पवनामाळेचा राखणदार वितंडगड ऊर्फ किल्ले तिकोना

Submitted by जिप्सी on 2 April, 2010 - 08:52

खरंतर गोरखगड सर केल्यानंतर पुढची स्वारी हि पावसाळ्यानंतरच करायची ठरली होती. मार्च अखेर असल्याने बरेचजण ऑफिसच्या कामात आणि एप्रिल/मे उन्हाळ्याचा असल्याने पावसाळ्यानंतरच कुठेतरी जायचे ठरले होते. पण २० मार्चला सगळ्यांनाच वेळ असल्याने एक छोटासा ट्रेक करायला काय हरकत आहे? असा विचार केला आणि पटापट सगळ्यांना मेल गेला. पण नक्की जायचे कुठे हेच ठरत नव्हते. मार्चच्या उन्हात जास्त दमछाक न करणारा एक सोप्पासा ट्रेक करायचे ठरले. त्यातच डिस्कव्हर महाराष्ट्र मध्ये मिलिंद गुणाजींनी तिकोनाची सफर घडवुन आणली होती. त्यामुळे तिकोना उर्फ वितंडगडलाच भेट द्यायचे नक्कि झाले. तारीख तर आधीच ठरेली होतीच आता फक्त वेळ आणि भेटण्याची जागा ठरवायची होती. सर्वानुमते पळस्पे फाटा येथील दत्ता स्नॅक्सजवळ सकाळी सात वाजता भेटण्याचे ठरले. गोरखगड ट्रेकच्या वेळी "बिर्ला कॉलेज" मिटींग पॉईंट होता यावेळी मात्र पळस्पे फाटा असल्याने आणि आमची वाट बघत येणार्‍या-जाणार्‍या ट्रक/टेम्पोंना निरखण्यात निश्चितच कुणाला इंटरेस्ट नसणार Happy हे जाणुनच ह्यावेळी वेळेवर आम्ही वेळेवर पोहचण्याचे ठरविले.पळस्पेलाच मस्तपैकी नाश्ता करुन लोणावळ्याच्या दिशेने निघालो.

मुंबईहुन तिकोन्याला जाण्यासाठी २ मार्ग आहे. पहिला लोणावळ्याच्या पुढे दोन स्टेशनवर कामशेत, तेथुन पवनानगर (पूर्वीचे काळे कॉलनी) व पुढे तिकोनापेठ गाव. तिकोनापेठ गावातुनच किल्याची पायवाट सुरु होते. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्यावरून पौड रोडने पवनानगर आणि तेथुन पुढे तिकोनापेठ गाव. दुधिवरे खिंडीच्या आधीचा रस्ता हा लोहगडला जातो आणि पुढचा रस्ता पवनानगर. मी सगळ्यांना दुसर्‍या रस्त्याने जाण्यासाठी तयार केले. त्यामुळे किमी आणि वेळ वाचणार तर होताच पण माझा वैयक्तिक स्वार्थ Wink सुद्धा होता. आणि तो म्हणजे तिकोनाला जाताना लाभणारी पवना जलाशयाची साथ. का माहित नाहि पण हा परिसर मला कुठल्याहि ऋतुत आवडतो. पावसाळ्यात तर याचे सौंदर्य अवर्णनीय असतेच पण इतर ऋतुतहि त्याचे दर्शन सुखावह असते. पवना जलाशयाचे मला पहिले दर्शन झाले ते लोहगडला पहिल्यांदा गेल्यावर आणि पाहताक्षणी मी या परिसराच्या प्रेमातच पडलो. त्यानंतर "पवनाकाठचा धोंडी" पुस्तकातुन वाचलेले वर्णन, "मावळसृष्टीला" जाताना झालेले त्याचे ओझरते दर्शन आणि नेटवर पाहिलेले पवना जलाशयाचे फोटोज यामुळे याचे आकर्षण वाढलेले होते. असे म्हणतात कि, इथला पाऊस हा उडत्या पक्षाच्या पंखावर शेवाळं धरणारा असतो आणि तोच अनुभवण्यासाठी एकदा तरी भर पावसात येथे
जायलाच पाहिजे.

पवना धरणाच्या काठाकाठाने आमचा प्रवास सुरु झाला. मस्त बाइकिंगचा अनुभव घेत आम्हि चाललो होतो. धरणाच्या पलिकडे उभा असलेला तुंग आमची साथ करत होता.साधारण ११:३० च्या सुमारास आम्ही तिकोनापेठ गावात पोहचलो. तिकोनापेठ गावातुन तिकोना किल्ला हा हुबेहुब पिरॅमिड सारखा दिसतो.गावाला वळसा घालुन पुढे थेट गडाच्या पायथ्यापर्यंत गाडीने (दुचाकी आणि छोट्या गाडयांनी) पोहचता येते.गडाच्या पायथ्याला महादेवाचे एक छोटेसे पण सुंदर मंदिर आहे. तेथेच बाइक पार्क करुन
गड चढायला सुरुवात केली.

