़ोन बंद झाला. आमदारांनी तिकडे मीनाला फ़ोन करून ती बातमी सांगीतली व दोन दिवस दम धरायचा सल्ला दिला.

आणि... केवळ लॊजिकली विचार करून भाऊंनी पंधरा मिनिटात एक मोठा विजय मिळवलेला होता.

खुष झाले काय किंवा दु:खी झाले काय! त्यांना पहिली आठवण यायची शर्मिलाची! भाऊंनी शर्मिलाला फ़ोन लावला. चक्क ती घरात होती.

भाऊ - दिल्लीला गेलीच नाहीस?

शर्मिला काल रात्रीच्या दिल्ली पुणे फ़्लाईटने पुण्याला आली होती अन सकाळची लवकरची बस पकडून बारा वाजता सोलापुरात आली देखील होती. आता भाऊंना खोटे सांगावे की काय असेही एकदा तिला वाटून गेले. पण तो विचार तिने दूर केला. कारण मधेअधे त्यांनी फ़ोन केलेला असला अन कुणीच उचलला नसला किंवा कुणीतरी स्टेशनवर वगैरे पाहिलेले असले तर घोळ व्हायचा. त्यात तिला आल्या आल्या मोठमोठाल्ले धक्के बसले होते. त्यामुळे ती आनंदाच्या शिखरावरून एका क्षणात घसरून पाताळात जाऊन पडली होती. मीना जिल्ह्याची उपप्रमुख झाल्याचे समजले. नंदन पकडला गेला हेही समजले. काही विचित्र झालेच तर पुन्हा चंदीगडला निघून जाण्याचा तिने विचार केलेला होता. पैसा होताच, पण आता कुणीतरी कायमस्वरुपी साथीदारही जवळ असावा असेही वाटू लागले होते. शारिरीक सुखातील गोडी एकवेळ नाही मिळाली तरी निदान बोलायला, विचारायला तरी कुणीतरी असाव असं तिला वाटू लागलं होतं! बग्गाने स्वीकार केल्यास त्याला त्या कामात मदत न करता केवळ त्याचं घर सांभाळायलाही ती मनातून तयार झाली होती. पण खूप विचार करकरूनही तिला असे एकही नाव आठवत नव्हते जे गुन्हेगारी विश्वातले किंवा गलिच्छ राजकारणातले नाही. आयुष्यात प्रथमच तिला शैलेशची आठवण झाली. काही असो, त्याचे प्रेम नि:स्वार्थी होते. योगेशलाही आपण जाळ्यात ओढले. आज चाळिशी आली. चटक तर लागलेलीच आहे. पण आता आपण अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो बग्गा आग्रह करत होता तसे आठ दिवस तिथे राहून बघायला हवे होते. कसा वागतो, पुढे कधीतरी तो खरंच प्रेमही करू शकेल की नुसताच शरीरावर प्रेम करतो. घरात कसा वागतो वगैरे तपासायला मिळालं असतं! नाहीतर काय? आहेच अल्वरला जाण्याचा प्लॆन!

शर्मिला - गेले होते... का?
भाऊ - इकडे रामायण झालंय!
शर्मिला - एक दिवस होणारच होतं हे!
भाऊ - शर्मिला, आज बंगल्यावर येतेस?

शर्मिलाच्या मनात वेगळाच विचार आला. आपण मुळातच एक श्रीमंतीचे व जमेल तितक्या पुरुषांना जाळ्यात ओढण्याचे वेड असलेली स्त्री होतो. भाऊंनी आपल्याला या कामाला लावले. आपण जे आधी करत होतो त्यापेक्षा हे काम काही फ़ार वेगळे आहे असे नव्हते. आपण आधीही अत्यंत वाईट कामच करत होतो. उलट या कामामुळे आपण रहीस झालो. आपण रहीस झालो तेव्हाही भाऊ आपल्याला बोलवायचे. आपल्यावर काही अडचण आली तरीही ते आपल्याला जमेल ती सगळी मदत करायचे. आज त्यांची अशी परिस्थिती झाली आहे आणि ते आपल्याला हाक देतायत.

शर्मिलामधील स्त्री आज मनापासून द्रवली. आयुष्यात पहिल्यांदाच! ’ते कुणीतरी आपले’ ’भाऊ’च का नसावेत? तिने स्वत:लाच विचारले.

शर्मिला - येते... येते भाऊ मी..

भाऊ मात्र दोन दोन विजयांच्या शिखरांवर होते. बंगलाही वाचला अन शर्मिलाही मऊ झाली.

एका महास्फ़ोटाची कल्पना दोघांनाही नव्हती... अन तो स्फ़ोट त्यांच्यातच होणार होता.

शर्मिलाने आज प्रयत्नपुर्वक स्वत:ला सजवण्याकडे लक्ष पुरवले. भाऊसाहेबांच्या आवडीनिवडी तिला माहीत होत्या. आज भाऊंनी आपली आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिलेच पाहिजे या इच्छेने ती त्यांना जमेल तितके खुष करणार होती. एकत्रच अल्वरला स्थायिक व्हायचा प्लॆनही सांगणार होती.

इकडे भाऊंनी स्वत:च्या बुद्धीमत्तेचे अभिनंदन स्वत:च करण्यासाठी खास जपून ठेवलेल्या बाटल्यांमधील एक महागडी स्कॊचची बाटली काढली.

पहिला पेग घेतानाच त्यांनी मीनाला फ़ोन लावला.

भाऊ - बनसोडे बोलतोय मीनामॆडम

भाऊंच्या स्वरात उपरोध होता की नव्हता याची मीनाला कल्पना येत नव्हती. तिला तो बंगला मिळणार नाही याचे मुळीच दु:ख नव्हते. पण त्याच बंगल्यात आजवर तिच्यासकट अनेक मुलींच्या बाबतीत पापकृत्ये झालेली असणार होती. त्यामुळे निदान तो बंगला या नालायकाला मिळू नये इतकीच तिची प्रामाणिक इच्छा होती.

पण मगाशीच सदूने स्वत:च्या बायकोमुलांची शपथ घेत ’काम झाल्याचे’ सांगीतले होते. त्यामुळे मीनाला फ़ारशी भीती वाटत नव्हती.

त्यामुळे तिने याच फ़ोनवर बोलून भाऊंच्या आजवरच्या वागण्याचे जमेल तितके उट्टे काढायचे ठरवले.

मीना - कुत्र्यांना माणसांसारखी नावं असतात हे माहीत नव्हते.

भाऊंचा चेहरा हिंस्त्र झाला होता. या पोरीशी कसे बोलावे हे त्यांना समजत नव्हते. आयुष्यभर राजकारणात मुरब्बीपणे बोलल्यामुळे तोंडावर वाट्टेल तसे बोलण्याची सवय कमी झालेली होती. आत्ता मीनाने पुन्हा कुत्रा असा उल्लेख केल्यावर त्यांचे बी.पीच वाढले पण शेवटी राजकारणी ते राजकारणीच!

भाऊ - बोला मॆडम, बोला हवे ते! आम्ही आपले साधे कार्यकर्ते...
मीना - फ़ोन का केलास?
भाऊ - अजून आम्हाला आपण अरे तुरेच करताय मॆडम! पण आपला हक्क आहे तो.
मीना - फ़ो..न..का..के..ला..स?
भाऊ - आरोग्यमंत्र्यांनी मला आपल्याला निरोप द्यायला सांगीतलं होत मॆडम!
मीना - कसला?
भाऊ - आपल्यासाठी मी आता एक चांगली जागा बघणार आहे... जेथे आपण व आपल्या मातोश्री..

मीनाने फ़ोन आपटला.

भाऊ खदखदून हसायला लागले.

दोन मिनिटांनी त्यांनी पुन्हा फ़ोन लावला.

भाऊ - माझ्या बंगल्याला आठवण आलीय तुझी... म्हणून पुन्हा फ़ोन केलाय... आज रात्री नऊ वाजता यायचं! काय? नाहीतर सी.डी. थेट आरोग्यमंत्र्यांना पाठवायचा विचार केलाय आम्ही! समजलं का?
मीना - येईन! नक्की येईन.. नऊ वाजता... तयार राहा!

काय बोलली ही? येईन? येईन म्हणाली? असं कसं झालं? काहीतरी घोळ आहे. निश्चीतच! भाऊ विचार करत होते. मीना नऊ वाजता इथे यायला इतकी झटकन कशी तयार झाली?

भाऊंनी वाघमारेला फ़ोन केला व स्वत:साठी दोन सुरक्षा रक्षक पाठवायला सांगीतले. वाघमारे असे कुणाच्याही सांगण्यावरून पोलीस तैनात करू शकत नव्हता. निदान रक्षक म्हणून तरी! त्याने वाद घातला. भाऊंनी झापल्यावर तो स्वत:च यायला तयार झाला. वाघमारे येणार म्हंटल्यावर भाऊंना जरा बरे वाटले. निदान पक्षाचे लोक आणून जबरदस्तीने मारहाण वगैरे करून बंगला खाली करायची धमकी तरी आता मीना देऊ शकणार नव्हती. आता आलीच तर ती सी.डी. फ़क्त मागायला येईल.

ग्लेनफ़िडिशचा एक भला मोठा पेग तयार करून त्यांनी सदूला हाक मारली. पॆक केलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा जागच्याकागी लावायला सांगीतले. सदू बधीर झाल्याप्रमाणे ऐकत होता.

