एम बी ए

Submitted by ज्ञाती on 27 March, 2010 - 00:49

नमस्कार
अमेरिकेत एमबीए करण्याविषयी मार्गदर्शनपर काही मुद्द्यांवर चर्चा/सूचना/अनुभव/मत अपेक्षित आहे.

मला एमबीए करण्याची इच्छा आहे. त्याबद्दल माहिती मिळ्वायला सुरुवात केल्यापासुन खुप गोष्टींबद्दल शंका/गोंधळ उडालाय.
१.पात्रता निकषः बर्‍याच टॉप युनिवेर्सिटीजमध्ये ३-५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. काही लोकल कॉलेज मध्ये त्याशिवायही अ‍ॅड्मिशन देतात. तेव्हा तेवढा अनुभव घेउनच एम्बीए करणे आवश्यक आहे का? (थोडक्यात चांगल्या ठिकाणाहुन काही काळाने की बर्‍या ठिकाणाहुन लगेच एम्बीए करावे?)
२. त्याच धर्तीवर नोकरी करता-करता पार्ट टाईम्/नोकरी न करता/असलेली सोडुन फुल टाईम?
३. एम्बीए साठी विषय निवडणे. साधारण कुठल्या विषयात पुढे जास्त/चांगल्या नोकरीच्या संधी आहेत?
४. (काहींना हा प्रश्न चुकीचा वाटण्याची शक्यता आहे पण) इथे एम्बीए मध्ये लागणारे पैसे आणि पुर्ण झाल्यावर नवीन नोकरीत मिळणारा पगार याचा ताळमेळ कसा लागतो? (शिकायला मिळते, डिग्री मिळते, तुमची आवड/ कल असेल तर करा वगैरे सगळे मान्य, पण हे एक क्षणभर बाजुला ठेवुन फक्त आर्थिक दृष्ट्या विचार केला तर शिकताना गुंतवलेल्या हजारो डॉलरची परतफेड होते का?)

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे विद्यापीठाचे पार्ट टाईम् एमबीए ३ वर्षांचे असते. पहिली २ वर्षे झाली की डीबीएम हा डिप्लोमा मि़ळतो. तिसर्‍या वर्षानंतर एम एम एस ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळते. संध्याकाळी ६.३० ते ८.३० कॉलेज असतं. त्यात लेक्चर्स, सेमिनार, प्रेझेंटेशन्स, गॅदरिंग, प्रोजेक्ट, असाइन्मेंट्स असं सगळं असतं.
ऑनलाईन मध्ये बरेच फेक इन्स्टिट्यूट्स आहेत. तेव्हा जपून.

>>इथे एमबीए करण्याविषयी
ज्ञातीला 'इथे' म्हणजे 'अमेरिकेत' असं म्हणायचं आहे का? आधी धागा कदाचित अमेरिकेच्या ग्रूपमध्ये असेल तर तिने तसे लिहिले असेल. ते नीट कळले तर माहिती देणार्‍यांना बरे पडेल.

ज्ञाती जरा बॅकग्राऊंड देशील का प्लीज? बेसिक डिसीप्लीन, कोणाला करायचे आहे, का करायचे आहे, कशा प्रकारची मदत हवी आहे? (म्हणजे प्रवेशप्रक्रिया, देशात की परदेशात, पुढील करियरदृष्टीनेस्कोप, स्कुल्सचे रेटिंग, आर्थिक मदत, वगैरे नक्की कशाबद्दल माहिती हवी आहे?)

इथं का करायच आहे हा? खूपच महत्वाचा ठरतो!

