सर्व्हे रिपोर्ट: विभाग - शिक्षण

Submitted by संयोजक on 21 March, 2010 - 04:23

शिक्षण

भारतातील स्त्रीशिक्षणाचे चित्र बदलते. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मुलभूत हक्क, तसेच, शिक्षणाची समान संधी मिळणे हा प्रत्येक स्त्रीचा मुलभूत हक्क, त्यामुळे या सदरातील सगळे प्रश्न (७) अनिवार्य ठेवले होते. बहुतांशी अतिशय उच्चशिक्षीत अशा मैत्रिणींचे चित्र यात उमटले. पुढील सर्व प्रश्नांना आलेल्या उत्तरांमध्ये या एका अतिशय महत्त्वाच्या घटकाचा प्रभाव जाणवतो का? पाहूयात..

Educationlevel.jpg
एकूण मैत्रिणींपैकी १०% पी.एच्.डी (पोस्ट डॉक, २ द्विपद्व्युत्तर डिग्री प्राप्त केलेल्या) आहेत. पदवीधर आणि द्विपदवीधर प्रतिसादाचे प्रमाण जवळजवळ सारखेच म्हणता येईल असे आहे. २% स्त्रिया (एकूण ३) पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या असून त्यापैकी एक जण अभारतीय आहे.

Education & Occupation.jpg

पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या स्त्रियांपैकी एक गृहिणी आहे व दोन जणी पूर्णवेळ नोकरी करतात. पदवी शिक्षण घेतलेल्यापैकी ५२% महिला पूर्णवेळ नोकरी करतात. हेच प्रमाण द्विपदवीधर महिलांमधे ५३% आहे.
एकूण १२ पी.एच्.डी. (पोस्ट डॉक, २ द्विपद्व्युत्तर डिग्री प्राप्त)स्त्रियांपैकी ७५% म्हणजे ९ स्त्रिया पूर्णवेळ नोकरी करतात. यामधे गृहिणी किंवा अर्धवेळ व्यवसाय करणार्‍या कोणी नाही. प्रत्येकी एक जण विद्यार्थिनी, पूर्णवेळ व्यवसाय आणि कामाच्या शोधात आहे.

पदवीपर्यंतच्या शिक्षणाच्या शाखा, द्विपदवी, पी.एच्.डी वगैरे शिक्षणापर्यंतच्या शाखा, सध्याचा पदभार, पूर्णवेळ नोकरी, एकाच प्रकारच्या शाखेला नोकरी मिळण्याच्या दृष्टीने असलेला वाव वगैरे परस्परसंबंध स्थापित करण्याइतपत तपशीलाने मजकूर आपल्याकडे नाही आणि तसे या प्रश्नावलीपुरते आपले उद्दिष्टही नव्हते. तरीही एक feel म्हणुन शाखेचा विचार करायचा झाल्यास ते वरीलप्रमाणे दिसते. पैकी सर्वात जास्त संख्येने निवड करायची झाल्यास मैत्रिणींनी अभियांत्रिकी शाखेत शिक्षण प्राप्त केले असे म्हणायला वाव आहे. वयोगटाचाही तांत्रिक शिक्षणावर परिणाम (निदान) भारतीय स्त्रियांबाबत काहीसा दिसून येतो.

 • कोणत्याही शाखेचे आणि कोणत्याही स्तरावरचे शिक्षण घेताना, ६५% स्त्रियांना आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडता आला. ३३% स्त्रियांनी परिस्थितीनुसार अभ्यासक्रम निवडला. फक्त २% स्त्रियांनी पालकांच्या दबावाखाली निवड केली.

  "हो मी भूगर्भशास्त्र निवडले कारण लहानपणासून बाहेरची Life Scienceची आवड होती."

  अशा सारखी तुरळक प्रतिक्रिया आली.

 • मनात होते तेवढे शिकता आले का?

  या प्रश्नाला ३४% स्त्रियांनी अजून शिकायचा मानस आहे असे नमूद केले आहे आणि ६ % स्त्रियांनी परिस्थितीवश सोडावे लागल्याचे नमूद केले आहे.

  ६०% स्त्रियांनी आपल्या मनात होते तेवढे शिकता आल्याचे नमूद केले आहे.

 • शिक्षणाच्या बाबतीत घरून भेदभाव जाणवला का या प्रश्नाला फक्त ५% स्त्रियांनी होकारार्थी उत्तर दिले आहे.
  यापैकी दोघींनी तशाही परिस्थित पी.एच्.डी पर्यंत तर दोघींनी द्विपदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
 • आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडूनही त्याला न्याय दिला नाही असे वाटणार्यांची संख्या १५ आहे. आवडीच्या अभ्यासक्रमाला न्याय दिला असे ४० जणींना वाटते. ज्यांनी परिस्थितीनुसार शिक्षणक्रम निवडला त्या ३१ जणींपैकी १५ जणींना न्याय दिला असे वाटते, तर १५ जणींना नाही दिला असे वाटते. प्रामाणिकपणे माहित नाही असेही उत्तर आले. असे म्हणता येईल की आवडीचा अभ्यासक्रम निवडलेल्या बहुतांशी स्त्रियांना आपण पुरेसा न्याय दिल्याचे वाटते.

