पालक पनीर रोल

Submitted by आरती on 3 March, 2010 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी जुडी पालक, १०० ग्रॅम पनीर, एक मध्यम आकाराचा ब्रेड [१०-१२ स्लाईस], ५ हिरव्या मिरच्या, ५ लसुण पाकळ्या, मीठ चवीनुसार, तळायला तेल.

क्रमवार पाककृती: 

ब्रेड स्लाईस च्या कडा सुरीने काढुन टाकाव्या,
पनीर चे साधारण दिड ईंच x अर्धा ईंच असे तुकडे करुन घ्यावे,
धुतलेल्या पालकाची पाने, हिरमी मीरची, लसुण मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे,
त्यात चवी प्रमाणे मीठ आणि अर्धा कप पाणी घालावे,
हिरव्या रंगाच्या या मिश्रणात कडा काढलेल्या स्लाईस एक - एक करुन भिजवाव्या,
हाताने मळुन त्या मिश्रणाचा गोळा तयार करा [साधारण थालपिठाच्या पिठा सारखा गोळा तयार होतो],

छोटा गोळा घेउन तळव्यावर गोल चकती करावी, पुरीच्या आकाराची, त्यावर पनिर चा एक तुकडा ठेउन,
तो तुकडा पुर्ण झाकला जाईल अशाप्रकारे गुंडाळावी.

तापलेल्या तेलात तळावे, सॉस बरोबर खाण्यास द्यावे.

DSC02675.JPG

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन ... :)
माहितीचा स्रोत: 
बहुदा ई टीव्ही मराठी किंवा झि टीव्ही मराठी :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करायला सोपी आणि मस्त पाककृती! ब्रेड पालकाच्या मिश्रणात मळून घ्यायची कल्पना फारच आवडली! (अश्याप्रकारे मल्टीग्रेन ब्रेड संपवायला मदत होईल.) थँक्यु! Happy

'नविन लेखन' मधुन 'नविन पाकक्रुती' मधे हलवणार्‍यांचे आभार Happy
साहित्यः हा शब्द मला संपादनात दिसत नाही त्यामुळे काढता आला नाही. क्रुपया, प्लीज जरा काढणार का ?

चिज घालून >> अरे वा, अजुन छान लागतील, पुढच्या वेळेस नक्की.

आरती, जबरी दिसतायत रोल्स. करुन बघायला पहिजेत.
सखी, मलाही तोच प्रश्न पडलाय शॅलो फ्राय किंवा बेक केले तर???

बादवे, आरती तु साहित्य मधे पनीर लिहीलेच नाहियेस...:) की मलाच दिसत नाहिये Uhoh

सखी, लाजो
शॅलो फ्राय करुन बघायला हरकत नाही. थोडे कच्चे लागतील असे वाटते.

आरती तु साहित्य मधे पनीर लिहीलेच नाहियेस >> खरच की Happy

रॉबीन, नविन नाही, बचपन की आदत Happy
फोटो च काय आकार - उकार पण गंडले आहेत. वेळेचा अंदाज चुकला थोडा Sad

आजच केले. मस्त जमले.
पण तळल्यानंतर रंग एकदम हिरवागार राहिला नाही.. रंगासठी काही युक्ती आहे का?
(मी व्हीट ब्रेड वापरला व लो-मेडियम्-हाय अशा ३ही टेम्परेचरवर तळुन पाहिले , पण रंग नाही आला वरील फोटोसारखा)

धन्यवाद... एकदम झटपट रेसिपी

आज केले पनीर रोल. मस्तच लागतात Happy मी पण व्हीट ब्रेड वापरला. त्यामुळे कॅलरीजकडे दुर्लक्ष केल्यास व्हाट्टहेल्दीफूडसर्जी Wink

केले शेवटी हे रोल्स..
काल घरी पालक नवमी साजरी केली.. पालक पुलाव आणि पालक पनीर रोल Wink
मस्त झालेले पनीर रोल्स पण माझ्याही रोल्सनी रंग बदलला. फोटो काढायच्या आधीच संपले.