तिकोनापेठ गावातुन दिसणारा "तिकोना"

मार्च महिन्याचे दुपारचे ऊन त्यामुळे "वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन" अशी स्थिती झाली होती. पण जस जसे वर चढत होते तशी थंड हवा थकवा घालवत होती. तिकोनाची वाट तशी सोप्पीच पण एकावेळी एकचजण जाऊ शकेल अशी पायवाट होती. भर उन्हातल्या थंडगार हवेमुळे थकवा जाणवत नव्हता. पुढे जाताच बुरुजाच्या पोटात एक बोगद्यासारखा भाग आहे, आणि त्यात लांब रुंद गुहा आहे. त्यातुनच पुढे जावे लागते.त्याच वाटेने पुढे गेलो असता मारूतीराय उभे ठाकलेले आढळले. मूर्ती अंदाजे
४-५ फूट उंचीची असले. हि मूर्ती इतर मूर्त्यांप्रमाणे हातात द्रोणागिरि पर्वत घेतलेली नसुन पायाखाली दैत्य मारलेली विजयी मुद्रेतील आहे. अनायसे शनिवार असल्याने मारुतीरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.

मारूतीला नमस्कार केला आणि चालु लागलो. पुढे जाताच डोंगराच्या कपारीत वसलेले वनदेवीचे गुहा मंदिर लागले. तेथेच थोडावेळ विसावलो. गुहेच्यासमोरच पाण्याचे एक तळे आहे, पण त्यातले पाणी पिण्यालायक नाहि. तीन गुहा असुन त्यातल्या मधल्या गुहेत देवीची स्थापना केली आहे. तिकानाच्या त्या दुर्ग देवतेचे दर्शन घेऊन आम्ही निघालो. पुढे वाटेत चुना दळण्याचे एक भले मोठे जाते लागले. तेथे थांबलो मस्तपैकी फोटोसेशन केले. पण समोरच उभा ठाकलेला तिकोनाचा बालेकिल्ला आम्हाला खुणावत होता. त्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही निघालो.

बालेकिल्ल्यावर जाताना अरुंद आणि खडी चढण लागते. एका बाजुला काळाकभिन्न कातळ आणि दुसर्‍या बाजुला दरी, त्यामुळे काहि ठिकाणी हातांचा आधार घेतच चढावे लागत होते. वाट अरुंद असल्याने एकावेळेस एकचजण जाऊ शकत होता. एक एक पायरी अंदाजे दोन अडीच फुटांपर्यंत असल्याने त्या ४० पायर्‍या चढताना चांगलीच दमछाक होत होती, पण पायर्‍या चढत असताना दोन बुरुजांच्या आतुन डोकावणारा दरवाजा थकवा घालवत होता. एव्हाना १ वाजत आला होता आणि सगळ्यांनाच भूक लागली होती. पायर्‍या चढुन वर आल्यावर गुहा लागते आणि तेथेच थंड पाण्याचे टाके आहे. तेथील पाणी पिण्यालायक असल्याने तेथेच थांबलो. गडावर भेळ करण्याचा आमचा बेत असल्याने येतानाच सगळे साहित्य आणले होते. कांदा कापण्याचे अवघड (!) काम गणेशकडे दिले (लग्न झालेला एखादा जर ट्रेकमध्ये असेल तर त्याचा असा फायदा होतो :)). कुरुमुरे, फरसाण, कांदा, कैरी मिक्स केले, वरुन कोथिंबीर भुरभुरवली आणि तय्यार झाले हि मस्तपैकी भेळ!!!!! भेळेचा फडशा पाडुन आणि टाक्यातील थंडगार पाणी पिऊन सगळे फ्रेश झालो. सगळा कचरा एका पिशवीत भरून बालेकिल्ला बघण्यास निघालो.

बालेकिल्ल्यावर बघण्यासारखे जास्त काहि आता शिल्लक नाहि, पण काहि ठिकाणी तटबंदी अजुनहि शाबुत आहे. वरती शंकराचे एक छोटेसे मंदिर असुन समोरच नंदी आणि पिंडीचे पुरातन अवशेष आहे. मंदिर जरी साधे असले तरी त्यातील शिवलिंग आणि त्यावरचा नाग अप्रतिम आहे.

