ईंटरनेट सेवेविषयी माहिती हवी आहे

Submitted by अनन्या_न on 31 March, 2010 - 14:00

चेंबूर देवनार या भागात चांगला आणि किफायत्शीर केबलनेट किंवा ब्रॉड्बँण्ड सर्व्हिस प्रोव्हायडर या विषयी माहीती कुणी सांगू शकेल का? मला माझ्या घरगुती वापरासाठी ईंटरनेट घ्यायचे आहे. एमटीएनएलचे सर्व प्लॅनस चांगले आहेत पण त्यांची कस्टमर सर्व्हिस तितकिशी चांगली नाही असे ऐकले आहे आणि त्यांच्या सर्व प्लॅनस मध्ये लँड्लाईन घेणे बंधन्कारक आहे तसेच त्यांचे नेट रविवारी बंद ठेवतात हेही ऐकीवात आहे त्यामुळे ते नको आहे. यामुळे मला ईंटरनेटसाठी काही ईतर ऑप्शन्स आहेत का याची माहीती हवी होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पुण्यात यू टेलिकॉमचे कनेक्शन घेऊ नका. माझ्या कंपनीतल्या अनेकांना त्यांच्या वाईट सेवेचा फटका बसलाय.>> अरे असं आहे का? मुंबईत ईतकी चांगली सेवा देत असताना पुण्यात त्यांनी का बरं असं कराव??
बरं मंडळी शेवटी रिलायन्सचेच कनेक्शन घेतले.. आज चालु झाले. त्यांनी डेमो वगैरे दाखवला. Happy सर्वांनी दिलेल्या माहितीबद्दल मनपूर्व्क आभार.

नमस्कार मीत्रांनो,
मी गेले सहा महिने एअरसेलचे नेट वापरत आहे. खुप छान स्पीड आहे. माला एक प्रश्न पडला आहे, क्रुपया त्याचे उत्तर द्यावे.
मी काही दिवसांपुर्वी माझ्या नेट वर मोझिल्ला फायरफॉक्स इंस्टॉल केले. पण त्यामुळे माझ्या नेटवर काहि साइट ओपन होतात काहि नाहि, तर असे का होते?
क्रुपया मार्गदर्शन करावे.

नमस्कार मीत्रांनो, मी गेले सहा महिने एअरसेलचे नेट वापरत आहे.

तुम्ही हे नेट पीसीवर कसे वापरता ? फोनची केबल पीसीला जोडून की कसे ?
ते सविस्तर लिहा मग काहीतरी सुचविता येईल.

चंपक | पेअर गेन हा काय प्रकार आहे?
http://en.wikipedia.org/wiki/Pair_gain इथे वाचा. तुम्ही कोणत्या कंपनीचे एडीएसेल ब्रॉड्बॅन्ड वापरु पाहत आहात ते कळवा.

एअरसेलचे नेट वापरत आहे. खुप छान स्पीड आहे

>>
हे बहुधा नवी सर्विस प्रोवायडर असल्याने होत असावे. कस्ट्मर्सची संख्या वाढल्यावर ब्यान्ड विड्थ विभागली जाऊन स्पीडवर परिणाम होत असणार. मध्यन्तरी बी एस एन एल च्या इन्जीनीअरबरोबर चर्चेत अनौपचारिक त्याने सांगितले की भारतात वायरलेस इन्टरनेट कोणतेच समाधानकारक चालत नाही.

तुम्ही हे नेट पीसीवर कसे वापरता ? फोनची केबल पीसीला जोडून की कसे ?
ते सविस्तर लिहा मग काहीतरी सुचविता येईल.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हो, मी नेट पीसीवर वापरतो, मी नेट माझ्या मोबाइलच्या माध्यमातुन वापरतो. माझा नोकियाचा हँडसेट आहे, त्यामुळे मी पीसीवर "नोकीया पीसीसुट" हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले आहे. नोकिया डेटा केबलचे एक तोंड मोबाइलला आणि दुसरे तोंड पीसीला जोडुन मी नेट बघतो. डाउनलोड अनलिमिटेड आहे.
माला काही दिवसांपासुन माझ्या नेटवर काहि साइट ओपन होतात काहि नाहि, मी काहि दिवसांपुरर्वी मोझिल्ला फायरफॉक्स इंस्टॉल केले. त्यामुळे तर हा प्रॉब्लेम आला नसेल? ज्या जॉबरिलेटेड साइट आहेत त्याच फ्क्त ओपन होत नाहि म्हणजे उदा. www.monster.com, naukri.com, shine.com
सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे.