सदू निघून गेल्यावर भाऊ शर्मिलाच्या आगमनाची वाट पाहात बसले. बरेच दिवसात शर्मिलाचा निवांत सहवास त्यांना मिळालाच नव्हता. कधी एकदा ती येतीय असे त्यांना झाले होते. गेल्या दोन चार दिवसांमधील तिने केलेल्या सर्व अपमानांचा तिला योग्य तो मोबदला द्यायला हवा होता.

आणि शर्मिला आली....

शर्मिलाकडे भाऊ बघतच बसले. ती मनमोकळेपणाने निखळ हसली. भाऊ पागल झाले. शर्मिलाकडे बघताना त्यांना त्यांचे तिने केलेले सर्व अपमान विसरायला झाले. आज शर्मिला जणू अप्सरेसारखी भासत होती.

भाऊ - आय हाय हाय हाय! आज किसपे इतने मेहेरबान हो....?

शर्मिला पुन्हा हसली. आत्ताचे तिचे हसू हे एखाद्या लाजलेल्या विवाहीत स्त्रीप्रमाणे होते. डोळ्यात स्वप्ने असावीत तसे डोळे झाले होते तिचे. आणि भाऊंना वाटत होते की तिला लक्षात आले आहे की आपल्यासमोर ती तुच्छ आहे.

भाऊ - ग्लेनफ़िडिश! घे! खास तुझ्यासाठी
शर्मिला - आत्ता नको...
भाऊ - का?
शर्मिला - अंहं!
भाऊ - काय झालं?
शर्मिला - तुम्ही घ्या. मी बनवते पेग तुमच्यासाठी.

भाऊ आणखीनच हवेत गेले. साली जमीनीवर आलेली दिसतीय! आता थोड्याच वेळात हिने केलेल्या अपमानांचा सूड घेता येईल.

भाऊ - इथे बस.. (भाऊ आपल्या शेजारी हात आपटत म्हणाले)

शर्मिला हळूच तिथे येऊन बसली. भाऊंनी तिला आपल्याकडे ओढले.

बंगल्यावर त्या रात्री मीना येऊन गेल्यापासून भाऊंना हे सुख मिळालेच नव्हते. रोज काही ना काही विचित्र घडत होते. आता शर्मिला स्वखुषीने त्यांच्या ताब्यात आली होती. तसेच, हे नाते बेकायदेशीरही नव्हते अन दोन्हीकडून रजामंदी होती. भाऊ धसमुसळेपणाने वागू लागले.

दिड तासाने त्यांची इच्छा पूर्ण झाली. दोन नग्न शरीरे एकमेकांच्या मिठीत सुस्तपणे पहुडलेली होती. शर्मिलाच्या मनात होते की भाऊंशी आता विषय काढावा. भाऊंच्या मनात होते की आता हिचा पाणउतारा करायची संधी आलेली आहे.

शर्मिला - अं! महत्वाचं बोलायचंय थोडं!
भाऊ - बोल...
शर्मिला - आपल्याकडे आता जन्मभर पुरेल इतका पैसा आहे.
भाऊ - का? त्याचं काय?
शर्मिला - आता हे सगळं सोडावसं वाटतं!
भाऊ - काय?
शर्मिला - हेच! तुमची इतकी धावपळ, ही राजकारणातली घाणेरडी स्पर्धा, आपलं हे सी.डी. चं काम!
भाऊ - का?
शर्मिला - शांतपणे जगावसं वाटतंय आता
भाऊ - अच्छा! म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हजको... आं?
शर्मिला - चेष्टा नाही करत मी.. खरंच वाटतं आता आता
भाऊ - ते सगळं जाऊदेत.. चल ... ये इकडे...
शर्मिला - ऐका ना ...
भाऊ - पहिलं काम होऊदेत... मग तू बडबड कर...
शर्मिला - मी आहेच की तुमचीच...
भाऊ - आणि वाघमारेची ... आणि आमदाराची

शर्मिलाच्या डोळ्यात अगदी क्षणभर म्हणजे क्षणभरच हिंस्त्र भाव आले होते. पण त्याच क्षणात तिने तो अपमान गिळला. भाऊ अजून आपले म्हणणे सिरियसली ऐकतच नाहीयेत त्यामुळे असे मजेत बोलतायत असे तिने गृहीत धरले.

शर्मिला - ऐका ना... आजवर झालं ते झालं.... यापुढे आपण अल्वरला जायचं का?
भाऊ - अल्वर? अल्वर म्हणजे?
शर्मिला - राजस्थानातलं गाव आहे एक. खूप छान आहे. दोघंच राहायचं तिथे..
भाऊ खूप वेळ हसत होते. शर्मिला निराश तोंडाने त्यांच्याकडे बघत होती.
भाऊ - तुला मधून मधून झटके येतात वाटतं!
शर्मिला - ऐका तरी...माझा बंगला विकते. आपल्या दोघांचा बॆन्क बॆलन्स आहेच! एक छोटेखानी घर घेऊ
भाऊ - दिल्लीला गेली होतीस का अल्वरला?
शर्मिला - दिल्लीला
भाऊ - का? दिल्लीला कोण असतं?
शर्मिला - खरं सांगू? तुम्ही सारखे चिडायचात म्हणून मी काही बोलले नव्हते.
भाऊ - काय?
शर्मिला - दिल्लीला अल्वरच्या बंगल्याचा मालक राहतो.
भाऊ - मग?
शर्मिला - त्याला भेटले. अकरा लाखात ते घर मिळेल.
भाऊ - डोकं फ़िरलं का?
शर्मिला - इथे राहून काय होतंय? सारख टेन्शन... आता भरपूर पैसे आहेत आपल्याकडे...
भाऊ - तुला काय वाटतंय? मी तुझ्याबरोबर तिकडे येईन?

पुन्हा भाऊ हसू लागले.

शर्मिला - हसू नका. नीट विचार करा. तुम्ही आता पंचावन्नचे आहात जवळपास, माझीही चाळिशी आलीय. यापुढील आयुष्य शांततेने जायला नको का? आजवर दोन तीन वर्षं आपण एकमेकांची इतकी छान साथ दिलीय. शेवटी स्थैर्य पाहिजेच की नाही? आजवर आपण चांगले वागत नव्हतो. लोकांचे शाप मिळाले. मी काही फ़ार मोठी संत नाही. पण निदान आता ही असली टेन्शन्स सहन होत नाहीत भाऊ! आता नंदनला पकडलंय! उद्या वाघमारेची बदली झाली किंवा मीनासारखीने स्वत:ची अब्रू पणाला लावत आपल्याबद्दल काही सांगीतले तर आपण आतच जाऊ! मग आपल्याला कुणीही वाचवणार नाही. आत्तापर्यंतच्या मी मिळवलेल्या पाच अन त्या आधी तुम्ही ज्या काही मुलींना फ़सवलं होतंत त्या सगळ्यांच्या घरचे त्यावेळेस साक्षी देतील. आपण मुद्देमालासकट पकडले जाऊ. काल त्या हॊस्पीटलमधल्या मुलीवर त्या माणसाने जबरदस्ती केली. उद्या आणखीन काहीतरी होईल. आज जे कार्यकर्ते तुम्हाला जिवाभावाची साथ देतात ते उद्या आपल्याला पाहून रस्ता बदलतील. आज आमदारसाहेब, मंत्रीसाहेब तुमचं ऐकतात. हे मी स्वत:ही पाहिलेले आहे. त्यावेळेस आपल्याला कुणीही विचारणार नाही. सगळे अंग झटकून मोकळे होतील. रागारागात मी परवा तुम्हाला काहीतरी बोलून गेले. तुम्हीपण मला वाघमारेकडे पाठवलंत! पण हे सगळं विसरून जाऊ शकतो आपण! अल्वर खूप छोटेसे अन छान गाव आहे. हिंदी बोलतात एवढंच! तिथे आपला हा इतिहास कुणाला माहीत नसेल. आरामात नवरा बायकोसारखे जगू शकू आपण! एखादा मुलगा दत्तक घेऊ! त्याला वाढवू. मला आता हे सगळं टेन्शन नकोसं झालं आहे. परवाच मी घरी होते तेव्हा तुमचा रात्री अकरा साडेअकराला फ़ोन आला होता. ती मीना आमदारांना कशी भेटली म्हणून तुम्हाला काळजी वाटत होती. आता ती पुढारी झालीय. तिने नंदनलाही अडकवलंय! तिच्यावर तुम्ही जबरदस्ती केलीत हे ती कधीच विसरणार नाही. एखादवेळेस नंदनला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून जबाब लिहून घ्यायला सांगेल ती वाघमारेला. वाघमारेला तिचं ऐकावच लागेल. आपण अडकत चाललो आहोत भाऊ! खूप आत आत अडकत चाललो आहोत. फ़ासे पलटलेले आहेत. तसले काही होण्याआधीच नवे आयुष्य सुरू करू! मी तुम्हाला जन्मभर साथ देईन. विश्वास ठेवा. हा रस्ता सोडून देऊयात आपण....
शर्मिला जवळपास पंधरा मिनिटे बोलत होती. भाऊ तिच्या शेजारी पडून ग्लेनफ़िडिशचा आस्वाद घेत होते. तिचे बोलणे संपल्यावर भाऊंनी पुन्हा तिला आवळली.

शर्मिला - ऐका ना... आधी मी काय म्हणते त्यावर बोला ना...

भाऊ पुन्हा हसायला लागले. शर्मिलाला एकंदर काळजीच वाटू लागली. भाऊ बहुतेक आपले ऐकणार नाहीत याची जाणीव तिला व्हायला लागली. भाऊ पुन्हा तिच्या शरीराशी खेळू लागल्यावर ती झटकन उठून बसली. भाऊंच्या मनाचा ताबा स्कॊचने घेतलेला होता.