  हो. मी XX केले. XX म्हणूनच काम करायचे होते. आता क्वालिफाय होऊन १० वर्ष झाली आणि तेच काम करत आहे. त्याचे खूप समाधान वाटते. शिकलेल्या गोष्टी करता आल्या, खाचाखोचा कळल्या, आनंद मिळाला. लॉ शिकले, त्याचाही कामात उपयोग होतो.

  इंजिनियरींगची सीट वाया घालवली नाही याचा आनंद होतो

  नक्की कळत नाही. शिक्षणाला न्याय म्हणजे नोकरी असेल तर हो. पण शालेय शिक्षणासोबत आपण इतरही बर्‍याच गोष्टी शिकत असतो. पुस्तकांमधून, कर्तुत्ववान माणसांकडून आणि समाजाकडूनही. त्याचा अजूनतरी उपयोग केलाय असं वाटत नाही.

  हो, हवं तेवढं आत्तापर्यंत शिकले. लग्न होउन इथे आले (परदेशात). त्यामुळे अजुन नोकरी करता येत नाही. ती मिळाली शिक्षणाचा काही उपयोग झाला तर जास्त बरे वाटेल.

  नाही. लग्न झाल्यावर शिक्षणाचा उपयोग करायची संधीच मिळाली नाही.

  घरात भेदभाव कधीच नव्हता. पण अभ्यासक्रम निवडताना आपल्याला पुढे करिअर करायचे आहे.......किंवा या शिक्षणाचा पुढे अर्थार्जनासाठी काही उपयोग करायचा आहे हा विचारच नव्हता. सायन्स/गणित आवडत नव्हते/कळत नव्हते म्हणून व भाषांमध्ये ईन्टरेस्ट होता म्हणून आर्ट्सला अ‍ॅडमिशन घेतली. आमच्या पिढीतल्या बहुसंख्य मुली हाच ऑप्शन निवडत..... आजच्या पिढीला हे आश्चर्यकारक वाटेल. त्यांचा फोकस्ड हा शब्द मला खूप आवडतो ...जो मी कधीच वापरला नाही. आत्ता वाटते की आपण कधी अर्थार्जनाचा विचार का केला नाही?

  खेडेगावात दवाखाना असल्याने शिक्षणाचा योग्य उपयोग होतो आहे असे वाटते.

  Yes, I had to prove myself that I am capable of studying science/engg. Then I worked in software field. Then I did my masters in chip design and am working in the same field. I could still study more in this topic to enhance my skills.

 • ६४% स्त्रियांच्या शिक्षणाचा त्यांच्या नोकरीशी थेट संबंध आहे. १५% स्त्रियांचे नोकरीचे क्षेत्र त्यांच्या शिक्षणापेक्षा अगदीच वेगळे असल्याचे सांगितले. ९% स्त्रियांच्या नोकरीत त्यांच्या शिक्षणाचा थोडाफार संबंध आहे.

  इथे शिक्षण म्हणजे फॉर्मल डिग्री शिक्षण असे विचारात घेतले आहे.

 • शिक्षणाने आपल्याला नक्की काय दिले यामधे सर्वात जास्त महिलांनी सांगितले की त्यांना शिक्षणाने आत्मविश्वास दिला आणि स्वावलंबी बनवले. असे सांगणार्‍या स्त्रियांचे प्रमाण ३७% (प्रत्येकी ४५) आहे.

  एक प्रामाणिक उत्तर असेही आहे की अपुर्‍या शिक्षणाने काहीच फायदा झाला नाही, पण शिक्षण पूर्ण झाले असते तर कदाचित फायदा झाला असता. विचार करण्याची क्षमता मिळाली असे २७% (३३) स्त्रियांना वाटते. Domain Knowledge मिळाले- हे प्रत्यक्ष फायदे १२ जणींनी सांगितले. स्वत:ची ओळख झाली असे १३ जणींनी सांगितले. चांगला जोडीदार मिळाला असे २ जणींनी सांगितले.

  बाकीच्या प्रतिसादांमधे मित्रमैत्रिणी (किंवा नेटवर्किंग) ६ जणींनी सांगितले. ६ जणींनी आनंद मिळाला असेही सांगितले. वैचारिक आणि मानसिक संतुलन किंवा स्थैर्य मिळाले असे सांगणार्‍या ५ जणी आहेत. जगाशी जुळवून घेण्याची कुवत आणि निर्णयशक्ती मिळाली असे प्रत्येकी ९ जणींनी सांगितले.