नवीन इंटरनेट कनेक्शन घ्यायचे असेल तर कुठले घेउ? क्रुपया तपशीलवार माहीती द्यावी.
पिंपरि-चिंचवड मध्ये बी.एस.एन.ल भारी कि रिलायन्स भारि?

धन्यवाद राजधर्म.

टीपीजी, आयआनेट, स्पेसनेट, कॉमसेन, ऑप्टुस, विर्जीन, अन शेवटी टेल्स्त्रा कडे प्रयत्न करतो आहे. वायरलेस इथे जाम महाग आहे. १० जीबी- ११० डॉलर/महिना.

घर मालकाला सांगुन लाईन बदलायल सांगितले आहेत. शेवटी तोच एक उपाय आहे असे कळाले.

स्वाती यु ब्रॉण्ड्बॅण्ड घे. चांगली सर्विस आहे. http://www.youbroadband.in/ . 98925 77898 या नंबरवर फोन करुन सांगित लेस तर घरी येऊन सगळी माहिती देतात.
किंवा मग हाथवे पण चांगलय. http://www.hathway.com/
ईथे तुला त्यांचे सर्व प्लॅन्स व ईतर माहिती बघायला मिळेल.
जर घरी मटेनिलचे कनेक्शन असेल तर त्यांचे ट्राय बॅण्ड ... याचा स्पीड तर चांगलाय पण त्यांचे कस्टमर केअर डिपार्ट्मेंट तेव्हढे चांगले आहे की नाही शंका आहे.

मी कुर्ल्याला राहते. आधी आमच्याकडे हाथवे कंपनीचे कनेक्शन होते. पण ते दर शनिवार रविवार बंद रहात असे. बंद झाल्यावर फोन केल्यावर ' अमक्या तमक्या बिल्डींगची गच्ची बंद आहे. उद्या जाऊन बघतो' वगैरे कारणे सांगत. नंतर दुरुस्तीचे काम झाल्यावर ५-६ वेळा फोन करून (आम्ही ऑफिसमध्ये असताना) सांगत. म्हणून ६ महिन्यांनंतर आम्ही एमटीएनएल चे कनेक्शन घेतले. (वायरलेस मोडेम आणि ५०० रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन). आता बरेच महिने झाले पण विशेष प्रॉब्लेम आला नाही. तुम्हाला चेंबूर नाक्यावर एमटीएनएल चे ऑफिस आहे, ते माहित आहे का?तिथे चौकशी करा.

MTNL / BSNL अगदी डोळे झाकुन घ्या. मी आता पर्यंत खुप कंपन्या ट्राय करून पाहिल्यात, MTNL / BSNL सर्वात छान.

- ऊत्तम स्पीड
- अखंडीत सेवा ( काही अपवाद वगळता )
- स्वस्त प्लान्स
- वैविध्य आणि गरजेनुसार प्लॅन्स.
- सरकारी कंपनी.

तोटे

- ग्राहक काळजी केंद्र - खुप ढिसाळ, अरेरावी, व्यवस्थित अपडेट कधीच मिळ्णार नाही
- लवकर कनेक्शन मिळत नाही.

..

Tata , BSNL किंवा MTNL घ्या कारण honesty आणि Hathway बेकार आहेत मध्ये मध्ये बंद असत आणि तक्रार केली तर कोणी येत नाही.

फक्त प्रफुल यांनी सांगितलेले तोटे आहेत.

रिलायन्स किंवा इतर कुणाचे इंटरनेट कार्ड घ्यायचे असेल तर खूप मोठी प्रोसिजर असते का? काय काय कागदपत्रे लागतात? किती वेळ लागतो?

अ‍ॅड्रेस प्रूफ, फोटो आयडी, एक दोन फोटो एवढ्यावर काम व्हायला पाहिजे. एक दोन दिवस लागतील. टाटा फोटॉन चा अनुभव आहे माझा.

Pages