सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ५ ब (धुंद रवी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 00:11

· डॉ. अनिल अवचट ह्यांना लिहलेलं पत्र - २००९
-धुंद रवी

Patra 02 - Dr. Anil Awachat - dhund ravi_Page_1.jpgPatra 02 - Dr. Anil Awachat - dhund ravi_Page_2.jpgPatra 02 - Dr. Anil Awachat - dhund ravi_Page_3.jpgPatra 02 - Dr. Anil Awachat - dhund ravi_Page_4.jpgPatra 02 - Dr. Anil Awachat - dhund ravi_Page_5.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुन्द्या, तुझ अक्षर हे असच हे का कायमच??? Wink
ते काने तम्बुचा वासा जमिनीत पुरल्याप्रमाणे येवढे खालवर का खुपसले आहेत? Proud

पुढील मजकुर "झब्बू" नाही.
तर वरील देवनागरीतील हस्ताक्षर (मजकुर नव्हे) बघितल्यावर माझ्या मनात जे विचार उद्भवत गेले ते मान्डलेत
(अस्थानि वाटल्यास डिलीट मारण्याची विनन्ती अ‍ॅडमिनकडे जरुर करा)

मान्य आहे, काही जणान्ना "उदात्त/भव्य/दिव्य वगैरे स्वप्न" बघायची देखिल भिती वाटू शकते, न जाणो येवढ्या उन्चीवरून पडलो तर?
मान्य आहे, कित्येकान्ना आपल्या सदैव चन्चल पाखराप्रमाणे विहरणार्‍या मनाला, कागदी पतन्गाला जसा दोराने पकडून धरावा, तसे कशासतरी बान्धलेले असण्याचि आवश्यकता भासते.
पतन्ग डचमळू नये म्हणून जसे त्यास लाम्बलचक शेपूट लावतात, तसे कस्ले तरी वैचारिक तात्विक शेपुट साम्भाळावेसे वाटते.
मान्य आहे मला, की पूर्वायुष्यात असन्ख्यवेळेस वा सदैवच नाकारला गेल्यानन्तर किन्वा नाकारले जाण्याची भिती बाळगुन असल्याने, मग दरवेळेसच स्वतःस ठामपणेच सिद्ध करीत रहायची कायमची सवयच लागुन जाते.
मला हे ही मान्य आहे, की परिस्थितीवश, परिस्थितीला शरण जाऊन असन्ख्यवेळेस आपले नियोजित बेत बदलायला लागल्यावर होणारा चडफडाट, अन तो व्यक्तही करता येत नाही कधी कुणाशी, अन म्हणूनच नन्तरच्या प्रत्येक कृतीत वेळप्रसन्गी हेकट वाटेल असा कृतनिश्चय अन्गी बाणवला जातो.
पूर्वानुभवामुळे, माझ्या नजरेसमोर येऊन उभी रहातात भविष्यकाळातील वादळे, अन त्यान्ना तोन्ड देता देता उन्मळून पडण्याच्या भितीने मी माझी मुळे अधिकाधिकच खोलवर जमिनीत घट्ट रोवत जातो, माझी तत्वे, माझी विचारप्रणाली यान्ना अपरिवर्तनीय बनवित मी त्यास घट्ट कवटाळून बसतो.

धुन्द्या, दोन्ही पत्रातील तुझ्या खोलवर जात असलेल्या "कान्यान्कडे" पाहून मला वरील सर्व सूचले. अस्थानी वाटत असेल, तर कुठेतरी दुसरीकडे सेव्ह करुन इथून उडवुयात Happy

बी, मी ही अगदी हेच लिहीणार आहे. खरंतर पत्र वाचलंच नाहीये मी Wink हा प्रतिसाद फक्त हस्ताक्षरासाठी. हस्ताक्षर म्हणजे पावसाच्या सरीच जणू. आणि त्या अगदी पांढर्‍या कागदापेक्षा निळसर कागदावर सुंदर दिसतायत.

आउटडोअर्स ने निळ्या कागदावर.... लिहिले ते वाचुन मला ब-याच वर्षापुर्वी वाचलेले आठवले. एका लेखकानेच लिहिले होते, - त्यांचे एक स्नेही होते आणि दोघांमध्ये बरीच पत्रापत्री चालायची. एकदा लेखकांना कामाच्या गडबडीत बरेच दिवस पत्रच लिहिता आले नाही, तेव्हा त्या स्नेह्यांनी एका पोस्टकार्डवर अतिशय फिकट शाई वापरुन पुर्ण पोस्टकार्डभर 'पत्र का लिहिले नाही?' ही ओळ अगदी लहान लहान अक्षरात लिहिली, पत्र त्यामुळे निळसर दिसायला लागले, आणि मग त्या बॅकग्राऊंडवर अगदी ठळक मोठ्या डार्क निळ्या अक्षरात 'पत्र का लिहिले नाही?' असे लिहिले आणि दिले धाडून...

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण इथेही वेगवेगळी पत्रे पाहुन एकदम आठवले... Happy