शर्मिला - भाऊ! खरच विचार करा.. परिस्थिती फ़ार गंभीर आहे..
भाऊ - वेश्या पुन्हा संसारात येत नसते. बकवास करू नको. चल.. झोप इथे..
शर्मिला - भाऊ.. ऐकून घ्या.. आपण अडकणार आहोत...
भाऊ - गप्प बस! तू कोण मोठी संतीण आहेस? अडकलीस तर तूच अडकशील! मला सुटायला एक दिवस पुरेल..
शर्मिला - असे बोलू नका. मी सुधारायला तयार आहे.
भाऊ - असले बोलणे धंदेवाल्यांना शोभत नाही. पैसे दिसले की कपडे काढायचे.. जास्त विचार करायचा नाही
शर्मिला - मला राग येईल भाऊ.. मी मनापासून सांगतीय सगळं
भाऊ - राग गेला ********! चल.. चल.. मला तू पेलतेस का तुलाच मी पेलत नाही हे बघू...
शर्मिला - ते जाऊदेना... आत्ता आधी ही चर्चा करा.. तुमच्या लक्षात येत नाहीये..
भाऊ - माझा बाप आहे नाही का दिल्लीला? ऒं? तुझ्या दिड दमडीतल्या अर्ध्या दमडीवर जगतो नाही का मी? दलाल म्हणलीस.. हो की नाही?
शर्मिला - नाही.. ते सगळं सोडून देऊ...
भाऊ - ******! एक फ़ोन केला तर जन्मभर जेलमधे सडशील तू...
शर्मिला - भाऊ.. दूर व्हा..

शर्मिला जोरात भाऊंपासून दूर झाली. तिचा भ्रमनिरास झाला होता. ती संतप्त मनाने कपडे घालायला लागली.

भाऊ - साली रांड! मला शिकवते...
शर्मिला - एक शब्द बोलू नका. (आता शर्मिला चवताळली होती.)
भाऊ - सतरा जणां** **** बाईबरोबर राहात नाही आम्ही..

आता मात्र शर्मिला ऒफ़ झाली. तिचा संपूर्ण संयम सुटला. बाई चवताळते तेव्हा कशी दिसते, कशी वागते याचं प्रत्यंतर भाऊंना आलं!

शर्मिला - असल्या बाईच्याच पोटी जन्माला आलेला असशील तू
भाऊ - ए... कोणाशी बोलतीयस?
शर्मिला - अरे तुझ्याशी (आत्तापर्यंत चढते आवाज ऐकून सदू दारात पोचला होता. शर्मिलाचे असे अर्धनग्न रूप पाहून तो पटकन बाजूला झाला)
भाऊ - तुला आज वाघमारेकडेच धाडतो... तुझी लायकीच ती आहे... सडून मरणार आहेस तू
शर्मिला - अरे तो बरा.. एकाच **चा आहे...

भाऊ तसेच उठले व त्यांनी शर्मिलाच्या खाडकन कानसुलात भडकवली. शर्मिला अतिशय संतापलेली होती. तिने तिथला फ़्लॊवरपॊट उचलून भाऊंच्या तोंडावर जोरात आपटला. भाऊंच्या नाकातून रक्ताची धार लागली. त्याच अवस्थेत भाऊंनी तोच फ़्लॊवरपॊट स्वत: उचलला. शर्मिलाने त्यांना ढकलले. भाऊ पुन्हा बेडवर पडले. शर्मिलाने आता शिव्या द्यायला सुरुवात केली. भाऊंनी अख्ख्या आयुष्यात ऐकल्या नसतील अशा शिसारी आणणाया शिव्या शर्मिलाच्या तोंडातून बाहेर पडत होत्या.

आता भाऊ एका हाताने नाक दाबत तिला शिव्या द्यायला लागले. शेवटी बोलता बोलता त्यांनी सांगून टाकले की एक दिवस त्यांनी तिचीही त्यांच्याबरोबरची सी.डी. बनवली होती.

शर्मिलाचे सगळे अवसानच गळाले.

भाऊ - तुझं तळपट होणार आहे आता तळपट... सगळ्या जगात दिसशील तू... ही .. आत्ता आहेस तशी.. पोरंसोरं बघतील आता तुला
शर्मिला - बनसोड्या.. बया बोलाने आत्ताच्या आत्ता सी.डी. माझ्याकडे दे... नाहीतर बरबाद होशील तू
भाऊ - विसर.. सी.डी. पोचणार आजच्या कुरीअरने पंजाबात
शर्मिला - बग्गाने जर माझी सी.डी. पाहिली ना... तुझा राहत्या घरात मर्डर होईल ***....

बाजी क्षणार्धात पलटली. मागे कधीतरी बग्गा, बजाज शोरूम, चंदीगड वगैरे रेफ़रन्सेस बोलता बोलता तोंडात आल्याचे भाऊंनाही आठवत होते. पण.. शर्मिला एकदम बग्गाचा असा उल्लेख करते याचा अर्थच त्यांच्या लक्षात येईना.

भाऊ - कोण बग्गा?
शर्मिला - सांगीतलं नाही का? तुझा एक बाप.. त्याला भेटून आलीय मी.. खल्लास झालायस तू.. खल्लास. रॆकेटमधे नाहीच्चेस तू...

अवाक झालेल्या भाऊंना मुद्दा समजेपर्यंत शर्मिलाने साडी नेसलेली होती. पर्स उचलत ती म्हणाली:

शर्मिला - तुझी लायकीच नाही.. घर बसवण्याची.. स्वत:च्या आईला धंद्याला लावणारी जात आहे तुझी...माझं व्हायचं ते होऊदेत.. तुला नाही उद्याच्या उद्या त्या वाघमारेचा अन बग्गाचा दोघांचाही *** *** लावला तर नावाची शर्मिला नाही....

इतक्या हीन पातळीला जाऊन बोलणारी बाई सदूने आजवर पाहिलेली नव्हती. झटक्यात बाजूला झाला तरी जाताना शर्मिलाला तो दिसलाच. तो दिसल्यावर मात्र शर्मिलाच्या डोळ्यांमधून एक ओघळ गालावर आला. आपले हे काय रूप नोकराने बघितले. हा तोच, ज्याला आजवर आपणही ’हे आण ते आण’ करायचो.

तिने मनातच ठरवले. भाऊला संपवायचा. फ़क्त कसा संपवायचा इतकाच विचार करायचा राहिलेला होता. घरी गेल्या गेल्या ती पुन्हा पुण्याच्य़ा फ़्लाईटचे अन सोलापुर-पुणे ट्रेनचे तिकीट काढायला नोकराला सांगणार होती.

आयुष्यभर पुरुषांना जाळ्यात अडकवून गब्बर होणारी मेनका आज झालेल्या भयानक अपमानाने जखमी नागिणीसारखी निघाली होती.

तिला नशिबाने घरंदाज स्त्री होण्याचा अधिकार नाकारला होता. कारण अनेक घरंदाज लोकांना नासवून तिने त्यांची दौलत हडपली होती.

आणि भाऊ...

भाऊ बर्फ़ाने नाक बधीर करायचा प्रयत्न करत असतानाच फ़ोन वाजला म्हणून फ़ोन घ्यायला धावले.

वाघमारे - साहेब, वाघमारे बोलतोय
भाऊ - ...
वाघमारे - साहेब, .. हॆलो... हॆलो...
भाऊ - बोल
वाघमारे - कुलकर्णी डॊक्टरला आत घेतलाय, घ्यावा लागला...
भाऊ - .....
वाघमारे - हॆलो साहेब..
भाऊ - का?
वाघमारे - हॊस्पीटलच्या राठीने कंप्लेंट केली साहेब...तो राठी नाही का? हॊस्पीटलमधे कामालाय तो...
भाऊ - कसली?
वाघमारे - त्याच्यावर खोट्या मुलाखती घेऊन हॊस्पीटलच्या नावाने खोटा पत्रव्यवहार करण्याचा आरोप लावलाय साहेब...
भाऊ - ....
वाघमारे - हॆलो.. अन त्याच्यातच एक मोठा घोळ झालाय साहेब
भाऊ - काय?
वाघमारे - ती योगिता जी पोरगी आहे तिचे वडील जाब द्यायला इथे आले होते त्यांनी इथे त्याला बघून सांगीतलं की हा पण नंदनबरोबर कधीकधी असायचा
भाऊ - मग?....... मला का सांगतोयस?
वाघमारे - म्हणजे?
भाऊ - तुझा आणि माझा याच्याशी काही संबंध नाही हे दुपारी सांगीतलं होतं ना
वाघमारे - सरळ आहे साहेब, मी फ़क्त माहिती असावी म्हणून फ़ोन केला.

अर्धा तास भाऊ हबकून खोलीतच बसले होते. अर्धा तास प्रचंड विचार करून त्यांना पटायला लागले की शर्मिलाच्या प्रस्तावात तथ्य होते.

पण आता त्याला काही अर्थ राहिलेला नव्हता. आता शर्मिला पुन्हा तोच प्रस्ताव भाऊंकडून कधीच ऐकणार नव्हती.

शर्मिला? शर्मिला बग्गाकडे पोचली? आपली बुद्धी कुठे गेली? ही बग्गाकडे कशी काय पोचली?

भयानक एकाकीपणाची जाणीव भाऊंच्या मनातून वाहायला लागली.

भाऊंनी हतबुद्ध मनाने बग्गाला फ़ोन लावला.