'इथे' म्हणजे 'अमेरिकेत' असं का? अमेरिकेच माहित नाही भारताच सांगू शकेन Happy

एम बी ए - या शिक्षणप्रणालीने मुख्यतः multidisciplinary perspective आणि network मिळते (वै मत). तसेच २-५ वर्षाचा कार्यानुभव असलेल्यांना जास्त फायदा होतो असं मला वाटतं. मी जर्मन साहित्यातील पदवीनंतर केले तरी फार काही वाईट झाले नाही, पण भारतात तरी बी.ई + कार्यानुभव+ एमबीए ला जास्त स्कोप आहे.
तिकडच्या फुलटाईमच्या फिया पाहता स्कोप किती आहे ते माहित नाही, (एम बी ए ला एड मिळत नाही ना ?) ओळखीचा सहका-याला अलिकडेच बर्कले मध्ये अ‍ॅडमिशन मिळाली त्याला ८ वर्ष कार्यनुभव आहे आणि तो येलचा ग्रॅड आहे.
रेटेड स्कुल्स कार्यानुभवाला वेटेज जास्त देतात का?
तिकडचे माहित नाही इकडे Finance, HR, Mktg, Operations, Systems या विषयात मेजर करता येते. पहिलं वर्ष मात्र mandatory (आणि छळवादी) असतं. Proud

Snapshots from Hell - Peter Robinson हे जरुर वाचणे. मस्ट रीड आहे. तिकडे कुठल्याही ग्रंथालयात मिळेल.

रच्याकने: काही दिवसांपूर्वी आय.आय.एम कलकत्त्याला जाण्याचा योग आला- १५% मुली (फक्त). आय आय टी Kharagpur मुली ६%. (फक्त म्हणायचं त्राण नाही Sad
हापिसात लोकांनी तोंड फुटेस्तोवर चर्चा केली. Sad

Snapshots from Hell याच नावाने IIM Lucknowच्या अनिरुद्ध पूर्णपात्रे नावाच्या विद्यार्थ्याने ब्लॉग लिहिला आहे. तोही वाचनीय आहे..

पार्ट टाईम वगैरेंबद्दल उद्या लिहीते.
पार्ट टाईम-
पूर्णवेळ नोकरी करत असताना पार्टटाईम MBA मध्यमव्यवस्थापकिय लोकं करणे पसंत करतात. यात हेतू ज्ञान मिळवणे जास्त असतो शिवाय असलेले अद्ययावत करणे. शिवाय जर कंपनी वित्तपुरवठा करणार असेल तर सोन्याहून पिवळे.
विकेंड MBA लोकं करतात. नव-याने जपानात कॅनेडियन विद्यापीठाचे केले.
ज्ञान कधीही वाया जात नाही आणि कामात उपयोग होतोच असे असले तरी एकदम असे पार्टटाईम MBA करुन जॉबप्रोफाईल बदलु शकणा-यांची संख्या तुलनेने कमी (तरीही पुरेसे प्रयत्न करणारे आणि धोका पत्करणारे करु शकतात).
पार्टटाईम करायचे असणा-यांनी रेटेड स्कुल्स पेक्षा आपली सोय/ फी वगैरे घटक विचारात घेणे जरुरी आहे.

पूर्णवेळ २ वर्ष MBA करणा-यांना आणि पूर्वीचा मोघम ते घसघशीत कार्यानुभव असणा-यांना MBA तील मुख्य विषयानुसार नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पूर्ण २ वर्ष फी भरायचा अवघड निर्णय आहे. अशावेळेस स्कुल्सच्या रेटिंगला जास्त महत्व देणे साहजिक आहे. त्यांच्या प्लेसमेंटस कशा होतात त्याचीही माहिती काढणे अनिवार्य.

'इकडे अन 'तिकडे' लिहिण्यापेक्षा देशाची नावे लिहा. गोंधळ होतोय. महाराष्ट्रात आय आय एम का नाही?
उ.प्र. सारख्या 'बुद्धिवादी' राज्यात असताना?