 • घरातील शैक्षणिक पार्श्वभूमी, सुधारकी वातावरण, आर्थिक परिस्थिती याचा स्त्रियांच्या शिक्षणावर किती प्रभाव पडतो याचे काटेकोर विश्लेषण करण्याएवढा ठोस पुरावा आमच्याकडे नाही तरी ह्या काही प्रतिक्रिया. या पिढीबाबत जरी मध्यमवर्गीय वा सुखवस्तु अशी आर्थिक परिस्थिती असली तरी या प्रश्नाला उत्तर देताना आधीच्या पिढीने आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना घेतलेले शिक्षण आणि मिळालेले उत्तेजन याबद्दल खास जाणीव दिसली.,

  आई कॉमर्स ग्रॅड. सरकारी नोकरीत ३३ वर्ष आहे. बाबा एमकॉम,एलेल्बी, सीए. आईच्या नोकरीच्या आधारे त्यांनी बरंच शिक्षण पूर्ण केले. आईची नोकरी कायमच प्रायमरी. बाबा त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करू शकायचे. आईनी सगळी प्रमोशन्स नाकारली.. मोठा भाऊ - मेकॅनिकल इंजिनिअर. आजी बहुतेक ७वी किंवा १०वी पर्यंत शिकली असावी, अजुनही सतत वाचत लिहीत असते वयाच्या ९३व्या वर्षी..

  आजोबा खूप हुषार होते इतकेच माहीत. शाळेत मुख्याध्यापक. माझ्या आईने देखील पाहीले नाहीये त्यांना, त्यामुळे शिक्ष्णाबद्दल कल्पना नाही.

  आई - एम ए, एम फिल संस्कृत, संस्कृत प्रोफेसर होती. वडील - एम कॉम, आय सी डब्ल्यू ए, एका मोठ्या कंपनीची फायनान्स व्हि पी म्हणून निवृत्त. आजी १ - तिचे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने इंग्रजांच्या शाळेत न घालता घरीच शिक्षक बोलावून शिक्षण झाले. मॅट्रीक equivalent. आजोबा १ - डबल एम ए, पी एच डी. एका कॉलेजच्या एका भाषा विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते.
  आजी २ - माझ्या आईच्या बरोबरच आपले राह्यलेले मॅट्रीक पूर्ण केले.
  आजोबा २ - व्हिजेटिआय चा इंजिनियरींग डिप्लोमा (ज्या काळात डिग्री अस्तित्वातच नव्हती)

  Grandparents - Uneducated, Mother - 10th Pass, Father - Graduate
  वडील - मॅट्रिक - गरिबीमुळे पुढील शिक्षण शक्य झाले नाही. आई - बी ए - सगळी भावंडे किमान पदवीधर. दोघेही सरकारी नोकरीत. आता निवृत्त.

  आई-७ पास, वडिल- पदवीधर,आजी- ४ थी,१ भाऊ ३बहिण: पदवी,आजोबा- निरक्षर,वहिनी- १० वी,नवरा- पी एच डी,सासु- निरक्षर,सासरे- पदवी,दीर- पदवी, पदवी,जावा- १२ वी, निरक्षर

  आई - १० वी नापास, वडील - ७ वी पास


stline2.gifनिष्कर्ष

वर नमूद केल्याप्रमाणे उच्चशिक्षित, बहुतांशी शिक्षणाची समान संधी उपलब्ध झालेल्या, बहुतांशी आवडीचा अभ्यासक्रम निवडता आलेल्या आणि त्याला आपण पुरेसा न्याय दिला असे वाटणार्‍या, बहुतांशी मनासारखे शिकता आलेल्या किंवा अजून शिकायचा मानस असलेल्या मैत्रिणीचा चेहरा यात काहीसा स्पष्ट होतो. प्रत्येक स्तराच्या शिक्षणाबरोबरच बहुतांशी पूर्णवेळ नोकरी करणार्‍या मैत्रिणी आहेत. नोकरीतील पदभार, नोकरीतील समान संधी याचा पुढील एका भागात आपण परामर्श घेणार आहोत.

मनासारखे शिकता आलेल्या/शिक्षणाला न्याय देऊ शकलेल्या स्त्रिया आणि हे न करू शकलेल्या अपवादात्मक स्त्रिया यांच्यात वय किंवा राहण्याचे ठिकाण असा काही 'पॅटर्न' दिसून आला का? म्हणजे प्रत्येक बदलत्या पिढीगणिक हे चित्र समाधानकारक होतं आहे किंवा ठराविक शहरांत हे चित्र जास्त आशादायक आहे असं काही?

स्वाती,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
नाही असा काही स्पष्ट ठोस संबंध प्रस्थापित करता आला नाही. भारतीय वंशाच्या स्त्रियांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण आणि वय (अलिकडची पिढी) असा परस्परसंबंध असावा, परंतू काही मैत्रिणींने शिक्षणशाखेची पूर्ण तपशीलवार माहिती न दिल्याने आकडेवारीनुसार ठोस संबंध प्रस्थापित होत नाही.

- विश्लेषकचमुच्या वतीने

वा, इत्क्या उच्चशिक्शित बायका पाहून आनंद झाला. पण मराठी साईट्वर येणार्या बायका खूप शिकलेल्या असणारच ना. पण घरात शिक्शणाचे वातावरण असेल तर शिकायला पाठींबा मिळतो.