भाऊ - बनसोडे बोल रहा हूं
बग्गा - बोलो?
भाऊ - शर्मिला आयी थी क्या?
बग्गा - पुछनेवाले तुम कौन हो?
भाऊ - आजतक मेरी तरफ़से एक बार भी कुछ प्रॊब्लेम हुवा है क्या?
बग्गा - मुझे चीजे डिस्कस करनीही नही है... फ़ोन बंद करो
भाऊ - डिस्कस कैसे करनी नही है? यहॊपर राडा हुवा है! तुम भी फ़सोगे
बग्गा - राडा? राडा क्या होता है?
भाऊ - बहुत बडा प्रॊब्लेम! नंदन और माधव अंदर है! कलतक शर्मिलाभी ऎरेस्ट होजायेगी
बग्गा - बको मत!
भाऊ - सुनना है तो सुनो...नही तो फ़ोन बंद कर रहा हूं...
बग्गा - बताओ
भाऊ - ये नंबर लिखलो
बग्गा - कैसा नंबर
भाऊ - पोलीस चौकी का नंबर है... वाघमारे नामका ऒफ़ीसर होगा.. पुछो उसको... नंदन और माधव है क्या अंदर...
बग्गा - आगे बोलो..
भाऊ - नंदनको बहुत मार रहे है... वो घंटे दो घंटे मे शर्मिलाका नाम बता देगा
बग्गा - तुम्हारा?
भाऊ - मेरा नाम बतानेसे क्या होगा? मै तो पॊलिटिक्समे हूं! आधे घंटेमे मेरा नाम मिटादियाजायेगा रिपोर्टसे
बग्गा - फ़िर?
भाऊ - फ़िर माधव सब कुछ उकलदेगा...
बग्गा - आगे बोलो...
भाऊ - शर्मिलाको पकडेंगे...
बग्गा - तो?
भाऊ - तो रॆकेट कौन चलायेगा?
बग्गा - अच्छा... बात पते की है...
भाऊ - घुसी अंदर?
बग्गा - क्या कहना चाहते हो?
भाऊ - शर्मिलाका फ़ोन आयेगा तुमको..
बग्गा - तो?
भाऊ - वो बोलेगी... मेरेसे मारामारी होगयी करके..
बग्गा - मारामारी? तुम लोगोंकी मारामारी होगयी?
भाऊ - वो एक अलग बात है.. उसका रॆकेटसे संबंध नही है..
बग्गा - फ़िर?
भाऊ - वो कहेगी भाऊको रॆकेटसे निकालने को...
बग्गा - हं! (बग्गाला शर्मिलाच्या सहवासातले मधुर क्षण आठवले.)
भाऊ - तो हां बोलना! उसको धोखेमेही रखना...
बग्गा - हं! दिमाग तो है तुममे
भाऊ - वो जब पकडी जायेगी तबभी मेरा नाम नही ले पायेगी...
बग्गा - क्युं?
भाऊ - क्युंकी उसकी भी सी.डी. बनायी थी मैने..
बग्गा - बनसोडे... ये क्या किया तुमने?
भाऊ - मै किसीको सरपर नही बैठने देता बग्गा
बग्गा - वो सी.डी कहा है?
भाऊ - मेरे पास! कॊपी तुमको कल भेज रहा हू
बग्गा - किसलिये?
भाऊ - इंटरनेट्पे लाओ साली को...

बग्गा क्षणभर विचारात पडला. शर्मिला त्याला आवडली होती हे खरे. पण त्यात काही निरागस प्रेम वगैरे नव्हते. ती केवळ वासना होती. अजून काही वेळा तिला फ़ुकटात उपभोगल्यानंतर तिची सी.डी वर पाठवायला हरकत नव्हती. नाहीतरी मॆच्युअर्ड वूमन या साईटसाठी शर्मिला म्हणजे संजीवनीच ठरणार होती.

बग्गा - हं! सोचता हूं! तुम सी.डी. भेजो..

कसा का होईना, बग्गाचा विश्वास बसल्याचे भाऊंना जाणवल्यावर ते शांत झाले. आरश्यात आपले रूप पाहून त्यांना चीड आली. शर्मिला संपली हे त्यांच्या दृष्टीने नक्की झाले होते. एकदा तिची सी.डी. बग्गाने गंभीरपणे घेतल्यावर शर्मिला काहीच करू शकणार नव्हती. तिला जनमानसात जर किंमतच राहिली नाही तर तिच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार होतं? आणि मुख्य म्हणजे एकदा तिची सी.डी. वर पाठवल्यावर ती स्वत:च बग्गाबरोबर रॆकेट मधे काम करायला पूर्ण नाराज होणार होती. नंदनसारखी चार पोरं उभी करता आली असती.

शर्मिला अन भाऊसाहेब बनसोडे ही नावे अजून प्रकरणात गुंतलेली नव्हती. पण ती गुंतल्यावर मात्र काहीच करता येणार नव्हते.

नंदनला पकडेपर्यंत आरोग्यमंत्र्यांना किरकोळ दखल घेण्याशिवाय काहीच करणे आवश्यक वाटले नव्हते.
मात्र, डॊक्टर माधव कुलकर्णी या सोलापुरातील पश्चिम विभागाच्या पक्षप्रमुखाला चौकीत नेलेले समजल्यावर त्यांनी आपल्या मुलाला - आमदाराला- सडकून झापला. आमदार तेव्हा नुकतेच उस्मानाबदमधील एका सभेतून हॊटेलमधे जेवायला निघाले होते. वडिलांचा अचानक फ़ोन आला अन त्यांनी इतके झापले म्हंटल्यावर पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करून संध्याकाळीच त्यांनी सोलापूरला प्रयाण करायचे ठरवले. त्यापुर्वी मीनाला फ़ोन करून ते येत असल्याचे सांगीतले व भाऊंनाही सांगून ठेवायला सांगीतले. त्या फ़ोनवर त्यांनी माधवबद्दल कोणताच प्रश्न विचारला नाही. मात्र उद्या येथे पोचल्यावर सर्वप्रथम ते मीनाची खरडपट्टी काढणार होते.

संध्याकाळचे साडे आठ वाजले तेव्हा भाऊंनी मीनाला फ़ोन लावला.

भाऊ - सी.डी. पाठवतोय मंत्र्यांना. अर्ध्या तासात आलीस, माधव अन नंदनवरचे आरोप मागे घ्यायला त्या त्या पार्टींना सांगीतलंस तर पाठवणार नाही. नऊ वाजता तू इथे पाहिजेस.. आणि चौकीतून मला फ़ोन आलेला असला पाहिजे.. की केसेस मागे घेतल्यात...

मीना - येते म्हणाले ना मी? रागावता कशाला?

मीनाचा लाडीक स्वर ऐकून भाऊंना खरेखोटे काहीच समजेना. ही पोरगी येतीय? म्हणजे सी.डी. मधे दम आहे तर! नाचवू शकू आपण या पोरीला.

अर्धा तास! अर्धा तास भाऊ मीनाची वाट पाहात होते. चौकीवरून कोणताही फ़ोन आला नाही.मात्र, अर्धा तास झाला त्या क्षणीच सदू वर सांगायला आला. कातगडे मॆडम आल्यात.

त्या खोलीत प्रवेशताना मीना शहारली. हीच ती खोली! जिथे तिच्या मासूम स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. आत्ताही आपण एकट्याच खोलीत आलो आहोत. आत्ताही तोच राक्षस या खोलीत आहे. आणि आत्ताही त्याच्या मनात तेच विचार आहेत. तरीही आपण आलो आहोत. कुठून आला हा धीर? आईकडून तर निश्चीतच नाही. बाबांकडूनही नाही. परिस्थितीकडून? आमदारांनी दाखवलेल्या विश्वासामधून? आरोग्यमंत्र्यांनी ’बेटी’ अशी हाक मारली म्हणून? की नशीबाकडून? की .. सूड घ्यायच्या तीव्र इच्छेतून?

इकडे शुभा अपार्टमेंटमधील आपल्या तीन खोल्यांच्या फ़्लॆटमधे एकटी राहात असलेल्या कावेरीने आत्ताच ठेवलेल्या फ़ोनकडे पाहून भेसूर स्मितहास्य केलं! आत्ता तिच्याकडे कुणी पाहिले असते तर त्या माणसाला तिची भीतीच वाटली असती.

चार वर्षांपुर्वी राजीव गेला तेव्हा त्याने बायकोसाठी हा फ़्लॆट अन तीन लाखांचा बॆन्क बॆलन्स ठेवलेला होता. दिड लाखाच्या विम्याचे जवळपास ऐंशी टक्के पैसेही वर्ष दिड वर्षात मिळालेले होते. पण हे सगळे पैसे किती वेळ पुरणार या विचाराने कावेरी एका हॊटेलमधे रिसेप्शनीस्टचा जॊब करू लागली. तेथे मिळणारे साडे चार हजार तिला महिन्यासाठी सहज पुरायचे. एकटीच होती, मूल ना बाळ!

नातेवाईकांपैकी सासरच्या लोकांचे येणे खरे तर लग्न झाल्यापासूनच कमी होते. कारण त्यांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. मात्र राजीव गेल्यावर मात्र सगळे हंबरडा फ़ोडत आले होते.

प्रेम, प्रेमातून प्रेमविवाह असे टप्पे ओलांडत राजीव अन कावेरी मुंबईहून सोलापुरला स्थायिक झाले. सोलापुरच्या साखर कारखान्यात वरिष्ठ पदावर नोकरी मिळाली होती राजीवला. कावेरी घरीच असायची.

