माझी हरहुन्नरी आई - बदलून ( मोठे फोटो )

Submitted by अवल on 1 April, 2010 - 02:22

नमस्कार !
सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.

तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच.
अन कुटुंबातील जवळ्जवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले.
भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या.

पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाने दोर्‍याची बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल.
१९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात.

याच विणकामाच्या नमुन्यांचे काही फोटो इथे टाकते आहे.

आणि हे सर्व चालू असताना टि. व्ही वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. अन ही सुडोकुही साधी नाहीत. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात; ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.

तिच्यावर एक सी. डी. ही मी तयार केली आहे, मराठी चॅनल्सकडे ती पाठवली होती, परंतु ओळखी नसल्याने त्याचा पाठपुरावा मला घेता आला नाही. येथे कोणाला तिचे काम आवडले तर कृपया मला मदत कराल ? केवळ तिचे हे प्रचंड काम लोकांपुढे यावे हाच दृष्टिकोन आहे. त्यात व्यावसाईक हितसंबंध नाहीत, ना तिचे, ना माझे.
असो.

आता तिच्या कामाचे काही फोटो-

हा गणपती विणलेला दाराचा पडदा

A1.jpg

ही काही डबलबेडशीट्स

A2.jpgA3.jpgA4.jpgA5.jpgA7.jpg

हा ५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल

A6.jpgA10.jpg

अन हा ६ बाय ४ फुटी टेबलासाठीचा टेबलक्लॉथ

A11.jpg

माझ्या मुलाला गाड्या अन वाहनांचे फार वेड. म्हणून त्याच्या या आजीने त्याच्या खोलीच्या खिडकीला हा पडदा विणला

A8.jpg

अन हा दाराचा पडदा. कमानी खाली नाचणारे मोर

A9.jpg

अन ही माझी आई Happy

A12.jpgतळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.


याचे मोठे फोटो फ्लिकरवरून इथे टाकते आहे

Bedsheet 2

Bedsheet

तळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.

गुलमोहर: 

फारच सुरेख!

हातात कला, उत्साह, आणि एवढं करायची चिकाटी खरच वाखाणण्यासारखं आहे.

त्यांची कला टि.व्ही. वर सादर करायच्या तुझ्या प्रयत्नांना यश येवो.!

त्यांच्या कलाकृतींच एक छोटेखानी प्रदर्शन नाही का भरवता येणार?

सर्वांना मनापासून धन्यवाद ! सगळ्यांच्या शुभेच्छा लगेच तिला कळवल्या. तीने तुम्हा सर्वांना नमस्कार सांगीतला आहे अन धन्यवादही दिलेत.
>>>तू शिकलीस की नाही? <<< अगं शिकलेय सगळं. पण अजून एकतर वेळ नाही होत या गोष्टी करायला. अन तिच्या इतका पेशन्स कसा शीकू बरे Happy
बाय द वे, ती पुण्यातच असते, कोथरूड्मध्ये.

खूप सुंदर आहेत सगळे डिझाइन्स.

हे कसे करायचे वगैरे डॉक्युमेंट करुन ठेवा खरच. आम्ही असे माझ्या आईने केलेले करायला सुरुवात केली आहे. तरी आमचे लहानपणी शिवलेले कपडे काहीच नाहीत आता. त्यामुळे काही पेंटमधे, काही स्केचेस असे काम सुरु केले आहे.

>>>हे कसे करायचे वगैरे डॉक्युमेंट करुन ठेवा खरच<<< अगं मी केलीय एक सीडी, आईची अन बाबांचीही, बाबांबद्दलही लिहिनच लवकर..

आरती, आईंना माझ्यातर्फे साष्टांग नमस्कार. असला गुरु मिळाला पाहिजे. तू त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवायची धडपड करते आहेस ती सत्कारणी लागो.

मी पुण्यात आल्यावर त्यांना भेटायला नक्की आवडेल. आणि जास्त सुट्टी मिळली तर शिकायला देखील आवडेल.

अग, इथे शर्मिला फडके आहेत ना त्यांना संपर्क करतेस का? त्या लोकसत्तामधे पत्रकार आहेत.

आरती,
आईंना माझ्या तर्फेही नमस्कार.सतत काही ना काही कारणं सांगून " काही करायला वेळ मिळत नाही "हे सांगताना आता लाज वाटेल.
अतिशय सुरेख कलाकृती आहेत सगळ्या..

मस्तच!!! तुझ्या आईला खरच मानलं!!

क्रोशा हा माझाही आवडता प्रकार आहे. फ्लॉवरपॉटच्या खाली ठेवायला क्रोशाचे रुमाल असतात (डॉली म्हणतात त्याला) ते मी पण केलेत. तसेच २ उशांना अभ्रे केलेत. बेबी शूज केलेत.

एक मात्र नक्की की ह्या प्रकारात मान- पाठ अगदी एक होऊन जाते. डोळ्यांची वाट लागते. प्रचंड चिकाटीचं काम आहे हे..

टॅटींग येतं का कुणाला? मला शिकायचय...

मानलं !! सगळी डिझाईन्स केवळ अप्रतिम !! खरचं ग्रेट, चिकाटीचे काम आहे हि कलाकुसर !!
थॅक्स.. हे सगळे शेअर केल्याबद्द्ल

बापरे ! किती चिकाटीचं काम केलंय !!!
साष्टांग नमस्कार तुझ्या आईला आरती Happy एक वीतभर वीणलं तरी स्वतःवर खूष होणारी मी आणखी काही बोलूच शकत नाहिये.

अप्रतिम! खुप सुरेख आहेत सगळ्याच कलाकृति. त्यांच्या जिद्दिला आणि चिकाटिला प्रणाम. त्यांचि कला जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना मनापासुन शुभेछ्छा.

Pages