शिवलिंगाचे दर्शन घेऊन बालेकिल्ला फिरण्यास निघालो. मंदिराच्या मागेच पाण्याचा एक मोठा खंदक आहे, पण त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे. समोरच दुर्गप्रेमींनी उभारलेली ध्वजस्तंभ आहे. तेथुनच समोर तुंग, लोहगड, विसापुर आदि किल्ले, पवनेचा परिसर, मोर्सेचा डोंगर आणि फागणे धरण असा संपूर्ण मावळप्रांत नजरेत येतो. सह्याद्रिचा तो नजारा न्याहळताना तास-अर्धा तास कसा निघुन गेला ते कळलेच नाहि. "इन हसीन वादियोंसे दो चार नजारे चुराले तो चले" अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे त्या सार्‍या सौंदर्याला कॅमेर्‍यात बंदिस्त करून गड उतरायला सुरुवात केली.

परत निघताना पवना जलाशयाच्या पाण्यात आपले सौंदर्य निरखत असलेला तुंग खुणावत होता. त्याला न भेटताच चाललो होतो त्यामुळे जरासा आमच्या वर नाराजच दिसत होता (तुंग आणि तिकोना हे एका दिवसात सहज करता येणारे ट्रेक आहेत). त्याला तिथेच वचन दिले, "मित्रा पुढच्या वेळी नक्की तुलाच भेटायला येऊ". त्यानेसुध्दा मग हसत हसत फोटोसाठी एक मस्त पोज दिली. Happy

पवना जलाशय आणि "तुंग"

"साद सह्याद्रिला ......मनापासुन

अशा तर्‍हेने अजुन एक विकएण्ड सत्कारणी लागल्याचे समाधान घेऊन परतीच्या वाटेकडे निघालो.

अधिक प्रकाशचित्रे:
http://www.maayboli.com/node/15115

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहेत रे फोटो आणी वर्णन.
त्या अधिक फोटोच थोडी थोडी माहिती त्या बीबी वर लिहि रे. Happy

<<आणि तो म्हणजे तिकोनाला जाताना लाभणारी पवना जलाशयाची साथ. का माहित नाहि पण हा परिसर मला कुठल्याहि ऋतुत आवडतो. पावसाळ्यात तर याचे सौंदर्य अवर्णनीय असतेच पण इतर ऋतुतहि त्याचे दर्शन सुखावह असते>>>

पावसाळ्यात स्वर्ग तिकडे उतरतो. Happy

योग्या झक्कास राव.. Happy मस्तच आलेत फोटो.

>>>> पण इतक्या लोकांच्यात फक्त एवढीशीच भेळ?
सायो, क्रिकेट खेळताना आणि ट्रेकींग करताना नेहमी अल्पोपहार करायचा असतो. हादडायचं नसतं. Proud

असे म्हणतात कि, इथला पाऊस हा उडत्या पक्षाच्या पंखावर शेवाळं धरणारा असतो आणि तोच अनुभवण्यासाठी एकदा तरी भर पावसात येथे जायलाच पाहिजे. >>> अग्दी अगदी...

साधारण ८ वर्षापुर्वी जुलैच्या भर पावसात तिकोना सर केलाय... बालेकिल्ल्यावर गेल्यावर पाऊस ९० अंशाच्या कोनातून सरळ डोळ्यांचा वेध घेत होता...

पावसाळ्यात देवीच्या गुहे समोरील विहिरी सदृष्य तळ्यात एक धबधबा कोसळतो... तो ही मस्तच Happy

जर धुक्याने कृपा केली तर तुंगचे असे विलोभनीय दर्शन दिसते... हे प्रचि मावळसृष्टी ववि-२००९ ला जाताना काढलेले आहेत...
Tikona.jpgPavana.JPGTung.JPG

पुन्हा एकदा मस्तच वर्णन

>>गोरखगड ट्रेकच्या वेळी "बिर्ला कॉलेज" मिटींग पॉईंट होता यावेळी मात्र पळस्पे फाटा असल्याने आणि आमची वाट बघत येणार्‍या-जाणार्‍या ट्रक/टेम्पोंना निरखण्यात निश्चितच कुणाला इंटरेस्ट नसणार स्मित :ऑ

बिर्ला कॉलेज पे़क्षा पळस्पे फाटयाला जास्त निसर्ग सॉदर्य बघायला मिळत. निदान माझ्या एक्स्पिरिअन्स वरुन तरी..