पाच वर्षे भरपूर कमवून मग कुटुंब निर्माण करण्याचा दोघांचा विचार झाला होता. पण ते स्वप्न भंगलं! हैदराबादहून बसने येताना झालेल्या अपघातात राजीव जागच्याजागी ठार झाला. लग्नानंतर केवळ दिड वर्षात! पुढची चार वर्षे कावेरीच्या आयुष्यातील सर्वात वादळी काळ ठरला.

सुरुवातीला तिच्या सासरच्यांनी रडून गोंधळ घातला. नंतर त्यांनी कावेरीच अपशकुनी असल्याचे आरोप केले. त्यानंतर राजीवच्या पैशांवर हक्क सांगीतला. कसाबसा तो प्रकार पार पडला. राजीवचे सगळे पैसे कावेरीलाच मिळाले. कावेरीचे आई वडील म्हातारे झाले होते. त्यांनी मुलीचे पांढरे कपाळ पाहून तिला काही काळाने दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. तिचा लहान भाऊ अजून कॊलेजलाच होता. पण हे तिघेही मुंबईला राहायचे. पुन्हा मुंबईला जावे असा विचार जवळपास ठरला होता. पण विम्याच्या पैशांसाठी पुन्हा धावपळी करायलाच लागणार होत्या. ते पैसे मिळेपर्यंत कावेरीने येथेच राहावे असे सर्वानुमते ठरले.

कावेरीनेही नुसते काय बसायचे म्हणून नोकरी धरली. वेळही जाऊ लागला अन पैसेही मिळू लागले. तोवर सहा महिन्यात तिचे आई वडील दोघेही कालवश झाले. आता भावाच्या आयुष्यात जायचे अन पुढे त्याचे लग्न झाले की उगाच अपमानीत होऊन कशाला राहायचे असे ठरवून कावेरी येथेच स्थायिक झाली.

शेजारी पाजारी चांगले होते. हॊटेलमधली आणखीन एक रिसेप्शनीस्टपण मैत्रीण झाली. एकंदर निदान दिवसभर तरी राजीवची आठवण फ़ारशी छळेनाशी झाली. लोकांचे तिच्याकडे बघणे अगदीच शुद्ध नव्हते. हॊटेल चांगल्यापैकी असल्याने तेथील ग्राहक समाजातील वरच्या थराचे असायचे. ते फ़क्त हसून वगैरे बोलायचे. पण हॊटेलचे मालक मात्र अतिशय सत्शील व कनवाळू होते. ते कावेरीला आपली मुलगीच मानायचे. जवळपासचा किराणा मालवाला, दूधवाला अशा सगळ्यांनाच तिची परिस्थिती माहीत झाली होती. बहुतेकांची सहानुभुती तिला लाभायची.

मात्र काही काही पुरुष जरा जास्तच निकट यायचा प्रयत्न करायचे. पण कावेरी मनाने धीट होती. स्त्रीची परवानगी असल्याशिवाय पुरुषाचे काहीही धाडस होऊ शकत नाही. राजीव गेल्यापासून कावेरीला पुरुषाच्या सहवासाची ओढच नष्ट झाली होती.

पण एक मात्र होते. कावेरी अत्यंत आकर्षक, सुडौल शरीराची व सुंदर मुखड्याची होती. भलेभले तिच्या व्यक्तीमत्वाने घायाळ व्हायचे.

तिला याची पूर्ण जाण होती. अत्यंत जपून राहात होती त्यामुळे ती!

कधीकधी तिच्या मनात विचार यायचा. या जगात आपण राजीवच्या आठवणीत असेच राहिलो तर आपले काहीच बिघडणार नव्हते. एखादी ओळखीतील मुलगी सांभाळायला घ्यायची अन तिला मोठे करणे हेच आपले ध्येय मानायचे.

जीवनातील रस नष्ट होणे हे फ़ार मोठे संकट असते. अत्यवस्थ व जख्खड वृद्ध असलेल्या रुग्णाला देखील ’आपण अजून जगावे’ असेच वाटत असते. पण जर काही कारणाने जीवनाचे आकर्षण संपले तर माणूस फ़ार भयानक अवस्थेतून जातो.

कावेरीच्या जीवनात अशी अवस्था अजून तरी आलेली नव्हती.

कारण लहान भावाचे लग्न करून देणे हे तिचे नाही म्हंटले तरी थोडेसे तरी कर्तव्य होतेच. तोही मनाने खूप चांगला होता.

या एकाच कारणासाठी कावेरी स्वत:ला रमवत होती.

राजीवच्या फ़ोटोकडे बघताना रोज किमान दोन वेळा तरी रडायची.

आपण दुसरे लग्न करूच शकणार नाही हा विचार रोज जास्तच दृढ होत चाललेला होता.
आणि एक दिवस तो प्रकार घडला.

महिन्यातून दोन तीन वेळा रामनशेठ हॊटेलवर एक दिवस राहायला यायचे. एकटेच!

सकाळी आठ ते सायंकाळी सहा अशी कावेरीची ड्युटी असायची. ती एकटीच असल्याचे माहीत असल्यामुळे हॊटेलच्या मालकांनी तिला कायमस्वरुपी हीच वेळ नेमून दिलेली होती.

रामन साधारण दुपारी तीन वाजता आले की संध्याकाळी सहापर्यंत तरी त्यांच्या खोलीतून एकही फ़ोन यायचा नाही. सहापासून मग ते स्नॆक्सची वगैरे ऒर्डर द्यायला लागायचे. सहा वाजता साधारण त्यांची पहिली ऒर्डर किचनला कळवून कावेरी घरी निघायची.

एक गोष्ट तिच्या कधीच लक्षात आली नाही. तिची रिसेप्शनीस्ट मैत्रिण... नेमकी रामन ज्या दिवशी यायचे त्या दिवशी सेकंड शिफ़्टला असायची. ती यायचीच सहा वाजता!

एक दिवस एक बाई कसलीतरी फ़ाईल हातात घेऊन हॊटेलच्या मालकांना भेटायला आली. ती तब्बल पाऊण तास त्यांच्या केबीनमधे बसलेली होती. जाताना तिने कावेरीला रामन या नावाने एंट्री करायला सांगीतले. आज साहेबांच्या ऐवजी त्यांची एंट्री या बाई का करायला सांगत आहेत हे कावेरीच्या लक्षात येईना. कावेरीहून ती बाई असेल तशी मोठीच! पण कावेरीइतकीच तीही सुंदर होती. तिने मुद्दाम कावेरीचे नाव विचारले. कावेरीमधे काहीतरी इंटरेस्ट असल्याप्रमाणे काही किरकोळ चौकश्या केल्या. तुझे ड्युटी अवर्स काय, कुठे राहतेस वगैरे...

मग कावेरीलाही जरा चौकशी करावीशी वाटली.

कावेरीने सहज विचारले.

कावेरी - सर आज स्वत: नाही आले?
ती - येणारेत ना.. दुपारी येतील... चारला
कावेरी - आपण त्यांच्या ऒफ़ीसला असता का?
ती - अंहं! मी पिक्चर्सला आहे...
कावेरी - हो का? ...... पिक्चर्स म्हणजे?
ती - सरांची मुव्ही कंपनी पण आहे.. माहीत नाही?
कावेरी - हो? खरच माहीत नव्हते...
ती - ते विविध पटकथांवर निवांत विचार करता यावा म्हणून तर येथे येतात
कावेरी - ओह! हे मला खरच माहीत नव्हते.
ती - यावेळेस तर दोन तीन दिवस राहणार आहेत.
कावेरी - ओके.. काही विशेष?
ती - एक पटकथा फ़ायनल झालीय. देवराजला साईन केलंय.. आता नायिका.....

कावेरी... ! कावेरीच्या मनात झटकन वादळे उठली. ही बाई आपल्याकडे रोखून बघत काहीतरी हेतूने आपल्याला काही प्रश्न का विचारत होती? हिच्या मनात तसे तर काही नसेल? आपण? छे! तिने मनातील विचार झटकले. या बाईशी जास्त संवाद वाढवायचा नाही असे तिने ठरवले.

कावेरी - ओके.. बूकिंग केलंय मी.. सरांकडून आम्ही कधीच ऎड्व्हान्स घेत नाही...
ती - थॆन्क्स.. अं.. तसं ... खरं मी एकदम म्हणायला नको.. पण...
कावेरी - काय?
ती - तुझं फ़ेसिग... पटकथेतल्या नायिकेच्या वर्णनाला...

सुन्न होऊन कावेरी ते वाक्य मनात तब्बल चार पाच सेकंद घोळवत होती.

तिला जाणीव होती. आजवर एक माणूस नव्हता जो तिच्या सौंदर्याने घायाळ झाला नव्हता. एक बाई नव्हती जी जळफ़ळाट करत नव्हती. लग्न समारंभांमधे तर वधू कोण आहे असाच प्रश्न पडावा असे प्रसंग यायचे. लग्नाआधी तिला तीन चार मागण्या आल्या होत्या. काहींनी स्वत:च प्रपोज केलं होतं! मात्र तिचा जीव राजीववर जडलेला होता. तो होताही तिला शोभेलसा.. पण आंतरजातीय विवाह ही एकच अडचण होती. तीही संपवून दोघांनी प्रेमविवाह केलेला होता.

लोक माना वळवून वळवून तिच्याकडे पाहायचे. बायकांनाही प्रभावित करणारं सौंदर्य तिला लाभलं होतं!
आणि आज रामन शेठजींच्या पिक्चर्स आर्ममधील एक बाई सरळ तिला.... ही ऒफ़र?

आपण इतक्या चांगल्या दिसतो???

राजीव म्हणायचाच.. पण ते आपल्याला प्रेम वाटायचं!

पण ही तर बाई आहे... आणि ही पण ..

