एम बी ए

Submitted by ज्ञाती on 27 March, 2010 - 00:49

नमस्कार
अमेरिकेत एमबीए करण्याविषयी मार्गदर्शनपर काही मुद्द्यांवर चर्चा/सूचना/अनुभव/मत अपेक्षित आहे.

मला एमबीए करण्याची इच्छा आहे. त्याबद्दल माहिती मिळ्वायला सुरुवात केल्यापासुन खुप गोष्टींबद्दल शंका/गोंधळ उडालाय.
१.पात्रता निकषः बर्‍याच टॉप युनिवेर्सिटीजमध्ये ३-५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. काही लोकल कॉलेज मध्ये त्याशिवायही अ‍ॅड्मिशन देतात. तेव्हा तेवढा अनुभव घेउनच एम्बीए करणे आवश्यक आहे का? (थोडक्यात चांगल्या ठिकाणाहुन काही काळाने की बर्‍या ठिकाणाहुन लगेच एम्बीए करावे?)
२. त्याच धर्तीवर नोकरी करता-करता पार्ट टाईम्/नोकरी न करता/असलेली सोडुन फुल टाईम?
३. एम्बीए साठी विषय निवडणे. साधारण कुठल्या विषयात पुढे जास्त/चांगल्या नोकरीच्या संधी आहेत?
४. (काहींना हा प्रश्न चुकीचा वाटण्याची शक्यता आहे पण) इथे एम्बीए मध्ये लागणारे पैसे आणि पुर्ण झाल्यावर नवीन नोकरीत मिळणारा पगार याचा ताळमेळ कसा लागतो? (शिकायला मिळते, डिग्री मिळते, तुमची आवड/ कल असेल तर करा वगैरे सगळे मान्य, पण हे एक क्षणभर बाजुला ठेवुन फक्त आर्थिक दृष्ट्या विचार केला तर शिकताना गुंतवलेल्या हजारो डॉलरची परतफेड होते का?)

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोकरीचा अनुभव नसेल तर इथे एम बी ए करून नंतर नोकरी मिळवायला बराच त्रास पडतो. माझ्या बरोबर एम बी ए करणार्‍या बर्‍याच विद्यार्थ्यांनी ( एफ १ वर असलेल्या ) नोकरी मिळेपर्यंत म्हणून सुरवात करून शेवटी पी एच डी पण पूर्ण केलं .तरिही नोकरी मिळायला त्रास झालेले काही जण होते. अगदी चांगल्या स्कूल्स मधे ( जसे की व्हार्टन , सी एम यू वगैरे ) अनुभवाला पुष्कळ महत्व देतात.

चांगल्या कंपनीत नोकरी असेल तर पार्ट टाइम एम बी ए करण्याकरता ट्यूशन लोन/ रीइम्बर्समेन्ट वगैरे मदत मिळ्ते शिवाय कामाचे तास वगैरे अ‍ॅडजस्ट करता येतात. केस स्ट्डीज, प्रोजेक्ट वर्क इत्यादी करता पण प्रत्यक्ष अनुभवाचा चिकार फायदा होतो.

मी स्वतः ग्रॅजुएट झाल्याझाल्या एम बी ए केलं होतं. कार्यानुभव शून्य . त्यामुळे नुस्तं पुस्तकी ज्ञान मिळवण्यापलिकडे त्याचा काही फायदा झाला नाही. दुर्दैवाने माझ्या इंस्टि ट्यूट मधल्या शिक्षकांनाही फक्त शिकवण्याचा अनुभव होता. प्रत्यक्ष नोकरी करण्याचा अनुभव सगळ्यांचा मिळुन सरासरी वर्षभर असेल Happy
त्यामुळे त्यांच्याकडुनही पुस्तकी धड्यांपलिकडे काही शिकायला मिळालं नाही.

एका वर्षी त्रिकया- ग्रे मधले काही लोक येऊन दीड दिवसाचा सेमिनार घेऊन गेले. त्या दिड दिवसात जेवढं व्हॅलुएबल अन उपयुक्त शिकायला मिळालं तेव्हढं वर्गात दोन वर्षे काही मिळालं नाही.

कामाचा अनुभव असेल तर उत्तम पण पदवीनंतर केले तरी काही हरकत नाही. शिकवणारे कसे आहेत आणि अभ्यासक्रम कसा आहे यावर मुलांना त्यातून ज्ञान मिळणे वा न मिळणे अवलंबून आहे. कामाचा अनुभव जरी असला पण वर्गात काही खास शिकवल्या जात नसेल तर त्यातून अनुभवी व्यक्तीला तरी कितपत फायदा होईल! एक ती पदवी मिळेल या पलिकडे फार काही होणार नाही. इथे सिंगापुरात ज्या प्रकारे मुलांना शिकवले जाते आणि त्यांचा जो अभ्यासक्रम असतो तो पहाता माझे तरी असे मत झाले आहे.

एम बी ए (finance) केल्यावर ( भारतात ) नेट सेट करण कितपत बरोबर आहे? प्लीज सांगा. मी नेट द्यायचा विचार करतीये.

नंतर शिकवण्याचा विचार असेल तर नेट देऊन ठेवायला हरकत नाही... पण त्याच बरोबर पी एच डीचा पण विचार करा.. आणि तुम्ही जिथून शिकलात तिथेच शिकवण्याची संधी उपलब्ध आहे का तेही बघा...

हो, तसा विचार आहे. नेट द्यायला हरकत नाहीये तर आता तयारी सुरु करायला हवी.. पी एच डी जरा कठिण वाटतय.
आणि तुम्ही जिथून शिकलात तिथेच शिकवण्याची संधी उपलब्ध आहे का <<<< वेल, माझ शिक्षण एका गावात आणि मी आता दुसरी कडे राहतीये.
बादवे, नेट साठी एखादी चांगली साईट आहे का? ugc वर तशी फार माहीती नाहीये.

अरे इतका मस्त धागा माझ्या नजरेत कसा आला नाही ? Uhoh

मलाही थोडे मार्गदर्शन हवे आहे ...

मी M.Stat केले आहे ISI Delhiतुन ....सध्या आयसीआयसीआय मधे जॉब करतोय १.५ वर्श झाली .

युरोपात ...स्पेशली इन्सीड मधे पीएच्डी कराचयी इछा आहे ...मग नक्की कशी सुरवात करु ?

अजुन थोडा एक्क्ष्पीरीयन्स घ्यावा काय ?
cfa , actuary सारखं एखादं प्रोफेशनल सिक्षण घावं काय ?
शिवाय बी-स्कुलात पीएच्डी साठी मला प्रोफ रेको देणार नाहीत बहुतेक ..जी एम चा वगैरे रेको चालेल का ?

मी M.Sc (Software Engineering) केले आहे २००६ मध्ये. Faculty,Website Developer, Freelancing असे ४ वर्ष काम केले आहे. आता मला MBA करायचे आहे Business Administration मध्ये.पूण्यात Executive or Part time MBA करायचे आहे.कृपया मला college, fees आणि IT or Business Administration मध्ये कूठले निवडावे ते कळत नाहीये.कृपया मला मार्गदर्शन करा.

मी सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधून MBA करतेय. नोकरीची शक्यता आहे का? स्पेशलायजेशन साठी कोणता विषय निवडावा ?

Pages