*

मला वाटलं ह्या भारतात आहेत. त्या अनुषांगाने लिहीली होती. नंतर प्रोफाइल बघितल्यावर कळलं की त्या इथेच आहेत. मी दिलेल्या माहिती पेक्षा त्यांना ज्यांनी एम बी ए केले आहे अश आ लोकांकडुन योग्य माहिती मिळेल. मी दिलेली माहिती इथे पहिल्यांदाच येणार्‍या लोकांकरता कदाचित उपयोगी पडू शकली असती.

ही माहिती कितपत उपयोगी पडेल माहित नाही.

ज्ञाती, मी खरं तर सकाळीच इथे आलो होतो २-४ मुद्दे लिहायला पण तुम्हाला नेमकी काय माहिती हवी हे स्पष्ट कळलं नाही म्हणुन लिहायचं टाळलं. मी स्वतः एम बी ए केलेलं नाही त्यामुळे तुमच्या प्रश्न १ ते ३ ची उत्तरं इथे माझ्या पेक्षा पुष्कळ जास्त अनुभवी आणि मुख्यतः एम बी ए स्वतः केलेली मंडळी देतीलच.
मी स्वतः इथे मास्टर्स (एम एस) करता इथे आलो. मी स्वतः जरी एम बी ए केलेलं नसलं तर माझ्यामते तुम्ही विचारलेला प्रश्न क्र ४ याचं उत्तर माझ्या सारख्या एम एस करणार्याला देता येण्या सारखं आहे आणि खरं तर त्या बद्दलच २-३ मुद्दे (माझ्या दृष्टीने)मुद्दामच लिहायला घेतले.
तुमचा प्रश्न (क्र ४) हा खुप महत्वाचा आहे. तुमचा अमेरिकेत येऊन उच्च शिक्षण घेऊन पुढे नोकरी करायचा विचार जर असेल तर ह्या काही बाबी तुम्ही कृपया करुन विचारात घ्या.
१) इथे कुठलं ही उच्च शिक्षण खुप खर्चिक असतं. आर्थिक मदत किंवा आपण ज्याला फंडिग म्हणतो, ते सुद्धा मिळायचे मार्ग पुष्कळ आहेत पण ते फंड्स आपल्याला मिळातील ह्याची कितपत शक्यता आहे हे इथे येऊन कॉलेज मध्ये वावरायला लागल्या शिवाय आजिबात कळत नाही. एम एस ला रिसर्च बेस्ड फंड्स उपलब्ध असतात पण एम बी ए ला कितपत असे फंड्स असतील ह्या बद्दल मला शंका आहे. एकंदरित एम बी ए हा एम एस पेक्षा खर्चिक प्रकार आहे असं मी म्हणीन.
२) तुम्ही नेमक्या सध्या कुठे आहात हे मला माहित नाही पण जर भारतात असाल तर, माझ्या मते कमीत कमी ३-४ वर्षाचा अनुभव घेतल्या शिवाय एम बी ए ला अॅडमिशन घेऊ नये असं मी स्पष्टपणे सांगीन. सहसा एम बी ए वाले कॉलेजेस तुम्हाला अनुभव असल्या शिवाय अॅडमिशन देत नाहीत हे मी जाणतो पण फारसा अनुभव नसताना सुद्धा कधी कधी अॅडमिशन मिळुन जाते. मी स्वतः शुन्य अनुभव असताना इथे एम एस करायला यायची घोडचुक केलेली आहे. एम बी ए च्या डिग्री ला नक्कीच मह्त्व आहे पण तुम्हाला जर नंतर इथे नोकरी करायची असेल तर हँड्स ऑन एक्स्पिरियन्स शिवाय पर्याय नाही. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अनुभवाबरोबर एम बी ए ची डिग्री आहे हा एक प्लस पॉइंट असेल पण ह्या समिकरणातुन जर अनुभव काढुन घेतला तर खरच सांगतो फारसं काही उरत नाही. मी पुर्वी २-३ इंटर्व्युस ला गेलो तेव्हा उत्तरं चांगली दिली पण अनुभव नसल्यामुळे कंपन्या नोकरी द्यायला धजल्या नाहीत (हे मला स्वतः हायरिंग मॅनेजर्स नी नंतर सांगितलेलं आहे). माझंतर मतं आहे की एम बी ए वगैरे सारख्या खर्चिक बाबी तुम्ही एकदा नोकरी करायला लागल्यावर कंपनीच्या खर्चानी कराव्यात.
३) भारतातुन कर्ज घेऊन इथे येणे आणि मग एकदा पहिल्या सेमिस्टर ची फी भरुन पुढे फंड्स शोधणे हा मार्ग बरीच लोकं घेतात. हा अत्यंत धोकादायक मार्ग आहे. फंड्स मिळाले नाहीत तर त्याच्या द्बावाखाली येऊन कुठलीही व्यक्ति नीट अभ्यास करु शकणार नाही हे लक्षात घ्या (तसं करण्याचे मनात असेल तर). नंतर बरचसं कर्ज करुन जर तुम्ही नोकरी जरी मिळवली तर त्या कर्जातुन पुर्ण पणे मुक्त व्हायला बराच वेळ लागतो. आणि मुख्य म्हणजे ह्यात बर्याच जर तर च्या गोष्टी आहेत त्यामुळे एकदा नोकरी लागली की सगळं नीट होइल असा विचार करणं शुद्ध वेडेपणा आहे.(स्वानुभव)
४) तुम्हाला अमेरिकेतच यायचं असेल तर एखादा असा कोर्स निवडा जिथे तुम्हाला फंड्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. कोणी मित्र मैत्रीणी आधीच कुठल्या कॉलेज मध्ये असतील तर तिथे चौकशी करुन पहा. जितकं जमेल तितकं कमी कर्ज घ्या. वर पार्ट टाइम नोकरी बद्दल तुम्ही लिहीलं आहे. अमेरिका ह्या बाबतीत अतिशय चक्रम देश आहे. तुम्ही जर इथे स्टुडंट विसा वर आलात तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक सेमिस्टर ला फुल टाइम एनरोल व्हावं लागतं. फुल टाइम म्हणजे सहसा ९ क्रेडिट्स(तीन विषय). तुमचं कॉलेज कुठे आहे त्याप्रमाणे ह्या पर क्रेडिट आवर फी मध्ये प्रचंड तफावत आहे. नोर्थ इस्ट ( न्यु यॉर्क, न्यु जर्सी) किंवा वेस्ट कोस्ट ( कॅलीफॉर्निया) वर तुमचं कॉलेज जर असेल तर ह्या फिया खुप असतात. ह्याउपर तुम्हाला कॉलेज कँपस वर आठवड्याला फक्त २० तास काम करायची मुभा असते. ह्यात तुम्हाला १०, १५ किंवा २० डॉ प्रती तास ह्या हिशोबानी जरी नोकरी लागली तरी तुम्ही ५०० डॉ प्रती आठवड्याच्या वर कमवु शकणार नाही. चांगल्या कॉलेजेस ची फी साधारण ८००-१२०० डॉ प्रती क्रेडिट च्या दरम्यान असते. ९ क्रेडिट १,००० डॉ च्या हिशोबानी म्हंटले तरी ९,००० डॉ होतात. त्यात तुमच्या घराचं भाडं, खाणे, पिणे ह्याचा खर्च आपण हिशोबात घेतलेला नाहीये.