आपलं कधीच कसं लक्ष गेलं नाही स्वत:कडे राजीव गेल्यानंतर... नाही गेलं तेच बरोबर आहे...

विचारांची हजारो आवर्तने क्षणभरात घोंघावल्यानंतर कावेरीची मान खाली गेली...

ती - विचार कर.. घरच्यांना विचार.. रामन पिक्चर्सच्या ऒफ़र्स अशा... कोणालाही
कावेरी - अं! नाही.. मला .. अनुभव
ती - शिकवू..
कावेरी - नाही... म्हणजे तसं शाळाकॊलेजात वगैरे मी... थोडी गॆदरींगची नाटकं
ती - मग काय तर?
कावेरी - नाही पण... मला नाही जमणार असं आता ...
ती - या ऒफ़रसाठी आज आठ मुली येणार आहेत.. उद्या पाच... तुला अशीच मिळतीय.. सिलेक्शन माझ्याकडेच आहे
कावेरी - मॆडम.. मला नाही हो..
ती - हा माझा नंबर... संध्याकाळी आठ वाजता तुझ्या फ़ोनची वाट पाहेन मी...
कावेरी - आपलं .. नांव मॆडम....?
ती - शर्मिला... शर्मिला अत्रे... चीफ़ एक्झिक्युटिव्ह ऒफ़ीसर.. रामन पिक्चर्स..

घरी आल्यावर स्वत:साठी नेहमीप्रमाणे चहाही न करता होती तशीच कावेरी स्वत:ला तासभर आरशात न्याहाळत होती.

एक पिक्चर! एकच! पुन्हा कुठे काय करायचंय?

पडला तर नोकरी आहेच. सरही रिसेप्शनीस्टचा जॊब पुन्हा नक्की देतील..

हे रामन पिक्चर्स काय आहे? कधी ऐकलं कसं नाही?

पण देवराज? एकदम देवराज? आणि आपण?
छे! काहीतरीच... लोकांना काय वाटेल?

पण मग.. आपलं आयुष्य म्हणजे काय फ़क्त एकाकीपणच? या.. या इथे किती ट्रॊफ़ीज आहेत या..?

एक क्रीडास्पर्धांची... दोन अभिनयाच्या... दोन लेखनाच्या... आपण म्हणजे अगदीच काही.. सामान्य नाही आहोत..

पण राजीव? राजीवला काय वाटेल? राजीव असता तर?

तो असता तर नोकरी कशाला केली असती? आणि.. अशी ऒफ़र तरी कुणी दिली असती?.. पण.. दिली असतीच तर...

काय म्हणाला असता तो? नको म्हणाला असता? आपली प्रगती.. नसती पाहवली?

आपल्या पत्नीला जगाने पडद्यावर बघावे असे पटले नसते त्याला?

पण.. खरच आहे! देवराज म्हणजे मसाला पिक्चर असणार.. गाणी, नाच, मारामारी, एकदम रजनीकांत सारखा

आपण कसले विचार करतोय हे?

सरळ नाही म्हणून कळवावं! काहीतरी काय विचार करायचे? एक विधवा आहोत आपण... सासरचे आहेत अजून आपल्या..

कावेरीचं नक्की झालं! नाही म्हणण्याचं!

साडे सात वाजले होते.

निवांत चहा घ्यावा अन आठ वाजता फ़ोन करून टाकावा. खरे तर.. फ़ोन करण्याची तरी काय गरज आहे? नाही केला की त्यांना आपोआपच समजेल...

पण ती वेळ आली नाही. तिलाच एक फ़ोन आला. स्वत: रामन बोलत होते. ’माझं पिक्चर आहे, तू मला ओळखतेसच, मीही तुला पाहिलेले आहे, अनघाने तुझ्याबद्दल मला सांगीतलेले आहे, तुझं करीअर उजळेल’ वगैरे वगैरे!

रामन शेठ यांचा आवाज कावेरीने इतका वेळ कधीच ऐकला नव्हता. तिला भरून आलं! स्वत" प्रोड्युसर बोलवतो? आणि आपण नाही म्हणायचे?

थरथरत्या हातांनी तिने फ़ोन लावला तेव्हा शर्मिलाने उचलला आणि कोण बोलतंय हे समजायच्या आधीच शर्मिला म्हणाली:

शर्मिला - कावेरी.. दहा वाजता हॊटेलवर ये..
कावेरी - मी.. कावेरी बोलतीय हे तुम्हाला ... कसं
शर्मिला - ईंडस्ट्रीत राहून तेवढं हुषार होता येतंच.. तू मनाने चांगली आहेस अन काम नक्की स्वीकारशील याची खात्री होती. कारण तो रोल तुझ्यासाठी अगदीच परफ़ेक्ट आहे... दहा किंवा फ़ार तर साडे दहाला ये... साडी नेसून...

राजीव गेल्यापासून कावेरीने आजवर इतकं मन लावून स्वत:च कधीच आवरलं नव्हतं! शॊवर घेताना बाथरूममधील आरशात जवळपास पंधरा मिनिटे ती स्वत:च शरीर स्वत:च न्याहाळत होती. आपणच स्वत:ला बघून पागल झालो आहोत तिथे लोकांचे काय होत असेल असा विचार मनात आल्यावर लाजून तिने नजर वळवली.

साडे नऊ वाजता तिला घराबाहेर पडताना जर शेजारच्या कुणी पाहिलं असतं तर भल्याभल्यांची नीयतच बिघडली असती अशी कावेरी दिसत होती.

आणि हॊटेलच्या रामन यांच्या रूमवर मात्र पाच जणं होते. दोन स्त्रिया, तीन पुरुष! दोघंजण कॆमेरा सांभाळत होते. ते अपरिचित होते. एक चांगलाच स्मार्ट अन रुबाबदार होता. पण तो देवराज नक्कीच नव्हता. चांगला उंचापुरा, पुरुषांमधे क्वचित आढळणारा गुलाबी छटेकडे झुकणारा गोरा रंग! आणि दोन स्त्रियांमधील एक शर्मिला होती... आणि दुसरी होती तिची रिसेप्शनीस्ट मैत्रिण.. अनघा...

शर्मिलाने ऎप्लिकेशन केल्यामुळे व अनघाने फ़ॊलो अप केल्यामुळे कॆमेरे निर्विघ्नपणे रूममधे पोहोचले होते. फ़क्त, हॊटेलच्या मालकांना ही टी.व्ही सिरियल असल्याचे पटवण्यात आले होते व ’रामन’शेठचे नावही घेण्यात आले नव्हते. मुळात रामन या नावाची कंपनीच नव्हती. विलास व्हिडिओ या नावाची सिरियल होती असे सांगण्यात आले होते.

कावेरी आल्यावर दहा मिनिटांनी अनघा निघून गेली. तिला ड्युटी होती. तिच्या उपस्थितीमुळे कावेरीही जरा कंफ़र्टेबल झालेली होती. पण तो उंचापुरा पुरुष मात्र कावेरीचे सौंदर्य बघताना थिजला होता आणि ते पाहून शर्मिला हसत होती.

हा माणूस म्हणे सहाय्यक दिग्दर्शक होता. रामन शेठजींना म्हणे काहीतरी अचानक काम आल्यामुळे ते निघून गेले होते.

एक तास एका कंटाळवाण्या पटकथेचे वाचन त्या माणसाने तितक्याच कंटाळवाण्या पद्धतीने केले. त्याच्या शैलीवरून तो कसा काय दिग्दर्शक होईल असा प्रश्न कावेरीच्या मनात आला.

तिच्या रोलमधे अर्थातच तीन गाणी, त्यातील दोनमधे नृत्ये, चार वेळा रडणे, एक लव्हसीन, एक पळण्याचा, दोन विनोदी प्रसंग व एक क्लायमॆक्समधे व्हीलनच्या गोटातील एकाच्या डोक्यात फ़ळकुट मारण्याचा सीन असे सीन्स होते.

एकंदर कथेत नायिका नसती तरी चालले असते अशी परिस्थिती होती.

पण... साडे तीन लाख.. हे मानधन होते...
असे कधी पैसे मिळतात का कुणाला?

हा प्रश्न तिला त्यावेळेस का भेडसावला नाही याचे तिलाच आश्चर्य वाटले.

जांभया देत तिने रोलसाठी होकार दिला.

पंधरा दिवस त्याच रूममधे सलग सकाळपासून रात्रीपर्यंत विविध चर्चा चालायच्या. कधी उगीचच कोणी नवे चेहरे वगैरे यायचे. कधी नुसतेच पाठांतर वगैरे! काही काही इनडोअर सीन्सचे टेक्स, प्रॆक्टिस वगैरे! बरेच काही चालले होते. अनघा रिसेप्शन सांभाळायची. हॊटलच्याच स्त्री कर्मचारी असल्याने कावेरी व अनघाला रूमवर केव्हाही प्रवेश मिळू शकायचा.

शुटिंग सुरू झाल्यावर दोन दिवसातच कावेरीने स्पष्टपणे मालकांना सांगून टाकले होते. उत्सुकता व तिचे नवे करीअर याकडे प्रेमाने बघत मालकांनी काम करण्यास प्रोत्साह दिले. अनघाला ओव्हरटाईम दिला.
रामन मात्र स्वत: त्या पंधरा दिवसात एकदाही आले नव्हते हॊटेलवर! याचेही कावेरीला आश्चर्यच वाटायचे. ज्यांच्या कंपनीचा पिक्चर आहे, तेच येत नाहीत?