>>मी सगळ्यांना दुसर्‍या रस्त्याने जाण्यासाठी तयार केले. त्यामुळे किमी आणि वेळ वाचणार तर होताच पण माझा वैयक्तिक स्वार्थ डोळा मारा सुद्धा होता

हा दुसरा रस्ता कसा होता ते नाही लिहिलस Happy

बाईक ट्रेक्...मस्त...
मला अजुन हा अनुभव घेता आला नाहिये..कारण किर्‍या टांगारु आहे, आणो यो बाईकला घाबरतो आणि ट्रेन पकडायला लावतो...:अरेरे:

योगेश नेहमीप्रमाणेच उत्तम. तिकोना माझ्याही फेव्हरिट्स लिस्टमध्ये आहे आणि ट्रेकींगची सुरुवात करण्यार्‍यांसाठी मेजवानी.

मला ह्या स्पॉटला मस्त टेन्ट लावून कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची खूप इच्छा आहे.
OgAAADfDvTJftkhx3xLjPkluUJSy4ATC8D-1cs3p_dvQ0w2s82cJouSjGr_y01IAtTYY-CasHkaIqzWgCJq4YvIZQO4Am1T1UMcb4OjuBnzi2jHpMm5wG178IkY1.jpg

हा इथलाच एक आवडता फोटो
OgAAAMe9td4zVI06ST92u8kZeKrheRDM1aaXEZnpjJBdNDiA-qPS2wWN4dPqmjMufSwpLcM7IWXiayeQwIGCi0CNrn0Am1T1UHJaAjZqp2DaFPRmz3zWJcl0Oi-7.jpg

धन्यवाद मित्र/मैत्रीणींनो Happy

साधारण ८ वर्षापुर्वी जुलैच्या भर पावसात तिकोना सर केलाय... बालेकिल्ल्यावर गेल्यावर पाऊस ९० अंशाच्या कोनातून सरळ डोळ्यांचा वेध घेत होता...
पावसाळ्यात देवीच्या गुहे समोरील विहिरी सदृष्य तळ्यात एक धबधबा कोसळतो... तो ही मस्तच>>>>>
आता तर जायलाच पाहिजे पावसाळ्यात. Happy
हा दुसरा रस्ता कसा होता ते नाही लिहिलस>>>>> हां आता थोडा खराब रस्ता (रस्त्याचे काम चालु असल्यामुळे) होता, पण "कुछ पाने के लिए.... " इतना तो चलता है ना Wink

मला ह्या स्पॉटला मस्त टेन्ट लावून कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची खूप इच्छा आहे.>>> वाह मेघना!! मस्तच कल्पना आहे.

मस्तच !

फोटो आणि वर्णन दोन्ही खुप छान! नागाचा फोटो भारी. बाईका बरोबर होत्या ना मग, तुंग केला असतात तर अजुन मजा आली असती. असो. पुढ्ल्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

धन्यवाद Happy
पुढच्या वेळी आम्हाला पण बोलवा >>>> नक्कीच!!!
बाईका बरोबर होत्या ना मग, तुंग केला असतात तर अजुन मजा आली असती. असो.>>>
हो नक्कीच शक्य झाले असते, पण थोडी घाई झाली असती, तिकोना व्यवस्थित पाहता आला नसता आणि हो पुढच्या वेळी परत जाण्यास काहितरी निमित्तपण पाहिजे ना Wink

ह्या वर्षीचा पाऊस पाहून, गतवर्षीच्या पावसातल्या ट्रेक्स ची आठवण झाली. पावसाळ्यामध्ये तिकोना हा एक अविस्मरणीय प्रकार आहे. अतिशय साधा ट्रेक आहे. पावसाळा सुरू झालाच आहे. नक्की अनुभव घ्या.

जोड म्हणून हे फोटो -

7.jpg

तिकोना टॉप

8.jpg

अमेझिंग

9.jpg10.jpg12.jpg13.jpg

तुंग

14.jpg15.jpg

मेघनाद/गणेश धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

मेघनाद पावसाळ्यातले तिकोनाचे फोटो एकदम खल्लास आले आहेत Happy

punhaa kadhee jaataay tikonaa laa. malaa saangaal kaa mumbaihoon jaanaare loks. mee faar poorvee geley. khaalee gaavaat ek deul aahe tithe raahilo hoto. prachamd thandee hotee. malaa vaatata aamhee jan / feb madhye gelo hoto.

सुरेख फोटू आणि मस्त वर्णन.
त्या भेळेच्या फोटोत कैरी फोडलेली असती तर मला पुढे धागा वाचवला गेला नसता. Happy मस्त.
पुण्याकडून तिकोनाला येताना हाडशी मंदिरापासून १० किमी (तिकोनाकडे) अजून एक मस्त स्पॉट आहे.परत गेलात तर तेथे जाऊन या. Happy