हे सगळं सांगायचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा किंवा इथे येण्यापासुन परावृत्त करण्याचा आजिबात नाहीये. मी स्वतः ह्यातुन गेल्यामुळे मला फक्त वस्तुस्थिती ची जाणिव करुन देण्याची नितांत गरज वाटते. तुम्ही जर एकदा ठरवलत की आपण अमेरिकेत येऊन डिग्री घ्यायची तर तुम्हाला कोणीही थांबवु शकत नाही, पण फक्त या सगळ्या बाबींकडे डोळस पणे बघणे खुप गरजेचं आहे असं मी सांगु इच्छितो.

त्यापेक्षा भारतात कमी खर्चात एम बी ए करायला काय हरकत आहे. आणि नन्तर अमेरिकेत जाय्ला?

आणि मुळात एम बी ए ही काही जादूची कांडी आहे का? ते डिझायरेबल क्वालिफिकेशन असणार ना?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांना!
रैना, चांगली माहिती दिलीस.
रेटेड स्कुल्स कार्यानुभवाला वेटेज जास्त देतात का?>> हो कमीत कमी ५-६ वर्ष (बर्केलीसारखे टॉप टेन)
वैद्यबुवा, तुमची माहिती इन जनरल इथे शिक्षणासाठी येणार्‍या सगळ्यांना उपयोगी आहे, धन्यवाद.
भारतात कमी खर्चात एम बी ए करायला काय हरकत आहे.>>>टोणगा, मी इथेच आहे अमेरिकेत आत्ता, त्यामुळे इथेच करायचेय एम्बीए.

मला वाटतेय ज्यांनी अमेरिकेत स्वतः एमबीए केले आहे असे मला हवी ती माहिती देउ शकतील, आहे का असे कुणी? (इथे लिहायला वेळ होत नसेल तर तसे कळवा प्लीज, मी फोन करेन आणि मग इथे ती माहिती लिहीन)

तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अनुभवाबरोबर एम बी ए ची डिग्री आहे हा एक प्लस पॉइंट असेल पण ह्या समिकरणातुन जर अनुभव काढुन घेतला तर खरच सांगतो फारसं काही उरत नाही.>>> हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. (माझ्या पहिल्या प्रश्नाच्या जवळ जाणारा). मलाही असे बरेच जण माहीत आहेत ज्यांना पीएच्डी केल्यावरही, अनुभव नाही म्हणुन नोकरी मिळवायला जड गेले.

एम बी ए वगैरे सारख्या खर्चिक बाबी तुम्ही एकदा नोकरी करायला लागल्यावर कंपनीच्या खर्चानी कराव्यात.>>> पार्ट टाईम (नोकरी करता करता) करता येते. एकच आहे यात नोकरी संभाळुन किती कोर्सेस घेता येतील, परिणामी एमबीए पूर्ण व्हायला जास्त वेळ लागण्याची शक्यता. तोवर नोकरी टिकली पाहिजे.

मला. अमेरिकेत नोकरी करुन , भारतातल्या एखाद्या चांगल्या बी स्कुल मधुन MBA करता येईल का?
येत असेल तर काय काय पर्याय आहेत.. ते कुणी सांगु शकेल का?

तुम्ही जर इथे नोकरी करत असाल फुल टाइम तर पार्ट टाइम एम बी ए करता येइल. २-२ कोर्स करुन एम बी ए पार पाडता येइल. थोडं जड जाइल पण करता येण्याजोगं आहे, खुप लोकांनी केलय.
पण जर स्टुडंट विसा वर याल तर मग एनरोलमेंट फुल टाइम करावी लागते. तसच एच ४ वर असलात तरी पार्ट टाइम एम बी ए करता येइल पण मग नोकरी (अधिकृतपणे) करता येणार नाही (एच ४ असल्यामुळे).

अमेरिकेत नोकरी करुन , भारतातल्या एखाद्या चांगल्या बी स्कुल>>>> बुवा, ते इथे आहेत.

ह्या बुव्याचं काय डोकं फिरलय, लोकं कुठे आहेत ते बघत नाही अन सुरु सल्लेबाजी Lol
ज्ञाती, मी उत्तर तुझ्या पोस्टीतल्या दुसर्‍या मुद्द्याला दिलं होतं किशोर यांच्या पोस्टीला नाही . Happy

बुवा मी अमेरिकेतच आहे .. मागील २ वर्षां पासुन...