आज शुक्रवार होता. संध्याकाळी सात वाजता लव्ह सीनचे शूटिंग होणार होते. सकाळपासूनच हे कळल्यामुळे कावेरी अस्वस्थ होती. आत्तापर्यंतचे सीन्स साधेसुधे होते. मात्र तीन दिवसांपासून शर्मिला कावेरीच्या मनाची तयारी करत होती. तिला तो तरुण रुबाबदार वाटत होता खरा! पण सगळ्यांच्या समोर आपण... ! आज तिने मनातच राजीवची माफ़ी मागीतली. आता मागे वळणे शक्य नव्हते. ऎड्व्हान्स म्हणून चाळीस हजार मिळालेलेही होते अन ते तिने तिच्या घराच्या पेंडिंग दुरुस्तीसाठी वापरलेही होते. शर्मिलाशी बोलून तिने सीनमधील बोल्डनेस शक्य तितका कमी करायला सांगीतला होता. हा मधुचंद्राचा सीन असल्यामुळे तोंडावर वधूचे भाव आवश्यक होते. हसरे, लाजरे! आयुष्यात पहिल्यांदाच असे काम करताना वधूचे भाव कसे काय आणता येतील या तिच्या निरागस प्रश्नावर शर्मिलाने हसून ’प्रयत्न कर, येतील’ असे उत्तर दिले होते.

प्रत्यक्ष सीन करण्याची वेळ आली तशी ती भयानक नर्व्हस झाली. हे शर्मिलाला अपेक्षित असावे. तिने कॆमेरामन, अनघा, सगळ्यांना बाहेर काढले. त्या तरुणालाही बाहेर जायला सांगीतले. खरे तर कावेरीचा अन त्याचा अजून फ़ारसा संबंधच आलेला नव्हता. कारण कावेरीकडून सीन करून घेण्याचे काम मुख्यत्वे करून शर्मिला करत होती. शर्मिलाने तब्बल तासभर तिचा ब्रेनवॊश केला. तिला कंफ़र्टेबल केलं! सगळे आत आले.

अनघाला मात्र प्रवेश नव्हता. तो तरुण, त्याला शर्मिला ’माधव’ अशी हाक मारायची, हपापलेल्या नजरेने कावेरीकडे पाहात होता. त्याची ती नजर पाहूनच तिला किळस आली.

कावेरी अलगदपणे त्याच्या शेजारी बेडवर पहुडली. तिला या सीनसाठी नववधूचा पोषाख करायला सांगीतले होते. त्यामुळे पारंपारिक लाल साडीत ती आलेली होती. माधव आधीच वेडापिसा झालेला होता. ती शेजारी झोपताच त्याने तिला जवळ ओढायचा प्रयत्न केला. शर्मिलाने त्याला हालचालींमधे सुधारणा आणण्यासाठी सल्ला दिला. त्यावर त्याने ’ही कोऒपरेट करत नाहीये’ म्हणून सांगीतल्यावर शर्मिलाने निर्लज्जपणे त्याला साथ द्यायला सांगीतले. स्क्रिप्टमधील काही फ़ुटकळ डायलॊग चालू झाले. डायलॊग मात्र कावेरी व्यवस्थित बोलत होती. पण माधव तिला जास्त जास्त जवळ ओढत होता.

स्क्रिप्ट व्यवस्थित वाचलेले असल्याने कोणत्या पातळीपर्यंत जायचे आहे याची कावेरीला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे ती फ़क्त डायलॊगवर लक्ष केंद्रीत करून बाकी हालचाली माधवला करू देत होती.

माधवच्या मिठीत गुदमरत असताना शर्थीने ती स्क्रिप्टमधल्या भूमिकेचे भाव तोंडावर ठेवत होती. माधवने लिहिल्याप्रमाणे तिचा पदर बाजूला केला. खरे तर या एकाच प्रसंगावर गेले तीन दिवस तिचा शर्मिलाशी वाद चाललेला होता. फ़ार तर रूममधे आल्यावर त्याने उभ्या उभ्याच जवळ घेतले इतपत सांकेतिक वाटू शकत होते. इतक्या तपशीलवार दाखवण्याची गरजच नाही हा तिचा मुद्दा! शर्मिलाचे म्हणणे असे की जग कुठल्याकुठे गेले आहे. असे दाखवले नाही तर चित्रपटाला बालीश समजले जाईल. केवळ स्पर्धात्मक उद्देशाने अधिक धीट होणे कावेरीला पटत नव्हते. पण साडे तीन लाख अन शर्मिलाचा अधिकार! दोन्हीपुढे तिचा विरोध गळून पडलेला होता.

माधवने धीट होत हूक्स खोलायला सुरुवात केल्यावर कावेरीने खाडकन शर्मिलाकडे बघितले. हाच एक क्षण होता जो शर्मिलाच्या दृष्टीने जिंकणे आवश्यक होते. ती बरोब्बर कावेरीच्या समोरच आपण राहू अशी उभी होती. कावेरीने पाहिल्या पाहिल्या शर्मिलाने तिला ’शांत बस, चूप बस’ अशी खूण केली. मन मारून कावेरीने तो दोन मिनिटांचा काळ काढला. मात्र हद्द झाली. माधव आता सरळ अधिक प्रगती करू लागला होता.

हे कावेरीच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. खाडकन कावेरी उठून बसली. पण माधव नियंत्रणाच्या पलीकडे गेला होता. शर्मिला कावेरीला काहीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करेपर्यंत माधवने तिला पुन्हा खेचून शेजारी झोपवले व पुढच्या अर्ध्या तासात सर्वांसमक्ष कावेरीच्या नग्न शरीरावर माधव तुटून पडला होता. कॆमेरा घेऊन उभे असलेल्या दोघांना हे दृश्य पाहून तीच इच्छा झाली होती. पण त्या गोष्टीस त्यांना शर्मिला व माधवने नकार दिला. कावेरीचा अधिक हीन अपमान होणे टळले होते. हे सर्व चित्रीकरण तयार होते.

रडत भेकत, चित्रीकरण रद्द करण्याची भीक मागत आपली विदीर्ण झालेली अब्रू गोळा करत...

कावेरी खाली येईपर्यंत अनघा ड्युटी संपवून निघून गेलेली होती. शर्मिलानेच तिला घरी सोडले.
त्यानंतरचे चार दिवस कावेरी घराबाहेरही पडली नाही.

मात्र एक गोष्ट झाली. ती गोष्ट फ़ार भयानक होती. तो बलात्कार असूनही, तो कॆमेयात बद्ध असूनही अन तो सर्वांदेखत झालेला असूनही...

कावेरीला ते सुख दोन वर्षांनी मिळालेले होते.. एकाच वेळेस तिला स्वत:ची घृणा वाटत होती आणि..

त्याचवेळेस माधवचे राकट स्पर्श पुन्हा पुन्हा आठवत होते.

आजवर तिला पेपरांमधे कधीच वाचायला मिळाले नव्हते की बलात्कारीत स्त्री अशाही मनस्थितीत असू शकते.

पण कावेरी स्वत: मात्र होती.

या चार दिवसांमधे अनघा येऊन गेली होती. रोज एकदा. ती आली की दोघीही पोटभर रडायच्या. पण कारणेच वेगवेगळी असायची. कावेरीचे दु:ख होते की हे असे अचानक काय वळण लागले. आणि अनघाचे दु:ख होते की तिला तेथे थांबायला सांगून या लोकांनी कावेरीवर असा प्रसंग आणला. रामन अनेकदा अनघाला रूमवर बोलवायचे. हे हॊटेलच्या मालकांना माहीतच नव्हते. रात्री एक ते पहाटे पाच या वेळात जरी अनघा होटेलवर असली तरी स्त्री असल्यामुळे तिला लेडीज रूममधे बसून राहायची परवानगी होती. तेव्हा एक मुलगा रिसेप्शनीस्टचे काम बघायचा. खरे तर अशा वेळेस काही कामच नसायचे. पण उपस्थिती आवश्यक असायची. याच वेळात कुणाच्याही नकळत अनघा शेठजींना आपल्या शरीराशी खेळू द्यायची. त्याचे तिला जे पैसे मिळायचे ते दोन महिने हॊटेलात राबूनही मिळत नव्हते. पण कावेरीशी तिची मैत्री खरीखुरी होती. आपला उपयोग करून ही माणसे कावेरीला फ़सवणार आहेत याची तिला कल्पना नव्हती. तिच्यामते शेठजींना कावेरी हवी होती म्हणून हे सगळे चाललेले होते. खरे तर याची तिला काळजीच होती. कारण कावेरीवर शेठजी लट्टू होणे सहज शक्य होते. आणि तसे झाले असते तर अनघाची गरजच संपली होती. पण कावेरीला पाठवण्याचेच तिला जे बक्षीस मिळणार होते तेच भरपूर होते. अनघा वाईट चालीची मुलगी होती.

पण तब्बल पंधरा दिवस तिला शर्मिला सांगत होती की पिक्चरचे काम आहे. नेमके याच पंधरा दिवसात शेठजी हॊटेलवर आलेच नव्हते अन त्यांच्या वतीने शर्मिलाने अनघाशी स्वत:ची ओळख करून दिल्याचे भासवले होते. याचा अर्थ.. सरळ होता. शेठजींचा संबंधच नव्हता. शर्मिलाला कावेरी हवी होती. पण का? त्या माधवसाठी? का पण?

अनघाला विचार करकरूनही उत्तर सापडत नव्हते. पण काहीच न मिळता उगाचच कावेरीचा बळी गेला याचे तिला वाईट वाटत होते. पण या वाटण्याला काहीच अर्थ नव्हता. आणि कावेरीला वाईट याचे वाटत होते की हॊटेलच्या मालकांना तरी कसे सांगायचे की काय झाले? अनघाने परस्पर कावेरीची तब्येत बरी नसल्याचे सांगीतले होते. त्यांचा फ़ोनही येऊन गेला होता.

एकंदर! कोणताच चित्रपट बनणार नव्हता. पण कावेरीला पटवत बसण्याइतका रॆकेटकडे वेळही नव्हता अन ते अवघडही होते. ती कुणी कुमारिका नव्हती की जी प्रेमाच्या जाळ्यात फ़सेल. ती होती एक विधवा! जी जास्तच जपून वागणार होती. मात्र, ती इतकी आकर्षक होती की तिची सी.डी. पाठवल्यास नुसते बक्षीस म्हणूनच रॆकेटला काही लाख मिळण्याची शक्यता होती.

आणि नेमका हाच प्रॊब्लेम झाला होता. रॆकेटच्या चंदीगड कॊन्टॆक्टने म्हणे ती सी.डी. पाहून भाऊंना प्रचंड झापले होते. कोणत्या शब्दांमधे झापले होते हे शर्मिला, माधव अन नंदन या तिघांनाही व्यवस्थित समजले होते. कारण या तिघांनाही भाऊंनी त्याच शब्दांमधे झापले होते.

त्याला कारण तसेच होते. जी स्त्री अत्यंत सुंदर आहे, जिची सी.डी. बाजारात आल्यास लाखोंनी विकली जाईल, ज्यातून कोट्यावधीचा फ़ायदा होईल, अशा स्त्रीच्या सी.डी.त सहमतीने झालेला सेक्स नव्हता.. रेप होता. आणि रेपसीन्सना जगात नॊर्मल सेक्ससीन्सपेक्षा फ़ारच कमी मागणी होती. सोलापुरच्या रॆकेटने एक अत्यंत महत्वाचे प्रॊडक्ट बरबाद केल्याचा आरोप चंदीगडहून झाला होता. त्यात पुन्हा हे प्रकरण सरळ कॆमेरे लावून झालेले असल्याने त्या स्त्रीने तक्रार वगैरे केली तर मोठाच प्रॊब्लेम होणार होता.

आणि भाऊंच्या बंगल्यावर त्या रात्री एकमताने ठरले की या स्त्रीला माधव कधीही डोके वर काढू देणार नाही.

त्याच रात्री कावेरीच्या घराची बेल वाजली साडे बारा वाजता.

माधव व कावेरी या दोघांना एकेका मोठ्या आश्चर्यास सामोरे जावे लागले.

माधव आलेला पाहून सुरुवातीला कावेरी हादरली होती.

आणि त्याने तिच्या घरात येऊन ’कुठे बोललीस तर खलास होशील’ अशी धमकी दिली तेव्हा त्याच्याकडे पाहात कावेरी गालातल्या गालात मादक हासत होती हे पाहून माधव हादरला होता.

पुढची दोन वर्षे.. अत्यंत वादळी दोन वर्षे!

माधव व कावेरी यांचे नियमीत संबंध! कावेरीला शरीरसुखाची भयानक चटक लागणे! या आगीत सुंदरमल, भाऊ हेही होरपळणे! शेवटी माधवने तिला ब्लॆकमेल करून सोलापुरातील इतर गर्भश्रीमंत लोकांकडे पाठवायला सुरुवात करणे, तिचा गर्भपात होणे, दोन वर्षांनी तिला जाणीव होणे की ती एका भयानक रोगाची शिकार होणार आहे... आणि आज अचानाक सुंदरमलचा फ़ोन येणे...

’नंदन अन माधव आत आहेत. मुलींना फ़सवण्याचा आरोप आहे त्यांच्यावर! तू सावध राहा’

हा फ़ोन ठेवताना कावेरीच्या मुखावर एक भेसूर हास्य होतं! नंदन अन माधवला पकडून पोलीस मूर्खपणा करत आहेत हे तिला माहीत होतं! तिच्यामते पकडायला हवं होतं शर्मिलाला...

आणि ते ती करणार होती. चौकीवर जाऊन ’या दोघांची प्रमुख शर्मिला आहे’ हे सांगणार होती.

एकाच वेळेस सोलापुरातील या प्रकरणासंदर्भात अनेक ठिकाणी अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडत होत्या.
डीनने आमदारांच्या फ़ोनवरून राठीला हॊस्पीटलमधून हाकलून दिले होते...

नंदन व माधव वाघमारेकडे सगळ्या आशा लावून बघत होते

कावेरी आपले रोगट शरीर जरासे नीटनेटके करून चौकीवर निघाली होती

शर्मिला शेवटचे पॆकिंग करायच्या तयारीला लागली होती

चार दिवसांनी त्याच खोलीत प्रवेशल्यावर मीना अन भाऊंची पहिलीच नजरानजर फ़ार भयानक झाली होती

हरजिंदरसिंग बग्गा शर्मिलाचा सहवास आठवून ’मॆच्युअर्ड मॊम्स’ या साईटवर हिचा किती भाव येईल याचा अंदाज करत होता...

आणि... सोलापूर सेक्स स्कॆंडल आता जी वळणे घेणार होते... त्याची जराशीही कल्पना असती.... तर ते इथे आलेच नसते... आमदार बंडाभाऊ..

गुलमोहर: 

काय प्रतिक्रिया द्यावी...तुम्हि निशब्द केले अहात्..एवढच बोलू शकते..लिहित रहा..

हम्म्म्...इंटेरेस्टींग्..वळणावर वळणं घेत चाललीये कथा..येऊदे लवकर पुढचा भाग...
पण...पण...
स्त्रीची परवानगी असल्याशिवाय पुरुषाचे काहीही धाडस होऊ शकत नाही.>>>
जगभरात होणार्‍या बलात्कारांची संख्या पाहता हे विधान जरा धाडसाचं ठरेल, नाही का?

मात्र काही काही पुरुष जरा जास्तच निकट यायचा प्रयत्न करायचे. पण कावेरी मनाने धीट होती. स्त्रीची परवानगी असल्याशिवाय पुरुषाचे काहीही धाडस होऊ शकत नाही. राजीव गेल्यापासून कावेरीला पुरुषाच्या सहवासाची ओढच नष्ट झाली होती.

सुमेधा,

या परिच्छेदातील एक विधान नोंदवून आपण विचारलेल्या प्रश्नावर मी विचार केला. मला असे वाटले की हे विधान त्या परिच्छेदातील काही संदर्भ घेऊन येते. जसे 'निकट येऊ पाहणार्‍या पुरुषांना दूर ठेवणे' किंवा लाळघोटेपणा करणार्‍यांना दूर ठेवणे / टाळणे ही गोष्ट स्त्रीसाठी, त्यातही एका विधवेसाठी जरा सहज असावी. मात्र आपण ज्याबद्दल लिहीत आहात, बलात्कार, त्यात स्त्री प्रत्यक्षरीत्या असहाय्य असल्याने (म्हणजे प्रत्यक्ष मदतीसाठी कुणीही नसल्याने व पुरुषाला शारिरीक बळावर विरोध करण्यास असमर्थ ठरल्याने) बळी जाते व तेथे 'आपल्या रिझर्व्ह्ड वागण्यातून पुरुषांना दूर ठेवणे' या उपायाला काही अ‍ॅप्लिकेशनच राहात नाही.

तसेही, सांख्यिकीदृष्ट्या असे समजते की चित्रपटात प्रेम चोप्रा, राज बब्बर वगैरे करतात तसे बलात्कार प्रत्यक्षात होतच नाहीत. कित्येकदा तर स्त्री सुरुवातीला आमिषाने बळी पडते व फसवले गेल्याची भावना निर्माण झाल्यावर कुणी सपोर्ट करणारे असले तर गुन्हेगारावर बलात्काराचा जाहीर आरोप ठेवते. असे नसेल तेव्हा बहुतांशी बलात्कार हे केवळ भयाने होतात. नातेवाईक, ओळखीचे, शेजारपाजारचेच कुणीतरी गरजूपणा पाहून जबरदस्ती करतात व भयाने ते सहन केले जाते.

त्यामुळे, 'स्त्रीची परवानगी नसणे' हा उपाय साध्यासुध्या ला़ळघोटया , रोमिओछाप किंवा तात्कालीन संधीसाधू पुरुषांवर चालू शकेल, मात्र सापळ्यात अडकल्यावर त्याचा उपयोग होईल असे वाटत नाही.

आपल्या मुद्देसूद प्रतिसादाबद्दल आपले व सुजा यांच्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

कादंबरी नियमीत पणे वाचतो आहे... खिळवुन ठेवते.

बेफिकीर महाषय अथक परिश्रम घेत कादंबरी लिहीत आहेत, पुसले गेलेले दोन भाग त्यांनी पुन्हा खरडलेत... मी त्यांना पुढील लेखनास शुभेच्छा देतो.

बेफिकीर, जमले तर प्रत्येक नविन भागासोबत, जुन्या भागांची लिंक दिली तर खूप बरे होइल...काही भाग वाचणे राहून गेले असतील, तर शोधणे सोप्पे जाईल..

स्वप्नाली यांच्या विनंतीचा विचार व्हावा. भाग १, २... १०...१५ असे सर्व भागांना एकमेकांत गुंफवता येते. नविन वाचणार्‍यांस खुप मदत होईल (सर्वांनाच पावलांचे ठसे बघणे माहित नसते).

खुप उत्कंठावर्धक कादंबरी आहे ही... आणी तुम्ही पटापट पुढचे भाग टाकताहात ते खरेच खुप छान करताय, नाहीतर मग आधी काय झाले ते आठवत बसावे लागते.