असो मी एच-१ बी व्हिसा वरती आहे... भारतातुन MBA करता येईल का ते option बघत होतो..
अमेरिकेत शिक्षण फार महाग आहे.. परवडत नाही Happy

welingkar institute चा distance learning PGDIBA आहे.. पण तो किती उपयोगी पडेल ते कळत नाहीये.
कुणाला त्याबद्दल माहीती असेल तर नक्की कळवा..

कुठलाही मॅनेजमेंटचा कोर्स ऑनलाईन ( Distance Learning) करू नये. मॅनेजमेंट कोर्समधे वर्गात पुस्तकातून जितकं शिकायला मिळतं त्यापेक्षा कितीतरी जास्त तुमची , प्राध्यापकांची आणि वर्गमित्रांची चर्चा यातून शिकायला मिळतं. तसेच MBA करण्याचा मुख्य फायदा हा त्यातून जे नेटवर्किंग होतं यात असतो. नुसतं certificate फारसं उपयोगाचं नसतं ( Unless you are graduating from very top school) आणि माझ्या माहितीप्रमाणे याच कारणासाठी सगळ्या चांगल्या शाळा Distance Learning ने MBA करू देत नाहीत.

तुमच्याकडे अनुभव नसेल तर १) MBA मधले अनेक धडे तुम्ही नीट समजू शकत नाहीत. २) त्याने तुमच्या career मधे फारसा फरक पडत नाही. MBA चा फायदा ज्याला थोडा अनुभव आहे त्यालाच होतो.

MBA चा फायदा ज्याला थोडा अनुभव आहे>> अगदी खरं. एमबीए फूल टाईमच करावं!

welingkar institute चा distance learning PGDIBA आहे.>>फारसा फायदा नाही होणार! (वै. म.)

अजयना अनुमोदन किशोर. माझंही तेच मत आहे.
पार्ट टाईम करा हवं तर. एमबीए डिस्टनस करुन फारसा फायदा होत नाही unless nothing else matters to you but gaining knowledge. मग एक वेळ ठिक आहे.

Here in Singapore, I don't find any relevant differences in part time MBA and full time MBA. The only difference is in number of years required to complete it. Full timers can complete it in just one year while it takes two years for part timers. The lecture-sessions are same for both. Mostly they are conducted early evening so that both can attend. The fees structure, syllabus, projects all are same. Very few electives are conducted afternoon which part-timers cannot attend but the list of elecitives is very big so there are always better options if you miss your electives due to lecture-schedule.I have noticed that, full timers are generally outsiders.. means student who have come from other countries. While part timers are those who have their own jobs and are not willing to give it up just for the sake of MBA. In fact, nowadays, part-time MBA is on high demand!!!! ..but I have no idea about other countries.

१. MBA करण्याचा मुख्य फायदा हा त्यातून जे नेटवर्किंग होतं यात असतो. नुसतं certificate फारसं उपयोगाचं नसतं
२. तुमच्याकडे अनुभव नसेल तर १) MBA मधले अनेक धडे तुम्ही नीट समजू शकत नाहीत. २) त्याने तुमच्या career मधे फारसा फरक पडत नाही.
३. तुम्ही नोकरी जरी मिळवली तर त्या कर्जातुन पुर्ण पणे मुक्त व्हायला बराच वेळ लागतो. आणि मुख्य म्हणजे ह्यात बर्याच जर तर च्या गोष्टी आहेत
>>> खूप मोलाचे मुद्दे. धन्यवाद अजय आणि बुवा.
बी तिथलीही माहिती दिल्यबद्दल थॅन्क्स. चिनुक्स, रैना पुस्तक कुठुनतरी मिळवुन जरुर वाचेन.

MBA distance learning सगळ्यात उत्तम.
मी symbiosis मधुन करतोय, ४ वर्षात पुर्ण करु शकता.

मुख्य परवडते.
३०K मध्ये काम होते.

अमेरिकेत तुम्हाला sysmbiosis सारखी institute बघावी लागेल.

Pages